पठाणकोट इथे काल दहशतवादी हल्ला झाला. त्यांचा डाव उधळून लावताना भारतीय लष्कराचे काही जवान शहीद झाले. त्या सर्वांना श्रद्धांजली.
आज कदाचित एखाद्या वृत्तपत्रात अशी बातमी येईल की त्या हल्ल्यामागे पकिस्तानचा हात असण्याची शक्यता आहे. पण आपल्याला मात्र खात्री आहे की पाकिस्तानचाच हात आहे.
नुकतेच मोदी पाकिस्तानचा धावता दौरा करून आल्याच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांच्या चर्चेलाही उधाण येणार हे नक्की.
या चर्चेतून दोन विचारधारा समोर येणार, एक जी सहजरीत्या येते. घुसा पाकिस्तानात आणि नायनाट करून टाका त्यांचा.
तर दुसरा विचार म्हणजे भारत सरकारने पाकिस्तान सरकारशी जी संबंध सुधारण्याची चर्चा सुरू केली आहे तिला खीळ बसावी म्हणून हे कृत्य आहे. तर आपण पाकिस्तान सरकारशी चर्चा थांबवून दहशतवाद्यांचाच डाव यशस्वी करू नये. विकासासाठी या दोन देशांतील संबंध सुधारने गरजेचे आहे.
खरे तर हे संबंध सुधारण्याची प्रक्रिया गेले कित्येक वर्षे चालूच आहे. कॉंग्रेसचे राज्य असो वा वाजपेयी सरकार, पुन्हा कॉंग्रेस असो वा आताचे मोदी सरकार.
मात्र मोदी सरकार जेव्हा आले तेव्हा विकासाबरोबरच आणखी एक मुद्दा त्यांच्या अजेंड्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होताच, तो म्हणजे पाकिस्तानचा बंदोबस्त करणे. त्यांचे सरकार आल्यावर पाकिस्तानविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाया सोशलसाईटवर अश्या फिरायच्या की तुम हमारा एक मारोगे तो हम तुम्हारे चार मारेंगे, घुस के मारेंगे. पुढे निवडणुका संपल्या तसे या विचारांचे प्रचारही थंडावले. मग मोदी सरकारतर्फेही पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे शांतता मार्गाने प्रयत्न होऊ लागले. यालाही त्यांचे समर्थक त्यांचा मुत्सद्दीपणा म्हणू लागले. अगदी आठवड्याभरापूर्वीची त्यांची पाकिस्तानभेट, यात त्यांचे धाडस शोधले गेले. पण काल जे काही घडले त्यानंतर मूळ प्रश्न जैसे थे च आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
आज मी माझ्या मोदी समर्थक मित्रांना व्हॉटसपग्रूपवर विचारले की आता सरकारची भुमिका काय असेल. निषेध करणे, चर्चा पुढे ढकलणे, काही काळासाठी क्रिकेट खेळायचे थांबवणे.. हेच नेहमीचे की आणखी काही.. पण चार तास झाले त्यावर उत्तर द्यायला कोणी आले नाही.
इथे मोदी सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभे करायचे नाही, कारण आधीही हेच चालू होते. फरक ईतकाच की यांनी थोडा विश्वास(!) जागवला होता.
तर धाग्याचा विषय हा आहे की ईथून पुढेही तेच होणार का जे गेले कित्येक वर्षे चालू आहे?
सरकार बदलले तरी पाकिस्तान प्रश्नाला हाताळायची आपली भुमिका कायम तशीच राहणार आहे का? की काही बदल आहे? असल्यास जाणकारांनी आम्हा सामान्य लोकांनाही कळवावा.
जर चर्चेने हा प्रश्न कधीच सुटणार नसेल तर वेगळे काय करायची गरज आहे आणि ते कोण करणार? कधी करणार? की उर्वरीत देशात शांतता नांदावी आणि देशाचा विकास व्हावा यासाठी सीमेवर काही जवानांचे आणि दहशतवादी हल्ल्यात काही भारतीय नागरीकांचे जीव अधूनमधून जाणे ही तुलनेत कमी किंमत आहे..
हो. ६-७ होते आता असे
हो. ६-७ होते आता असे सांगण्यात येत आहे पहिल्याच दिवशी ४ अतिरेकी ठार केल्यावर लक्षात आले नाही कारण एसपीने ४ अतिरेकी साम्गितलेले होते. काल एकही अतिरेकी ठार करता आला नाही.
