सहिष्णू धागा

Submitted by प्रकु on 8 January, 2016 - 16:14

मित्रहो,

शिवशक्ती संगमच्या निमित्ताने काढलेल्या धाग्यावर अतिशय सुंदर आणि संयत शब्दात चर्चा झाली. अनेक प्रश्न तेथे उपस्थित करण्यात आले आणि त्याला सगळ्यांनी मिळून आपापल्या परीने उत्तरे दिली.
मुख्य कौतुक म्हणजे कोणीही विखारी प्रतिसाद न देता एक एक गोष्ट समजून घेतली.

या निमित्ताने विचारांची/माहितीची जी देवाणघेवाण झाली ती अप्रतिम होती. मायबोली सारख्या संकेतस्थळाचा याहून सुंदर उपयोग तो काय असू शकतो.

तोच धागा पकडून कैपोचे यांनी सुचवल्याप्रमाणे हा नवीन धागा येथे काढत आहे. याचा उद्देश मी खाली स्पष्ट करतो.

तत्पूर्वी एक स्वानुभव मला सांगावासा वाटतो.
मी सावरकरांचा निस्सीम भक्त होतो आणि आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी स्वतः लिहिलेले बरेच लिखाण मी वाचले. स्वातंत्र्य संग्रमातल्या इतर अनेक महापुरुषांबद्दल पुढे वाचनात आले.
यामधून एक विचारधारा निर्माण होत गेली ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जहाल मतवादी विचारांशी जास्त जवळीक होती.
याच बरोबर अजून एक विचारधारा नकळतपणे डेव्हलप होत गेली ज्यात मवाळ गट, गांधीजी यांच्याबद्दल तिरस्कार होता.

यातला 'तिरस्कार' हा शब्द महत्वाचा आहे. हा तिरस्कार उगाच आपला मनात येऊन बसलेला होता.

यावर घरात अनेकदा वडिलांशी वादविवाद करताना ते मला गांधीजींचे महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करत. लाखो लोक त्यांच्या मागे गेले यात नक्कीच फार मोठा अर्थ आहे असे ते सांगत.
त्यावेळी मला ते फारसे पटत नसे.

पुढे जशी जशी प्रगल्भता वाढत गेली तसतसे मी एका थर्ड आय ने जगाकडे पाहू लागलो. ज्यामुळे मला हे लक्षात यायला लागले कि प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला त्याच्या झालेल्या जडणघडणी प्रमाणे विचार करतो आणि निर्णय घेतो. अर्थात, त्याच्या जागी तो बरोबरच असतो.

सावरकर असो वं गांधीजी, कोणीहि मुद्दाम हून चला आता आपण भारत देशाला खड्ड्यात घालू म्हणून काम केले आहे का.? अर्थातच नाही. दोघांनी कार्य तर भारताच्या उन्नतीसाठीच केले. त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. इतकेच..

मग आपल्या मनात 'तिरस्कार' असण्याचे कारण ते काय.?

यामध्ये असहमती असू शकते. मतभेद असू शकतात. पण तिरस्कार हा एक बिनगरचेचा घटक आहे.

तिरस्कार अज्ञानातून येतो. आणि मतभेद अभ्यासातून येतात.

या विचारातून मग मी गांधीजींचे चरित्र वाचण्याचे ठरवले. लकीली याच दरम्यान एकदा काकांच्या घरी गेलेलो असताना त्यांच्याकडे मला गांधीजींचे आत्मचरित्र मिळाले. मी ते त्यांच्याकडून घेऊन वाचायला सुरुवात केली.
लवकरच माझे गांधीजींबद्दल असलेले मत पूर्णपणे बदलले.
त्यांच्या काही गोष्टी मला पटल्या, काही नाही पटल्या. पण मनातला गांधीजींबद्दलचा आदर मात्र खूप वाढला. त्यांच व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. असं व्यक्तिमत्व जगात पुन्हा होणे नाही या मताला मी आलो.

मनातील पूर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्या चष्म्यातून जग पाहताना खूप छान वाटले. (अजूनही माझे वाचन सुरु आहे. खंड पडलाय जरा, पण लवकरच पूर्ण होईल.)

अशा प्रकारे माझ्या मनातून तिरस्कार हद्दपार झाल्यावर मला एक मानसिक शांतता मिळाली. कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.

अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.

