सहिष्णू धागा

Submitted by प्रकु on 8 January, 2016 - 16:14

मित्रहो,

शिवशक्ती संगमच्या निमित्ताने काढलेल्या धाग्यावर अतिशय सुंदर आणि संयत शब्दात चर्चा झाली. अनेक प्रश्न तेथे उपस्थित करण्यात आले आणि त्याला सगळ्यांनी मिळून आपापल्या परीने उत्तरे दिली.
मुख्य कौतुक म्हणजे कोणीही विखारी प्रतिसाद न देता एक एक गोष्ट समजून घेतली.

या निमित्ताने विचारांची/माहितीची जी देवाणघेवाण झाली ती अप्रतिम होती. मायबोली सारख्या संकेतस्थळाचा याहून सुंदर उपयोग तो काय असू शकतो.

तोच धागा पकडून कैपोचे यांनी सुचवल्याप्रमाणे हा नवीन धागा येथे काढत आहे. याचा उद्देश मी खाली स्पष्ट करतो.

तत्पूर्वी एक स्वानुभव मला सांगावासा वाटतो.
मी सावरकरांचा निस्सीम भक्त होतो आणि आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी स्वतः लिहिलेले बरेच लिखाण मी वाचले. स्वातंत्र्य संग्रमातल्या इतर अनेक महापुरुषांबद्दल पुढे वाचनात आले.
यामधून एक विचारधारा निर्माण होत गेली ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जहाल मतवादी विचारांशी जास्त जवळीक होती.
याच बरोबर अजून एक विचारधारा नकळतपणे डेव्हलप होत गेली ज्यात मवाळ गट, गांधीजी यांच्याबद्दल तिरस्कार होता.

यातला 'तिरस्कार' हा शब्द महत्वाचा आहे. हा तिरस्कार उगाच आपला मनात येऊन बसलेला होता.

यावर घरात अनेकदा वडिलांशी वादविवाद करताना ते मला गांधीजींचे महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करत. लाखो लोक त्यांच्या मागे गेले यात नक्कीच फार मोठा अर्थ आहे असे ते सांगत.
त्यावेळी मला ते फारसे पटत नसे.

पुढे जशी जशी प्रगल्भता वाढत गेली तसतसे मी एका थर्ड आय ने जगाकडे पाहू लागलो. ज्यामुळे मला हे लक्षात यायला लागले कि प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला त्याच्या झालेल्या जडणघडणी प्रमाणे विचार करतो आणि निर्णय घेतो. अर्थात, त्याच्या जागी तो बरोबरच असतो.

सावरकर असो वं गांधीजी, कोणीहि मुद्दाम हून चला आता आपण भारत देशाला खड्ड्यात घालू म्हणून काम केले आहे का.? अर्थातच नाही. दोघांनी कार्य तर भारताच्या उन्नतीसाठीच केले. त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. इतकेच..

मग आपल्या मनात 'तिरस्कार' असण्याचे कारण ते काय.?

यामध्ये असहमती असू शकते. मतभेद असू शकतात. पण तिरस्कार हा एक बिनगरचेचा घटक आहे.

तिरस्कार अज्ञानातून येतो. आणि मतभेद अभ्यासातून येतात.

या विचारातून मग मी गांधीजींचे चरित्र वाचण्याचे ठरवले. लकीली याच दरम्यान एकदा काकांच्या घरी गेलेलो असताना त्यांच्याकडे मला गांधीजींचे आत्मचरित्र मिळाले. मी ते त्यांच्याकडून घेऊन वाचायला सुरुवात केली.
लवकरच माझे गांधीजींबद्दल असलेले मत पूर्णपणे बदलले.
त्यांच्या काही गोष्टी मला पटल्या, काही नाही पटल्या. पण मनातला गांधीजींबद्दलचा आदर मात्र खूप वाढला. त्यांच व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. असं व्यक्तिमत्व जगात पुन्हा होणे नाही या मताला मी आलो.

मनातील पूर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्या चष्म्यातून जग पाहताना खूप छान वाटले. (अजूनही माझे वाचन सुरु आहे. खंड पडलाय जरा, पण लवकरच पूर्ण होईल.)

अशा प्रकारे माझ्या मनातून तिरस्कार हद्दपार झाल्यावर मला एक मानसिक शांतता मिळाली. कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.

अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.

असो. तर या धाग्यावर हा अनुभव सांगण्याचे प्रयोजन असे कि आपण येथे परस्परविरोधी विचार असलेले लोक एकत्र येऊन, शांतपणे चर्चा करून समोरची बाजू समजून घेऊ. समोरच्याचे मत जसे आहे तसे का आहे त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून आपल्या मनातील तिरस्कार दूर होईल. एकमेकांकडून माहित नसलेल्या गोष्टी कळतील. जाणीवा वाढतील. सहिष्णुता वाढेल. आभ्यास वाढेल. आपल्या पैकी बहुतेकांनी कोणत्या तरी एकाच बाजूचा पण सखोल आभ्यास केलेला असेल. त्याचा एकमेकांना फायदा होईल.

दोन्ही बाजूंची सहमती बऱ्याच बाबतीत शक्य नाही हे तर आपल्याला माहितच आहे. हे गृहीत धरूनच आपण बोलूया. तिरस्कार नाहीसा होत गेला तरी या धाग्याचा उद्देश सफल होईल.
आपण एकमेकांशी असहमत असू, पण तरी एका बाजूने असू Happy

या धाग्यावर सावरकर, गांधी, आंबेडकर, कॉंग्रेस, भाजप, हिंदू, मुसलमान, इसाई कोणताही विषय वर्ज्य नाही.
फक्त हा धागा नावाप्रमाणे सहिष्णू राहू द्यावा. (या दोन वाक्यांवरून हा प्रयोग फारच धाडसी वाटतोय मला)
असो. वरून देव बघत आहे. जो आयडी असहिष्णुता दाखवेल त्याचा मृत्यू अटळ आहे.
कोणीही असहिष्णूता दाखवल्यास त्याला कृपया कोणतेही उत्तर देऊ नका. शांतता राखा.

