सहिष्णू धागा

Submitted by प्रकु on 8 January, 2016 - 16:14

मित्रहो,

शिवशक्ती संगमच्या निमित्ताने काढलेल्या धाग्यावर अतिशय सुंदर आणि संयत शब्दात चर्चा झाली. अनेक प्रश्न तेथे उपस्थित करण्यात आले आणि त्याला सगळ्यांनी मिळून आपापल्या परीने उत्तरे दिली.
मुख्य कौतुक म्हणजे कोणीही विखारी प्रतिसाद न देता एक एक गोष्ट समजून घेतली.

या निमित्ताने विचारांची/माहितीची जी देवाणघेवाण झाली ती अप्रतिम होती. मायबोली सारख्या संकेतस्थळाचा याहून सुंदर उपयोग तो काय असू शकतो.

तोच धागा पकडून कैपोचे यांनी सुचवल्याप्रमाणे हा नवीन धागा येथे काढत आहे. याचा उद्देश मी खाली स्पष्ट करतो.

तत्पूर्वी एक स्वानुभव मला सांगावासा वाटतो.
मी सावरकरांचा निस्सीम भक्त होतो आणि आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी स्वतः लिहिलेले बरेच लिखाण मी वाचले. स्वातंत्र्य संग्रमातल्या इतर अनेक महापुरुषांबद्दल पुढे वाचनात आले.
यामधून एक विचारधारा निर्माण होत गेली ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जहाल मतवादी विचारांशी जास्त जवळीक होती.
याच बरोबर अजून एक विचारधारा नकळतपणे डेव्हलप होत गेली ज्यात मवाळ गट, गांधीजी यांच्याबद्दल तिरस्कार होता.

यातला 'तिरस्कार' हा शब्द महत्वाचा आहे. हा तिरस्कार उगाच आपला मनात येऊन बसलेला होता.

यावर घरात अनेकदा वडिलांशी वादविवाद करताना ते मला गांधीजींचे महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करत. लाखो लोक त्यांच्या मागे गेले यात नक्कीच फार मोठा अर्थ आहे असे ते सांगत.
त्यावेळी मला ते फारसे पटत नसे.

पुढे जशी जशी प्रगल्भता वाढत गेली तसतसे मी एका थर्ड आय ने जगाकडे पाहू लागलो. ज्यामुळे मला हे लक्षात यायला लागले कि प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला त्याच्या झालेल्या जडणघडणी प्रमाणे विचार करतो आणि निर्णय घेतो. अर्थात, त्याच्या जागी तो बरोबरच असतो.

सावरकर असो वं गांधीजी, कोणीहि मुद्दाम हून चला आता आपण भारत देशाला खड्ड्यात घालू म्हणून काम केले आहे का.? अर्थातच नाही. दोघांनी कार्य तर भारताच्या उन्नतीसाठीच केले. त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. इतकेच..

मग आपल्या मनात 'तिरस्कार' असण्याचे कारण ते काय.?

यामध्ये असहमती असू शकते. मतभेद असू शकतात. पण तिरस्कार हा एक बिनगरचेचा घटक आहे.

तिरस्कार अज्ञानातून येतो. आणि मतभेद अभ्यासातून येतात.

या विचारातून मग मी गांधीजींचे चरित्र वाचण्याचे ठरवले. लकीली याच दरम्यान एकदा काकांच्या घरी गेलेलो असताना त्यांच्याकडे मला गांधीजींचे आत्मचरित्र मिळाले. मी ते त्यांच्याकडून घेऊन वाचायला सुरुवात केली.
लवकरच माझे गांधीजींबद्दल असलेले मत पूर्णपणे बदलले.
त्यांच्या काही गोष्टी मला पटल्या, काही नाही पटल्या. पण मनातला गांधीजींबद्दलचा आदर मात्र खूप वाढला. त्यांच व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. असं व्यक्तिमत्व जगात पुन्हा होणे नाही या मताला मी आलो.

मनातील पूर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्या चष्म्यातून जग पाहताना खूप छान वाटले. (अजूनही माझे वाचन सुरु आहे. खंड पडलाय जरा, पण लवकरच पूर्ण होईल.)

