सहिष्णू धागा

Submitted by प्रकु on 8 January, 2016 - 16:14

मित्रहो,

शिवशक्ती संगमच्या निमित्ताने काढलेल्या धाग्यावर अतिशय सुंदर आणि संयत शब्दात चर्चा झाली. अनेक प्रश्न तेथे उपस्थित करण्यात आले आणि त्याला सगळ्यांनी मिळून आपापल्या परीने उत्तरे दिली.
मुख्य कौतुक म्हणजे कोणीही विखारी प्रतिसाद न देता एक एक गोष्ट समजून घेतली.

या निमित्ताने विचारांची/माहितीची जी देवाणघेवाण झाली ती अप्रतिम होती. मायबोली सारख्या संकेतस्थळाचा याहून सुंदर उपयोग तो काय असू शकतो.

तोच धागा पकडून कैपोचे यांनी सुचवल्याप्रमाणे हा नवीन धागा येथे काढत आहे. याचा उद्देश मी खाली स्पष्ट करतो.

तत्पूर्वी एक स्वानुभव मला सांगावासा वाटतो.
मी सावरकरांचा निस्सीम भक्त होतो आणि आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी स्वतः लिहिलेले बरेच लिखाण मी वाचले. स्वातंत्र्य संग्रमातल्या इतर अनेक महापुरुषांबद्दल पुढे वाचनात आले.
यामधून एक विचारधारा निर्माण होत गेली ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जहाल मतवादी विचारांशी जास्त जवळीक होती.
याच बरोबर अजून एक विचारधारा नकळतपणे डेव्हलप होत गेली ज्यात मवाळ गट, गांधीजी यांच्याबद्दल तिरस्कार होता.

यातला 'तिरस्कार' हा शब्द महत्वाचा आहे. हा तिरस्कार उगाच आपला मनात येऊन बसलेला होता.

यावर घरात अनेकदा वडिलांशी वादविवाद करताना ते मला गांधीजींचे महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करत. लाखो लोक त्यांच्या मागे गेले यात नक्कीच फार मोठा अर्थ आहे असे ते सांगत.
त्यावेळी मला ते फारसे पटत नसे.

पुढे जशी जशी प्रगल्भता वाढत गेली तसतसे मी एका थर्ड आय ने जगाकडे पाहू लागलो. ज्यामुळे मला हे लक्षात यायला लागले कि प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला त्याच्या झालेल्या जडणघडणी प्रमाणे विचार करतो आणि निर्णय घेतो. अर्थात, त्याच्या जागी तो बरोबरच असतो.

सावरकर असो वं गांधीजी, कोणीहि मुद्दाम हून चला आता आपण भारत देशाला खड्ड्यात घालू म्हणून काम केले आहे का.? अर्थातच नाही. दोघांनी कार्य तर भारताच्या उन्नतीसाठीच केले. त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. इतकेच..

मग आपल्या मनात 'तिरस्कार' असण्याचे कारण ते काय.?

यामध्ये असहमती असू शकते. मतभेद असू शकतात. पण तिरस्कार हा एक बिनगरचेचा घटक आहे.

तिरस्कार अज्ञानातून येतो. आणि मतभेद अभ्यासातून येतात.

या विचारातून मग मी गांधीजींचे चरित्र वाचण्याचे ठरवले. लकीली याच दरम्यान एकदा काकांच्या घरी गेलेलो असताना त्यांच्याकडे मला गांधीजींचे आत्मचरित्र मिळाले. मी ते त्यांच्याकडून घेऊन वाचायला सुरुवात केली.
लवकरच माझे गांधीजींबद्दल असलेले मत पूर्णपणे बदलले.
त्यांच्या काही गोष्टी मला पटल्या, काही नाही पटल्या. पण मनातला गांधीजींबद्दलचा आदर मात्र खूप वाढला. त्यांच व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. असं व्यक्तिमत्व जगात पुन्हा होणे नाही या मताला मी आलो.

मनातील पूर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्या चष्म्यातून जग पाहताना खूप छान वाटले. (अजूनही माझे वाचन सुरु आहे. खंड पडलाय जरा, पण लवकरच पूर्ण होईल.)

अशा प्रकारे माझ्या मनातून तिरस्कार हद्दपार झाल्यावर मला एक मानसिक शांतता मिळाली. कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.

अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.

असो. तर या धाग्यावर हा अनुभव सांगण्याचे प्रयोजन असे कि आपण येथे परस्परविरोधी विचार असलेले लोक एकत्र येऊन, शांतपणे चर्चा करून समोरची बाजू समजून घेऊ. समोरच्याचे मत जसे आहे तसे का आहे त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून आपल्या मनातील तिरस्कार दूर होईल. एकमेकांकडून माहित नसलेल्या गोष्टी कळतील. जाणीवा वाढतील. सहिष्णुता वाढेल. आभ्यास वाढेल. आपल्या पैकी बहुतेकांनी कोणत्या तरी एकाच बाजूचा पण सखोल आभ्यास केलेला असेल. त्याचा एकमेकांना फायदा होईल.