याच उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण जमेल तसे आपापल्या आवडत्या नेत्यावर लेख लिहूया. म्हणजे माहितीची देवाण घेवाण होईल आणि विषय निघतील ..

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

नेहमी ब्राम्हणांना शिव्या घालायचे जिवितकार्य मा. सचिनजी पगारेजी यांनी ह्याही धाग्यावर ही सुरु ठेवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

मस्त धागा, Happy
संघ कोणाचा आहे, यापेक्शा संघाने केलेले कार्य बघणे मला वाटते अधिक सुज्ञ पणाचे ठरेल.
शेवटी उणीवाच काढायच्या म्हटले तर , जगी असा परिपुर्ण कोण आहे?
Happy

मी इथे लिहीणार नव्हतो. पण.. पगारेउवाच बघितला आणि रहावले नाही....
>>>>> उपनयन सारख्या संस्कारातुन हिदु धर्मात दोन विषमता निर्माण होतात१)वर्ण विषमता- ह्यातुन ब्राम्हण हिंदु व शुद्र हिंदु अशी हिंदुचि विभागणी होते. <<<<<
पूर्वीही इथेच माबोवर अनेकवेळा सांगुन सवरुनही पगारे तोच तो प्रश्न परत परत उगाळतात.
हिंदु धर्माप्रमाणे, प्रत्येक जातीत उपनयन व्हावे. उपनयनाचा अर्थ इतकाच की शैक्षणीक ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश व्हावा व प्रथम आईबापाकडुन व नंतर गरज असल्यास त्या त्या गुरुकुलात जाऊन शिक्षण घेणे. इथे निव्वळ संस्क्रुत वेद घोकत बसणारी गुरुकुले अपेक्षित तेव्हाही नव्हती, आजही नाहीत.
यामुळे, ब्राह्मण हिंदु व शूर्द्र हिंदू अशी विभागणी उपनयनामुळे होत नाही.
शिवाय, "हिंदू शूद्र" असे काही अस्तित्वात नसुन, हिंदुंचे सोळा संस्कारापैकी एकही संस्कार न झालेला जगातील यच्चयावत मनुष्य प्राणी तो तो शूद्र असे मानले गेले आहे. त्यादृष्टीने तत्कालिन सत्ताधारी "इंग्रजही" शूद्रच होते असे मानले जायचे.

>>>>> २)हिंदु धर्मात मुलिंवर उपनयन संस्कार होत नाहित त्यामुळे होणारी विषमता. <<<<
हा अजुन एक गैरसमज. मुलिंचेही उपनयन फार पूर्वी अस्तित्वात होते, व सध्याही पुण्यामुंबईसारख्या शहरात निवडक ठिकाणी आवर्जुन केले जाते. पण मुलिंचे उपनयन केले वा नाही केले तरी त्यामुळे स्त्रीपुरुष विषमता कशी काय निर्माण होते?
एकिकडे पहिल्याच प्रश्नात तर तुम्ही गृहित धरता की उपनयन फक्त ब्राह्मणांमधे होते म्हणून विषमता वाढते, तर दुसरीकडे निव्वळ साडेतिन टक्क्याहुन कमी शिल्लक असलेल्या ब्राह्मणांनी त्यांच्या मुलिंचे उपनयन केले नाहि तर एकुणात उर्वरित साडे श्याहण्णव टक्के हिंदु धर्मात स्त्रीपुरुष विषमता कशी काय बोवा होते? अचाट अन अतर्क्य असे युक्तिवाद असतात तुमचे, व ते एकामागोमाग दगडफेक केल्यागत समोरच्यावर प्रश्नरुपात फेकल्यावर समोरचा भांबावुन जाऊ श्कतोच, पण जे कमी ग्रहण शक्तिचे असतील, त्यांना तुमचेच म्हणण्या/प्रश्नामागचे "सूप्त हेतू/कांगावे" खरेही वाटु लागु शकतात.
पगारे, वेळीच आवरा स्वत:ला. मी नॉर्मली असे कुणाला सांगत नाही, पण ब्राह्मणद्वेष्टेपणा, व हिंदुद्वेष्टेपणामुळे तुमचे गोड गोड संसदीय शब्दात वेड पांघरुन पेडगावला जाऊ पहाणे अति होतय.
अन हे तुम्हाला इथे सांगितल्याबद्दल माझि येथिल आयडी गेली तरि हरकत नाही.

माझी आई पूर्वापार संघ सभासद आहे पण मला वाटतं, संघ हा शब्द नंतर वापरात आला. पुर्वी शाखा असाच शब्द वापरात होता.

वरची चर्चा वाचतोय. विखार बाजूला ठेवता आला तर बरे होईल.

आंतरजातीय विवाह हा शब्द सुद्धा ज्यावेळी फारसा प्रचलित नव्हता तेव्हापासून मी हे विवाह बघत आलोय. माझ्या ५ काकांपैकी ३ कांकाची लग्ने आंतरजातीय होती, तेच का माझ्या दोन्ही मावस आज्यांची लग्नेही आंतरजातीय होती.
माझ्या भावाचेही.. या सर्व विवाहात प्रश्न आले ते खाण्यापिण्याच्या पद्धतीचे आणि भाषेचेच. पण एकत्र कुटुंब असल्याने.. सगळ्यांनी एकमेकांना समजावून घेतले.

