Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येस्स तिसरी मंझिल हा तसाच एक
येस्स तिसरी मंझिल हा तसाच एक ऑलटाइम फेवरिट..
गुमनामचा सगळा पसारा हा परदेशातून उधार घेतलेला जाणवत राहतो. कितीही देसी कॅरेक्टर्स वापरली तरी आणि त्यामुळे एकदम पावटाच वाटायला लागतो सिनेमा.
सिनेमा बघेपर्यंत मी खूप आख्यायिका ऐकल्या होत्या. अमुक इतके खून आहेत, प्रचंड डोक्याचे रहस्य आहे वगैरे..
बघितल्यावर एकदम पोपटच झाल्यासारखे वाटले होते.
रहस्य पट म्हणून कहानी,
रहस्य पट म्हणून कहानी, बालनांच्या विद्यातैंचा..
इत्तेफाक सुधा.
कोर्ट रूम ड्रामा म्हणून कानून.
पाषाण कादंबरी आवडली होती य
पाषाण कादंबरी आवडली होती य वर्षांपूर्वी वाचली तेव्हा.
एवढे प्रतिसाद पलिकडे आलेले
एवढे प्रतिसाद पलिकडे आलेले बघुन मला तुला कसं कळला नै चित्रपट अस म्हणत ओरडा भेटला कि काय अस वाटल होत

बाकी विदेश मध जायचयं वगैरे म्हणून परत भारतातच उतरवतात बघुन जां हसली होती मी..कथानक इथच करुन पैसे वाचवले.. सर्वात जास्त राग तर ते लकी टिकीट डिक्लेअर करणार्याचा येतो..उगा आता बघाच काय होते तुमच्यासोबत अस तोंड करतो तो सुरुवातीला .. निव्वळ काहितरी.. त्यापेक्षा शांत खुनशी डॉक्याचा पाहिजे म्हणजे लोकांना कळणार तरी नै कि अरे हा तर नक्कीच नै म्हणून
चला आता ज्वेल थिफ आणि तिसरी मंझिल बघायचा आहे..
विजय आनंद म्हणजे तहकिकात मधला अभिनेता का ?
मी न चुकता बघायची ती सिरीयल .. मस्त होती ..
कापोचे , रहस्य पट म्हणून
कापोचे ,
रहस्य पट म्हणून कहानी, बालनांच्या विद्यातैंचा..
इत्तेफाक सुधा.
कोर्ट रूम ड्रामा म्हणून कानून. >>>> त्यावरून आठवलं , त्या फाटकाच काय झाल????????
अवांतराबद्दल माफी असावी.
विजय आनंद म्हणजे तहकिकात मधला
विजय आनंद म्हणजे तहकिकात मधला अभिनेता का ? >> अरे यार टीना, हे तर 'शारूख म्हणजे सर्कस मध्ये काम करायचा तोच अॅक्टर ना' विचारणार्या माझ्या आजीसारखं झालं
गुमनाम मध्ये फक्त मेहमूदचा
गुमनाम मध्ये फक्त मेहमूदचा हैद्राबादी रोल सही आहे. ऐ हंगामा काले से डर गये क्या, उदास,
बुढ्ढी ह ड्डी सही बोल रै. तो चहा सर्व्ह करतो ते वगिअरे. एकदम हह पुवा. आणि हेलन एकदम सुपर्ब दिसते. तो धुमाळ फ्रॉक का घालतो?
हा हा सिमंतिनी.. करेक्ट!
हा हा सिमंतिनी.. करेक्ट!
तिसरी मंझिल काय कंप्लिट पॅकेज
तिसरी मंझिल काय कंप्लिट पॅकेज मुव्ही होता !
विजय आनंद थ्रिलर, शम्मी कपुर, आरडी .. एंटरटॅन्मेंट एंटरटॅन्मेंट एंटरटॅन्मेंट!
टोटली... आणि शम्मी काय यम्मी
टोटली... आणि शम्मी काय यम्मी दिसलाय!!
फॅन क्लब काढा. तंतोतंत.
फॅन क्लब काढा. तंतोतंत. दीवाना मुझसा नही. इस अंबरके नीचे.
गुमनामच्या काळात एक तर
गुमनामच्या काळात एक तर सामान्य प्रेक्षक हॉलीवुडी सिनेमे पहातच नव्हता. जे यायचे ते प्पाच सहा महिने उशिरा. तेही जास्त करून मोठ्या शहरातच. त्यात ते कळायचेही नाहीत ईंग्लिश असूनही. इंग्रजी सिनेमे अत्यल्प लोक पहायचे. त्यामुळे काय ढापले आहे हे सामन्य करमणूक प्रधान प्रेक्षकाना कळण्याला काही मार्गच नसायचा. हे अगदी तिकडच्या ट्यूनवरून ढापलेल्या हिंदी गाण्याच्या बाबतीत ही असे. इकडचे कित्येक 'क्लासिक्स' तिकडच्या सिनेम्यावर बेतलेले आहेत हे भाबड्या प्रेक्षकाना कळायचे देखील नाही. ते आपले इथल्या निर्मात्या दिग्दर्शकाच्या प्रतिभेचे वारेमाप कौतुक करत. उदा: चोरी चोरी. वगैरे. अगदी घर आया मेरा परदेसी हे गाणे सुद्धा ढापलेले आहे. या ढापाढापीची माहितीयुक्त चर्चा बहुधा शोले पासून सुरू झाली. मजबूर मध्ये तर तांबडी मोटार असलेल्या पाठलागाचा एक सीन कोल्ड स्वेट नावाच्या चित्रपटातून फिल्म चा तुकडा उचलून जोडून दाखवला आहे ! कंटिन्युईटी साठी इथली मंडळी लाल गाडीत बसताना दाखवलीये सुरुवातीला. नंतर र्हूऊऊऊऊऊम्म्म्म्म..::फिदी:
त्या मानाने गुमनाम मधली उचलेगि री लैच निरुपद्रवी....
