मित्रहो,
शिवशक्ती संगमच्या निमित्ताने काढलेल्या धाग्यावर अतिशय सुंदर आणि संयत शब्दात चर्चा झाली. अनेक प्रश्न तेथे उपस्थित करण्यात आले आणि त्याला सगळ्यांनी मिळून आपापल्या परीने उत्तरे दिली.
मुख्य कौतुक म्हणजे कोणीही विखारी प्रतिसाद न देता एक एक गोष्ट समजून घेतली.
या निमित्ताने विचारांची/माहितीची जी देवाणघेवाण झाली ती अप्रतिम होती. मायबोली सारख्या संकेतस्थळाचा याहून सुंदर उपयोग तो काय असू शकतो.
तोच धागा पकडून कैपोचे यांनी सुचवल्याप्रमाणे हा नवीन धागा येथे काढत आहे. याचा उद्देश मी खाली स्पष्ट करतो.
तत्पूर्वी एक स्वानुभव मला सांगावासा वाटतो.
मी सावरकरांचा निस्सीम भक्त होतो आणि आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी स्वतः लिहिलेले बरेच लिखाण मी वाचले. स्वातंत्र्य संग्रमातल्या इतर अनेक महापुरुषांबद्दल पुढे वाचनात आले.
यामधून एक विचारधारा निर्माण होत गेली ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जहाल मतवादी विचारांशी जास्त जवळीक होती.
याच बरोबर अजून एक विचारधारा नकळतपणे डेव्हलप होत गेली ज्यात मवाळ गट, गांधीजी यांच्याबद्दल तिरस्कार होता.
यातला 'तिरस्कार' हा शब्द महत्वाचा आहे. हा तिरस्कार उगाच आपला मनात येऊन बसलेला होता.
यावर घरात अनेकदा वडिलांशी वादविवाद करताना ते मला गांधीजींचे महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करत. लाखो लोक त्यांच्या मागे गेले यात नक्कीच फार मोठा अर्थ आहे असे ते सांगत.
त्यावेळी मला ते फारसे पटत नसे.
पुढे जशी जशी प्रगल्भता वाढत गेली तसतसे मी एका थर्ड आय ने जगाकडे पाहू लागलो. ज्यामुळे मला हे लक्षात यायला लागले कि प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला त्याच्या झालेल्या जडणघडणी प्रमाणे विचार करतो आणि निर्णय घेतो. अर्थात, त्याच्या जागी तो बरोबरच असतो.
सावरकर असो वं गांधीजी, कोणीहि मुद्दाम हून चला आता आपण भारत देशाला खड्ड्यात घालू म्हणून काम केले आहे का.? अर्थातच नाही. दोघांनी कार्य तर भारताच्या उन्नतीसाठीच केले. त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. इतकेच..
मग आपल्या मनात 'तिरस्कार' असण्याचे कारण ते काय.?
यामध्ये असहमती असू शकते. मतभेद असू शकतात. पण तिरस्कार हा एक बिनगरचेचा घटक आहे.
तिरस्कार अज्ञानातून येतो. आणि मतभेद अभ्यासातून येतात.
या विचारातून मग मी गांधीजींचे चरित्र वाचण्याचे ठरवले. लकीली याच दरम्यान एकदा काकांच्या घरी गेलेलो असताना त्यांच्याकडे मला गांधीजींचे आत्मचरित्र मिळाले. मी ते त्यांच्याकडून घेऊन वाचायला सुरुवात केली.
लवकरच माझे गांधीजींबद्दल असलेले मत पूर्णपणे बदलले.
त्यांच्या काही गोष्टी मला पटल्या, काही नाही पटल्या. पण मनातला गांधीजींबद्दलचा आदर मात्र खूप वाढला. त्यांच व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. असं व्यक्तिमत्व जगात पुन्हा होणे नाही या मताला मी आलो.