आजचा ३रा दिवस आहे इतके दिवस गोळीबारी करत आहे म्हणजे शस्त्रसाठा भरपूर आणला असेल. एका मॅग्झिन मधे १० राऊंड बुलेट्स असतात यावरून किमान २० ते ४० मॅगझिन्स तरी एकेका कडे असायला हवे. वर हँडग्रेनेड वेगळे.
इतका प्रचंड शस्त्रसाठा अश्या डिफेंस एरिआ मधे घेऊन येणे ते ही पुर्वकल्पना सरकारला असताना. विचार करण्याजोगी बाब आहे
अमा बीईजीत भरती व्हायला गेलो
अमा
बीईजीत भरती व्हायला गेलो तेव्हा वजन कमी भरल्याने रिजेक्ट झालो होतो. सदर्न कमांडला पण याच कारणासाठी रिजेक्ट झालो. मग नोकरी करत शिक्षण पूर्ण झाल्यावर पुन्हा अधिकारी पदासाठी प्रयत्न केले, या वेळी मेडिकल मधे ओव्हर वेट म्हणून रिजेक्ट केले.
पण अशा फिल्ड मधे काम करता आले की आर्मी , नेव्ही, एअर फोर्स या तिन्ही दलाची सेवा करता आली. सियाचेन भागात सलग दहा वर्षे माझे काम चालू होते. जवळून पाहीले ते लाइफ. त्याबद्दल लिहीणं योग्य होणार नाही म्हणून कधीही लिहीत नाही. तुम्ही आठवण करून दिल्याने मोघम लिहीलेय.
त्या मुलीबद्दल कल्पनाही करू शकत नाही.
धन्यवाद जयन्त. परिस्थिती
धन्यवाद जयन्त.
परिस्थिती आटोक्यात यायला हवी. शहिद जवानान्ना आदरान्जली. लाखमोलाचे जिव आपण गमावतो आहे याचे दु:ख आहे. प्रधान सेवक मोदी, गृह मन्त्री राजनाथ हे दहशतवादाला समजेल अशा भाषेत उत्तर देतिल अशी माझी अपेक्षा, त्यान्च्यासाठी अग्निपरिक्षा आहे
आणि त्याहूनही महत्त्वाचं
आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे मी सैन्यात भरतीही झाले आणि पाकिस्तानी बॉर्डरवर पोस्टींगही मिळाले तरी मी मला पाहिजे तशी लढाई करू शकत नाही.
अजूनतरी भारताच्या इतर देशांशी लढाया सैन्याच्या मनावर अवलंबून न होता राजकारण्यांच्या मनावर अवलंबून होतात
भारताच्या सगळ्या लढाया
भारताच्या सगळ्या लढाया राजकारण्यांच्या मनावर अवलंबुन होतात म्हणजे काय? हे समजले नाही.
म्हणजे इतर काही देशांत लष्कर
म्हणजे इतर काही देशांत लष्कर सर्वेसर्वा असते आणि लढायांसंबंधी निर्णय ते स्वायत्ततेने घेऊ शकते तसे भारतात नाही.
लष्कर पार्लमेंटच्या /पंतप्रधानांच्या/संरक्षण मंत्र्यांच्या निर्णयाशी बांधिल असते.
नाही हो साती ताई तस नसत. लढाई
नाही हो साती ताई तस नसत. लढाई करायची की नाही हे प्रत्येक देशाच सरकारच ठरवत. कोणत्याही देशाचे लष्कर परस्पर निर्णय घेत नाही. एकदा लढाई सुरु झाली की सगळं लष्कर ठरवत. स्ट्र्टेजिक शस्त्रास्त्र वापरायची की नाही हे पण सरकारच ठरवत.
अजूनतरी भारताच्या इतर देशांशी
अजूनतरी भारताच्या इतर देशांशी लढाया सैन्याच्या मनावर अवलंबून न होता राजकारण्यांच्या मनावर अवलंबून होतात
>> ज्या ज्या देशांत लोकशाही आहे तिथे जगभरात असे रिपोर्टिंग फ्रेमवर्क आहे.
सैन्ये निर्णय घेउन लढाई करायला लागली की त्याला मिलिटरी कू म्हणतात. किंवा मग हुकुमशहांच्या हाताखाली सैन्ये आक्रमण करत असतात.
क्रायसिस चालू असताना अर्धे कच्चे धागे काढून चर्चा करणे अवघड आहे. कालच एक चित्र पाहण्यात आले. वाजपेयीजी. मनमोहन जी, मोदीजी तिनी पंत्रप्रधांनांनी मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर
थोड्या काळातच कारगिल युद्ध, २६-११ व ही ताजी घटना घडली आहे. दुटप्पी राज कारणात जीवित हानी होते व चांगले ऑफिसर्स / जवान जातात ह्याचे मला दु:ख आहे. एका कँटिन मध्ये काम करणार्या जवानाने अॅटॅकरचीच गन घेउन त्यानेच अॅटॅकरला मारले. पण त्याच क्षणी जवान देखील गोळी घेउन शहीद झाला. शौर्याची कमी नाही आपल्याकडे....