असो. तर या धाग्यावर हा अनुभव सांगण्याचे प्रयोजन असे कि आपण येथे परस्परविरोधी विचार असलेले लोक एकत्र येऊन, शांतपणे चर्चा करून समोरची बाजू समजून घेऊ. समोरच्याचे मत जसे आहे तसे का आहे त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून आपल्या मनातील तिरस्कार दूर होईल. एकमेकांकडून माहित नसलेल्या गोष्टी कळतील. जाणीवा वाढतील. सहिष्णुता वाढेल. आभ्यास वाढेल. आपल्या पैकी बहुतेकांनी कोणत्या तरी एकाच बाजूचा पण सखोल आभ्यास केलेला असेल. त्याचा एकमेकांना फायदा होईल.

दोन्ही बाजूंची सहमती बऱ्याच बाबतीत शक्य नाही हे तर आपल्याला माहितच आहे. हे गृहीत धरूनच आपण बोलूया. तिरस्कार नाहीसा होत गेला तरी या धाग्याचा उद्देश सफल होईल.
आपण एकमेकांशी असहमत असू, पण तरी एका बाजूने असू Happy

या धाग्यावर सावरकर, गांधी, आंबेडकर, कॉंग्रेस, भाजप, हिंदू, मुसलमान, इसाई कोणताही विषय वर्ज्य नाही.
फक्त हा धागा नावाप्रमाणे सहिष्णू राहू द्यावा. (या दोन वाक्यांवरून हा प्रयोग फारच धाडसी वाटतोय मला)
असो. वरून देव बघत आहे. जो आयडी असहिष्णुता दाखवेल त्याचा मृत्यू अटळ आहे.
कोणीही असहिष्णूता दाखवल्यास त्याला कृपया कोणतेही उत्तर देऊ नका. शांतता राखा.

याच उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण जमेल तसे आपापल्या आवडत्या नेत्यावर लेख लिहूया. म्हणजे माहितीची देवाण घेवाण होईल आणि विषय निघतील ..

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

प्रकु

मी ऑर्गेनायझर या वृत्तपत्रामधे संघाच्या वरीष्ठ समजल्या जाणा-या लोकांची मतं काय आहेत हे इथेच सांगितलं होतं. बाबासाहेबांना संघाने केलेला विरोध दाखवून दिला होता. राज्यघटना व बाबासाहेब यांच्याबाबातीतली संघाची मतं बदललेली नाहीत. अनेकांकडून अनेक संस्थळांवर त्याच टोनमधे लिखाण होत असते.

संघात जातीयवाद नाही म्हणावे तर मग माधवन हा फॉर्म्युला काय आहे ?
संघाचे द्वितीय संघचालक माधव गोळवलकर यांच्या नावावरून माधवन हा फॉर्म्युला संघाने भाजपसाठी आखलेला होता. मा म्हणजे माळी, ध म्हणजे धनगर, व म्हणजे वंजारी. मुंडेंना याच फॉर्म्युल्याप्रमाणे लाँच केले गेले. हा जातीयवाद नाही ?

महात्मा फुलेंबद्दल नंतर.

चर्चेही पातळी घसरली.
======

प्रकु,

तुमची लेटेस्ट मोठी पोस्ट ही संघाची जाहीर भूमिका व तिचे दाखले देते. संघाचे अनुयायी खासगीत काय बोलतात किंवा करतात किंवा एकुणच संघ अलगदपणे काय बुद्धीभेद करू पाहतो किंवा कोणता अजेंडा राबवतो ह्याची उदाहरणे विरोधक देत आहेत. व्यक्तीशः मला असे वाटते की संघ आणि इतर सगळ्याच संघटना दांभिक आहेत. संघ दांभिक नसल्याचा आव आणण्यासाठी प्रभावी भाषा वापरतो हा फरक! बाकीचे कट्टर लोक जुनेपुराणे वाद उकरणे हे एकमेव जीवितकार्य असल्याप्रमाणे अती आक्रमक होतात. खासगीतही आणि जाहीरपणेही! राजकीय पक्ष मात्र जाहीरपणे उदार भूमिका घेतात आणि त्यांचे अनुयायी तिसरेच करतात.

ह्या सगळ्याच गदारोळात 'प्रगती कशी होईल' हा एक क्षुल्लक (!) प्रश्न जर्रा बाजूला पडतो बिचारा!

मला वाटते तुमच्या पोस्ट्स जितक्या संघवादी आहेत तितक्याच विरोधकांच्या पोस्ट्स संघविरोधी!

इथे संघविचार (तो काय ते मला माहीत नाही) मांडायचा असला तर तुम्ही तो स्वतंत्रपणे मांडणे हे बहुधा निरुपयोगी ठरेल.