दोन्ही बाजूंची सहमती बऱ्याच बाबतीत शक्य नाही हे तर आपल्याला माहितच आहे. हे गृहीत धरूनच आपण बोलूया. तिरस्कार नाहीसा होत गेला तरी या धाग्याचा उद्देश सफल होईल.
आपण एकमेकांशी असहमत असू, पण तरी एका बाजूने असू Happy

या धाग्यावर सावरकर, गांधी, आंबेडकर, कॉंग्रेस, भाजप, हिंदू, मुसलमान, इसाई कोणताही विषय वर्ज्य नाही.
फक्त हा धागा नावाप्रमाणे सहिष्णू राहू द्यावा. (या दोन वाक्यांवरून हा प्रयोग फारच धाडसी वाटतोय मला)
असो. वरून देव बघत आहे. जो आयडी असहिष्णुता दाखवेल त्याचा मृत्यू अटळ आहे.
कोणीही असहिष्णूता दाखवल्यास त्याला कृपया कोणतेही उत्तर देऊ नका. शांतता राखा.

याच उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण जमेल तसे आपापल्या आवडत्या नेत्यावर लेख लिहूया. म्हणजे माहितीची देवाण घेवाण होईल आणि विषय निघतील ..

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

आर्य बाहेरून आले या थिअरीला संघाचा असलेला विरोध सर्वश्रुत आहे. >>
विकु, लेटेस्ट संशोधनानुसार या थियरीचे काही ठोस पुरावे नाहीत असे समोर आल्याचे वाचले होते.
संघाचे जाउद्या, तुमचे स्वतःचे अभ्यासु मत काय आहे? पुर्वी ती एक थिअरी होती. पण नंतर त्यात वेळोवेळी बदल आणि संशोधन झालेले आहे ज्यानुसार या मायग्रेशन चे ठोस पुरावे नाहीत. तसेच द्रवीडीयन + युरोपीयन यांचे फार फार पुर्वीचे पुरुष पुर्वज एकच असल्याचे पुरावे आहेत. त्याबद्दल तुमचे काय मत आहे?

चिनूक्स
आता कळाले ही चर्चा इथे का ते. Happy

सीएसआयर तर फंडामेंटल रिसर्च साठी आहे ना ?
अप्लाईड रिसर्च साठी इस्त्रो, डीआरडीओ, बीएआरसी, फूड रिसर्च लॅब, ए आर आय , सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पोल्युशन रिसर्च सेंटर अशा संस्था आहेत ना ? ज्याचे काम त्याला सांगावे.

हल्ली अप्लाईड रिसर्चच्या लॅबकडे पैसा असल्याने तिथेच फंडामेंटल रिसर्चचे विभाग सुरू झालेत. कॉम्पोझिटस मधला रिसर्च अशाच एका लॅब मधे चालू आहे. नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल दोन्ही ठिकाणी रिसर्च चालू आहे. या संस्थांनी एकमेकांना परस्परपूरकच रहायला हवे, स्पर्धक म्हणून नको.

<सीएसआयर तर फंडामेंटल रिसर्च साठी आहे ना ?>

नाही, फक्त मूलभूत संशोधनासाठी नाही. अनेक प्रयोगशाळा उपयुक्त संशोधनासाठी आहेत. काही प्रयोगशाळांमध्ये दोन्ही प्रकारचं संशोधन चालतं.

बेफिकीर,
जिज्ञानासाने उत्तर दिलं आहे, तरीही -

भारतातल्या सरकारी प्रयोगशाळांमध्ये संशोधन करतानाही मन मानेल तसं वागता येत नाही. मला पीएचडी करायचं असेल, तर संशोधनाचा विषय समितीकडून मान्य करून घ्यावा लागतो. त्याआधी पीएचडीसाठी आधी एखाद्या प्रोजेक्टमध्ये असिस्टन्ट म्हणून रुजू व्हावं लागतं, किंवा यूजीसी / सीएसआयआरची नेट परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागतं. किमान दोन वर्षं संशोधन करून, मुलाखत देऊन एसआरएफ ही फेलोशिप मिळते. मग त्यानंतर थीसिस.

शास्त्रज्ञांना प्रोजेक्ट मिळवण्यासाठी अर्ज करावे लागतात. कामाचं महत्त्व पटवून द्यावं लागतं. संशोधनासाठी प्रोजेक्ट मंजूर झाला तरी पैसे शास्त्रज्ञाला मिळत नाहीत. संस्थेला मिळतात. प्रत्येक वर्षी कशासाठी किती पैसे खर्च करायचे याचे नियम आहेत. वर्षभर पैसे पुरवावे लागतात. प्रोजेक्टवर भार पडू नये, म्हणून आम्ही आमच्या पैशानं कार्ट्रिज, कागद आणायचो प्रिंटआऊट घेण्यासाठी.

