Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डिव्हीडी वर पाहिला मी. तुम्ही
डिव्हीडी वर पाहिला मी. तुम्ही नेट वर शोधू शकता, तुम्हाला योग्य वाटल्यास. यु ट्यूबवर आहे असं वाटतं.
थँक्स श्रद्धा... छान होता
थँक्स श्रद्धा...
छान होता तो, फक्त नाववाले कलाकार नव्हते म्हणून चालला नाही बहुतेक.
अर्जून रामपालला अपघात होतो.
अर्जून रामपालला अपघात होतो. चेहरा विद्रुप होतो, डॉक्टर खुप प्रयत्नाने त्याला चेहरा मिळवून देतात. बायको त्याला पुर्वीच्या स्मृती आठवून देते... पण पुढे सगळाच घोळ आहे. शेवटी उकलही छान आहे. >>> मुक्ता बर्वेचं 'लव्हबर्ड्स' हे नाटक असंच आहे. चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे कथा पूर्ण जुळते आहे का ते माहीत नाही.
टीना मुनीमची अपघातानंतर पूनम
टीना मुनीमची अपघातानंतर पूनम धिल्लों होते असा पण एक सिनेमा होता - यह वादा रहा का काही.. अर्जुन राम्पाल कोण होतो?? ह्रितिक का काय?
लव्हबर्डस नाटकावरूनच तो
लव्हबर्डस नाटकावरूनच तो चित्रपट घेतला आहे. कथा साधारण तीच आहे. चांगला रहस्यपट आहे.
टीना मुनीमची अपघातानंतर पूनम
टीना मुनीमची अपघातानंतर पूनम धिल्लों होते असा पण एक सिनेमा होता - यह वादा रहा, हो पण मला वाटतंय पूनमची टीना होते. हिरो ऋषी कपूर बहुतेक.
तू तू है वही दिलने जिसे अपना कहा,
तू है जहा मै हु वहा,
अब तो जिना तेरे बिन है सजा.
हे गाणं आठवलं लगेच,
.
बरोबर, पूनमची टीना होते गाणी
बरोबर, पूनमची टीना होते
गाणी मस्त होती सगळीच!
टीना मुनीमची पूनम झाली काय
टीना मुनीमची पूनम झाली काय किंवा व्हाईस वर्सा, अॅक्टींगची बोंब राहणारच आहे.
अनबिलीव्हेबल मर्डर असंच नाव
अनबिलीव्हेबल मर्डर असंच नाव आहे का? या नावाचा सापडला नाही म्हणून विचारतोय.
मर्डर वर चर्चा चाललेली, तर 'मेकिंग ए मर्डरर' डॉक्युमेंटरी बघतंय का कोणी? नेटफ्लिक्सवर हॉलिडेज मध्ये आल्येय, सगळे एपिसोड एकदम टाकलेत. स्टीव्हन एव्हरी विरुद्ध विस्कोन्सिन स्टेट या गाजलेल्या केसवर आणि एकूणच क्रिमिनल जस्टीस सिस्टीमवर आहे. बघवत नाही पण पुढचे एपिसोड खुणावत राहतात. इंटरेस्ट असेल तर जरूर बघा.
लव्ह बर्ड्स चीच कथा ती, पण
लव्ह बर्ड्स चीच कथा ती, पण लव्ह बर्ड्स नाटक आता परत आलंय, पहिल्या अवतारात संजय मोने आणि डॉ गिरीष ओक होते. पण त्या नाटकाच्या वेळी निवेदनात, कथा कल्पना परकीय असे आवर्जून सांगत असत ( म्हणजे याच कथेवर आधीही चित्रपट आलाय. )
मराठीतही हा खेळ सावल्यांचा (
मराठीतही हा खेळ सावल्यांचा ( आशा काळे, डॉ घाणेकर, लालन सारंग, राजा गोसावी ) हा एक बरा सस्पेन्स सिनेमा होता.
पडछाया ( ऐन दुपारी यमुना तीरी खोडी ऊगी काढली .. हे गाणे असलेला ) पण बर्यापैकी सस्पेंन्स होता, पण त्यातले रहस्य खुनाबिनाचे नव्हते. त्या काळातला तो मल्टी स्टारर होता
सीमा, रमेश देव, डॉ. घाणेकर, लिला गांधी, सचिन, रत्ना, वर्षा, इंदीरा चिटणीस.. असे बरेच कलाकार होते त्यात.
अमितव माफ करा सगळेच. नाव
अमितव
माफ करा सगळेच. नाव चुकवलं मी .
द इमपॉसिबल मर्डर
https://www.youtube.com/watch?v=eE7yMWx7GHI
तो यकीन चित्रपट . त्याच
तो यकीन चित्रपट .
त्याच स्टोरीचा पुरु राजकुमारचा एक्सिनेमा होता.