संघविचार आणि संघाने केलेले सामाजिक कार्य व संघाचे एकुण योगदान ह्या गोष्टींची इतर तत्सम संघटनांच्या त्याच गोष्टींशी तुलना करून दाखवणे हे चर्चेला कुठेतरी नेईल.

मी असे का म्हणतो त्याचे एक कारण माझ्यापाशी आहे व ते आधीच्या एका पोस्टमध्ये मी लिहिलेलेही आहे.

संघाची छुपी / उघड भूमिका ह्यावर नक्कीच वाद आहे व असो पण संघाने कधी जाळपोळ केलेली ऐकिवात नाही. ओवेसींची शैली अंगिकारली नाही.

प्रगती घडवून आणणारे लोक (सरकार / शास्त्रज्ञ / इंजिनिअर्स / उद्योजक) हे कोणीही असोत. देशातील नागरिकांना आपापल्या वैचारीक प्रभावाखाली ओढण्याचे प्रयत्न करणारे तरीही असतीलच. त्यातच एक संघही असेल. पण अश्या सर्व संघटनांपेक्षा संघात काय वेगळे आहे हे सांगणे बहुधा अधिक उपयुक्त ठरेल, अर्थात, संघात काही वेगळे असले तरच! संघाने केलेले समाजकार्य, आपत्तीमध्ये धावून जाणे वगैरे बाबींवर चर्चा होणे आवश्यक आहे. संघविचार हा मुळातच वादोत्पादक विषय आहे.

ब्राह्मण आणि (मूळ) हिंदू ह्यांच्यापुरते आम्ही मर्यादीत नाही हे संघाने कृतीतून कसे दाखवले ते सांगावे लागेल बहुधा. गांधीजी किंवा बाबासाहेबांना वंदनीय मानणे ह्या त्या कृती नव्हेत. मुळातच, मी चांगला आहे ह्यावर माझा विश्वास असला तर ते गांधीजींनी आणि बाबासाहेबांनी ऑथेन्टिकेट करण्याची गरज मला का भासावी?

मनूचा मासा या पुस्तकात संघाच्या एका माजी शिक्षकाने दावा केला आहे कि गांधीजींबद्दल संघामधे अत्यंत कडवटपणा होता. पण संघाची एक पद्धत आहे कि अडचणीच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची नाहीत. लोकांना विसर पडला की सत्य आणि असत्य याचं बेमालूम मिश्रण करायचं.

याच पद्धतीप्रमाणे महात्मा गांधी वर्ध्याच्या आश्रमातून संघाच्या शिबीरात आले होते. जेवण केलं. संघाची शिस्त पाहिली. भाषण केलं. संघाच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. जाहीर प्रशंसा केली असं सांगितलं जातं.

महाले पुढे म्हणतात कि ज्या तारखेला संघाने हे दावे केले होते त्या तारखेला गांधीजी वर्ध्यातच नव्हते.

मनूचा मासा वाचा .

काही पोस्ट्स जंप कराव्या लागताहेत, त्याला इलाज नाही.

महात्मा गांधींची हत्या, बाबरी मशीद राममंदीर आंदोलन, १९४७ च्या दंगली, अनेक हिंदू मुस्लीम दंगली, पुण्यातल्या कॅफे सनराईज जाळलेली दंगल, दगडूशेठ गणपती प्रकरणावरून झालेली दंगल, १९९१ ची मुंबई दंगल, त्याधीची भिवंडी दंगल, ९१ चीच अहमदाबाद दंगल, नंतर उसळलेल्या गुजरातेतील दंगली. गुजरातेत वेळोवेळी झालेल्या दंगलीत दलितांच्या झालेल्या हत्या ते अलिकडच्या काळातल्या

मुझफ्फरपूर दंगली, दादरी प्रकरण, पुण्यातल्या हडपसरच्या मुस्लीम अभियंत्याची झालेली हत्या, फेसबुकवरून पसवरलेला विद्वेष ही शांततामय आंदोलने असावीत कदाचित.

