चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर लिहिलेस गं स्वप्ना. मलाही हा चित्रपट खुप आवडलेला, आता तु आठवण करुन दिलीस तर परत पाहिन. शर्मिलाहा तिच्या नणंदेशी एक टेलिफोनवर संवाद आहे ज्यात ती शर्मिलाला विचारते येणार का म्हणुन आणि ती इकडे मान डोलावुन उत्तर देते. नणंद परत विचारते मान डोलावली असशिल ना म्हण्न... शर्मिलाला अभिनय करण्याचे फारसे कष्ट नाहीयेत या चित्रपटात. कुछ दिलने कहा मध्ये तोंडची वाक्ये काही वेगळे बोलतात तर तिचा चेहरा काही वेगळे बोलतो. असो. बाकी यामुळे काही बिघडत नाही. शेवटचा सिन डोळे भरुन आणतो मात्र.

>>धुंद मधे झिंतामान आहे ना ?

हो आणि मला वाटतं डॅनी आहे. अ‍ॅगथा ख्रिस्तीच्या एका कथेवर आहे हा चित्रपट. त्यातलं 'इन्सान की हर शय का इतनाही फसाना है,एक धुंद से आना है, एक धुंद मे जाना है' हे गाणं मस्त आहे.

झिनत आणि संजय खान. संजय खान खुपच देखणा होता. वरचे गाणेही खुप सुंदर आहे. डॅनीचे काम खतरनाक आहे एकदम. खुर्चीवर बसुन असतो पण काय टेरर वाटत राहते त्याची. डॅनीने कायम उत्तम कामे केलीत. कधीच पाटीटाकु कामे केली नाहीत.

डॅनीचा तर मुख्य रोल आहे. त्याचा पहिलाच मोठा चित्रपट .या रोलने त्याचा जो इम्पॅक्ट झाला तो अजूनही कायम आहे. 'संसार की हर शय का इतनाही फसाना है,'असे शब्द आहेत. टिपिकल बी आर चोप्रा कॅम्प रवि, महेन्द्र कपूर, साहिर, संजय खान

धुंदमध्ये सिनेमाभर झीनत साडीत आहे, तरीही तिचा एक आंघोळीचा आणि साडी नेसतानाचा सीन आहेच Uhoh ही अशी जबरदस्ती दिग्दर्शकालाच वाटत असावी का, का नटीही त्यात सहभागी होत असावी काही समजत नाही. ’इत्तफाक’ तर काही तासांमध्ये घडणारी गोष्ट. त्यातही नंदाचा साडी बदलतानाचा आणि नंतर ती घरंगळण्याचा सीन आहेच. एकूणातच तिने जी आणि जशी साडी नेसली आहे तेही भयंकरच आहे हा भाग वेगळाच! (मग जेव्हा संलीभा म्हणतो की प्रियांका आणि दिपिका आल्या की नाच आलाच पाहिजे तेव्हा त्याला हा ’इतिहास’ कारणीभूत असावा का- दिग्दर्शकीय सूटीचा?)

आताच्या सगळ्या बाया एकसारख्या दिसतात. एकाच डॉक्टरकडे जाऊन ओठ, नाक, हास्य इ. इ. सुंदर करुन घ्यायचे, एकच टाईपचा मेकप, केस, कपडे.. काहीच वैविध्य नाही. त्यामानाने जुन्या नट्या कधीच एकमेकींसारख्या दिसायच्या नाहीत. फक्त जाडेपणात साम्य असेल. पण दिस्सण्यात प्रत्येकीचे वेगवेगळे वैशिष्ट्य होते. गेले ते दिवस आता.......... आता सगळ्या रोबोसारख्या, एका साच्यातुन काढल्यासारख्या दिसतात. हिरोंचेही तेच. प्रत्येक जण अ‍ॅब बाळगुन. तुशार कपुर सारख्या काही जणांवर तर अगदीच हास्यास्पद दिसते.

पुनम, सहमत. इत्तेफाक पाहताना मलाही खुप खटकलेले ते सगळे. काहीही गरज नव्हती त्याची. पण निर्मात्याची काही गणिते असावित जिथे दिग्दर्शकाला आणि नटीला मान तुकवावी लागत असेल.

संजय खान खुपच देखणा होता.>> + १००० अभिलाषा आठवला Happy ."प्यार हुआ है तुमसे .."