ॠ ने धागा काढला आता
ॠ ने धागा काढला
आता मायबोलीकरांचे संबंध पुन्हा बिघडणार का?
म्हणजे इतर काही देशाप्रमाणे
म्हणजे इतर काही देशाप्रमाणे भारतातही 'मार्शल लॉ' लागु व्हावा असे तुम्हाला वाटते काय?
पण ते काही असले तरी मन्नु सरकारप्रमाणे आताचे श्री मोदि यांचे सरकार देखिल पाकिस्तानवर एकादा अणुबॉंम टाकायाच्या ऐवजी फक्त इशारेच देत आहे.
यूरो, पाकिस्तानाबाबत असं नाही
यूरो, पाकिस्तानाबाबत असं नाही आहे , पाकिस्तानतर्फे केली जाणारी बारिकसारिक आक्रमणे आणि हल्ले मिलीटरीच ठरवते.
आत्ताचा हल्लाही पाकिस्तानच्या राजकारण्यांना त्यांच्या लष्कराने दिलेली चेतावणी आहे असे बरेच जाणकार म्हणतात.
पण ते काही असले तरी मन्नु
पण ते काही असले तरी मन्नु सरकारप्रमाणे आताचे श्री मोदि यांचे सरकार देखिल पाकिस्तानवर एकादा अणुबॉंम टाकायाच्या ऐवजी फक्त इशारेच देत आहे. >>> कुठल्या नंदनवनात आहात प्रसाद.?? मोदी अणुबाँब टाकणार?? ते नुसते बोंबा मारण्यातच एक्स्पर्ट आहेत.
काँग्रेसने / भाजपने यंव केलं
काँग्रेसने / भाजपने यंव केलं म्हणून आम्ही त्यंव करू, हा टोन सुरक्षाविषयक प्रश्नांविषयी हे दोन्ही पक्ष आणि त्यांचे पाठीराखे किती गंभीर आहेत हे दर्शवतो. या दोन्ही पक्षांना आलटून पालटून अनेक संधी मिळाल्या पण प्रश्न कायम राहीले.
देशभक्तीचे प्रमाण द्यायचे असल्यास या दोन्हींना घरी पाठवले पाहीजे. खरे तर एखाद्या अज्ञात बेटावर सोडून यायला हवे. तिथे बसून एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढून दमल्यावर जर यांच्यात गांभिर्याने वागण्याबाबत थोडेफार एकमत झाले म्हणजे पुन्हा विचार करावा.
देशापेक्षा डोईजड झालेले हे पक्ष वठणीवर आले नाहीत तर समस्या सुटणार नाहीत.
कडबोळं सरकार आणूया
कडबोळं सरकार आणूया का?
मागच्या कडबोळ्याच्यावेळी किती हल्ले/युद्ध्/लढाया झाल्या?
म्हणून यांच्या माकडचेष्टा
म्हणून यांच्या माकडचेष्टा समर्थनीय ठरतात ?
अगदी योग्य साती. तीथे
अगदी योग्य साती. तीथे पडद्यामागे कोण सत्ता चालवते हे यातुन स्पष्ट होते. म्हणुनच आपण चर्चा करतो ती कोणाशी करतो आणि जे करतात त्यांना प्रत्यक्ष काय अघिकार आहेत?
खरी वादाची सुरुवात इथुनच आहे.
पाकचे प्रधानमन्त्री शरिफ
पाकचे प्रधानमन्त्री शरिफ भारताबरोबर सम्बन्ध सुधारण्याच्या जास्त फन्दात पडले तर ते सत्ता गमावतिल... सर्वेसर्वा लष्कर आणि आय एस आय आहे.
<< वाजपेयीजी. मनमोहन जी, मोदीजी तिनी पंत्रप्रधांनांनी मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर थोड्या काळातच कारगिल युद्ध, २६-११ व ही ताजी घटना घडली आहे.>>
----- पैकी कुठलाही हल्ला एका दिवसाच्या किव्वा आठवड्याच्या (short notice) तयारीने झालेला नाही आहे, फार आधीपासुन तयारी सुरु होती. वाजपेयी लाहोर मधे असतानाच घुसखोरी सुरु झालेली होती, २६/११ साठी अनेक महिने तयारी सुरु होती... आणि पठाणकोट हल्ला अचानक नाही घडवला गेला आहे.
