आता भारत पाक संबंध पुन्हा बिघडणार का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2016 - 04:25

पठाणकोट इथे काल दहशतवादी हल्ला झाला. त्यांचा डाव उधळून लावताना भारतीय लष्कराचे काही जवान शहीद झाले. त्या सर्वांना श्रद्धांजली.

आज कदाचित एखाद्या वृत्तपत्रात अशी बातमी येईल की त्या हल्ल्यामागे पकिस्तानचा हात असण्याची शक्यता आहे. पण आपल्याला मात्र खात्री आहे की पाकिस्तानचाच हात आहे.
नुकतेच मोदी पाकिस्तानचा धावता दौरा करून आल्याच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांच्या चर्चेलाही उधाण येणार हे नक्की.

या चर्चेतून दोन विचारधारा समोर येणार, एक जी सहजरीत्या येते. घुसा पाकिस्तानात आणि नायनाट करून टाका त्यांचा.
तर दुसरा विचार म्हणजे भारत सरकारने पाकिस्तान सरकारशी जी संबंध सुधारण्याची चर्चा सुरू केली आहे तिला खीळ बसावी म्हणून हे कृत्य आहे. तर आपण पाकिस्तान सरकारशी चर्चा थांबवून दहशतवाद्यांचाच डाव यशस्वी करू नये. विकासासाठी या दोन देशांतील संबंध सुधारने गरजेचे आहे.

खरे तर हे संबंध सुधारण्याची प्रक्रिया गेले कित्येक वर्षे चालूच आहे. कॉंग्रेसचे राज्य असो वा वाजपेयी सरकार, पुन्हा कॉंग्रेस असो वा आताचे मोदी सरकार.

मात्र मोदी सरकार जेव्हा आले तेव्हा विकासाबरोबरच आणखी एक मुद्दा त्यांच्या अजेंड्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होताच, तो म्हणजे पाकिस्तानचा बंदोबस्त करणे. त्यांचे सरकार आल्यावर पाकिस्तानविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाया सोशलसाईटवर अश्या फिरायच्या की तुम हमारा एक मारोगे तो हम तुम्हारे चार मारेंगे, घुस के मारेंगे. पुढे निवडणुका संपल्या तसे या विचारांचे प्रचारही थंडावले. मग मोदी सरकारतर्फेही पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे शांतता मार्गाने प्रयत्न होऊ लागले. यालाही त्यांचे समर्थक त्यांचा मुत्सद्दीपणा म्हणू लागले. अगदी आठवड्याभरापूर्वीची त्यांची पाकिस्तानभेट, यात त्यांचे धाडस शोधले गेले. पण काल जे काही घडले त्यानंतर मूळ प्रश्न जैसे थे च आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

आज मी माझ्या मोदी समर्थक मित्रांना व्हॉटसपग्रूपवर विचारले की आता सरकारची भुमिका काय असेल. निषेध करणे, चर्चा पुढे ढकलणे, काही काळासाठी क्रिकेट खेळायचे थांबवणे.. हेच नेहमीचे की आणखी काही.. पण चार तास झाले त्यावर उत्तर द्यायला कोणी आले नाही.

इथे मोदी सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायचे नाही, कारण आधीही हेच चालू होते. फरक ईतकाच की यांनी थोडा विश्वास(!) जागवला होता.

तर धाग्याचा विषय हा आहे की ईथून पुढेही तेच होणार का जे गेले कित्येक वर्षे चालू आहे?
सरकार बदलले तरी पाकिस्तान प्रश्नाला हाताळायची आपली भुमिका कायम तशीच राहणार आहे का? की काही बदल आहे? असल्यास जाणकारांनी आम्हा सामान्य लोकांनाही कळवावा.

जर चर्चेने हा प्रश्न कधीच सुटणार नसेल तर वेगळे काय करायची गरज आहे आणि ते कोण करणार? कधी करणार? की उर्वरीत देशात शांतता नांदावी आणि देशाचा विकास व्हावा यासाठी सीमेवर काही जवानांचे आणि दहशतवादी हल्ल्यात काही भारतीय नागरीकांचे जीव अधूनमधून जाणे ही तुलनेत कमी किंमत आहे..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सरकार पुर्णतः अपयशी ठरले आहे
परिस्थिति हाताळता येत नाही. कुठे काय चालू आहे कळत नाही
संरक्षण गोष्टींवर वित्तमंत्री भाष्य देतोय, वित्तीय गोष्टींवर दुरसंचारमंत्री बोलतोय, भुकंपावर संरक्षणमंत्री बोलतोय, गृहमंत्री आपरेशन संपले म्हणतात तर गृहसचिव चालू आहे म्हणतात

सावळागोंधळ चालू आहे

त्याहूनही काहीतरी वाईट होऊ दिलं गेलं नाही असं म्हणण्यात येत असेल तर ते खोटं आणि प्रचारकीच कशावरून?
<<
खोटं असो नसो, प्रचारकी कशावरून नाही?
अधिक वाईट काय व्हायला हवं होतं? अणुहल्ला? की कसाब-२?