आताच्या सगळ्या बाया एकसारख्या दिसतात. एकाच डॉक्टरकडे जाऊन ओठ, नाक, हास्य इ. इ. सुंदर करुन घ्यायचे, एकच टाईपचा मेकप, केस, कपडे.. काहीच वैविध्य नाही >>> + १००००० .

कालच कुठल्यातरी एका हिरवणीवर चर्चा चालु होती . कलिग म्हणाला नेहा शर्मा आहे , मी म्हटलं नाहे रे दूसरी कोणीतरी . मैत्रिण म्हणते - तसाही दोघामध्ये काय फरक करता येतोय तुम्हाला .
या हिरवीणी आणि केकतेच्या हिरविणी - सगळ्या सारख्याच दिसतात , मेकप करतात , एकाच टाईप ची साडी नेसतात .

मला एका दृष्टीक्षेपात हल्लीची कुठलीही हिरोईन ओळखता येत नाही. Happy अगदी फिगरपासुन सगळे सेम असते. चेहरा क्लोजपमध्ये आला तर कळते.

उलझन , हा संजीव कुमार आणि सुलक्षणा पंडीतचा चित्रपट,
दर्पण, वहीदा रेहमान आणि सुनील दत्तचा चा चित्रपट
अजनबी, राजेश खन्ना आणि झीनत अमान चा चित्रपट

हे तिन्ही जरा वेगळे रहस्यपट होते.. तिन्ही चित्रपटातील एक तिसरेच पात्र शेवटी येऊन खुलासा करते.

@स्वप्ना, घुंघट हा खरंच चांगला चित्रपट आहे. बीना राय आहे म्हटल्यावर थोडी रडारडी असणारच, पण ती तरी सुसह्य आहे. वरती नौकाडूबी या चित्रपटाचा उल्लेख आला आहे. ती टागोरांची कथा आहे आणि घुंघट त्याच कथेवरून घेतलेला आहे. मूळ कथा गुंतागुंतीची असली तरी तिचे सादरीकरण चांगले आहे. भारत भूषण कधी नव्हे तो या चित्रपटात मला आवडला Happy संगीत बहुतेक रवीचे आहे, सगळी गाणी छान आहेत, विशेषतः लताचे 'आज मिले है मेरे सावरिया' आणि 'मोरी पत राखो गिरिधारी' ही खूप सुंदर आहेत.

अनुपमा हा माझाही आवडता चित्रपट! अनेकदा पाहिला आहे.

अनुपमाच्याच टीमचा (धर्मेंद्र, शर्मिला, देवेन वर्मा, शशिकला, तरूण बोस) देवर हा चित्रपटही खूप वेगळा आणि छान आहे. अनुपमा आणि देवर या दोन्ही चित्रपटांचं चित्रीकरण एकसाथच चालू होतं. पण देवर ची कथा आणि त्यात याच लोकांच्या भूमिका अनुपमापेक्षा खूपच वेगळ्या आहेत. जरूर पाहावा.

धुंदमध्ये सिनेमाभर झीनत साडीत आहे, तरीही तिचा एक आंघोळीचा आणि साडी नेसतानाचा सीन आहेच
>>
जरी बाथ सीन असला तरी तो तसा चीप नाही.( जसा मनोरंजन मध्ये होता) ( चोप्रा आहेत ना) . त्या सीनचा कथेशी संबंध आहे. गुंतागुंतीने विमनस्क झालेली नायिका बाथ् घेण्यासाठी जाते तेव्हा खाली भांडणे चालू होतात व मोठ्मोठ्याने भांडणाचे आवाज येऊ लागतात. ( डॅनी आणि संजय ची) .बाथरूमम्धे व कपडे करीत असताना तिला भांडण सोडवायला खाली जाणे शक्य नव्हते मग्मध्येच सगळे आवाज बंद होतात. तिला वाटते भांडणारी व्यक्ती निघून गेली आहे .साडी नेसत असताना पुन्हा खाली डॅनीची आणि संजय ची भांडणे चालू होतात. व मध्येच जाणार्‍या विमानाचा मोठा आवाज येतो (त्या आवाजात गोळीबाराचा आवाज दाबला जातो) मग ती साडी नेसतच बाहेर वर्हांड्यात जाते तेव्हा संजय निघून गेलेला असतो. त्यामुळे त्या बाथ सीनचा स्टोरीची लिंक आहेच.
त्यामुळे तो 'घुसवलेला'सीन वाटत नाही आणि तो तसा उत्तानही नाही.
https://www.youtube.com/watch?v=jJ1vM8f2vtw#t=01h25m57

धुंदचे रहस्य फारसे क्लिष्ट नसले तरी सर्वांचा अभिनय , गाणी , वेग यामुळे रहस्य माहीत असूनही मी तो असंख्य वेळा पाहिला आहे...