अशा प्रकारे माझ्या मनातून तिरस्कार हद्दपार झाल्यावर मला एक मानसिक शांतता मिळाली. कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.

अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.

असो. तर या धाग्यावर हा अनुभव सांगण्याचे प्रयोजन असे कि आपण येथे परस्परविरोधी विचार असलेले लोक एकत्र येऊन, शांतपणे चर्चा करून समोरची बाजू समजून घेऊ. समोरच्याचे मत जसे आहे तसे का आहे त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून आपल्या मनातील तिरस्कार दूर होईल. एकमेकांकडून माहित नसलेल्या गोष्टी कळतील. जाणीवा वाढतील. सहिष्णुता वाढेल. आभ्यास वाढेल. आपल्या पैकी बहुतेकांनी कोणत्या तरी एकाच बाजूचा पण सखोल आभ्यास केलेला असेल. त्याचा एकमेकांना फायदा होईल.

दोन्ही बाजूंची सहमती बऱ्याच बाबतीत शक्य नाही हे तर आपल्याला माहितच आहे. हे गृहीत धरूनच आपण बोलूया. तिरस्कार नाहीसा होत गेला तरी या धाग्याचा उद्देश सफल होईल.
आपण एकमेकांशी असहमत असू, पण तरी एका बाजूने असू Happy

या धाग्यावर सावरकर, गांधी, आंबेडकर, कॉंग्रेस, भाजप, हिंदू, मुसलमान, इसाई कोणताही विषय वर्ज्य नाही.
फक्त हा धागा नावाप्रमाणे सहिष्णू राहू द्यावा. (या दोन वाक्यांवरून हा प्रयोग फारच धाडसी वाटतोय मला)
असो. वरून देव बघत आहे. जो आयडी असहिष्णुता दाखवेल त्याचा मृत्यू अटळ आहे.
कोणीही असहिष्णूता दाखवल्यास त्याला कृपया कोणतेही उत्तर देऊ नका. शांतता राखा.

याच उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण जमेल तसे आपापल्या आवडत्या नेत्यावर लेख लिहूया. म्हणजे माहितीची देवाण घेवाण होईल आणि विषय निघतील ..

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

पण काँग्रेसवाले आमच्याकडे अभूतपूर्वक शिस्त आहे, असे क्लेम करताना दिसतात का? संघाबद्दल किंवा संघिष्टांबद्दल प्रेम आहे म्हणतात का?
पण इथे गांधीजींबद्दल प्रेम आहे म्हणणार्‍या संघाचे पहा! बाकी जाऊदे खुद्द मायबोलीचर संघाचे म्हणून मिरवणारे आणि हाफ चड्डी घालून संमेलनाला जाणारे कुठल्या मानसिकतेचे आहेत ते सर्वांनी पाहिले आहे. गांधीजींच्या पुण्यतिथिला नथुरामाच्या पिस्तुलाचे फोटो टाकणारे (पुरावा- स्क्रीन शॉट सगळे आहे.) आणि तो पाहून टाळ्या पिटणारे.

आमीरखानच्या सत्यमेव जयते जातीयवाद खाप धाग्यावर जातीचे समर्थन करणारे इथले आयडी कट्टर हिंदुत्ववादी संघवादी आहेत हाही एक योगायोग !

हेच वाक्य स्वयंसेवकांऐवजी काँग्रेसचे कार्यकर्ते वापरून ही लिहीता येइल आणि चुकीचे नसेल. (मोस्टली पश्चिम महाराष्ट्रातील) खेड्यापाड्यात व शहरात दोन्हीकडे पाहिले आहे.
<<
त्यांनी शेण खाल्लं म्हणून संघासारख्या दुधात धुतलेल्या संस्कारी, राष्ट्रभक्त, पुरुष संघटनेलाही तेच करायची मुभा आहे का?

हे असलं लॉजिक तुम्ही देखिल लावावं?

त्या फा यांना मी ते हे म्हणत असतो, ते याच साठी.