मजा म्हणजे मालवणच्या घरी गेल्यावर, प्रत्येक काकीच्या हातच्या जेवणाची वेगवेगळी चव अनुभवली !

लिंबूटिंबू
पुढची चर्चा तुम्ही आणि पगारे एकमेकांच्या विपुत करा ना..इथे कृपया विषयांतर करु नका.
तेच तेच विषय इथे नकोत. उगाच इथे पगारेंना प्रोत्साहन देऊ नका प्रत्येक वेळी रिप्लाय करुन.

लिम्बुभाऊ तुमच्या या पोस्टला ( मुन्जीविषयी ) हजार अनुमोदन. मा. अ‍ॅडमीन याना विनन्ती की ही पोस्ट इथेच राहु द्यावी. कारण क्लीअर आहे, फक्त पगारेनी अथ पासुन इतीपर्यन्त नीट वाचलेले बरे, नाहीतर परत तेच तेच येईल..

पगारे, ही तुमची अशीच गोड गोड पण फसव्यारितीने आगलावु शब्द रचना, ...

>>>> माझा उद्देश काहीही वेगळा नाही.जानवे हे चिन्ह जातदर्शक आहे. <<<<< हिंदु धर्मावर टीका करायचि अथवा सुधरवायच असे ठरवत असाल तर आधी हिंदु धर्माबद्दलची माहिती वाढवा, अभ्यास करा व पूर्वग्रह काढुन विचार करायला शिका.... आधीच्या पोस्ट मधे साम्गितल्याप्रमाणे मुंज करुन जानवे घालण्याचा अधिकार हिंदु धर्मातील प्रत्येक जातिला आहेच. सध्या केवळ ब्राह्मण घालताना दिसतात असे सोईस्कर समजुन घेऊन जो आक्षेप ठेवताय तो बुडातुनच चुकीचा आहे. केवळ ब्राह्मणच नव्हे तर सोनारही घालतात, अन्य जातीत शिंपी/सुतार त्यांच्या "पद्धतीने गळ्यात्/खान्द्यावर वा कमरेला लावतात . या निवडक जाती सोडून बाकी जातींनी ते घालणे का सोडले हे त्यांना जरुर विचारुन घ्या. पण जानवे घातल्याने "जातीभेद" पसरतो असली आचरट विधाने निदान इथे तरी करु नका.
अन तसे तर प्रत्येक हिंदुने "शेंडी" राखलिच पाहिजे असाही नियम आहे. ज्यांना पाळायचा, ते पाळतातच, नाही ते नाही पाळत. उद्या तुम्ही म्हणाल की "शेंडी राखुन" तुम्ही अन्य धर्मांपासुन वेगळेपण का जपताय?" हो विचारु शकता तुम्ही तसे..... तुमचे काही सांगता येत नाही. किंबहुना तोच उद्देश घेऊन..... असो.

>>>>>ते घालुन हिंदु समाजापासुन वेगळे अस्तित्व का दर्शवले जाते <<<<<<<
जानवे घालुन वेगळे अस्तित्व "जातीचे" दाखवले जात नसुन "शिक्षणावस्थेतील ब्रह्मचर्याश्रमाचे" दाखविले जाते हे तुम्ही माहित करुन घेण्याचे कारणच नसेल ना? इतकेच नव्हे, तर पुढे ग्रुहस्थाश्रमात गेल्यावर म्हणजे लग्न केल्यावर "जानव्याची संख्या वाढवली जाते" जे ब्रह्मचर्याश्रमात केवळ एकच घातले जाते. अर्थात सोईस्कररित्या काहीही अभ्यास न करता, समजुन न घेता, मुद्दामहुन खवचट अर्धवट अन आचरट अवसानघातकी प्रश्न विचारुन हिम्दु धर्म व ब्राह्मण जात यावर गोड गोड शब्दात दुगाण्या झाडित गैरसमज पसरवायची एकही संधी तुम्ही सोडत नाहीच. तर मी इथे उत्तरा दाखल लिहितोय कारण येथिल कुणा हिंदु वाचकाचे मनात तुम्हास अपेक्षित असलेले गैरसमज रुजु नयेत.

>>>>> ह्याबद्दल प्रश्न विचारले तर ते खोडसाळ का ठरवले जात आहेत हे अनाकलनिय आहे. <<<<<<
खोडसाळच नव्हे, तर बरेच अधिक ठरवतोय मी तुम्हाला... सगळेच शब्दात सांगणे अनुचित ठरेल म्हणुन इतकेच. बाकी वर लिहीलेच आहे. खरे तर तुमच्या मोजक्या गोड गोड संसदीय शब्दातील पोस्ट मधुन हिंदु/ब्राह्मण द्वेषाचे वैचारिक वीष पसरवले जाते जे अर्धवटरित्या वाचल्यास वा त्याचा प्रतिवाद न झाल्यास वैचारिक स्लोपॉयजनिंग सारखेच घातक आहे असे मला वाटते. व हिंदुधर्म/ब्राह्मणजातिबद्दल धादांत असत्य ते देखिल येनकेनप्रकारेण पुन्हा पुन्हा थोपत राहून सत्यासारखे भासावयाला लावायचा तुमचा कायमच प्रयत्न असतो असे निदान माझ्या तरी निदर्शनास आलेले आहे.