पाकडे एक नम्बरचे कान्गावखोर
पाकडे एक नम्बरचे कान्गावखोर आहेत. त्याना कितीही पुरावे द्या, ते नाहीच स्वीकारणार. पूर्वी माझ्या पण असेच मनात यायचे की घ्या एक बॉम्ब आणी टाका पाकड्यान्वर, सुटलो आपण. पण तसे नाही ना. आपण समजा घुसलो अमेरीकेसारखे तर बाजूने चीन आपल्याकडे घुसुन हल्ला करु शकत, आपल्याला बेसावध ठेऊन. वरतुन बाकी इस्लामी राष्ट्रे ( सौदी सारखी कदाचीत) नाराज होण्याची शक्यता जास्त, कारण पाकड्याना शिमगा करायची सवय आहे की पाकीस्तान्वर हल्ला म्हणजे अख्ख्या इस्लाम जगतावर हल्ला.
अमेरीकेचे वेगळे आहे, ते राष्ट्र मुळातच धाडसी आणी बलाढ्य आहे. आणी भारत-पाक याना कोम्बड्या सारखे झुन्जवत ठेवण्यातच त्यान्चा आर्थिक फायदा आहे. केनेडीना का मारले गेले हे शोधा म्हणजे उत्तर सापडेल.
मग कॉन्ग्रेसनी हल्ला करा वा भाजपाने, प्रश्न सुटणार आहे का? त्यापेक्षा शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या नात्याने अफगाणिस्तान आणी पख्तुनी स्तान चळवळीला पाठिम्बा देऊन, त्याना मदत करुन त्यान्च्याच काठीने हा पाकीस्तान नावाचा अॅनाकोन्डा मारा.
पण मनमोहनसाहेबांनी कधी
पण मनमोहनसाहेबांनी कधी आरपारची लढाई करू, यांव करू त्यांव करू म्हणाले होते ? ते तर फुशारक्या फेकाड्याने मारलेल्या होत्या. मग आता का लवलेटर लिहित आहे ?
<<पण ते काही असले तरी मन्नु
<<पण ते काही असले तरी मन्नु सरकारप्रमाणे आताचे श्री मोदि यांचे सरकार देखिल पाकिस्तानवर एकादा अणुबॉंम टाकायाच्या ऐवजी फक्त इशारेच देत आहे. >>> कुठल्या नंदनवनात आहात प्रसाद.?? मोदी अणुबाँब टाकणार?? ते नुसते बोंबा मारण्यातच एक्स्पर्ट आहेत.>>
------ अण्वस्त्र किव्वा अणू बॉम्ब बाबत विधान अत्यन्त जपुन, जबाबदारीने करायला हवे.... भारताची no-first-use पॉलिसी आहे. या विषयाबद्दल अत्यन्त जबाबदारीने लिहा अशी विनन्ती. विनोदाने, (कुठल्या पक्षाच्या, व्यक्तीच्या) हेटाळणीने पण असे विचार नको.
जपानचा अनुभव जन-मानसावर फार खोलवर रुजलेला आहे...
वाजपेयी लाहोर मधे असतानाच
वाजपेयी लाहोर मधे असतानाच घुसखोरी सुरु झालेली होती > चुक. वाजपेयी बससेवा सुरु करण्याचे ठरवत असताना आयबीने घुसखोरीचा इशारा दिलेला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करून नंतर त्यांनी बससेवा सुरु केली आणि लाहोरला गेलेले. तो पर्यंत घुसखोर कारगीलच्या टप्प्यावर पोहचलेला होता.
मग आता का लवलेटर लिहित आहे
मग आता का लवलेटर लिहित आहे ?>>>>उलट टपाली लवलेटर आले की मग त्यान्चा प्रेमभन्ग करु असे मनात असेल.:फिदी: खर तर बॉर्डर वर २ झोके बान्धायला पाहीजे. एकात शरीफ आणी दुसर्यावर मोदी असे एकमेकान्कडे पाठ करुन बसतील. झोका उन्च गेला की शरीफ भारतात आणी मोदी पाकीस्तानात पोहोचतील. बाकी जनता खाली-वर न्याहळत बसेल.:फिदी:
या दोन्ही पक्षांनी केलेल्या
या दोन्ही पक्षांनी केलेल्या नालायकीचा फ्रॅक्चर्ड मॅन्डेट शी का संबंध जोडायचा हे कळेल का?