दर सहा महिन्यांनी केलेल्या कामाचं मूल्यांकनही करून घ्यावं लागतं. संशोधन योग्य दिशेनं जात नाहीये, पैसे नको तिथे खर्च होत आहेत असं समितीला वाटलं, तर केलेला खर्च समितीला पटवून द्यावा लागतो. आपलं काम योग्य दिशेने जात आहे, हे शास्त्रज्ञाला सिद्ध करावं लागतं. हे आजचे नियम नाहीत. निदान गेली पंधरा वर्षं हे नियम आहेत, आणि ते योग्यच आहेत.

संशोधकांनी काय संशोधन करावं, याबद्दल बाहेरच्या संस्थेनं का बोलावं, हे कळलं नाही. त्यासाठी सीएसआयआर आहे, संशोधक आहेत.

>>> चिनूक्स | 10 January, 2016 - 11:29 नवीन <<<

चिनूक्स,

तुमची ही मोठी पोस्ट वाचली. एक शंका विचारू का? तुमच्या आधीच्या पोस्ट्समधील आक्षेप हा 'संघाने (किंवा सरकारने) स्वतःचे राजकीय (किंवा तत्सम) अजेंडे राबवण्याचा प्रयत्न संशोधन क्षेत्राच्या माध्यमातून करणे' असा होता ना? आणि आता ह्या पोस्टमधील आक्षेप 'संशोधनाबाबत सरकारला काहीही माहीत नसणे व सरकारचे स्वतःचेच नियोजन गडबडलेले असणे' असे आहेत ना? मग हे दोन पूर्णपणे वेगळे आक्षेप होतात ना?

आधीच्या आक्षेपानुसार संघ राजकीय / हिंदुत्ववादी किंवा तत्सम अजेंडे आणू पाहात आहे असा अर्थ मला वाटला. नंतरचे दोन आक्षेप हे सरकार आधी स्वतःच क्लॅरिटी आणू शकत नाही आहे असे वाटत आहेत. हे अंडरस्टँडिंग चूक असले तर प्रश्न मिटला. पण बरोबर असले तर तुमच्या आक्षेपाची तीव्रता एकदम झटक्यात खूप कमी होत नाही का? म्हणजे संघ अडाणीपणा करत असेल पण तेढ वाढवणारे किंवा विकास रोखणारे काम करत नाही असे त्यातून निष्पन्न होईल ना?

(ही शंका आहे, मतप्रदर्शन नव्हे) Happy

(तुमच्या ह्या विधानामुळे ही शंका आली - >>>धोरणांना विरोध केल्यास 'तुम्हांला संघ म्हणजे काय हे कळत नाही, आधी संघविचार समजून घ्या' असं स्टॉक उत्तर मिळतं.<<<)

<<तरीही गेल्या सहा दशकांमध्ये पगार चांगले नसून, सुविधा नसून भारतीय संशोधकांनी बरीच मजल मारली आहे.>>

चिनूक्स्,याबद्दल अधिक कुठे वाचायला मिळेल? ही एक अभिमानास्पद बाब आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत हे पोचायला हवं. अजूनही जागतीक पातळीवर भारताची इमेज "संशोधकांचा देश" अशी नाही. बॉडीशॉपर, चीप लेबर अशीच आहे.झालंच तर exporter of talent (brain drain) अशी आहे. फंडामेंटल रिसर्चमधील भारतीय सायंटिस्ट्सच्या सहा दशकांतील प्रगतीबद्दल मेनस्ट्रीम मिडियाही काहीच बोलत नाही.

काही नैसर्गीक आपत्तींमध्ये संघाचे स्वयंसेवक निरपेक्ष वृत्तीने सहाय्य करण्यासाठी जातात असे ऐकले आहे. हे खरे की खोटे हे स्वानुभव नसल्याने माहीत नाही. पण हे खरे आहे म्हणून कट्टर एकांगी भूमिका मान्य व्हावी असे म्हणता येणार नाहीच. पण माझा असा अंदाज आहे की संघटना निर्माण होणे, शाबूत राहणे व वाढणे ह्यासाठी कोणतातरी एक विचार आवश्यक असतो. संघाकडे हिंदुत्ववाद आहे, इतरांकडे इतर काही विचार आहेत. संघाने कधी जाळपोळ, रास्ता रोको, पुतळे फोडणे किंवा हलवणे असे प्रकार केल्याचे ऐकिवात नाही. मग कट्टर विचारावर उभ्या राहिलेल्या आणि कृतीही भडकच करणार्‍या इतर काही संघटनांच्या तुलनेत संघाला थोडे झुकते माप मिळू नये का?

जाणकारांनी कृपया लिहावे.