<<भारतीय राज्यकर्ते नेहमीच चर्चेसाठी अनुकूल असणे आणि पाकिस्तानी लष्करशहा किंवा लष्कराच्या अधिन असलेले लोकनियुक्त सरकार अशी जोपर्यंत चर्चेची पातळी राहिल तो पर्यंत अशी चर्चा नेहमीच निष्फळ राहणार आहे.>>
हे मात्र अगदी खरं आहे. भा पा प्रश्न धुमसत ठेवण्यात भारताच्या कुठल्याही पक्षाच्या पंतप्रधानांचा काही छुपा अजेंडा आहे असे वाटत नाही. मात्र पाकिस्तानी राजकारणी आणि लष्करशहांचा फार मोठा अजेंडा आहे हे लक्षात येते. >> +१.

पाकिस्तानवर बाँब टाकायचे सल्ले देणार्‍यांना आणि त्यासाठी अमेरिका/फ्रान्सचे उदाहरण देणार्‍यांना हे लक्षात येत नाही की इराक/अफगाणिस्तान/सीरिया यांच्या सीमा अमेरिका आणि फ्रान्सला लागून नाहियेत. शिवाय ते देश अण्वस्रसज्ज आणि लढाउ विमानं बाळगणारे नाहीयेत. शिवाय त्यांना इतर कुठल्याही लष्करी महासत्तेचा पाठिंबा नाहिये. त्यामुळं अमेरिका किंवा फ्रान्सनं त्यांच्यावर बाँब टाकले तरी ते डायरेक्ट रिटॅलिएट नाही करू शकत. पाकिस्तान आणि या देशांत तोच फरक आहे.

शिवाय ते देश अण्वस्रसज्ज आणि लढाउ विमानं बाळगणारे नाहीयेत. शिवाय त्यांना इतर कुठल्याही लष्करी महासत्तेचा पाठिंबा नाहिये. त्यामुळं अमेरिका किंवा फ्रान्सनं त्यांच्यावर बाँब टाकले तरी ते डायरेक्ट रिटॅलिएट नाही करू शकत>>>
हेच आधी मी सांगितले पण ऐकत नव्हते प्रखर राष्ट्रभक्तांना मोदींमधे देव दिसत होता अणूबाँब दिसत होता
जावा आता फोडा एकदाचा,

भाजप सरकारचं अपयश किंवा भाजप सरकारला खोटे पाडण्याची संधी - असे म्हणालो होतो. तुम्ही एकाच बाबीवर बोललात हा तुमचा निर्णय! >> एकाच बाबीवर बोललो कारण दुसर्‍या बाबीवर काही बोलण्यासारखं भाजपाच्या ट्वीटर गँगनी ठेवलंच नाहीये Wink यातून ते अ‍ॅटलीस्ट कुठल्याही गोष्टीवर इम्मॅच्युअरली ट्वीट/चेस्ट थंपिंग/दुसर्‍याला लगेच देशद्रोही ठरवणं या गोष्टी केल्या नाही पाहिजेत एवढं जरी शिकले तरी त्यांच्यासाठी खूप आहे.

काही जवान शहीद झाले हे वाईटच पण त्याहूनही काहीतरी वाईट होऊ दिलं गेलं नाही असं म्हणण्यात येत असेल तर ते खोटं आणि प्रचारकीच कशावरून? >> Lol बरोबर आहे त्यांचं काहीच खोटं आणि प्रचारकी नसतं Happy

परिस्थिती बदलत असते >> हे तुम्हीच म्हणताय हे लक्षात ठेवा.. Happy

फ्रान्सवर अतिरेकी हल्ला झाल्यावर एकवटलेल्या फ्रान्सचे मेसेजेस पाहिले आणि तेच भारतावर हल्ला झाल्यावर एकमेकांवर आरोप करणार राजकारण प्रकर्षाने जाणवलं , काय पण दुर्दैव आहे भारताचं .

Pages