धुंदवरूनच चुप हा सिनेमा बेतलेला आहे. सोमी अली, नासिरुद्दिन शाह, मिथुन चक्रवर्ती त्यात आहेत.

आताच्या सगळ्या बाया एकसारख्या दिसतात. एकाच डॉक्टरकडे जाऊन ओठ, नाक, हास्य इ. इ. सुंदर करुन घ्यायचे, एकच टाईपचा मेकप, केस, कपडे.. काहीच वैविध्य नाही >> Sad तर बघा "आताच्या" १०० करोड क्लब हिरवीणी कोण कोण - कंगना, दिपीका, सोनम, सोनाक्षी, आलिया, कटरिना, अनुष्का, प्रियांका!! ह्यातल्या सारख्या कोण वाटतात??

साधना, धन्स! तो नणंदेच्या संवादाचा सीन तू म्हणतेस तसा मस्त. आणि डेव्हिड्कडे तो एक माणूस बायकोला डिव्होर्स द्यायचा म्हणून येतो तोही.

>>'संसार की हर शय का इतनाही फसाना है,'असे शब्द आहेत.

हो बरोबर.

>>@स्वप्ना, घुंघट हा खरंच चांगला चित्रपट आहे

अरे वा! पाहेन कधी चॅनेलवर दिसला तर.

बाकी संजय खान दिसण्यात मलाही आवडायचा. हल्लीच्या हिरविणीच काय हिरो पण मला एकसारखे वाटतात.

कोकणस्थ पाहिला चक्क.
वेगळा रिव्ह्यूच लिहायला पाहीजे खरं तर. पण टंकाळा होईल.

सचिन खेडेकर लाठीकाठी फिरवत असतो तेव्हां अनेकांचे रोमटे खडे झाले असतील. त्याला पाहून एका आयडीची खूप आठवण येत होती. त्याचीही स्वप्नं अशीच. त्याची ती फॅण्टसी ( विरुद्ध मताच्या लोकांना रस्त्यात तुडवण्याची) पण कधी लपून नाही राहिलेली. लेखाची अर्पणपत्रिका त्यालाच दिली असती,

अनुपमा मधलं 'भीगी भीगी' पण छान आहे. मस्त पिकनिकला निघालेले असतात सगळे. एकदम मज्जानु लाईफ! आजकाल दुर्मिळ झालेलं Happy

'द ट्रेन' म्हणून राजेश खन्ना आणि नंदाचा एक चित्रपट होता तो पण रहस्यमय होता ना? टीव्ही गाईडवर कुठेही 'ट्रेन' दिसलं की मी मोठ्या आशेने बघते पण तो नवा (बहुधा इम्रान हाश्मीचा) असतो.

तसंच 'हलचल' म्हणून पण होता त्यात तो हिरो कोणतरी स्वतःच्या बायकोचा खून करणार आहे असं ऐकतो.पण मजा अशी की त्या खुनी माणसाच्या नावाची अनेक माणसं असतात.

ओ पी रल्हन

कान आणि डोळे यात दोन बोटांचं अंतर असतं अशी काही तरी सुरूवात होती बहुतेक सिनेमाची. रहस्यमय सिनेमा नसून रहस्य+ हास्यपट आहे असं वाटतं

मजा अशी आहे की एका घरात नाटकाची प्रॅक्टीस चाललेली असते हा बाहेरून त्यातले डायलॉग ऐकतो खुनाचे . आणि चंपक भुमिया नावाच्या व्यक्तीला शोधायला निघतो तो खून रोखण्यासाठी.

घायल once again बघितला, आणि सन्नी फॅन असल्यामुळे आवडला पण. Happy प्रोमो बघून वैगरे टेकन/जाने भि दो यारो (फक्त फोटो सिक्वेन्स म्ह्ण़जे फोटो प्रिन्ट करताना खून झालेला कळणे वैगरे) ची भेळ असेल असे वाटले होते.
फनी देवल चा मूव्ही थिएटर मधे अजिबात बघणार नाही असे सांगून नवरा मोकळा झाला होता तरीही त्यानेच टिकिट्स काढली . सिनेमा मस्त एन्जोय केला , सनी ने स्वत:वर कमी फोकस ठेवला आहे असे वाटले. पण सिनेमा फास्ट आहे. मुंबई चे एरिअल व्यू मस्तच. अ‍ॅन्टीलिआ चे सुखद दर्शन. एरवी eyesore वाटणारी बिल्डिन्ग यात छान दाखवली आहे. खरोखर चे शूटींग असेल असे वाटत नाही. जुन्या घायल, अर्जून , दामिनी, बेताब मधे सनी पाजी आवडला असेल तर बघण्यास हरकत नाही. Happy
थिएटर मधे सन्नी च्या एन्ट्री ला वेळी लोक मस्त आरडा ओरडा करत होते. थिएटर बाहेर चक्क black marketing चालू होते , ते बघून एकदम भरून आले.;-)