बेफिकीर,

माझे आक्षेप -

१. संघानं धोरण ठरवू नये किंवा सरकारी संस्थांमध्ये लुडबूड करू नये.
२. सरकारनं स्वतःच्या धोरणांसाठी (जी कशी राबवायची हे त्यांनाच माहीत नाही) शास्त्रज्ञांचं आणि भारतीय विज्ञानाचं नुकसान करू नये किंवा त्यांना इतरांच्या क्षेत्रात काम करायला लावू नये.

हे दोन्ही आक्षेप माझ्या पहिल्या पोस्टीपासून आहेत.

<आणि आता ह्या पोस्टमधील आक्षेप 'संशोधनाबाबत सरकारला काहीही माहीत नसणे व सरकारचे स्वतःचेच नियोजन गडबडलेले असणे' असे आहेत ना? मग हे दोन पूर्णपणे वेगळे आक्षेप होतात ना?>

हा आक्षेप आहेच. पण त्यामुळे माझ्या मूळ आक्षेपाची धार कमी कशी होते? शास्त्रज्ञांनी काय करावं हे ठरवण्याआधी सरकारनं काय करावं, हे मी लिहिलं आहे. मी सतत एकच एक वाक्य प्रत्येक पोस्टीत लिहावं, अशी अपेक्षा आहे का?

सुनिधीनं गंगेच्या शुद्धीकरणाबद्दल लिहिलं आहे, त्या अनुषंगानं मी सरकारच्या धोरणाबद्दल आणि योजनांच्या अभावाबद्दल लिहिलं. स्वतःची कामं व्यवस्थित न करता शास्त्रज्ञांना वेठीस का धरावं, असा माझा प्रश्न आहे. शास्त्रज्ञांनी सगळी कामं सोडून हीच चारपाच कामं का करावी, हा मूळ आक्षेप कायम आहेच.

<धोरणांना विरोध केल्यास 'तुम्हांला संघ म्हणजे काय हे कळत नाही, आधी संघविचार समजून घ्या' असं स्टॉक उत्तर मिळतं>

इथे धोरण = संघाची लुडबूड + शास्त्रज्ञांनी फक्त उपयुक्त, 'समाजोपयोगी' संशोधन करणे

बाकी, मी 'हिंदुत्ववादी' हा शब्द कुठेही वापरलेला नाही. नद्यांचं शुद्धीकरण ही अत्यावश्यक बाब आहे आणि गेली वीस वर्षं त्यावर योजना बनत आहेत. पण सरकारी धोरणांच्या अभावामुळे बीएआरसीनं तयार केलेल्या यंत्रांचा का उपयोग नाही, हे मी लिहिलं आहे. माझी पोस्ट पुन्हा नीट वाचल्यास मला काय म्हणायचं आहे ते लक्षात येईल. Happy

सनव,

बीएआरसी, इस्रो, टीआयएफआर, सेन्ट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट, एनसीएल (Computational chemistry, nanotechnology) यांच्या कामांबद्दल गूगल केल्यास वाचायला मिळेल. या संस्थांमधले अनेक शास्त्रज्ञ जागतिक दर्जाचं काम करतात.

धन्यवाद चिनूक्स. विल गुगल इट. त्यातही नॅनोटेक्नॉलिजी इंटरेस्टिंग वाटतंय.

बार्क आणि इस्त्रो अप्लाईड रिसर्चच करतात असा माझा '(गैर्)समज होता.

ही वरची यादी उपयुक्त + मूलभूत अशी आहे. उदा, बार्कला डॉ. याखनी होते, ज्यांनी नॅनोतंत्रज्ञानात मूलभूत संशोधन केलं. बाकीचं विपूत बोलू.

चिनूक्स, खुप महत्वाचा मुद्दा.

कापोचे यांनी लिहीलेला हा एक महत्वाचा मुद्दा ( या धाग्यावर अवांतर असला तरी )
<<फंडामेंटल रिसर्च मधे आपली गुंतवणूक शून्य आहे. तशी संस्कृतीच डेव्हलप झालेली नाही. एखाद्या विद्यार्थ्याला रात्रीच्या एक वाजता प्रयोगशाळेत जाऊन एखादा प्रयोग करावासा वाटला तर त्याला ती सुविधा उपलब्ध व्हायला हवी. >> ++

चिनुक्स, एकुणच खुप चांगली माहिती मिळाली. खुप आभार. मुद्दा काल समजला होताच. आज अजुन नीट समजला.

चिनुक्स ,
संघाच्या विज्ञान धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेत असलेल्या समावेश आक्षेपार्ह वाटण्याचे काही कारण नाही असे माझे मत आहे,
कोणतेही सरकार असो आपापल्या मर्जीतील लोकांना पदे देण्याकडे त्याचा कल असतो. आता या सरकारच्या मर्जीतले लोक म्हणजे संघाचे लोक आहेत.