सीमंतिनी >> बरीच लहान होती मी
सीमंतिनी >> बरीच लहान होती मी तेव्हा.. अभिनेता कशाशी खातात ते कळायच नै ना म्हणून नावाबद्दल शुअर नव्हती.. खर तर लहान असताना ज्या सिरिअल्स बघायची त्या सर्वच्या सर्व आठवत सुद्धा नै आता पण टिव्ही हा प्रकार खुप आवडायचा म्हणुन त्यातही काही लक्षात राहिलेले..त्यांच्या सुदैवाने

विजय आनंद हा त्याने
विजय आनंद हा त्याने दिग्दर्शित केलेल्या भारी फिल्म्ससाठी प्रसिद्ध होता. अभिनयासाठी नव्हे.
गाइड, तिसरी मंझील, ज्वेल थीफ, तेरे घर के सामने.. असे काही भन्नाट सिनेमे त्याने दिग्दर्शित केले होते.
अब तो गोल्डी फेस्ट करना मंगता
अब तो गोल्डी फेस्ट करना मंगता है यार!
अमा, शम्मी फॅन क्लब हैईच्च ना!
जॉनी मेरा नाम पण गोल्डी फेस्ट
जॉनी मेरा नाम पण
गोल्डी फेस्ट - बेस्ट idea
गोल्डी फेस्ट >> +१०० वेगळा
गोल्डी फेस्ट >> +१०० वेगळा धागा काढला की झालं. त्याचे बहुतेक सिनेमे आहेत यूट्यूब वर.
राइटो!!
राइटो!!
सिनेमे आहेत ना युट्युबवर. मग
सिनेमे आहेत ना युट्युबवर. मग वेगळ्या धाग्यावर काय करणार?
गप्पा.. दुसरं काय?
गप्पा.. दुसरं काय?
बर!
प्लिज लिंकापण टाका
प्लिज लिंकापण टाका जमल्यास.
कट्यार बघितला.
नाट्क बघितले नसल्याने खुप्च आवडला.
टिना तिसरी मंझिल ताबडतोब पहा
टिना तिसरी मंझिल ताबडतोब पहा (पहिल्या पासून मन लावून, प्रत्येक सिनची नोंद घे नीट)
ज्यानी तीसरी मंजील पाहिला
ज्यानी तीसरी मंजील पाहिला नाही त्याना एक आठवड्याची मुदत देण्यात येत आहे. एक आठवड्यात न पाहिल्यास येथे रहस्यभेद करण्यात येईल ... हुकुमावरून ::फिदी:
इत्तेफाक आठवत नाहीये का
इत्तेफाक आठवत नाहीये का कुणाला ? एकही गाणे नसलेला सस्पेन्स सिनेमा आहे.
खन्ना, बेबीनंदा चा
दिनेश., मला नाही जाणवले कुठले
दिनेश., मला नाही जाणवले कुठले फ्लॉज . इंडियन एक्सप्रेसच परीक्षण मी वाचलेलं नाही . मला तरी पटकथा घट्ट बांधलेली वाटली . जास्त लांबण लावले असत तर कंटाळा आला असता
इत्तेफाक आठवत नाहीये का
इत्तेफाक आठवत नाहीये का कुणाला ? एकही गाणे नसलेला सस्पेन्स सिनेमा आहे.
खन्ना, बेबीनंदा चा >>>>
ह्म्म तुशार दळवी आणि कोणितरी होतं , मराठी टेलिफिल्म होती एक सेम तशीच.
इत्तेफाक यश चोप्राचा होता.
इत्तेफाक यश चोप्राचा होता.
त्याच्यावर बेस्ड मराठी टेलीफिल्म्स २-३ तरी पाहिल्याचं आठवतंय.
तुषार दळवी वाली एक (बहुतेक रेशम टिपणीस होती त्यात)
रमेश भाटकर वाली पण एक पाहिल्याचं पुसंटसं आठवतंय.
मी पाहिलाय इत्तेफाक पण लक्षात
मी पाहिलाय इत्तेफाक पण लक्षात नाही, तसाच तो धुंद पण पाहिला पण मला इतका इफेक्टिव्ह नाही वाटला.
त्यापेक्षा केके मेनन चा 'रहस्य' जास्त सस्पेन्स वाटला मला.
आत्ता सरकार बघीतला..परत
आत्ता सरकार बघीतला..परत एकदा..मस्तच..
Pages