हिंदुपासुन फारकत घेउन बौध्दधर्मियांना साठ वर्षे झालीत. परंतु हजारो वर्ष हिंदु समाजाला चिकटुन राहिलेल्या हिंदु दलितांपेक्षा हा समाज सुस्थितीत आहे.हिंदुतील डोंबारी, कातकरी, आदिवासी, वैदु, गोसावि,मातंग, गोसावि,देवदासी, भटक्या जमाति ह्यांच्यापेक्षा शैक्षणिक, आर्थिक द्रुष्ट्या ह्या समाजात सुधारणा आहेत. ह्या वरील समाजांना कुणिही वाली नाही.बौध्द समाजाचे बलाढ्य आणि लढाउ संघटन आहे.अन्यायाविरूध्द लढण्याची अरे ला कारे म्हणण्याची निर्भिडता अंगी आलिय.अनेक वसतिग्रुहे, विद्यालये आहेत. मेलेल्या बापाला कावळा समजुन घास भरवणे हास्यास्पद समजले जाते.आंबेडकर हे नाव त्यांच्यासाठी स्फुर्तिस्थान आहे त्यांच्या नावावर समाज एकत्र होतो.बौध्द समाज म्हणजेच पुर्वाश्रमीची महार जात ही महाराष्ट्रात एकमेव जात आहे जी स्वबळावर महाराष्ट्र बंदची हाक देउ शकते नि त्यात बर्याच प्रमाणात यशस्वि होऊ शकते इतर कुठल्याही जातीत ती ताकत नाही.

शिवधर्माचे अनुयायी नि बौध्द धर्माचे अनुयायि हे मोठ्या प्रमाणात अंधश्रध्देतुन बाहेर पडत आहे याचे श्रेय आंबेडकर साहेबांना व सध्याच्या काळात शिवधर्माचे धाडस करणार्या खेडेकर साहेबांना जाते.

माझा जात, धर्म ह्या प्रकारांवर विश्वास नाहि मात्र ह्या दोन धर्मांकडुन विज्ञानवाद जोपासण्याची आशा वाटते.

इदगाह मैदानात जिथे मुस्लिमांना नमाज पढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती, तिथेच १५ ऑगस्टला झेंडा फडकवण्याचे आंदोलन, त्याच वेळी काश्मीर मधे ही असेच आंदोलन हाती घेण्यामागे काय हेतू होते ?

त्या काळात संघाच्या हेडक्वार्टर वर मात्र भगवाच झेंडा होता !!

Pagare cannot answer my question about rajivji Gandhi. I have full text of his historic speech opposing mandal commission.

Aajacha Zee 24 Tass la news vachli

Fule yanche Chatrurastra (pantu) sudha ale hote ShaivShakti Sangamavar


Q.jpg
हे प्रकु कोण आहेत?
हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत प्रवक्ते आहेत काय?
तसे असेल तर काही प्रश्न उपस्थीत करीण म्हणतो.
अन्यथा, इथे संघ/बीजेपी सायबरसेलमार्फत (नेहेमीप्रमाणे) फक्त भूलथापा देण्याचे काम सुरू आहे, असे म्हणतो.

गं. वा. बेहेरे यांनी सोबतच्या अंकामधे " हा कसला महात्मा, ही तर फुले नावाची दुर्गंधी" हा लेख छापलेला होता.
त्या लेखाचं समर्थन कुणी कुणी केलं होतं हे आठवतंय का ?

संघाच्या शिबिरात गांधीजी आणि बाबासाहेब फिरले आणि त्याना जातीयवाद दिसला नाही म्हणे !

पोलिसाची गाडी येणार म्हटलं की टपर्‍या बंद होतात.

पण इतर वेळा त्या सुरु असतातच.

जातीयवाद हा प्रामुख्याने रोटीबेटी व्यवहारातून दिसतो. तो एक दोन दिवसाच्या शिबिरात कसा दिसेल ?

पेशंटचा बडका तपासताना मायक्रोसोपात त्याचे १०० फील्ड्स तपासावे लागतात.. त्यात एकातही टीबीचा जंतू दिसला नाही , तरच ती स्लाइड टीबी निगेटिव्ह म्हणून सर्टिफाय होते ! साध्या टीबीच्या जंतूची ही कथा ! तर तिथं जातीयवादाचा जंतू खरोखरच नाही का , हे तपासणे किती अवघड असेल ! त्यासाठॅ संघाच्या शिबिरातून दोन तास फिरणं पुरेसं असेल का ?

आपल्या वैचारिक विरोधकांच्या शिबिरातही हे महात्मे प्रेमाने गेले , यात त्यांची महानता दिसते , संघाची महानता नव्हे ! त्यामुळे उगाचच महात्म्यांची नावे संघाने स्वतःच्या जाहिरातीसाठी वापरु नयेत

प्रकु हे संघाचे प्रवक्ते आहेत का ?

..

असे लोक जाहिरातबाजीची भुमिका करताना प्रवक्ते असतात.

पण लोक अडचणीत टाकणारे प्रश्न विचारु लागले की आमी काय अधिकृत प्रवक्ते नाही असे म्हणून निघुन जातात.