संघाने विज्ञान क्षेत्रात लुडबुड करू नये कारण त्यांच्याकडे तशा प्रकारचे मनुष्यबळ नाही असा एक मुद्दा होता,
तर संघाच्या विजन भारती मध्ये काही सामान्य स्वयंसेवक नाहीत तर त्यामध्ये विजय भटकर यांच्या सारख्या विवध संशोधकांचा समावेश आहे. त्यात इस्रो, DRDO सारख्या संस्थांचे प्रमुख पद सांभाळलेल्या व्यक्ती देखील आहेत. त्याची लिस्ट येथे मिळेल.
http://vibhaindia.org/governing-council-members/

त्यामुळे संघाचे स्वयंसेवक फक्त शिस्त आणि देशभक्ती याच्या जोरावर विज्ञान क्षेत्रातील धोरणे ठरवत आहेत असे नाही.

<< 'सहा महिन्यात / एका वर्षात अमूक एक झालंच पाहिजे' असं सरकार शास्त्रज्ञांना सांगू शकत नाही. >>
असा दबाव वगेरे आणला जात आहे असे मला काही वाटत नाही.We also resolve to: अशा वाक्याने त्या जाहीरनाम्याची सुरुवात होत आहे. त्यामुळे मला वाटते हे जस्ट समोर ठेवलेले गोल्स आहेत जे अचिव्ह करायचा जास्तीत जास्त यत्न करायचा आहे असा त्याचा अर्थ आहे. असे सांगण्यात गैर ते काय.
मुळात असे काही लोक समाजात आहेत कि ज्यांना संघाच अस्तित्वच खटकत. त्यामुळे संघाचे लोक तेथे आहेत म्हणल्यावर त्यांनी काहिही बोलले तरी त्यात त्यांना काहीतरी निगेटिव्ह दिसतेच.
आताच्या सरकारवर सर्व योजना पूर्ण करण्याचा अभूतपूर्व ताण आहे. लोकांच्या अपेक्षा भरपूर आहेत. त्यामुळे सुद्धा सरकारकडून थोडाफार दबाव येत असावा.
एवढ्या प्रमाणात गोष्टी बदल घडवून आणायचा म्हणजे सर्व व्यवस्थांवर कुठेतरी ताण पडणारच आहे. सर्वांचे समाधान करणे औघड आहे. तरीही संशोधना सारख्या क्षेत्रात काम करणाऱ्यांकरता गोष्टी त्रासदायक होणार नाही हे सरकारने पहिले पाहिजे.

संघविचार समजून घ्या :
हा संघाचा एक दुर्गुण आहे हे मी मान्य करतो. संघविचार समजून घ्या असे उत्तर देणे योग्य नाही. तो संघविचार काय आहे हे समजून सांगणे गरजेचे आहे. यामुळे संघाचे बरेच विचार गोष्टी बाहेर पोहोचतच नाहीत आणि गैरसमज होतात.
यामागे संघाच्या प्रत्येक गोष्टीला एकदम कडाडून होणारा विरोध हे सुद्धा एक कारण असावे. अशी असहिष्णुता गेली अनेक वर्षे संघ झेलत आहे. 'संघाला विरोध करा आणि स्वतःला पुरोगामी सिद्ध करा' हे गेले अनेक वर्ष चालू आहे. यामुळे कुठेतरी आपण आपले काम करत राहावे, काहिही बोलले तरी ते समोरच्याला पटणारच नाहीये हे बऱ्याच संघी लोकांच्या डोक्यात बसलेले असते त्यामुळे बरेच जण उत्तर देण्याचे टाळतात.
पण असे करून काही चालण्या सारखे नाही. यातून संघाविषयी गैरसमज फक्त वाढत राहतील. त्यामुळे कितीही विरोध झाला तरी संघ समर्थकांनी आपला मुद्दा शांतपणे मांडला पाहिजे असे मला वाटते.

------------------------------

पुरातन भारतीय विज्ञान (वगैरे) :
या विषयावर बरीच टिका होते. पण आपल्या पुरातन संस्कृती मध्ये नक्कीच काही विशेष गोष्टी होत्या. Spirituality शी संबंधित गोष्टी खरोखर संशोधन करण्यासारख्या आहेत.
बंगलोरला एका कॉन्फरन्स दरम्यान एक वक्ते म्हणाले ज्या देशाने आपली जी विशेषता आहे ती ओळखून ते डेव्हलप करावे. (आणि जगाला विकावे)
Spirituality किंवा तत्सम गोष्टी हि आपली विशेषता आहे.
विज्ञानाने अजून उलगडा झालेला नाही अशा अनेक गोष्टी आहेत.
उदा. ज्योतिषशास्त्र. हे विश्वासार्ह वाटत नाही कारण सांगणाऱ्या माणसाच्या कौशल्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. त्यामुळे आपण याचा आधार घेत नाही. परंतु एकदम छातीठोक पणे ज्योतिषशास्त्र हे थोतांडच आहे असे प्रुव्ह करणे औघड आहे. माझे असे मत बनायचे कारण म्हणजे कोणी एक ज्योतिषी (अवचट कदाचित) आहेत त्यांनी पावसाबद्दल केलेले प्रेडिक्शन्स ९५% पेक्षा जास्त बरोबर आले म्हणे. अशा अनेक गोष्टी आहेत.
तसेच यात काहीतरी तथ्य असू शकते अस वाटण्याचे अजून एक कारण म्हणजे पुरातन काळातले बरेच वैज्ञानिक हे ज्योतिषशास्त्राचे जाणकार होते असे उल्लेख सापडतात.