>>>>>>> स्वताच्या रुढी कायम ठेउन भेदभाव कसा मिटणार.तथाकथित उच्चवर्णियांनी स्वता जुन्या रुढी सोडुन समाजाला आदर्श देणे महत्वाचे आहे इथे तर प्रश्न विचारणेही खोडसाळपणाचे मानले जाते. <<<<<
यासही वर उत्तर दिलेच आहे.
फक्त अजुन एक बाब सगळ्यांच्याच निदर्शनास येते ती म्हणजे उच्चवर्णिय म्हणत म्हणत तुम्ही केवळ साडेतिन टक्के ब्राह्मणावरच फक्त "अजेण्डा' असल्याप्रमाणे घसरत रहाता, तुमचे तोंडुन कधी ब्राह्मणेतर उच्चवर्णीयांबद्दल एक शब्दही अधिक उणा गेलेला माबोकरांनी बघितला नाहीये. तेव्हा तुमचे गोड गोड संसदीय शब्दांमागेच हेतू निव्वळ अन निव्वळ हिंदु धर्म व ब्राह्मणांना कुटाळकी सदृष पद्धतीने चर्चेत आणणे व जमेल तितके गैरसमज पसरविणे हाच आहे हे लपुन राहिलेले नाही.

याही उत्तरादाखल विवेचनात्मक पोस्ट मुळे माझी ही आयडी उडणार असेल, तर हरकत नाही.

साती, तसेही असेल, पण झक्की अन हुडासारख्यांची आयडीज उडू शकतात (अन सकुरा / पगारे शिल्लक रहातात Uhoh ) तिथे माझी आयडी म्हणजे किस झाडकी पत्ती हे देखिल मी विसरत नाही.

सचीन पगारे, एक लक्षात घ्या डॉ. बाबासाहेब आम्बेडकर, म. ज्योतिराव फुले, न्या. रानडे, आगरकर हे लोक ज्या उन्चीवर आहेत, ते केवळ त्यान्च्या कार्यामुळे नाही, तर लोकाना आपल्या बरोबर घेऊन चालण्याबद्दल पण आहेत. आधी एक आला, मग शम्भर आले, मग हजार, कारवा बनता गया. डॉ. बाबासाहेब आणी म. ज्योतिराव फुले याना काय त्रासातुन जावे लागले हे परत सान्गण्याची गरज नाही, पण यामुळे त्यानी कोणत्याच जाती-जमातीचा राग केला नाही. उलट त्या लोकाना आपल्या कार्यात सामिल करुन घेतले.

तुम्ही अगदी या उलट करता आहात. कुठलाही नीट अभ्यास न करता, काहीही विधाने ठोकत बसता. ज्या कॉन्ग्रेसचे तुम्ही एवढे कौतुक करता, त्यान्च्याबद्दल कधी जाणुन घेतलेत का की कॉन्ग्रेस कार्यकर्त्याचा जनसम्पर्क किती दान्डगा असतो ते. हे खरे आहे, तुमचे नेते सोडले तर ( राहुल गान्धी) बाकी खासदार, आमदार, नगरसेवक हे सतत वेगवेगळ्या जाती-जमातीना घेऊन पुढे जातात. माझ्या बाबान्च्या ओळखीचे एक कॉन्ग्रेसचे माजी आमदार आहेत, त्यानी ही माहिती दिली आणी त्यान्च्यामुळे आम्ही पण अनूभवली. भाजप- शिवसेनेपेक्षा देखील आज कॉन्ग्रेसचे कार्यक्र्ते जास्त आहेत.

तेव्हा राग-पूर्वग्रह सोडा. सगळ्याना बरोबर घेऊन चला. आन्तर्जातिय विवाहाचे विचाराल तर माझ्या घरात दोन असे विवाह झालेत. घरच्यानी स्वतः करुन दिलेत.

बास इतकेच.

चिनूक्स, भरत - पोस्ट्स आवडल्या. तो थ्रेड पकडून पुढच्या पोस्ट्स यायला हव्यात येथे. तात्यांनी लिहीलेले प्रश्न - त्यांचीही उत्तरे वाचायला आवडतील.

चिनुक्स, चांगली माहिती दिलीस. संशोधन क्षेत्राबद्दल बोलण्याची अजिबात पात्रता नाही पण सर्व योग्य ती संशोधनं चालु रहावीत व सर्वाना सरकारी आर्थिक सहाय्य मिळावेच. मात्र नद्या व भारत स्वच्छ हे सध्याच्या भारताला लागणारी निकडीची गरज आहे असेही वाटते, त्यातल्या त्यात नद्या.. तर त्याला प्राधान्य दिले गेले तर बरोबर होईल का? कारण कित्येक वर्षांपासुन पाण्याचे हाल, शेतकर्‍यांची दारुण अवस्था, भयानक अस्वच्छ्तेमधे रहाणर्‍या लोकांबद्दल ऐकतोय वाचतोय... त्यामुळे ते सुधारायला जितके लवकर सु॑रु होईल ते बरे ना? अर्थात तुम्ही लोक भारतात रहाता , तुम्हाला जास्त माहिती असणार की सध्या लोकांना जास्त कशाची गरज आहे?

व्वा.. भरप्पूर पोष्टी आलेल्या आहेत. सगळ्या वाचल्या. सगळ्यांना एकेक करून माझ्या माहिती नुसार उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. आत्ता फार थकवा आलाय. उद्या देतो.

हा लेख ज्यांना हवा त्यांनी वाचवा, थोडा परखड वगेरे भाषेत आहे. ते सोडून द्यावे पण काही मुद्दे छान आहेत म्हणून देतोय. लेखाचे टायटल शिवशक्ती संगमशी रिलेटेड असले ते एकंदर लेख संघाच्या बाबतीत आहे..
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-ramesh-patange-editorial-about-...