साती, << इतके महान विचार आणि आचारही संघाच्या नेत्यांचे असतील तर संघाच्या स्वयंसेवकांपर्यंत ते न झिरपता फक्त दिखाऊ शिस्त आणि कडवेपणाच झिरपला असे प्रत्यक्ष आणि जालीय ओळखीच्या संघवाल्यांकडे बघून वाटते. >>
बरोबर आहे. संघ स्वयंसेवक होण्यासाठी प्रवेशाला कोणताही क्रायटेरीया अथवा प्रवेश प्रक्रिया नाही. शाखेत आला कि माणूस स्वयंसेवक झाला असे मानले जाते. त्यामुळे बऱ्याच स्वयंसेवकांमध्ये कडवटपणा कट्टरता वगेरे पाहायला मिळते. गाधीजींबद्दल द्वेष देखील पाहायला मिळतो. संघाची वेळोवेळी होणारी शिबिरे इत्यादी मधून या स्वयंसेवकांचे आचार विचार योग्य वाटेवर आणून त्याला घडवण्याचा प्रयास होतो. त्यामुळे माणूस संघात आला म्हणजे तो परफेक्ट आहे असे मानता येत नाही. बराच काळ हे विचार ऐकत राहिल्याने, अभ्यासाने स्वयंसेवक परिपक्व होतो. असे असल्यामुळे मुळे संघामध्ये वरिष्ठ जबाबदाऱ्या देण्याआधी विचारांच्या परिपक्वतेची खात्री झाल्यावर दिल्या जातात.

कापोचे यांना संघाचा आलेला वाईट अनुभव अशा घटकांमुळेच आलेला आहे असे दिसते. अर्थात हे संघाचे घटक आहेतच. येथे जबाबदारी झटकण्याचा विचार वगेरे नाही.

कापोचे,
आपण विचारलेला संदर्भ माझ्याकडे असलेल्या pdf मध्ये आहे. ती मी तुम्हाला संपर्कातून पाठवतो. आणि अजून काही संदर्भ असल्यास ते पाठवतो. आपण मला ते शाखेच्या शिक्षकाने लिहिलेल्या पुस्तक अथवा काही संदर्भ असतील तर पाठवावेत. गांधीजी, आंबेडकर यांच्या सारख्या मोठ्या व्यक्ती कधी कुठे असतात हे जगजाहीर असते. त्यामुळे त्या संदर्भात फेरफार असण्याची शक्यता मला कमीच वाटते.
आपण ते बाळासाहेब देवरस यांचे वसंत व्याख्यानमाले मधले व्याख्यान जरूर वाचावे. (तारीख टाकून मराठी मध्ये लिहून सर्च केले कि मिळेल बहुदा)

आपण पुढे अजून काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्यामध्ये काही लेखांचा उल्लेख आहे. मला त्याबद्दल माहिती नाही त्याचे समर्थन कोणी केले ते देखील माहित नाही. संघाविरोधात विपुल लिखाण झालेले आहे. त्या सर्वांवर येथे काथ्याकूट करत बसणे कंटाळवाणे आहे.
मी वर मांडलेल्या मुद्द्यांमध्ये सरसंघचालक पदावरच्या व्यक्तीने व्यक्त केलेले विचार आहेत. तेव्हा ते संघाचे म्हणून गृहीत धरणे जास्त योग्य आहे असे मला वाटते.
आपण कधीकाळी शाखेत आलेला आहात असा उल्लेख मी वाचला. त्यामुळे संघाचा मूळ उद्देश 'हिंदू संघटन' आहे हे आपण जाणताच. हे संघटन विषमता निर्मुलन झाल्या शिवाय शक्य नाही. तेव्हा संघाला विषमता हवी आहे या आपल्या विचारावर आपण पुनर्विचार करावा असे वाटते. यासाठी मी वरच्या लेखात दिलेले संदर्भ आपण स्वतः पडताळून पाहावेत. तेथे अगदी अलीकडे २०११ पासून सुरु झालेल्या पुरोहित वर्गाच्या उपक्रमाबद्दल देखील उल्लेख आहे. आपण इच्छा व्यक्त केल्यास हे अलीकडचे सगळे आपण स्वतः पाहू शकता Happy

मी पण लहानपणी शाखेत जायचो. मुख्य आकर्षण खेळ हे होते. त्यावेळी स्वदेश मोहिम जोरात होती. आम्ही रायनोळद्दस चे pen तोडायचो.
पण एकधा आमच्या शाखा प्रमुखांच्य दुकानात colagat पेस्ट पाहील अन्य टाइनेन विचारळ हे विदेशी वस्तू का विकतअ तर काही उत्तर नाहो. तसेच अनेक संघवलुया लोकाङ्स्या विविध वीदेशि . तेव्ापसून नाद सोडला.