अशा काही गोष्टींमधून काही उत्तम बाहेर पडण्याची शक्यता असेल तर प्रयत्न करण्यात फार काही गैर नाही असे मला वाटते.

अशा प्रकारच्या विषयांवर संशोधन करणे आज कालबाह्य वाटत असले तरी अशीही एक शक्यता आहे कि ते काळाच्या फार पुढे आहे. कारण संशोधनातून काय बाहेर पडेल ते काय सांगता येत.

अर्थात माझे असे आज्जीबात म्हणणे नाही कि सर्व शास्त्रज्ञांनी हेच करावे. मी आपला एक दृष्टीकोन सांगितला.

उद्या तात्या कापोचे यांनी उपस्थित केलेल्या काही विषयांवर लिहायचे आहे. विकू यांची लेखावरची प्रतिक्रिया त्यावर पण लिहायचे आहे.
टण्या यांचा हिंदू का भारतीय का नाही हा मुद्दा सावकाश घेऊ, यात बाबरी इ. प्रकरणे येणार असल्याने सगळ्यांकडे बरेच बोलण्यासारखे असेल Wink

प्रकु, ज्योतिषशास्त्रावर घसरु नका. किंवा स्पिरिच्युअ‍ॅलिटीवर. हाती फार काही लागणार नाही Sad
त्या गोष्टी वैयक्तिक पातळीवर लोकांना आधार वाटू शकतात, पण सामुहीक उन्नतिचा तो मार्ग खचितच नाही
मूलभूत विज्ञानाची पायामल्ली होत नसती तर त्या दोन गोष्टींमध्ये कसे तथ्य नाही हे समजणे सोपे झाले असते.

स्पिरीच्युअलीटी/ज्योतिष/...

अजून काय आता? हे पटणेबल नाही. कारण मुळात हे सायन्स नाहीच. सेलेबल तर मुळीच नाही. पुरातन भारतीय विज्ञानच भरीत करून खाल्लेलं बर. त्यातून काहीएक शिल्लक नाहीये.

आणि स्पिरीच्युअलीटी म्हणजे नेमकं काय, असाही प्रश्न उरतोच.

जो पक्ष, संघटना केवळ निवडणुक प्रचारावर काही शे कोटी उधळू शकते सॉरी ,गुंतवू शकत, त्या संघटनेला प्राचीन विज्ञान प्रूव करण्यासाठी खाजगी संशोधन का करता येऊ नय??
भाजप/ संघाने प्रायोजित केलेले काही संशोधन जे जर्नलमध्ये प्रसिध्द होऊन त्याला मान्यता मिळाली आहे( भले ते कितीही छोटे असेन,, अगदी शंख फूँकने आणी आरोग्य ,या पासून रामायणातील विमाने कोणताही विषय) असे माझ्या वाचनात नाही.
केले संशोधन तर डायरेक्ट राष्ट्रीय प्रयोगशाला वापरू,, नाहीतर अजिबात नाही

aschig, +1

प्रकु, तुमचे विचार वाचून मला भीती वाटू लागली आहे! किती हा आंधळेपणा! जिथे संघाची गरज नाही तिथे संघाने हस्तक्षेप करू नये. विजय भटकर यांना संशोधक आहेत म्हणून सगळ्या विषयातलं सगळं कळत असेल असा तुमचा खासा गैरसमज झालेला दिसतो! खरी परिस्थिती त्याच्या उलट असते. एखादा संशोधक आपल्या विशिष्ठ क्षेत्रात इतका पुढे गेलेला असतो की त्याला इतर विषयातल्या संशोधनाचे ज्ञान अद्ययावत ठेवणे मुश्कील असते. त्यामुळे संशोधक असणे म्हणजे सर्वज्ञानी असणे असे नव्हे. उदा. बारावीच्या शास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याला थोडेसे रसायन शास्त्राचे ज्ञान असते. पण तोच विद्यार्थी पुढे इंजिनिअरिंगला गेला तर त्याचे रसायन शास्त्राचे ज्ञान आपोआप अद्ययावत होत नाही. जरी मग तो computer science मधला मोठा शास्त्रज्ञ झाला तरी कदाचित त्याचे जीवशास्त्र किंवा रसायनशास्त्राचे ज्ञान हे कदाचित बारावी इतकेच राहील. खर सांगायचं तर तो अजेंडा वाचून मला तो फाडून टाकावा असे वाटले! इतका regressive आहे तो!