मनातील पूर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्या चष्म्यातून जग पाहताना खूप छान वाटले. (अजूनही माझे वाचन सुरु आहे. खंड पडलाय जरा, पण लवकरच पूर्ण होईल.)
अशा प्रकारे माझ्या मनातून तिरस्कार हद्दपार झाल्यावर मला एक मानसिक शांतता मिळाली. कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.
अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.
असो. तर या धाग्यावर हा अनुभव सांगण्याचे प्रयोजन असे कि आपण येथे परस्परविरोधी विचार असलेले लोक एकत्र येऊन, शांतपणे चर्चा करून समोरची बाजू समजून घेऊ. समोरच्याचे मत जसे आहे तसे का आहे त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून आपल्या मनातील तिरस्कार दूर होईल. एकमेकांकडून माहित नसलेल्या गोष्टी कळतील. जाणीवा वाढतील. सहिष्णुता वाढेल. आभ्यास वाढेल. आपल्या पैकी बहुतेकांनी कोणत्या तरी एकाच बाजूचा पण सखोल आभ्यास केलेला असेल. त्याचा एकमेकांना फायदा होईल.
दोन्ही बाजूंची सहमती बऱ्याच बाबतीत शक्य नाही हे तर आपल्याला माहितच आहे. हे गृहीत धरूनच आपण बोलूया. तिरस्कार नाहीसा होत गेला तरी या धाग्याचा उद्देश सफल होईल.
आपण एकमेकांशी असहमत असू, पण तरी एका बाजूने असू
या धाग्यावर सावरकर, गांधी, आंबेडकर, कॉंग्रेस, भाजप, हिंदू, मुसलमान, इसाई कोणताही विषय वर्ज्य नाही.
फक्त हा धागा नावाप्रमाणे सहिष्णू राहू द्यावा. (या दोन वाक्यांवरून हा प्रयोग फारच धाडसी वाटतोय मला)
असो. वरून देव बघत आहे. जो आयडी असहिष्णुता दाखवेल त्याचा मृत्यू अटळ आहे.
कोणीही असहिष्णूता दाखवल्यास त्याला कृपया कोणतेही उत्तर देऊ नका. शांतता राखा.
याच उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण जमेल तसे आपापल्या आवडत्या नेत्यावर लेख लिहूया. म्हणजे माहितीची देवाण घेवाण होईल आणि विषय निघतील ..
<< जर गरीब हिंदूना ख्रिस्ती
<< जर गरीब हिंदूना ख्रिस्ती धर्माचे विचार पटत असतील आणि त्यामुळे त्यांनी धर्मांतर केले असेल तर? >>
आजीबात हरकत नाही. पण ते पटवून सांगण्या साठी कसलाही आधार घेतला तर ते मान्य नाही.
मी स्वतः एका मित्राच्या आमंत्रणा वरून क्रिसमसला चर्च मध्ये गेलो होतो. तेथे मध्यमवर्गीयांपेक्षा खालच्या पातळीवर असलेले खूप लोक होते. तेथे दोघा लोकांची भाषणे झाली. एक युरोपियन होता तर एक 'ख्रिस्तीयाना भोसले' नावाच्या भगिनी होत्या. भाषण व्यवस्थित चालू असताना त्या मध्येच हिंदू धर्मावर घसरल्या. सरसकट हिंदू धर्म कसा अयोग्य आहे ते त्यांनी आवेशपूर्ण पद्धतीने सांगण्यास सुरुवात केली.
हे पूर्णपणे मार्केटिंग करण्यासारखे झाले नाही का. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेण्यासारखे झाले.
ख्रिश्चनांना लोकांच्या भल्यासाठी काम करायचे आहे असे गृहीत धरले तरी त्यासाठी धर्मांतराचे समर्थन कसे करता येईल.
प्रकु, हिंदुतल्या ज्या अंत्यज
प्रकु, हिंदुतल्या ज्या अंत्यज जाती जमातीतले लोक भेदभावांना कंटाळून इतर धर्मात जातील ते त्या नव्या धर्माचे गोडवे गाताना जुन्या धर्माला आपसूकच नावे ठेवणार ना?