सुनिधी,
तुझ्या पोस्टीला सविस्तर उत्तर देतो नंतर. पण एक गंमत आठवली. बर्‍याच इंजिनीयरांना घरातले मोठे दटावतात, 'एवढा इंजिनीयर झालास, साधं घरातलं वायरिंग बदलता येत नाही / साधी कार का सुरू होत नाही हे सांगता येत नाही?' Happy

<< सॉरी, मला ज्या क्षेत्रात गती नाही, अनुभव नाही त्या क्षेत्राची धोरणं ठरवायला मी जाणार नाही. दुसरं क्षेत्र कशाला, माझ्या अभ्यासाच्या विषयातसुद्धा मी असं करणार नाही. >>> चिनुक्स हेच अंबानीज , टाटा , मनोहर पर्रीकर , नरेंद मोदी , सोनिया गांधी , मनमोहन सिंग ह्यांनाही त्याच्या सुरवातीच्या काळासाठी म्हटलं असतं तर ? मग त्यांनी सहभागच घ्यायला नको होता का ?

<< भारतात इनोव्हेशन करण्याच्या नादी उद्योग लागत नाहीत. म्हणूनच आपण एकीकडे स्वदेशीचा नारा देतो आणि दुसरीकडे 'इनोव्हेट इन इंडिया' न म्हणता 'मेक इन इंडिया' म्हणतो. >>> स्वातंत्र्य मिळाल्यापासुन भारतीय उद्योगांनी R & D किती गुंतवणुक केली ? त्याच कालावधीत इतर देशांनी वेळोवेळी अशी गुंतवणुक R & D मध्ये करुन स्वतःला आणि देशालाही प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलयं. किमान आता एक पॉझीटिव सुरुवात होतेय , बरेचशे अडथळे दुर करण्याचे प्रयत्न होताहेत ते मान्य करायला काय हरकत आहे.

<<< सायन्स काँग्रेस ही एक जत्रा असते, हे मान्य केलं तरी 'भारतीय विज्ञान पुढे न्या' हा आदेशही आहेच > , < त्यात 'विद्यमान सरकारच्या ध्येयधोरणांशी सुसंगत अशाच प्रकल्पांना मंजुरी आणि आर्थिक मदत मिळेल' असं स्पष्ट लिहिलं आहे. ही ध्येयधोरणं म्हणजे गंगेचं शुद्धीकरण, स्वच्छ भारत इत्यादी. >>> असं जर असेल तर पुढील ३ किंवा ८ वर्षात भारतात ' फक्त भारतीय विज्ञान आणि गंगेच शुध्दीकरण आणि स्वच्छ भारत सोडुन बाकी कुठलीही प्रगती दिसणार नाही, आणि हे आपण सगळेच नक्कीच अनुभवु शकतो. पण जर तसं झालं नाही आणि इतर फिल्डसमध्ये प्रगती दिसली तर संघाला आणि मोदीसरकारला व्यवस्थीत रित्या बदनाम करण्याचा कट रचला जातोय असं म्हणता येईल का ?
मला स्वतःला गंगेच्या शुद्धीकरणापेक्षा स्वच्छ भारत बघायला आवडेल.

<<< हे खरंच अवांतर आहे आणि माझ्या विषयाशी / मुद्द्याशी / संशोधनाशी काहीही संबंध नाही.>>> खरतर मला ह्याविषयी लिहायचं नव्हतं पण << ह्या वाक्यामुळे लिहावं लागलं. 'दोनच वर्षांत इतकं, तर अजून तीन किंवा आठ वर्षांत किती?' हे त्रैराशिक आता अनेकजण मांडू लागले आहेत.>> आणि हे त्रैराशीक मांडणारे कोण आहेत हे आपण मागील २ वर्षांत अनुभवतो आहेच की , सध्या देशात जे चाललयं त्याची उदाहरणं देऊ का ? पण नको, विषय भरकटेल.

<चिनुक्स हेच अंबानीज , टाटा , मनोहर पर्रीकर , नरेंद मोदी , सोनिया गांधी , मनमोहन सिंग ह्यांनाही त्याच्या सुरवातीच्या काळासाठी म्हटलं असतं तर ? मग त्यांनी सहभागच घ्यायला नको होता का ?> झेपलं नाही.

<स्वातंत्र्य मिळाल्यापासुन भारतीय उद्योगांनी R & D किती गुंतवणुक केली ? त्याच कालावधीत इतर देशांनी वेळोवेळी अशी गुंतवणुक R & D मध्ये करुन स्वतःला आणि देशालाही प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलयं. किमान आता एक पॉझीटिव सुरुवात होतेय , बरेचशे अडथळे दुर करण्याचे प्रयत्न होताहेत ते मान्य करायला काय हरकत आहे.>

माझा मुद्दा कळलेला दिसत नाही. नक्की कसली पॉझिटिव्ह सुरुवात झाली आहे? गुंतवणूक कारखाने उभारण्यासाठी आहे. प्रयोगशाळांसाठी नाही. उद्योगांनी भारतात R&D केंद्रं उभी करावी, असं सरकारनं कुठेही म्हटलेलं नाही. इथे आमंत्रण कारखाने उभारण्यासाठी आहे. म्हणजे केवळ रोजगार निर्माण होणार. तंत्रज्ञान नाही.