पुरातन भारतीय विज्ञान (वगैरे)>>> खरतर ते सगळं प्लीज पुराणात राहू द्या! अहो ग्रीक लोकांकडे देखील अशा देवी देवता आहेत. पण युरोपियन लोकं (सुदैवाने) मागे वळून पाहत बसले नाहीत! त्यांनी पेनिसिलीनचा शोध लावला. वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. आणि पुढे गेले. जग हे पुढे जाणाऱ्यासोबत चालते. इथे साधा वैज्ञानिक दृष्टीकोन नाहीये आपल्याकडे! एकतर बारावीला PCMB ला किती टक्के पडले त्याबरोबर तो फुकट मिळत नाही आणि त्यातून हे असले अजेंडे आणा की झालेच कल्याण!

संघविचार समजून घ्या>> संघाच्या लोकांनी संघ चुकू शकतो ह्यावर विश्वास ठेवावा. आणि चुकणे काही गैर नाही. उलट चुकणारा आपल्या चुकांमधून शिकू शकतो. पण त्यासाठी संघाच्या बाबतीत लोकांचे "गैरसमज" असतात असा जो संघाच्या लोकांचा "गैरसमज" आहे तो दूर व्हायला हवा. ज्या काही गोष्टी संघाने साध्य केल्या आहेत त्यांचे जरूर कौतुक आहे पण त्यामुळे संघ निर्दोष ठरत नाही.

संघाच्या लोकांनी संघ चुकू शकतो ह्यावर विश्वास ठेवावा.>>>>> +१ जिज्ञासा उत्तम पोस्ट.

प्रकु, मी आधीच लिहीले की सन्घाच्या कार्याचे मला कौतुक आहेच, पण त्यान्ची कर्मठ तत्वे मला मान्य नाहीत.

महाराष्ट्र टाईम्समधील बातमी:

संघाने सायन्स परिषदेत आपली माणसे घुसडली. एकाने तेथे वक्तव्य केले की भगवान शंकर पर्यावरणवादी होते. एकाने शंख वाजवला व शंख वाजवणे आरोग्यास चांगले असल्याचे सांगितले.

<<एकाने शंख वाजवला व शंख वाजवणे आरोग्यास चांगले असल्याचे सांगितले.>>
----- यावर सखोल सन्शोधन होणे अत्यन्त गरजेचे आहे... Happy

फु- फु करुन अनेक मोठ- मोठे फुगे तोन्डा वाटे फुगवण्याने गाल आणि फुफुस्सा चे आरोग्य चान्गले रहाण्यास मदत होते, त्यान्च्या स्नायूना व्यायाम मिळतो असा माझा अनुभव आहे,

प्रकुजी,

आपला धागा काढण्याचा उद्देश खरच उत्तम आहे, काही काळ मी ही संघ शाखात जात होतो. अजाणत्या वयात आणि जाणत्या वयात सुध्दा.

गांधीजींना विरोध करणारे, तिरस्कार करणारे कोणतेही लेखन माझ्या वाचनात नाही. १९८९ /१९९२ काळात जी दोन पुस्तके वाचनात आली त्यात प्रामुख्याने ज्या घटनांचा उल्लेख होता त्या अश्या

१) गांधीजींचा खिलाफत चळवळीला मुद्दा

आज औवेसींनी सुध्दा खलिफा आणि त्याचे मुस्लीम धर्मगुरु म्हणुन असलेले वर्चस्व किंवा अधिकार सांगणार्‍या आय एस आय एस ( नाव चुकत असेल ) धर्मवेड्या आणि दशहतवादाचा कळस असलेल्या चळवळीला विरोध दर्शवत ही इस्लाम के खिलाफ असे म्हणले आहे. जगभरातुन दशहतवादी जमा करण्याच्या प्रयत्नांना खिळ बसतो पाहुन त्या तथाकथीत खलीफाचे पित्त खवळले आहे, त्याने औवेसींना मारण्याची धमकी दिल्याचे वृत आहे.

सबब, गांधीजी म्हणत तो मुस्लीमांना कुरवाळण्याचा मार्ग कसा चुकीचा होता हीच चर्चा त्या पुस्तकात होती.

२) गांधीजींनी आपल्या अनेक लेखनात मुस्लीमांनी बळजबरीने धर्मपरिवर्तन केल्याचे मान्य केले आहे. यावर पर्याय काय तर त्यांना पुन्हा हिंदु करुन घेणे. अन्यथा आज जसा काश्मिर मुस्लीम बह्ल झाल्यामुळे हिंदुंना काश्मिर सोडावा लागला ही स्थिती येईल.

गांधीजींनी धर्मपरिवर्तन करणार्‍या स्वामी श्रध्दानंदांच्या खुन्याला माफी द्यावी असे लिहले. यावर संघाने चर्चा केली होती. शिवाजी महाराजांनी सुध्दा नेताजी पालकरला हिंदु करुन घेतले. ह्या समस्येवर हाच उपाय आहे.

गांधीजींना कुठेही कमी लेखण्याचा प्रकार या लेखनात नव्हता, पण सरसकट सर्वच गोष्टी मानण्यास विरोध होता इतकाच त्या लेखनाचा अर्थ होता.