नव्या बौद्ध धर्मात प्रवेश करण्याच्या प्रतिज्ञाच 'मी हिंदू धर्मातलं अमुक तमुक यापुढे पाळणार नाही' अश्या असतात.
त्यामुळे प्रत्येक धार्मिल सणाला त्या परत परत सांगून अंगी बाणवायला प्रोत्साहनही दिले जाते.
मग तुमच्या सणाला हिंदु धर्माला नावे ठेवू नका हे त्यांना कसे सांगणार?
ख्रिश्चन धर्मातील बहुतेक गरीब लोक हिंदुधर्मात अंत्यज होते. मग त्यांच्या मनातील स्वाभिमान जुन्या धर्मातील वाईट वागणूक उगाळूनच जागवणार ना?
संपादित
संपादित
बरोबर आहे साती, हिंदू धर्माने
बरोबर आहे साती,
हिंदू धर्माने सर्वांना समान वागणूक दिली असती तर हा प्रश्न उद्भवला नसता हे खरेच आहे.
यावर हा भेदभाव काढून टाकणे हा
यावर हा भेदभाव काढून टाकणे हा उपाय आहे. >>> ह्या उपायांसाठी संघाकडे काही योजना असल्यास त्याबद्दल वाचायला आवडेल.
हिंदू धर्माने सर्वांना समान वागणूक दिली असती >> अजुनही ती दिली जात नाही हे वास्तव आहे.
हो विठ्ठल नक्कीच मलाही ते
हो विठ्ठल नक्कीच
मलाही ते लिहायचे आहे. लवकरच लिहितो.
हिंदू धर्माने सर्वांना समान वागणूक दिली असती >> अजुनही ती दिली जात नाही हे वास्तव आहे. >> खरंय. कायद्याने समानता आलीये पण मनातून विषमता गेलेली नाही. हे मोठे दुर्दैव आहे..
http://www.lokmat.com/storypa
http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=11270823 >> म.फुले यांचे वंशज स्वयंसेवक
प्रकु, ख्रिस्ती धर्मांतराबद्द
प्रकु, ख्रिस्ती धर्मांतराबद्द जितक्या खात्रीने , मुद्देसूद लिहिलंत , ततसं संघाच्या वैचारिक बैठकीबद्दल लिहिताना दिसत नाही. हिंदू सघटनांचा फोकस.आतल्यापेक्षा बाहेरच अधिक असतो ही गोष्ट वारंवार जाणवत राहते.
संघाच्या वैचारिक बैठकीबद्दल
संघाच्या वैचारिक बैठकीबद्दल >> म्हणजे संघाची 'हिंदू'ची व्याख्या त्यात इतर धर्मियांचे स्थान वगेरे असे का.? मला लिहायचे आहे खूप. लिहिणार आहे लवकरच.
काल एका दिवाळी अंकात एका
काल एका दिवाळी अंकात एका ख्रिश्चन धर्मगुरूंचा मराठीतला लेख वाचला.
भारतात श्रमसंस्कृती रुजली नाही, श्रमांना किंमत नाही याचे सगळे श्रेय (!)त्यांनी चातुर्वर्ण्य पद्धतीला दिले आहे.
इतकेच नव्हे तर व्हॅटीकनमध्ये कश्या चांगल्या पांढरपेश्या समाजातील स्त्रियाही टॉयलेट साफ करण्यासारखी नोकरी आनंदाने आणि सन्मानाने करतात ह्याचे श्रेय 'ख्रिस्चन धर्मपरंपरेनुसार श्रमांना असलेली प्रतिष्ठा ' या गोष्टीला दिले आहे.
सातींचे म्हणणे पटणेबल आहेच.