शाखेत येणार्‍या खालच्या जातीतल्या मुलाला तू येऊ नकोस असे एक 'सामान्य' स्वयंसेवक सांगतो, तेव्हा जबाबदार शाखाशिक्षक काय करीत असतो?

तो एक्झॅक्टली मोदीसाहेब करतात तेच करतो. दादरी हा केंद्राचा प्रश्नच नाही, असे सांगून हात झटकतो. 'सामान्य' स्वयंसेवकावर खासगीत टाकलेली ती जबाबदारी त्याने पार पाडल्याबद्दल त्याला कालांतराने बक्षिस दिले जातेच.

समरसता म्हणजे काय?
महात्मा फुले यांना पुण्यात दैनिक वृत्तपत्र चालू करायचं होतं. त्यावेळेस फुलेंना 'प्रेस जाळून टाकण्याची' धमकी देणारे कोण होते.
शाहू महाराजांचे वेदोक्त पुराणोक्त सर्वांना माहित आहे ते आतापर्यंत कलबुर्गी पानसरे दाभोळकरांपर्यंत.
ह्या लोकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यामुळे सर्व 3.५ आर एस एस बरोबर नाही.

मला आमच्या फडकेवाडी गणपती मंदिराच्या अंगणात भरणार्‍या लहान मुलांच्या शाखेच्या सरांचं आडनाव आठवलं. बगाडे सर. एकदम शांत होते पण नजरेत जरब असायची. मला कमान टाकता येत नसे तर मला ते जमावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले होते. पण मला जमलंच नाही. मैदानी खेळ मात्र भरपूर खेळले. शाखेत एक वर्षभर गेले आणि नंतर शाळेची वेळ बदलल्याने शाखेत जाणं बंद झालं.

अय्यो!
केश्वीतै, समितीच्या शाखेत, संघाच्या शाखेत की सेवादलाच्या? कारण लहान मुलांची शाखा संघाची असेल तर तुम्हाला तिथे कसं जाऊ दिलं? अन समितीच्या शाखेत पुरुष सर कसे काय आले?

@ इब्लिस,
आपण केवळ माझ्या कुलकर्णी या आडनावावरून मी संघाचा असल्याचा निष्कर्ष काढला एवढेच नाही तर गांधी, नेहरू विरोधी असल्याचा सुद्धा निष्कर्ष काढलात याचे मला मनापासून वाईट वाटले.. अरेरे
<<
हे वाक्य मा. प्रकु यांनी इथे लिहिले आहे.

तिथे बाकी चर्चाही आहेच. पण प्रकु संघाचे आहेत हा निष्कर्ष चुकीचा वाट्टोय का लोकहो? Wink

*

आपल्या नावडत्या व्यक्ती व विचारधारेचे खोटे बोलून चारित्र्यहनन ही संघाची ट्याक्टिक आहे.
इथे प्रकुंचा दुतोंडीपणा उघडा पाडला तरी पुरे. खोटे बोलायची वा वेगळे हनन करायची गरज नाही. पुढे या संघशितावरून भाताची परिक्षा लोकांना आपोआप होईलच.

दीमा, संघाची किंवा समितीचीच लहानमुलांसाठी शाखा असायची. सेवा दल नाही. मुलं मुली दोन्ही एकत्रच असायची. पण बगाडे सरच होते. अजूनही चेहरा जसाच्या तसा आठवतो आहे. सडसडीत आणि किंचीत टक्कल पडू लागले होते. त्या शाखेला फी नव्हती. लहान मुलांना सर/बाई कुणीही चालतं की. शाळेत पण सर किंवा बाई कुणीतरी एकच असे पीटीला. संध्याकाळी फडकेवाडीच्या अंगणात जमायचो आम्ही. आधी लायनीत उभं राहून प्रार्थना. मग मैदानी खेळ. अंगणात खूप खडे असायचे ते जाम टोचायचे. जरा काळोख होतोय असं वाटलं की आतमधल्या छोट्या हॉलमध्ये नेत. मग तिथे व्यायाम. नंतर परवचा म्हणायचा. नंतर घरी. रोज नसे शाखा. कुठल्या दिवशी असे ते आठवत नाही. मी राहायचे त्या वाडीतल्या अंगणात प्रचंड दंगा आणि उनाडक्या करत असू आम्ही. त्यामुळे वळण लागण्यासाठी तिकडे पाठवलं गेलं होतं आम्हाला Sad :-P. तेव्हाच्या वाडीतल्या काकूंपैकी कुणाशी संपर्क झाला तर विचारेन संघाची होती की समितीची होती की दोन्हीची एकत्र होती ते.