<असं जर असेल तर पुढील ३ किंवा ८ वर्षात भारतात ' फक्त भारतीय विज्ञान आणि गंगेच शुध्दीकरण आणि स्वच्छ भारत सोडुन बाकी कुठलीही प्रगती दिसणार नाही, आणि हे आपण सगळेच नक्कीच अनुभवु शकतो. पण जर तसं झालं नाही आणि इतर फिल्डसमध्ये प्रगती दिसली तर संघाला आणि मोदीसरकारला व्यवस्थीत रित्या बदनाम करण्याचा कट रचला जातोय असं म्हणता येईल का ?
मला स्वतःला गंगेच्या शुद्धीकरणापेक्षा स्वच्छ भारत बघायला आवडेल.>

तुला काय आवडेल इतकंच शास्त्रज्ञांना काय आवडेल हेही महत्त्वाचं आहे ना? Proud
प्रत्येकाला जावा किंवा ओरॅकलमध्येच काम करा, असं सांगितलेलं चालेल का?
उद्यापासून फक्त गजलाच लिहायच्या आणि विनोदी सिनेमेच तयार करायचे आणि लाल रंगाचेच कपडे घालायचे, अशा अटी घातल्या तर? मला आवडतील फक्त गजला वाचायला. Lol

संशोधन आणि विज्ञान या क्षेत्रांत 'बघू काय होतं आठ वर्षांनी' असं म्हणून चालत नाही. किंबहुना कुठलाही बरा शास्त्रज्ञ असं वागणार नाही.

<आणि हे त्रैराशीक मांडणारे कोण आहेत हे आपण मागील २ वर्षांत अनुभवतो आहेच की , सध्या देशात जे चाललयं त्याची उदाहरणं देऊ का ? पण नको, विषय भरकटेल.>

हे त्रैराशिक मांडणारे अनेक वर्षं कमी पगारावर काम करून पीएचडी मिळवणारे बुद्धिमान शास्त्रज्ञ आहेत. या शास्त्रज्ञांचे शोशनिबंध जागतिक पातळीवर नावाजले गेले आहेत. देशात काय चाललंय याची त्यांना नीट कल्पना असावी, कारण ते याच देशात राहतात. विज्ञानक्षेत्र हे त्यांनी त्यांची आवड आणि प्रेम म्हणून निवडलं आहे. त्यांची उपजीविका त्यावर अवलंबून आहे. बर्‍याच जणांना प्रयोगशाळेबाहेर काहीही काम करता येत नाही. त्यामुळे त्यांची भीती अनाठायी आहे, असं ठरवण्याची घाई करू नये. Happy

पगारेंच्या प्रश्नात मला तरी काही गैर वाटले नाही. धर्म चिकीत्सेच्या साध्या प्रश्नाने स्वताला पंडित म्हणवून घेणार्याची फेफे उडाली.
हिंदू धर्मातील अडाणचोट प्रथा, परंपरा, कर्मकांड, गंडेदोरे, विवेक विसरून केलेला धर्म वेडेपणा, धर्म मार्तंडांचा माजोरडेपणा इ कारणांमुळे कधी " गर्वसे कहो हम हिंदू है" असे म्हणावेसे वाटले नाही.

रमेश पतंगे यांच्या लेखातून ..

श्रीगुरुजी म्हणत, आज समाजात वर्णव्यवस्था वगैरे काही नाही, जे काही आहे ती अव्यवस्था आहे. ती मोडून पडली पाहिजे आणि माझ्या हातात जर शक्ती असती तर ती सर्व मोडून नवीन समाजरचनेसाठीचा एक आधार मी उत्पन्न केला असता. जन्मभर श्रीगुरुजी आजच्या पुरोगामी किंवा परिवर्तनी भाषेत सांगायचे तर जातिअंत करण्यासाठी ३३ वर्षे भारतभर फिरत राहिले. त्यांची चातुर्वर्ण्यासंबंधीची मते, ज्यांनी समजूनच नाही, घ्यायचे असे ठरविले आहे, त्यांचे समाधान ब्रह्मदेवही करू शकत नाही.

वरील परिच्छेदात त्यांनी श्री गुरुजींनी काय सांगितले होते त्याचा सोयिस्कर विपर्यास केला आहे. जन्माधारित वर्णव्यवस्था हा माझा आदर्श आहे असे श्रीगुरुजींनी पुण्यात दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे पुण्यात बरेच वादळही आले होते. आज कदाचित संघाने ही भुमीका सोडून दिली असेल पण त्यावेळी श्रीगुरुजींचे भूमीक चातुर्वर्ण्य समर्थकच होती हे नमूद करणे गरजेचे आहे.

वर वर इनोसंट वाटणारे शब्दप्रयोग, प्रतिमा यातही बराच अर्थ असतो. समता ऐवजी समरसता शब्द वापरणे, आदिवसी ऐवजी वनवासी, ई ई. शिवाय त्या ठिकाणचा शिवाजी महारजांचा फोटो पाहिला तर लक्षात येइल की असा आशिर्वाद देताना फोटो आपण पहिल्यांदाच पहतोय. हेही काही हेतू ठेवूनच झालेले आहे.