सातींचे म्हणणे पटणेबल आहेच. जेथे धर्मांतरणाच्या संकल्पनेची निर्मीतीच असमान वागणूक मिळाल्यामुळे झाली आहे तेथे पहिल्या एक दोन पिढ्यांमध्ये तरी ती भावनिक तीव्रता राहणारच.
पणः
>>>नव्या बौद्ध धर्मात प्रवेश करण्याच्या प्रतिज्ञाच 'मी हिंदू धर्मातलं अमुक तमुक यापुढे पाळणार नाही' अश्या असतात.
त्यामुळे प्रत्येक धार्मिल सणाला त्या परत परत सांगून अंगी बाणवायला प्रोत्साहनही दिले जाते.
मग तुमच्या सणाला हिंदु धर्माला नावे ठेवू नका हे त्यांना कसे सांगणार?<<<
पण जे लोक धर्मांतरीत जोडप्यांच्या पोटी बौद्ध धर्मातच जन्माला आलेले आहेत त्यांना सर्वधर्मसमभाव शिकवण्यास काय अडचण आहे? त्यांना कोणतीही वाईट वागणूक मिळालेली नसणार.
तसेच, आजही जर हिंदू धर्मात हीच विषमता आहे तर त्या विषमतेविरुद्ध हिंदूंमधील उपेक्षितांनी आवाज उठवणे योग्य ठरेल. जे आता हिंदू धर्मातच नाहीत त्यांनी तर ही विषमता केव्हाच त्यागलेली आहे.
आणि जर हिंदू धर्मात नसलेल्यांनाही हिंदू धर्मातील विषमता आजही सोसावी लागत असेल तर दुसरा धर्म स्वीकारून नेमके काय प्राप्त झाले?
एवढे सगळे लिहूनसुद्धा 'हिंदू धर्माने समानता अंगी बाणावी' ह्याबाबत दुमत नाहीच. 'आम्ही सुधारणार नाही, तुम्हीच सुधरा' असा ह्या प्रतिसादाचा अर्थ काढला जाऊ नये म्हणून हे लिहिले.
ह्याही शंकाच आहेत, मते नव्हेत.
पण जे लोक धर्मांतरीत
पण जे लोक धर्मांतरीत जोडप्यांच्या पोटी बौद्ध धर्मातच जन्माला आलेले आहेत त्यांना सर्वधर्मसमभाव शिकवण्यास काय अडचण आहे? त्यांना कोणतीही वाईट वागणूक मिळालेली नसणार.>>
नाही हो, असे मुळीच नाही.
माझ्या जन्माच्या तीस वर्षे अगोदर कन्वर्ट होऊनही आमची आमच्या पुढची पिढीही अजून डिस्क्रीमिनेशन सहन करतच आहे.
हिंदू सघटनांचा
हिंदू सघटनांचा फोकस.आतल्यापेक्षा बाहेरच अधिक असतो ही गोष्ट वारंवार जाणवत राहते.
>>
नेमकं मांडलत मयेकर
हिंदुंच संघटन (किंबहुना हिमस वा संघ परिवारातल्या संघटना) हेच मुळात एक्सटर्नल मुद्द्याहून झालय. बाहेरील धर्म ह्यांपासून संरक्षण ह्या उदात्त ध्येयापासून सुरुवात झाली तर, वैचारिक बैठक तशीच होणार.
आपला धर्म, साफ करून ठेवला तर आपोआप सक्षम होऊन इतरांपासून धोका राहणार नाही. पण ते कठीण, त्यापेक्षा इतरांना टार्गेट करणं सोप्प.
तसेच, आजही जर हिंदू धर्मात
तसेच, आजही जर हिंदू धर्मात हीच विषमता आहे तर त्या विषमतेविरुद्ध हिंदूंमधील उपेक्षितांनी आवाज उठवणे योग्य ठरेल. जे आता हिंदू धर्मातच नाहीत त्यांनी तर ही विषमता केव्हाच त्यागलेली आहे. >>> दुर्दैवाने चित्र असे नाहीये. कागदोपत्री बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत. पण मनामनात त्या रुजलेल्या नाहीत.