समरसता म्हणजे समता नव्हे.

पूर्वी बायका सासरी निघाल्या की सांगायचे .... समरस होउन रहा.... म्हणजे मिळुन मिसळुन रहा. कुरबुर करु नकोस.. तोंड्गप्प ठेव ..पडती बाजू घे. इ इ

समरसता ईज नॉट इक्वल टू समता.

समता म्हनजे समताच .. समरसता म्हणजे समता नसली तरी गप्प रहाणे अपेक्षित असते.

घटनेने स्वातंत्र्य समता बंधुता यांचा पुरस्कार केलेला असताना संघाने हे समरसता हे साडेतीनावं पिल्लु कशाला काढले ?

आपण केवळ माझ्या कुलकर्णी या आडनावावरून मी संघाचा असल्याचा निष्कर्ष काढला एवढेच नाही तर गांधी, नेहरू विरोधी असल्याचा सुद्धा निष्कर्ष काढलात याचे मला मनापासून वाईट वाटले.. अरेरे
>>>
धन्यवाद.. तिथे आडनावावरून काढलेला निष्कर्ष आवडला नाही असे म्हणले आहे दिमा. शिवाय गांधी, नेहरू विरोधी बद्दल मी वरच स्पष्ट केले आहे. तुम्हाला माझी वरच्या पोस्टी लपवायच्या आहेत यासाठी चालू असलेली धडपड दिसत आहे.

तुम्ही मी मांडलेल्या मुद्द्यांवर न बोलता माझ्यावर घसरत आहात हेच पुरेसं बोलकं आहे Happy

दिमा, तुमची क्रेडीबिलीटी पूर्ण माबो ला माहित आहे. कितवा आयडी चालू आहे ते कशामुळे गेले ते हि माहिती आहे. सो तुम्ही राहूच द्या जरा.
सातीताई आणि कापोचे कडून धडे गिरवा जरा ...

हेच कौंना लागू आहे. तुम्ही जरा देवरसांचे भाषण वाचा. समरसता नाही समता हाच शब्द वापरला आहे. त्यावरच आहे. मी लिंक देत नाही कारण सोर्स वरून तुम्ही संशय घ्याल. त्यापेक्षा तुमच्या आवडत्या सोर्स मधून वाचा.

धागा काढताना हे सगळे होणार अपेक्षित होते Happy
असो. मी निघतो आता. उद्या वगेरेच येईल बहुतेक ...

प्रकु,

तिथे मी आडनांवावरून निष्कर्ष काढलेला नाही. मी तसा काढला हे तुम्ही म्हटलं आहे.

किती खोटे बोलाल?

राहीली बाब आयडीची. ४२ अठवड्यांची ही तुमची आयडी पहिलीच आहे असं समजू का? Wink

अन मुद्द्यांबाबत :

आम्ही मांडलेल्या मुद्द्यांचे काय? बगल का?

आठवड्यापूर्वी जत्रेला गावी जाउन आलो. वर्षानुवर्षाची वतनदारी अजूनही देवळात जशीच्या तशी चालू असलेली पाहिली. मुंबई/पुण्यात आम्ही जातीयवादी नाहीत म्हणून सांगणारे गावी गेले कि मात्र या आरक्षणाचा आवर्जुन लाभ घेतात.

संघाने जर या वतनदारी मानसिकतेवर आघात केला तर त्यांना अनुयायी कुठून मिळणार? म्हणून समरसता!

समरसता चे दोन अर्थ निघतात १] प्रत्येक रस समान किंवा २] एका कोणत्यातरी रसात इतर रसांनी सामावून जाणे.
पहिला अर्थ असेल तर समता हाच शब्द काय वाईट आहे? पण ज्याअर्थी नवा शब्द आणला आहे तेंव्हा एकंदरीत प्रकार दुसर्‍या अर्थाबद्दल असावा.