चिन्मयने मांडलेल्या मुद्द्यावर, संघाशी संबंधित कुणाला खरंच माहिती असेल तर वाचायला आवडेल.
बाकी, पब्लिक फंडिंग असलेल्या संस्थात राजकीय हस्तक्षेप होणं अत्यंत गैर आहे. जे आपल्याकडे माहिती प्रसारण (दूरदर्शन, आकाशवाणी इ.) पासून सगळी कडे दिसतं.
सगळ्या गोष्टींत लोकापयोगी संशोधन करा सांगणे, वेडेपणा आहे. फंडामेंटल रिसर्च नकोच आणि फक्त अ‍प्लाईडच हवा असं म्हणून कसं चालेल? अर्थात, बहुमताने शासन निवडून दिले आहे आणि शासनाच्या ध्येय धोरणांचा अशा संस्थांवर परिणाम होणारच हेही समजतय, जे चूक आहे पण अपरिहार्य आहे. Sad त्यावर जनमताचा रेटा, लोकांची जागृती इ. शिवाय काही उपाय असेल असं वाटत नाही. खासगी संस्थाना मूलभूत संशोधानात नेहेमीच रस असेल असं नाही, त्यामुळे भवितव्यासाठी सरकारने आपला वाटा उचलणे अत्यंत आवश्यक आहे. पण ते केवळ आणि केवळ दूरदृष्टी असलेलं आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेलं नेतृत्त्व असल्याशिवाय शक्य नाही.
जर विषयाशी संबंधित नसलेल्या लोकांना नद्या शुद्धीकरण इ. प्रकल्पात अडकवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? ज्यांना आला दिवस ढकलायचा आहे ते करतील ते, ज्यांना पुढे काही वेगळं करायचं आहे ते सोडून जातील. शास्त्रज्ञांचा एक्वीलिब्रियम साधला जाईल, दुर्दैवाने तो देशहिताचा नसेल आणि तो कर देणाऱ्यांच्या पैशातून साधला गेला असेल.

आदिवासी आणि वनवासी, ह्यांतला फरक, आणि संघास अभिप्रेत भूमिका मला समजली ती अशी:

आदिवासी शब्द वापरला तर आदी, म्हणजे आदिम म्हणजे मूळनिवासी. असा अर्थ घेतला तर त्यांची वेगळी संस्कृती, वेगळा धर्म आदिक गोष्टी प्रोजेक्ट करतांना कठीण जाईल.

पण जर वनवासी म्हंटले तर केवळ वनात राहणारे. त्यामुळे त्यांचा धर्म किंवा संस्कृती ही हिंदू धर्माचा एक भाग म्हणून सहजच सामावून घेता येईल. म्हणून संघ वनवासी अशी शब्दरचना वापरतो.

हा अर्थ असाच आहे का? हिंदूंमधील प्रचंड विविधता असलेली उपासना पद्धती आणि सुलभ दैवतीकरण असल्याने वनवासींना सहजच हिंदू करवून घेता येईल किंवा तुम्ही मुळात हिंदूच आहात ही जाणीव करून देता येईल असे वाटते. पण हा माझा निष्कर्ष, वनवासी कल्याण आश्रमाच्या कोणत्याही रेफरंसवर आधारित नसून, मायबोली अथवा इतर आंतरजालीय चर्चांवरुन काढलेला आहे. स्वतः वनवासी कल्याण आश्रम किंवा त्या फिल्डमध्ये काम करणारे इतर मंडळी (संघ सोडून) काय म्हणतात यावर काही माहिती नाही.

---

मलाही समरसता विरुद्ध समरसता हयावर विवेचन आवडेल वाचायला.
आणि इतरांचा त्यावर काय आक्षेप आहे? तो ही.

---
शिवाजी महारजांचा फोटो पाहिला तर लक्षात येइल की असा आशिर्वाद देताना फोटो आपण पहिल्यांदाच पहतोय.
>>

हा मुद्दा फार चर्चिला जातोय.

शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, संघाला शिव-शक्ती संगम घडवून आणायचाय असलं संघवाल्यांनी सांगितलं. त्या उद्देशाने तो फोटो ठेवला असेल, असे मला वाटते.

महाराजांचे दैवतीकरण तर आधीच झालेलं आहे.

आशिर्वाद देताना फोटो आपण पहिल्यांदाच पहतोय. हेही काही हेतू ठेवूनच झालेले आहे.**** Lol

आता महाराजांनी द्रूष्टांत दिला अशी कथा रचून एखादे मंदिर बांधा. मंदिराच्या पूजाअर्चेचा न्यायनिवाडा लगेहाथ होवून जावू दे.

चिनूक्स मेट्रो रेल्वेचा प्रकल्प आरनडी सह आहे.
वरील सर्व विषयांपेक्षा पठाण कोटचा हल्ला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण इथे आपापसात भांडत आहेत आणि शत्रू दारात उभा राहिला आहे. हा हल्ला फक्त हिंदूस्थानावर नसून समस्त हिंदू धर्म खतरेमे आहे. Biggrin
आपली लोकसंख्या वाढली पाहिजे. येतो. Lol

पगारेंच्या प्रश्नात मला पण काही गैर वाटले नाही. कदाचित त्यांचा आधीचा वावर आठवुन असे झाले असेल.
सकुरा, थांबलात याबद्दल आभार.
चिनुक्स, बरं.
आणि हो विकु, आदिवासी/वनवासी किंवा राजांचा फोटो यात वाईट हेतु काय असेल ते कळले नाही.

संघ ही भारतातील आजच्या अनेक संघटनांपैकी एक अतिरेकी विचारांची संघटना आहे. अतिरेकी म्हणजे काय हे समजून घ्या. पूर्वी एकमेव संघटन होते ते म्हणजे संघ. राष्ट्र सेवा दल हे एक वैचारीक बैठक असलेले संघटन होते, पण काँग्रेसला नंतर त्याची आवश्यकता वाटली नाही आणि समाजवाद्यांना संघटन वाढवण्यासाठी काय करावे हे समजले नाही. संघाने संघटन शास्त्रामधे पीएचडी केली त्यामुळे संघटना वाढली. संघटनेत शिस्त आहे हे सगळं ठीक आहे.

पण संघटना वाढली आणि शिस्त आहे म्हणून ती योग्य विच्रारांवर चालू आहे असा निष्कर्ष कस काय मान्य करायचा ? देशात अनेक मतप्रवाह आहेत. एखाद्या घटनेकडे पाहण्याचे भिन्न भिन्न विचारप्रवाह असतात. या सर्वांचा आदर राखणे म्हणजे उदारमतवाद. आजकालच्या अनेक संघटनेत या गोष्टीला फाट्यावर मारण्यात येते.