विषमता अशा एका घटनेने त्यागण्याची किंवा सरकारी नियमांनी कमी होणारी नाही.
त्यासाठी लोकांच्या विचारात बदल घडणे गरजेचे आहे..
आपला धर्म, साफ करून ठेवला तर
आपला धर्म, साफ करून ठेवला तर आपोआप सक्षम होऊन इतरांपासून धोका राहणार नाही. पण ते कठीण, त्यापेक्षा इतरांना टार्गेट करणं सोप्प. >>
आपला धर्म साफ करण्याचे काम चालूच आहे तात्या. कठीण आहे म्हणून सोडून दिलेलं नाही. उलट अजून जोमाने केले जात आहे.
>>>नाही हो, असे मुळीच
>>>नाही हो, असे मुळीच नाही.
माझ्या जन्माच्या तीस वर्षे अगोदर कन्वर्ट होऊनही आमची आमच्या पुढची पिढीही अजून डिस्क्रीमिनेशन सहन करतच आहे.<<<
ह्याबद्दल एक प्रश्न विचारला आहे मी साती. मग धर्मांतरणाचा फायदा काय झाला असा.
>>>बाहेरील धर्म ह्यांपासून संरक्षण ह्या उदात्त ध्येयापासून सुरुवात झाली तर, वैचारिक बैठक तशीच होणार. <<<
तात्या, ह्याला योगायोग म्हणावा काय? साती म्हणत आहेत की हिंदू धर्मातील असहिष्णूतेला विटल्यामुळे लोक बौद्ध झाले व त्यामुळे त्यांच्या प्रतिज्ञा तश्या आहेत. तुम्ही म्हणत आहात की हिंदू धर्मीय इतर धर्मापासून सुरक्षित होण्यासाठी अशी वैचारीक बैठक बाणतात. मग दोन्हींच्या रिअॅक्शन्समध्ये फरक तो काय? जे एकाच्या बाबतीत उदारपणे पाहिले जाण्याची अपेक्षा बाळगली जाते ते दुसर्याच्या बाबतीत त्याचा कट्टरपणा म्हणून का पाहिले जाते?
प्रकु, ते सुरूही असेल, पण
प्रकु,
ते सुरूही असेल, पण आमच्यासारख्या बाहेरच्यांना, जे इतरत्र टार्गेट करतात, ते जास्त प्रमाणात आढळतात. म्हणून लिहिले हो.
जर सक्षमीकरण दिसले असते, तर ते लिहिले असते
प्रकु, संघाकच्या उपाय योजना
प्रकु,
संघाकच्या उपाय योजना काय आहेत त्याबद्दल लिहा ओ....
बाकिचे दळण खुप वेळा दळुण झालय.
मी बाहेरील धर्म म्हणालोय,
मी बाहेरील धर्म म्हणालोय, भारतीय नाही! संघाच्या स्थापनेवेळी, त्याचा धोका जास्त होता
चुकीच असल्यास संपादित करण्यात येईल)
माझ्यामते संघ बौद्ध आणि शीख ह्यांना हिंदूंच्या शाखाच मानतो. (संघ मानतो, मी नाही … नायतर माझ्यावर सुरु व्हायचे
चुकीची माहिती आहे संपादित
चुकीची माहिती आहे संपादित करा..
बेफी, धर्मांतराचा फायदा असा
बेफी, धर्मांतराचा फायदा असा झाला की हे डिस्क्रीमिनेशन बरेच कमी झाले.

आता अत्यंत कडवे डिस्क्रिमिनेशन बर्याच ठिकाणी होत नाही.
आणि त्याहूनही जो धर्म आमच्याबाबतीत असे डिस्क्रीमिनेशन करण्याची ऑफिशीयल परवानगी देतो त्याला आम्ही ऑफिशीयली नाकारतो असा स्वाभिमान आमच्या मनात आला.