कॉंग्रेजने गेल्या ६५ वर्षात तमाम जनतेला जी आयती खायची सवय लावलेय त्याच्याच परिणाम वरच्या अनेक प्रतिक्रीयां मधून दिसतोय. स्वत: काही करायचे नाही फक्त संघाने 'हे' करायला हवे, संघाने 'ते' करायला हवे, म्हणत तोंडाच्या वाफा घालवायच्या आणि कपडे सांभाळत बसायचे. वर म्हणत सुटायचे 'देशात समानता, समता यायला हवी म्हणुन !'.

"काँग्रेसने गेल्या साठ वर्षात काही केले नाही",किंवा "काँग्रेसने गेल्या साठ वर्षांत देशाची वाट लावली" ही वाक्ये संघसहानुभूतिदारांची भलेही घोषवाक्ये असतील पण इतकी घिशीपिटी झालीयत की प्रतिवादसुद्धा करावासा वाटत नाही. "तर मग चालते व्हा पाकिस्तानात" या वाक्यासारखी याही दोन वाक्यांची अर्थहीन अतिवापरामुळे पार रया गेलीय. आता काहीतरी इफेक्टिव अशी दुसरी वाक्ये शोधा बुवा.

प्रत्येकाच्या अस्मिता, इतिहास वेगळा. त्यात एकाला अमुक व्यक्ती प्रातःस्मरणीय तर दुसऱ्याला तिच्या गतकर्मामुळे तिच व्यक्ती तिरस्करणीय.

तेंव्हा इतरांनी आमच्या रसात विरघळून जावे असे वाटतेय, ते आपल्या तथाकथित पुज्य व्यक्तींना विसरण्यास तयार आहेत का?

वर हे वाचले आहे:- "संस्था मोठी, व्यक्ती नाही".

आता काहीतरी इफेक्टिव अशी दुसरी वाक्ये शोधा बुवा.
<<
नव्हे.
"आता काहीतरी नव्या थापा शोधा बुवा." असे म्हणा.

समरसते मधे विरघळण्या साठी प्रत्येकांनी जात धर्म घरात ठेऊन स्वता:ला एक भारतीय मानुन
भारतीय संविधाना नुसार आचरन करावे.

तेव्हा लोकहो, अश्या रीतीने एकदाचे सगळे मुखवटे गळून पडले. अठ्ठेचाळीस की काही तास कसेबसे धरून ठेवलेले हे मुखवटे सहिष्णूतेचे होते. येथे लिहिणारा कोणीही कोणत्याही धर्माचा, पक्षाचा अधिकृत प्रवक्ता नसतानाही दुसर्‍याला त्याच्या पदाचा जाब विचारण्याची शरम वाटताना दिसत नाही. संघासारखी संघटना शिस्त आणि स्वच्छ आचरण ह्या नावांखाली असमानता आणू पाहण्याचा दांभिकपणा करते आणि युगानुयुगे समानतेचे गोडवे गाणारे संघाचा उल्लेख होताच चवताळून बेताल लिहू लागतात आणि आगी लावत सुटतात. ह्यांच्यापैकी कोणाकडेही 'दुसर्‍याचा विरोध' ह्यापलीकडे काही कार्यक्रम असेल असे वाटत नाही. चर्चा सुरू आहे तर ती तशीच व्यवस्थित पुढे न्यावी इतकेही भान न ठेवू शकणारे चार दोन आय डी बहुतांशी धाग्यांचा असाच कचरा करत आहेत.

जयहिंद

मित्रपरिवाराने धाग्याची अवस्था काय केली हे समोर आल्यामुळे अवांतर मुद्दे लिहिण्याचे अधिकार घाईघाईत ओरबाडून घेतलेले दिसत आहेत. Wink

(माझ्या अवांतराबद्दल दिलगीर प्रकु)

Rofl

एकंदरीत स्कोअर सेटल करायचा एकही क्षण सोडायचा नाही हेच सगळे करतात. विशेषतः नावाजलेले आणि निर्ढावलेले आयडीज.

Pages