मी लहान असताना शाखेत जायचो. तिथे आमच्याच घराजवळ राहणा-या एका मुस्लीम मुलाला उद्यापासून तू आला नाहीस तरी चालेल असं सर्वांसमक्ष सांगण्यात आलं. हा अनुभव माझा एकट्याचा नाही. याला जातीयवाद म्हणायचं नाही आणि जातव्यवस्थेच्या दहीहंडीतल्या थरावर जो सर्वात तळाला आहे त्याने बोंब ठोकली की तो जातीयवादी अशा व्याख्या केल्याने नीट चर्चा होऊच शकणार नाही.

फारतर या लोकांच्या नादाला लागण्यात अर्थ नसतो असा जो सावत्रिक समज आहे त्याला खतपाणी घातले जाईल. चर्चाच होऊ नये म्हणून ज्या युक्त्या डेव्हलप झालेल्या आहेत त्यात अडचणीच्या गोष्टींना जातीयवाद म्हणणे ही आहे. संघावर टीका म्हणजे जातीयवाद कसा काय हे समजत नाही.

१९९२ - ९३ ला ऑर्गेनायझर या संघविचारांच्या आणि मुखपत्र समजल्या जाणा-या नियतकालिकात द शूद्र रेव्हॉल्यूशन हा लेख प्रकाशित झालेला होता. याच अंकात वर्शिपिंग फॉल्स गॉड्स बद्दल अनेक लेख होते. इतिहासाची चिकित्सा करायची तर अशा पुस्तकांवर बंदी आली नाही पाहीजे अशा आशयाचे कामत आणि अन्य काही लेखकांचे लेख होते. आपल्या विचाराशी फटकून असणा-या पुस्तकांच्या, नाटकांच्या, सिनेमाच्या बाबतीत संघपरीवार हीच भूमिका घेतो का ?

उलट बाबरी मशीद पाडण्यासाठी निवडलेला सहा डिसेंबर हा दिवस. पुढे या दिवसाला शौर्य दिवस म्हणणे आणि काहींनी काळा दिवस म्हणून त्याचे स्मरण करणे यामागे स्पष्ट हेतू होते जे अरूण शौरीच्या पुस्तकाआडून स्पष्ट झाले होते. ज्यांना आज बाबासाहेब पूजनीय वाटताहेत त्यांनी बाबासाहेबांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण होत असताना घेतलेल्या भूमिका काय होत्या हे लोक विसरलेले नाहीत. शक्यतो जन्मशताब्दीचं वर्ष साजरं केलं जात. ते न करता सव्वाशेवं वर्ष साजरं करण्याची प्रथा यापूर्वी होती काय यावर कुणीतरी प्रकाश टाकावा.

जन्मशताब्दी वर्षात बाबासाहेब मान्य नसल्याचं सांगण्यात येतं आणि सव्वाशेव्या वर्षात एकदम यू टर्न कसा काय घेतला जातो ? कदाचित १९२५ साली संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. २०१९ साली पुन्हा निवडणुका जिंकायच्या असतील तर इतर समाजघटकांना आपल्या जाळ्यात ओढावे असे हेतू तर नसतील ना ? २०१९ साली निवडणुका जिंकल्या तर तोपर्यंत राज्यसभेत बहुमत असेल. त्यावेळी राज्यघटनेत बदल करून भारत हिंदूराष्ट्र असल्याची घोषणा करून संघाला जन्मशताब्दी वर्षात भेट द्यावी अशी परिवारातील राजकीय, धार्मिक अंगांची योजना तर नसेल ना ?

नसेल तर बाबासाहेबांचे कुठले कुठले विचार मान्य आहेत आणि कुठले नाहीत याची चिरफाड होणे आवश्यक आहे.
संघात आंतरजातीय विवाह होतात आणि त्याला उत्तेजन दिले जाते यावर माझा विश्वास नाही. समाजवाद्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले होते. त्यावेळी अनेक विवाह झाले होते त्याची टिंगल टवाळी झालेली होती. सेवादलात येणारे ब्राह्मणाच्या मुलींशी लग्न करण्याची स्वप्ने पाहून येतात असे म्हटले जाई. ऑर्कुट कम्युनिटीवर संजय वैद्य या ज्येष्ठ संघ कार्यकर्त्याने तसे लिहीलेही होते. अविनाश कुलकर्णी यांनीही अनेकदा तसे बोलून दाखवलेले आहे. असे अनेक लोक आहेत ज्यामुळे संघातील लोकांचे बैयक्तिक मत काय आहे ते कळते. संघाचे हे अधिकृत विचार नाहीत असा प्रतिवाद इथे होईल, त्याला माझा विरोध नाही.

पण मग संघाचे अधिकृत विचार स्वयंसेवकांची मतं बदलवू शकत नसतील तर अधिकृत विचार कोणते आणि अनधिकृत कोणते याबद्दल गोंधळ उडणे साहजिक नाही का ? जे संघात नाहीत त्यांचे मत संघाचे असलेले अशी ओळख असणा-यांचे वागणे बोलणे यातून बनेल की संघाचे अधिक्रुत विचार काय आहेत यातून बनेल ?

त्यामुळे संघ जाणून घ्यायचा असेल तर संघात या हे म्हणणे हास्यास्पद वाटते. काँग्रेसचेही अधिकृत धोरण भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि राष्ट्रवादीचेही. मग त्यावर विश्वास ठेवणार का ?

Pages