उलझन नाव होते त्या सिनेमाचे
ॠन्मेष अंकुर अरोरा ची लिंक
ॠन्मेष अंकुर अरोरा ची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. आत्ताच पाहिला. आवडला . मस्त काम केलेय सगळ्यांनी.
काल Conviction नावाचा सिनेमा
काल Conviction नावाचा सिनेमा पाहिला..
सत्य घटनेवर आधारीत.. बहिण भावांची गोष्ट.. केनी नावाच्या व्यक्तीवर खुनाचा आरोप लावुन पोलिस त्याला जेलमधे टाकतात..आणि न्यायालय त्याला आजन्म कारावासाची शिक्षा देते विदाउट पॅरोल.. त्याच निर्दोषत्व सिद्ध करण्याची त्याच्या बहिणीची धडपड आणि शेवट असा मस्त चित्र्पट दाखवला..
त्या दोन भावंडांमधल प्रेम, त्यांच नात, स्वभाव, तिचा त्याला सोडावण्याचा ध्यास अन तिला समजुन न घेता आल्यामुळे तिच्या कुटुंबाची होणारी होरपळ सगळ काही खुप सुंदररित्या मांडलेल आहे..
माणसाचा एखादा गुण वाईट असल्यामुळे तो पुर्णच नाकर्ता होत नाही आणि एखाद्याच पुर्वायुष्य माहीती नसताना निव्वळ त्या व्यक्तीबद्दल बघुन जजमेन्टल होण किती चुकीच असतं हे ठळक कळुन आलं परत एकदा..
नक्की पाहावा असा..
https://www.youtube.com/watch?v=jFrlTFV5M_4
अंकुश अरोरा मलापन आवडला.. खुप
अंकुश अरोरा मलापन आवडला..
खुप आधीच बघीतला..
के के मेनन चा राग राग येतो यातच त्याच्या अभिनयाची दाद आहे..
आणि त्या लेकराच्या आईची दया
जुने चित्रपट डिविडीवर आहेत
जुने चित्रपट डिविडीवर आहेत त्यात खुप काटछाट केलेली आहे. त्यामुळे चित्रपट लक्षात असेल तर लिन्क लागते नाहीतर कधी कधी पडद्यावर काय चालले आहे त्याचा पत्ताही लागत नाही.
तिस्सरी मंझिल डिविडीवर पाहिलेला त्यात "मै तुमपे मरता हु" गाण्याआधीचा सिन आहे, तर गाणेच गडप आहे. परवा यु टुबवर पाहताना आधीचा सिन गडप पण गाणे आहे. त्या सिनच्या आधीचा सिन हेलन आणि शम्मीचा आहे. ज्याने आधी कधीही तिसरी मंझील पाहिला नाही त्याना ह्या थोड्याफार गुगली सिननंतर अचान्क हे गाणे का आले आणि गाण्यात पब्लिक असे का रिअक्ट होतेय याचा पत्ताच लागणार नाही.
फेसबुकवर एका गृपवर जॉय मुकर्जीच्या आओ प्यार करे मधले "ये झुकी झुकी निगाहे" शेअर केलेले पाहिले . गाणे गोड वाटले. अतिशय तरुण संजिव कुमार पाहुन चित्रपट युट्युबवर शोधला आणि पाहिला. सण्जिव कुमार अगदीच साईडरोल मध्ये आहे आणि श्रेय नामावलीत त्याचे नाव संजय आणि मॅकमोहनचे नाव ब्रिज्मोहन दिलेय. चित्रपटातली सगळि गाणी सुंदर पण चित्रपट इतका कापलाय की पत्त्तच लागत नाही काय चाललेय त्याचा. शेवटचा अर्था तास तर पाच मिनिटात गुंडाळलाय.
अंजली वेलकम टीना, येस्स, के
अंजली वेलकम
टीना, येस्स, के के मेनन या नावावरच मी बघायला घेतला होता. त्याने तर अपेक्षा पुर्ण केलीच पण सर्वांचाच अभिनय संतुलित आहे. अश्या चित्रपटांसाठी अभिनयाची बाजू चांगली असणे खूप गरजेचे असते.
टीना, त्या चित्रपटाला थोडा
टीना,
त्या चित्रपटाला थोडा ऐतिहासिक संदर्भ आहे. रक्त चाचणी पद्धतीत पुढे ज्या सुधारणा झाल्या, त्यामूळे सत्य बाहेर आले. त्या बहिणीची खरेच कमाल आहे.
हो ना.. खरचं त्या बहिणीला
हो ना..
खरचं त्या बहिणीला मानावे लागेल..