मी पण पाहिला. घायल हा सनीच्या करीयर मधला महत्वाचा सिनेमा. त्याला अभिनय करता येतो हे फक्त राहुल रवैल, राजकुमार संतोषीच्या सिनेमात जाणवायचं. घायलचं पार्श्वसंगीतही लोकांना पाठ आहे. हे फक्त शोलेच्या बाबतीत घडलं होतं.

घायल १ पाहिल्यानंतर लक्षात राहतात ते सिस्टीमच्या विरोधातले आग ओकणारे संवाद. सनीचं जेलमधलं भाष्य. कोवळ्या मुलाला चष्मा उचलून देण,. जो डिसोझाने कमिशनरला सुनावताना सिस्टीमवर बोट ठेवणं. हे प्रसंग त्यातल्या हिंसेला दिवाबत्ती पुरवतात. विनाकारण हिंसा यशस्वी होत नाही. घायल २ मधे असं भाष्य, असे संवाद दिसत नाहीत. या सिनेमाचा रिमेक सव्वीस वर्षांनी झालाय. तसे संस्करण करण्यात सनी कमी पडलाय.

अर्जुन, डकैत च्या प्रभावी सादरीकरणात लेखक, पटकथालेखकांचा वाटा मोठा होता. तसंच अर्जुन आणि घायल मधे फाईट सीन्स आधी लिहीले गेले होते. गर्दीतले पाठलाग अतिशय खरे खुरे वाटत. घायल वन्स अगेन इथेही कमी पडतोय. लोकलच्या समोरून कार पास होणं या करामती आता भुरळ घालणा-या राहीलेल्या नाहीत. सनीच्या चेह-यावर वय प्रचंड जाणवतं. तरीही त्याची देहयष्टी हाच या सिनेमाचा युएसपी आहे.

घायल १ मधे नायकावर अन्याय झाल्याने त्याच्या पेटून उठण्याशी प्रेक्षक रिलेट होतो. यात तसं होत नाही. सिनेमाचं नाव घायल का एव्हढ्यासाठी त्याचा मानसिक आजार घेतला असावा. ताब्यात घेतलेली मुलगी सनीची निघते हे वळण नसतं तरी चाललं असतं. तसं करण्यामागे पटकथेतली त्रुटी झाकण्याचा प्रयत्न दिसतो. पण एव्हढा पेटून उठलेला नायक घरात घुसुन धुमश्चक्री वगैरे काही करत नाही. शेवट घायलपटाचा वाटत नाही. पण माफ करणं ही गोष्ट मसाला सिनेमात दिसणं हा बदल स्विकारार्ह आहे.

थोडंसं आणखी काम व्हायला हवं होतं.

हाअ अर्जुन कपूर नेहमी थकलेल्या अवतारात का असतो .
त्याची एकंदर देहबोली आणि डोळे फार दमलेल्या माणसासरखी असते .

काही दिवसांपूर्वी सहज चॅनल चाळता चाळता अमरीश पुरीचा एक खूप छान सिनेमा पहायला मिळाला. अर्धवटच पहायला सुरुवात केल्यामुळे या सिनेमाचं नाव काय, हे मला कळले नव्हते. कारण त्यातले हिरो, हिरवीणही ओळखीचे नव्हते. पण सिनेमा खूप आवडला. गुगाळल्यानंतर कळले की त्या सिनेमाचे नाव मुस्कुराहट आहे आणि तो प्रियदर्शनने दिग्दर्शित केलाय. सिनेमा खूपच प्रसन्न आहे. संपूर्ण सिनेमात अमरीश पुरी भरून राहिलाय. मला खूप आवडला तो सिनेमा.

हो. पण मला तोपर्यंत त्या हिरविणीचे नाव म‌ाहित नव्हते. सलमान खान, अजय देवगणबरोबर काही सिनेमांत पाहिलं होतं तिला.

Pages