मनूचा मासा हे पुस्तक मिळवून वाचा. ऑर्गेनायझेर चा अंक तुम्हाला सहज उपलब्ध होउ शकतो. सोबत साठी शासकीय ग्रंथागार, वर्तमानपत्राचे कार्यालय, एखादी जुनी लायब्ररीी अशा ठिकाणी मिळेल.

या लेखाचा संदर्भ दिलेले लेख ऑर्कुट वर आहेत. पण त्याचे चालक फेक प्रोफाईल्स असल्याने देत नाही. हवे असल्यास घुसळून पहावे. लेखाचा अंदाज येईल.. तुम्ही थांबताय, हरकत नाही. थांबण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करतो. बाबासाहेबांनी अशा प्रकारचे भाषण केले असल्याचे वाचनात आलेले नाही. त्यांचे मूकनायक, जनता, बहीष्कृत भारत इत्यादी वर्तमानपत्रातील लेख वाचले आहेत. त्यांची सर्व भाषणे संग्रही आहेत. तरी देखील नजरचुकीने निसटले असल्यास पुन्हा एकदा पाहतो. थोड्या वेळासाठी बाबासाहेबांनी कौतुक केले असे गृहीत धरले तरी आमंत्रणावरून एखाद्या कार्यक्रमात गेल्यावर मनुष्य चांगलेच बोलू पाहतो हे ध्यानात ठेवले पाहीजे. त्या काळात संघाचे विचार नेमके काय आहेत हे ब्रह्मदेवालाही सांगता आले नसते. असते तर बाबासाहेबांनी जाहीरपणे सुनावले असते किंवा वर्तमानपत्रातून लिहीले असते. केसरी आणि लोकमान्य टिळक किंवा महात्मा गांधींना त्यांनी जाहीर विरोध केला होता.

संघाला विषमता दूर करायची असती तर महाडचे चवदार तळे, नाशिकचा कालाराम मंदीरचा सत्याग्रह झाला तेव्हां बाबासाहेबांना जो प्रचंड विरोध झाला त्या वेळी संघाने बाबासाहेबांच्या मागे आपली ताकद उभी केली असती. उलट हिंदू कोड बिलाच्या वेळी त्यांनी काय केले हे रेकॉर्डवर आहे. मागच्याच एका पोस्टमधे तसे म्हटलेले आहे.

काथ्याकूट करत बसण्यापेक्षा हा एक लेख पुरेसा वाटतो.
http://www.thecitizen.in/NewsDetail.aspx?Id=4245&AMBEDKAR%E2%80%99S%20LE...

उत्तरे देण्याचा प्रयत्न केल्याबाबत आभार. भावना दुखावल्य गेल्या असल्यास खेद व्यक्त करतो. लोभ असावा.

त्यामुळे संघाचा मूळ उद्देश 'हिंदू संघटन' आहे हे आपण जाणताच. हे संघटन विषमता निर्मुलन झाल्या शिवाय शक्य नाही.

फार हसू आले.

विषमता नांदवल्याशिवाय सत्ता मिळत नाही , हे तत्व बाळगून हजारो वर्षे विषमतेचं शस्त्र वाप्रून झालं.

नव्या युगात हेच शस्त्र बोथट ठरले म्हणुन ते फेकून समरसता हे नवीन शस्त्र वापरायचे !

संघाने विषमतेचा त्याग करणे !

आपल्या रुपाला भुलुन लोक फसत नाहीत , हे पाहून एखाद्या निराश डायनने आपले केस बालाजीला अर्पण करावेत , तसा प्रकार आहे हा !

व्हॅटिकन सिटीबद्दलची माझी पोस्ट क्लिअर झालेली नसल्यास फ्रॉम माय गॉड टू युवर गॉड हे Marco Ventura यांच्या पुस्तकातील पान क्रमांक १९४ वरील संदर्भ इथे देतो.

