चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बजेटपेक्षाही एक प्रकारची कल्चरल सेन्सिटीव्हिटी (संपन्न सांस्कृतिक जाणीवा) हवी. उदा: मार्टीन ल्युथरच्या जीवनावर नाटक केले तर त्यात गौरवर्णीय नट भूमिका उत्तम करतो म्हणून घेतला तर त्यात चूक नाही. (हा खरा उदभवलेला वाद आहे). पण असे करणे एक प्रकारची इन्सेटीव्हिटी आहे. काशीबाई नाचली हे दाखवले ह्यात चूक नसेलही पण ते विपन्न सांस्कृतिक जाणीव गटात मोडते.
शेखर कपूरचे म्हणून कौतुक वाटते. एलिझाबेथ बनवला त्यात रिसर्च टीम होती हे खरं पण सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली उगीच इन्सेसेटीव्ह गोष्टी नाही दाखवल्या. भंसाळीसारखे लोक आपल्या देशाच्या शासक लोकांचा धड सिनेमा बनवत नाही तर दुसर्‍याच्या राणीवर सिनेमा करणे मोठी गोष्ट आहे.

चिन्मय, म.वि. सोवनी यांच्या पुस्तकांमधे असलेले दागिने आणि वस्त्र सिनेमात आहे याबद्दल मला शंका आहे. मी भारतातून हे पुस्तक मागवलं आहे. आल्यावर वाचून इथे लिहीनच. पण ज्या मैत्रिणीकडे हे पुस्तक आहे तिनंही शंका उपस्थित केल्या आहेत.

सीमंतिनी, तुझी इच्छा पूर्ण झाली गं बाई. बाजीराव धत्तड धत्तड करत नाचला गं बाई नाचला. फक्त 'आता माझी सटकली' नाही म्हणला पण दुष्मनची वाट लावेन म्हणाला.

Proud

रमा माधव मधले बायकांचे "झुमके" मराठी पेशविण कळातले तरी वाटले नाहित.

मी वाचलेल ( हो म. वि. सोहनी) पुस्तकात मोत्यांच्या कुड्या असत हाच संदर्भ आठवतोय. पुर्ण कान असत त्याला लोलक असत.
पण एकदम उत्तर भागातील झुमके नसत.

झुब्यांचे फोटो मी औंधच्या पंतप्रतिनिधींच्या वाड्यात पाह्यलेले आहे. अर्थात तो काळ रमा-माधवच्या नंतरचा होता.
सोवनींचा रिसर्च य वेळा वाचून झालाय माझा पण माझी ती फिल्म बघायची राह्यली त्यामुळे नो कमेंटस.
पण प्रोमोजमधे दागिने पदरावरून घातलेले दिसले. ते पटले नाही.

सीमंतिनी, तुझी इच्छा पूर्ण झाली गं बाई. बाजीराव धत्तड धत्तड करत नाचला गं बाई नाचला. फक्त 'आता माझी सटकली' नाही म्हणला पण दुष्मनची वाट लावेन म्हणाला. >> Biggrin त्या गाण्यात कोरस लोक काय म्हणतात? "फक्त हाण"?? चुकीची ऐकू आलेली गाणी मध्ये लिहायला हवे काय? Happy

रमा-माधव मध्ये कानात झुबे मलापण थोडं वाटलं विचित्र, मोत्याच्या कुड्या प्रचलित असतील जास्त असं वाटलं. माझा अभ्यास वगैरे अजिबात नाही त्याबाबत पण मृणाल कुलकर्णी आणि नितीन चंद्रकांत देसाई ह्यांच्यासारखी अभ्यासू, तळमळीने इतिहास मांडणारी माणसं ह्या प्रोजेक्टशी संबधित आहेत त्यामुळे ते असू शकेल, त्यांनी काहीतरी विचार केला असेल असं मात्र वाटलं.

आलोक राजवाडे आणि छोट्या रमाने छान काम केलं. पर्ण पेठे ठीकच वाटली.

लहान माधवराव आणि मोठा माधवराव हा एकच अभिनेता आहे का? म्हणजे मोठा झाल्यावर त्याला मिशी लावली आहे बहुतेक. मला वाटले की इतक्या तंतोतंत चेहर्याचे २ अभिनेते कसे काय शोधले असतील. नंतर वाटले की तो एकच असावा.