गांधीजींनी औद्योगीकरणावर आणि त्यामुळे येणार्‍या शोषण वृत्तीवर जे लेखन केले आहे माझ्यामते आज आय एल ओ सारख्या संस्थेला ही एक विचारधारा म्हणुन पुरेल इतकी आहे.

गांधीजींचा तिरस्कार कोणीही करावा असे काहीच नाही. पण माथेफिरु गोडसेचा संघाशी संबंध जोडुन संघाला बदनाम करण्यात येते. त्या खटल्यात काहीही सिध्द झाले नाही तरी दुसरा मतप्रवाह संघाला बदनाम करण्याची संधी सोडत नाही, यामागे संघ विचारधारेला विरोध आहे हे नक्की.

नेहमी प्रमाणे धाग्याच्या मुळ विचाराला छेद देत धागा भरकटवण्याचे उपक्रम होणारच कारण प्रकूजी आता तुमच्यावर संघवाला म्हणुन शिक्का बसला असेल.

प्रकु,

उत्तराबद्दल आभार Happy

तुम्ही थेट spirituality आणि ज्योतिष्यशास्त्रावरच उतरल्यानंतर माझ्याकडे लिहिण्यासारखं काही नाही.
त्यातही तुम्ही 'जबरदस्ती वगैरे काही होत नाही' असं जाहीर केल्यानं माझ्या आधीच्या पोस्टींनाही काही अर्थ राहत नाही.

तरीही -

विज्ञान भारतीच्या कार्यकारिणीवर कोण कोण आहे, हे मला ठाऊक आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात विज्ञान प्रसाराबद्दल त्यांचा सत्कार दोनदा झाला आहे. मी त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या आमंत्रणावरून दोनदा नॅनोविज्ञानाबद्दल बोलायला महाविद्यालयांमध्ये गेलो आहे. मात्र म्हणून त्यांची सर्वच मतं आदर्श आणि अनुकरणीय आहेत, असं नाही. किंबहुना ती अतिशय घातक आहेत.

विज्ञान भारतीच्या कार्यकरिणीवरचे अनेक मोठे शास्त्रज्ञ / तंत्रज्ञ हे patrons आहेत. मार्गदर्शक केवळ. त्यांच्या मतांना तिथे किती किंमत आहे, हे ठाऊन नाही. ती नसावीच. गेल्या पंधरा वर्षांचा माझा अनुभव मला सांगतो की काकोडकर किंवा माधवन नायर यांची मतं, कार्यपद्धती अजिबात प्रतिगामी नाही आणि त्यांनी देहरादूनला निघाला तसला जाहीरनामा निघूच दिला नसता.

डॉ. भटकरांची सर्वच मतं शास्त्रज्ञ व संशोधक मान्य करतातच असं नाही. ते प्राचीन विज्ञानाबद्दल आणि गायींबद्दल जे लिहितात, बोलतात त्याचा अनेकांनी प्रतिवाद केला आहे.

विज्ञान भारती ही शिस्तप्रिय, निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना आहे वगैरे बाबी संशोधकांना सांगितल्या जात असल्या तरी याच संस्थेचे एक संचालक व्यापम घोटाळ्यात अडकले असून सीबीआयनं त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

असो. पण तुम्ही आता मला इतक्या ठामपणे खात्री दिल्याबद्दल तुमचे आभार.

kapoche जी,

जन्मशताब्दी वर्षात बाबासाहेब मान्य नसल्याचं सांगण्यात येतं आणि सव्वाशेव्या वर्षात एकदम यू टर्न कसा काय घेतला जातो ?

मी तर बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात १४ एप्रीलला संघाच्या संचलनाला गेलो होतो. पिंपरीला डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याला आम्ही संघाच्या कार्यकत्यांनी मानवंदन केले होते. हा स्थानिक कार्येक्रम नव्हता तसेच संघाच्या इतिहासात असे घडले नाही हे ही नमुद करावेसे वाटते.

इतकच काय जनता सहकारी बॅक या संस्थेने जन्मशताब्दी वर्षात डॉ आंबेडकर आणि महात्मा फुले यांच चित्र असलेल कॅलेडर प्रसिध्द केल होत. जनता सहकारी ही संघाच्या विचाराच्या लोकांनी सुरु केलेली बँक आहे हे वेगळे लिहणे नको.

बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात समरसता मंच या संघ विचाराच्या लोकांनी मुंबई ते नागपुर अशी रॅली काढली होती. ज्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचीच फक्त चित्रे रथावर होती. यानिमीत्ताने चिंचवडला रॅलीचा मुक्काम असताना त्या आधीच्या सभेत टेक्सासजी गायकवाड खुप चांगल बोलले.

इतक्या स्मृती माझ्याजवळ आहेत. आपण आपली माहिती पुन्हा तपासुन घ्यावी.

Pages