या एकाच पानावर दोन महत्वाचे उल्लेख आहेत. ते म्हणजे बाबासाहेबांना धर्म राजकारण हे पूर्णपणे वेगळे आणि स्वतंत्र असावेत असे वाटत होते. त्यांच्या या मताला जागतिक संदर्भ होते. (१९४६ मधे मुंबई उच्च न्यायालयात जस्टीस छागला यांच्यापुढे रोबस कन्नम यांच्या धर्मांतर आणि विवाहविषयक केस मधे संपूर्ण धार्मिक अलिप्ततेचा विचार पुढे आला होता. त्याला बाबासाहेबांनी पाठिंबा दिला होता). त्यामुळे राज्यघटने मधे प्रत्येकाचे धार्मिक स्वातंत्र्य मान्य केले गेलेले आहे. हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेशी ते सुसंगत नाही.( धार्मिक स्वातंत्र्यामधे धर्मांतराचाही समावेश होतो. )

युनायटेड स्टेट्स ने केलेल्या पहिल्या घटनादुरुस्तीचा उल्लेख अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गौरवाने केला आहे. त्यात पुढे म्हटलेले आहे की चर्च आणि सत्ता, राजकारण यातील भिंत अधिक उंच आणि जाड व्हायला हवी. चर्चही लुडबूड यात होता कामा नये.

(प्रगत देशांमधे चर्चेसचे अधिकार अशा प्रकारे मर्यादीत केले गेले आहेत. चर्चेसचे महत्व त्यांच्या धार्मिक क्षेत्रात आहे, पण त्यांच्या अवैज्ञानिक फतव्यांना पाठिंबा मिळत नाही).

याच पानावर बाबासाहेबांना हिंदू कोड बिला संदर्भात धार्मिक कारणावरून कसा विरोध झाला हे दिलेले आहे. याचे पुरावे ढिगाने मिळू शकतात. धर्म आणि राजकारण एकत्र आणण्याचे संघाचे प्रयत्न आणि बाबासाहेबांचे विचार हे कुठेच मेळ खाताना दिसत नाहीत, आणि बाबासाहेबांचे विचार मान्य असल्याचे संघाच्या इतिहासात कुठेही दिसत नाही. अलिकडे संघविचाराच्या लोकांनी केलेले लिखाण सोडून द्या..

इति लेखनसीमा.

बदललेत असे म्हणायचेय का ? स्पष्टपणे लिहा कि तसे.

ते तसे बदललेत का यासाठी तर एव्हढे प्रश्न विचारून लेखनसीमा म्हटलेले आहे. तुम्हाला पुन्हा भोपळे चौकातून सुरूवात करायची असल्यास तुमचे स्वातंत्र्य अबाधित आहे.

संघविचारी लोक किंवा संघाचे सहानुभूतिदार यांनी सामाजिक माध्यमांतून द्वेषपत्रे पाठवू नयेत, अति आत्मस्तुति आणि अति परनिंदा करू नये एव्हढा संकेत जरी पाळण्याचा आदेश निघाला आणि तो पाळला गेला तरी संघाची आणि स्वयंसेवकांची प्रतिमा उजळू शकते. आता यावर 'प्रत्येक व्यक्तीवर नियंत्रण कसे ठेवणार, किंवा प्रत्येकामध्ये काही दोष असतातच;स्वयंसेवक याला अपवाद नाहीत, असे स्पष्टीकरण दिले जाईल. पण पराकोटीची शिस्त आणि स्वनियंत्रणाबाबत प्रसिद्ध असलेल्या संघटनेच्या बाबतीत ते फुसके ठरेल..
वर संघसमर्थासाठी दिलेली अनेक उदाहरणे ही 'स्ट्रे इन्सिडंट्स' वाटतात. अनेक स्वयंसेवकांचे शाखाबाह्य सामान्य सामाजिक वर्तन, संभाषण हे अतिशय कडवे, गटबाजीचे आणि असहिष्णु असते हे सामान्य निरीक्षण वर अनेकांनी मांडले आहे.

मी वर मांडलेल्या मुद्द्यांमध्ये सरसंघचालक पदावरच्या व्यक्तीने व्यक्त केलेले विचार आहेत. तेव्हा ते संघाचे म्हणून गृहीत धरणे जास्त योग्य आहे असे मला वाटते.
<<
सरसंघचालकांनी व्यक्त केलेले सर्वच विचार संघाचे अधिकृत विचार असतात ना? Wink

उदा.
१. रिझर्वेशन बंद करावे.
२. राममंदिर लवकर बांधावे
३. Beef Lynchings Are Small Episodes, Says Mohan Bhagwat

इ.इ.इ.

यासारख्या वाक्यांनंतर संघाला स्पष्टीकरणे का देत बसावी लागतात?

पुन्हा एकदा,
प्रकु हे संघाचे अधिकृत प्रवक्ते आहेत काय?

नसलात, तर धूळफेक बंद करावी ही विनंती.

उत्तमरित्या घोळ घालणे व ऑबफुस्केशन सुरू आहे.