शेवटी बाजीराव ( सॉरी रणवीर ) नाचलेच !!!
जोशपुर्ण आहे पण ते मराठी वाटत नाही.. शिवाय वाट लावली हा शब्दप्र्योग पेशवेकालीन वाटत नाही. आता यावरून पण वादंग माजणार असे दिसतेय. त्या मानाने गजानना छान आहे पण त्याचे चित्रीकरण कसे केले असेल, ते भन्साळीच जाणे.

काल रिंगा रिंगा बघितला, छान रहस्यपट आहे. सोनाली कुलकर्णी, अजिंक्य देव, संतोष जुवेकर, भरत जाधव, अंकुश चौधरी सगळ्यांच्याच एकदम वेगळ्या भूमिका आहेत. एकदम वेगवान आणि धक्कातंत्राचा मस्त उपयोग केला आहे.

परवा अजिंक्य देव एका कार्यक्रमात पाहिला. रमेश देव अजून त्याच्या पेक्षा पांढर्‍या केसातही हँड्सम दिसतात.

हो रमेश देव एकदम dignified दिसतात!

पण अजिंक्यही छान दिसतो, एकदम फिट आहे आणि कामही मस्त केले आहे. या चित्रपटातल्या 'मस्ती की बस्ती' या गाण्याची धुन सारखी आधी ऐकलेली आहे असं वाटत होतं, नंतर कळलं की अजय अतुलने हीच चाल बोल बच्चन मधल्या 'नच ले' साठी वापरली आहे! पण मस्ती की बस्ती ऐकायला झकास आहे, एकदम typical Goa carnival song सारखं आहे.

सहमत. त्याचा वावर व बोलणेही ही एकदम सहज होते. काही वर्षांपूर्वी आलेल्या वासुदेव बळवंत फडके चित्रपटानंतर दिसला नाही फारसा तो. रिंगा रिंगा मधे मात्र जाम आठवत नाही. तो पिक्चरच फारसा आठवत नाही.

अजय अतुलने हीच चाल बोल बच्चन मधल्या 'नच ले' साठी वापरली आहे!>>>>>>>>> आणि त्याआधी बायको बायको विलायती बाय्को (असंच काहीतरी) मराठी गाण्यासाठी.

सासुकृपेने प्रेम रतन पाहिला. मध्येच थोडे दुर्लक्श झाले तेव्हा माझ्या लक्षात आले नाही की राजकुमाराला किती आई असतात? नील नितिन मुकेशची आई, त्या बहीणींची आई आणि सलमानची आई या तिघी वेगवेगळ्या असतात ना?

सस्मित ते गाणं,

बायगो बायगो,
विलायती नायगो,
फेणीची हायगो,
वायली मजा.

असं काहीतरी आहे बहुतेक.

मी अमि,
मी पण येता जाता पहायचा प्रयत्न केला प्रे.र.ध.पा.
तोच प्रश्नं पडला, राजानी (समीर धर्माधिकारी ?)नक्की लग्नं तरी किती केली , सगळेच सावत्रं Proud
असो, असेनात का ३ बायका त्या सगळ्यांवर इक्वली प्रेम केलं पाहिजे कारण प्रेम म्हणतो " वो लोग खुषनसीब होते है जिनकी फॅमिली होती है " Biggrin

मी अमि,
राजाला २ च बायका असतात. सलमानची आई बहुधा मेलेली असते, नीनिमु ची आई - राजाची दुसरी बायको असते. मुलींची आई केवळ प्रेमपात्र असते. लग्नाची बायको नव्हे. म्हणून तर माशुका की बेटीयाँ असा उल्लेख आहे त्यांचा Happy

बडजात्यांच्या सिनेमात एक-ना-एक बायको मरते का? आलोकनाथची बायको असती तर मैंने प्यार किया नसता झाला. मोहनीशची बायको असती तर हम आपके नसता झाला. हम साथ साथ मध्ये आलोकनाथची पहिली बायको असती तर सगळं सुरळीत झालं असतं. बायांच्या जीवावर का उठतात बडजात्या?? संस्कारी असले कसले!! Sad Wink

Pages