तिस्सरी मंझिल डिविडीवर
तिस्सरी मंझिल डिविडीवर पाहिलेला त्यात "मै तुमपे मरता हु" गाण्याआधीचा सिन आहे, तर गाणेच गडप आहे. परवा यु टुबवर पाहताना आधीचा सिन गडप पण गाणे आहे. >>>> +१
तीसरी मंझिलमधून जवळजवळ १० मिनिटांचा सीन गायब झाला आहे. ओ मेरे सोना गाण्यानंतर आशा पारेख आणि शम्मी परत भेटतात, त्यात आशाच्या मैत्रिणी मधेच टपकतात. शम्मी प्रेमनाथच्या घरी आशा आणि तिच्या मैत्रिणींना तो आपला काका असल्याचे सांगून घेऊन जातो. प्रेमनाथ अचानक तिथे उगवतो पण तोही त्याचे बिंग फुटू देत नाही. या सीननंतर आशा पारेख आणि शम्मी जत्रेत भेटायचे ठरवतात. त्यात आशा समजून तो दुसर्याच मुलीला मिठी मारतो आणि तिचे नातेवाईक त्याला मारायला येतात. या सीननंतर लगेच देखिये साहिबा, मै इनपे मरता हू हे गाणं आहे. बहुतेक सर्व डीवीडी आणि ऑनलाईन साईटवर हा पूर्ण सीन गाळलेला आहे, त्यामुळे प्रेमनाथची एंट्री, अचानक जत्रा कुठून आली अशा अनेक बाबींचा उलगडा होत नाही
जेव्हा दूरदर्शनवर हा चित्रपट दाखवला होता (खूप खूप वर्षांपूर्वी), तेव्हा त्यात हा सीन होता पण देखिये साहिबा हे गाणं नव्हतं, अर्थात हे गाणं नसल्यामुळे काही फार फरक पडला नाही. चित्रपटातील इतर गाण्यांच्या तुलनेत हे गाणं थोडं कमी पडतं, चित्रपटातही उगीचच घुसडल्यासारखं वाटतं.
पूर्वी दूरदर्शनवर हिंदी
पूर्वी दूरदर्शनवर हिंदी चित्रपट दाखवायचे तेव्हा वेळेत बसवण्यासाठी बर्याच वेळा एखादं गाणं कापलं जायचं. काही आठवतात ती लिहीत आहे.
ज्वेल थिफमधलं बैठे हो क्या उसके पास
शागीर्द मधलं कान्हा कान्हा
शर्मिली मधलं रेशमी उजाला है
तीसरी मंझिल मधलं देखिये साहिबा
आरजू मधली बायकांची कव्वाली
आम्रपाली मधलं तडप ये दिन रातकी
छोटीसी मुलाकात मधलं ए चांदकी झेबाई
आणि एखादा हेलनचा कॅब्रे असेल
आणि एखादा हेलनचा कॅब्रे असेल तर तोही धारातीर्थी पडायचा. छायागीतात गाणी दाखवायचे त्यातही इतके एडिटिंग.... परत परत तेच ते आकाश आणि तीच ती फुले पडद्यावर आली कि समजायचं कात्री चालवली म्हणून.
शोले मधलं मेहबूबा हे हमखास
शोले मधलं मेहबूबा हे हमखास कापल जाणारं गाणं..
अलिकडे झी सिनेमा वर दाखवतात मात्र
नाहीतरी स्टोरीच्या दृष्टीने
नाहीतरी स्टोरीच्या दृष्टीने मेहबूबा हे गाणे उटपटांगच आहे. गाणे म्हणूनही ती वेस्टर्न गाण्याची तंतोतंत कॉपी आहे. त्यामुळे कट केल्याने नुकसान नाही...
२ स्टेट्स पाहिला आताच...
२ स्टेट्स पाहिला आताच... आवडला ! वेळ चांगला कटला.. आणि आलिया कसली गोड मुलगी आहे, आणि किती सहज अभिनय करते.
विल स्मिथ चा 'फोकस' सिनेमा
विल स्मिथ चा 'फोकस' सिनेमा पाहिला. हातचलाखीच्या धंद्यातील छोट्या मोठ्या ट्रिक्स सही आहेत एकदम.
त्यातील फूटबॉल सामन्याच्या वेळचा प्रसंग पण मस्तच आणि शेवटचा ट्विस्ट पण.
एकदा नक्की बघण्यासारखा आहे.
काहीतरी काय पादुकानंद. अहो
काहीतरी काय पादुकानंद. अहो महबूबा गाणे तर जान आहे. हेलन काय दिसते. आणि काय नशीला
माहो ल आहे. असे बोलोन दाखवून मी लहान पणी जाम बोलणी खाल्ली होती. ते कायतरी मॉरली करप्ट गाणे आहे असे म.म. वर्गाला वाटत असे. तसे आजिबात नाही. त्या ऐवजी कोई हसीना कापायला हवे होते.
अख्खा शोलेच कापायला हवा खरंतर
अख्खा शोलेच कापायला हवा खरंतर
शोले मधला कोणताही सीन/गाणे
शोले मधला कोणताही सीन/गाणे कापणार्याचा सक्त निषेध!!
शोले हा शोले आहे आणि त्यातला प्रत्येक सीन्/संवाद गाणे हे किमती आहे.
Pages