अडचणीच्या प्रश्नांना सोयीस्कर बगल देण्यात आलेली आहे.

स्त्री स्वयंसेविकांसाठी राहण्याची वेगळी सोय करण्याबद्दलचा प्रश्न होता वरती. तर हे प्रकु साहेब म्हणतात : "मला कल्पना नाही"

संघात बायकांना घेत नाहीत, हा समानताप्रवर्तक नियम प्रकुंना ठाऊक नाही का?

संघाच्या शाखेत इतर धर्म, खालच्या जातीच्या लोकांना कशी वागणूक मिळते त्याबद्दल स्वानुभव लिहिले आहेत, तर त्याला उत्तर :
>>
संघ स्वयंसेवक होण्यासाठी प्रवेशाला कोणताही क्रायटेरीया अथवा प्रवेश प्रक्रिया नाही. शाखेत आला कि माणूस स्वयंसेवक झाला असे मानले जाते. त्यामुळे बऱ्याच स्वयंसेवकांमध्ये कडवटपणा कट्टरता वगेरे पाहायला मिळते. गाधीजींबद्दल द्वेष देखील पाहायला मिळतो. संघाची वेळोवेळी होणारी शिबिरे इत्यादी मधून या स्वयंसेवकांचे आचार विचार योग्य वाटेवर आणून त्याला घडवण्याचा प्रयास होतो. त्यामुळे माणूस संघात आला म्हणजे तो परफेक्ट आहे असे मानता येत नाही. बराच काळ हे विचार ऐकत राहिल्याने, अभ्यासाने स्वयंसेवक परिपक्व होतो. असे असल्यामुळे मुळे संघामध्ये वरिष्ठ जबाबदाऱ्या देण्याआधी विचारांच्या परिपक्वतेची खात्री झाल्यावर दिल्या जातात.

कापोचे यांना संघाचा आलेला वाईट अनुभव अशा घटकांमुळेच आलेला आहे असे दिसते. अर्थात हे संघाचे घटक आहेतच. येथे जबाबदारी झटकण्याचा विचार वगेरे नाही.
<<

कस्लं भारी आहे ना? "जे हलकटपणा करतात ते अहो, संघाचे नाहीतच!" अरे!?

मग अर्ध्या चड्ड्या घालून अशा कार्यक्रमांना जे स्टँप घोटाळ्यातल्या भ्रष्टाचारासाठी जेलमधे जाऊन मग भाजपाचे आमदार म्हणून निवडून आलेत त्यांना उभं कसं राहू देता? फोटो आहेत देवगिरी मेळाव्याचे. तुमच्या युनिफॉर्मला काहीच किम्मत नाही का?

किमान तुम्ही स्वतः संघाबद्दल बोलत आहात ते अधिकृत आहे की नाही ते तरी सांगा.

प्रत्येक गोष्ट अर्धवट खोटी सांगून पब्लिकला गुंडाळण्याचे उद्योग बंद कधी होणार?

अनेक स्वयंसेवकांचे शाखाबाह्य सामान्य सामाजिक वर्तन, संभाषण हे अतिशय कडवे, गटबाजीचे आणि असहिष्णु असते हे सामान्य निरीक्षण वर अनेकांनी मांडले आहे. >>> हीरा, पण हे अ‍ॅनेक्डोटल आहे., हेच वाक्य स्वयंसेवकांऐवजी काँग्रेसचे कार्यकर्ते वापरून ही लिहीता येइल आणि चुकीचे नसेल. (मोस्टली पश्चिम महाराष्ट्रातील) खेड्यापाड्यात व शहरात दोन्हीकडे पाहिले आहे.

ज्यांचा विरोध संघाच्या नेतृत्वाला, त्यांच्या प्रतिगामी वक्तव्यांना, व त्यांनी वेळोवेळी हे संघटनाबळ वापरून समाजाला आधुनिक करण्यापेक्षा तसे आधुनिक करण्याचे प्रयत्न होत होते त्याला विरोधच केला (उदा: हिंदू कोड बिल)- याला आहे तो योग्यच आहे. पण सर्वसामान्य स्वयंसेवक इतर समाजापेक्षा जातीयवादी कमीच असेल, निदान मी तरी असेच बघितले आहे. मुस्लिमविरोधात ते जास्त असतात, जातीयवाद सहसा नसतो.

नाहीतरी पक्षाची/संघटनेची धोरणे आणि त्यातील लोकांचे वैयक्तिक वागणे याचा कोठे संबंध असतो एकमेकांशी? तसेच आहे हे Happy

Pages