असा स्वाभिमान, जो तुम्ही तुलना करून पाहिलात तर कन्वर्टेड बुद्धिस्ट आणि ख्रिश्चन यांच्या मनात जितक्या प्रमाणात आलाय तितका अनकन्वर्टेड हिंदु अंत्यजांत अजूनही नाही.
आणि ही आकडे वारीने सिद्ध करण्याची गोष्ट नाही, याकरिता ते पर्सिव्ह करून घेणारे मन आणि बुद्धी हवी.
बाकी सकुरातै म्हणतात हे दळण इथे अनावश्यक आहे, त्यामुळे इथे याबाबतीत फुलस्टॉप.
संघ सर्व देशभक्त भारतीयांना
संघ सर्व देशभक्त भारतीयांना हिंदू मानतो हे खरे आहे. जैन, बौध्द, शिख तर अगदीच भारतीय आणि देशप्रेमी आहेत.
हसवू नका.
हसवू नका.
मग संघ त्यांच्या आरएसएस
मग संघ त्यांच्या आरएसएस मुख्यालय वर प्र्जासत्ताकदिनी तिरंगा का नाहि फडकावत?
'अगदीच भारतीय' शब्दप्रयोग लई
'अगदीच भारतीय'

शब्दप्रयोग लई आवडला!
झ्यकास!
हसवू नका.
हसवू नका.:P
तिरंगा फडकवायला सरकारी
तिरंगा फडकवायला सरकारी आस्थापने आणि शाळा *यांनाच* आत्ताआत्तापोतर (पक्षी २०१० पर्यंत वगैरे) परवानगी होती न? बाकी नंतर रेशीमबागेत तिरंगा फडकल्याचे पाहिलेय मी स्वतः
त्या प्रजासत्ताक आणि
त्या प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनाचं म्हणत असतील.
>>> साती | 11 January, 2016 -
>>> साती | 11 January, 2016 - 16:21 नवीन <<<
साती, छान वाटला रिप्लाय आणि पटलाही. डिस्क्रिमिनेशन कमी होणे (खरेतर नष्टच होणे) हेच ध्येय होते आणि ते कमीजास्त प्रमाणात साध्यही झाले. मग आता प्रतिज्ञा ग्रॅज्युअली बदलायचे विचार येऊ शकत नाहीत का?
१. प्रतिज्ञेमुळे डिस्क्रिमिनेशनचा जास्त आघात न सोसावा लागलेल्यांच्याही मनात तेढ पेरली जात नाही का?
२. एका धर्मापासून वेगळे होऊ पाहणारा आणि झालेला धर्म असा परिचय त्यागून स्वतंत्रपणे अस्तित्त्वात असलेला एक धर्म असा परिचय निर्माण होणे आवश्यक नाही का?
============
मूळ धाग्यात सर्व विषय (सर्व धर्म, व्यक्ती वगैरे) चर्चेस घेतले जाण्याचे स्वागत होईल असे म्हंटलेले आहे. त्यामुळे संघाबरोबरच इतर विषय आपसूकपणे आले तर 'हे दळण आहे' वगैरे म्हंटले जाऊ नये असे वाटते. मुद्दामहून कोणी 'संघाबद्दल बोलता काय, मग आम्ही ह्याच्या-त्याच्याबद्दल बोलतो' अशी भूमिका घेतलेली दिसली तर ते अयोग्य ठरेलच.
कहर आहे कहर,, जग तिकडे
कहर आहे कहर,,
जग तिकडे फेसबुक, व्हाट्सएअॅप , विन्डोज, अजुन असे काहीतरी शोध लावते अन आपण अजुनही जात धर्म यापुढे जात नाही. कमाल आहे. जस्ट टाइम पास. जे चांगले आहे ते घ्यावे, उगाच ज्ञान का पाजळावे. कळत नाही.
हा वाईट , तो चांगला, आम्ही हुशार , ते नालायक असे करुन जो आनंद मिळेल ति विकॄतीच.
Pages