मागच्या कडबोळ्याच्यावेळी किती
मागच्या कडबोळ्याच्यावेळी किती हल्ले/युद्ध्/लढाया झाल्या? >> हा निकष आहे हे माहीत नव्हते. त्यांनी क्रिकेट मॅच प्रमाणे युद्ध अॅ रेंज करायचे होते का? लढाया झाल्या नाहीत हे चांगले की वाईट?
जी आश्वासने हे दोघेही देतात ती ते कधीच पाळत नाहीत, हा प्रश्न आहे असे मला वाटते.
@ अमा, आमच्या कॉलेज
@ अमा,
आमच्या कॉलेज कॅम्पसमध्ये आलेली सैन्य भरती. काय कसली पोस्ट, कसला जॉब प्रोफाईल आणि आपण एलिजिबल ठरू की नाही हे माहीत नसताना पहाटे उठून रांगा लावलेल्या. अर्थात यात प्रखर देशभक्ती होती असे उगाच खोटे नाही बोलणार, पण कुतूहल म्हणा, क्रेझ म्हणा, लावलेली रांग.
माझे वजन कमी होते तेव्हा. कटाप झालो. अर्थात त्याची कल्पना होती मला, म्हणून मी सरांना आदल्या दिवशी विचारलेलेही. पण ते म्हणाले तुला काय करायचेय, तुम्ही जायचे काम करा.
हे सगळे गैरलागू आहे खरे तर इथे विषय निघाला म्हणून लिहावे लागले, पण मला सांगा जर माझ्यासारखी लायकी नसलेली माणसे तिथे हातात बंदूक घेत सीमेवर गेली तर आज जो शहीद जवानांचा आकडा सात आहे तो सत्तर नसता का. तर प्रॅक्टीकली हे सोल्युशन होऊ शकते का.
उद्या मी असेच मंत्र्यांना म्हणेन की ईथे कार्यालयात बसून कागदे हलवण्यापेक्षा तिथे सीमेवर लढायला जा. प्रॅक्टीकल आहे का. त्याऐवजी त्यांना जे जमते, आणि ज्या कामासाठी नेमलेय ती अपेक्षा ठेवतोय त्यांच्याकडून.
असो, या प्रश्नावर जेवढा चांगला तोडगा निघेल तेवढी माणसं कमी मारली जातील. जवान असो वा नागरीक.
------ अण्वस्त्र किव्वा अणू
------ अण्वस्त्र किव्वा अणू बॉम्ब बाबत विधान अत्यन्त जपुन, जबाबदारीने करायला हवे.... भारताची no-first-use पॉलिसी आहे. या विषयाबद्दल अत्यन्त जबाबदारीने लिहा अशी विनन्ती. विनोदाने, (कुठल्या पक्षाच्या, व्यक्तीच्या) हेटाळणीने पण असे विचार नको.>> सहमत.
जी आश्वासने हे दोघेही देतात
जी आश्वासने हे दोघेही देतात ती ते कधीच पाळत नाहीत, हा प्रश्न आहे असे मला वाटते >
बरोबर. पण पहिल्याने आवाक्यातील आश्वासने दिली होती. ती थोडीफार पाळली तरी गेली.
दुसर्याने मात्र राणाभीमसेनच्या थाटात अवाजवी आश्वासने दिली. ती कधीच पाळली जाणार नाही. हे भक्तांच्या लक्षात अद्याप येत नाही
कॉलेज कॅंपस मधे सैन्य भरती?
कॉलेज कॅंपस मधे सैन्य भरती? ऑन कॅंपस रीक्रुट्मेंट? हल्ली असं पण होत?
"गरिबी हटाव" ही देखिल
"गरिबी हटाव" ही देखिल आवाक्यातील घोषणा होती.
आणि ह्या घोषणेमुळे देशातील गरिबी संपुन सगळीकडे कसे सुजलाम सुफलाम झालेय.
थोडक्यात दगडापेक्षा वीट मऊ.
थोडक्यात दगडापेक्षा वीट मऊ. पण डोके फुटणार हे नक्की.
राजीव गांधींवर त्यांच्याच संरक्षण मंत्र्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यातील तथ्ये अरूण शौरीने बाहेर आणली. भाजपने तेव्हां सर्वांना शिक्षा करू असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात व्ही पी चौकशी सुरू करण्याच्या वेळेस अयोध्या इश्यू निर्माण करून ते सरकार पाडले. पुढे बोफोर्स मागे पडून हिंदू मुस्लीम ध्रुवीकरण दोन्ही साइडने केले.
प्रत्यक्षात वाजपेयींनीही बोफोर्स मधील एकाही आरोपीला शिक्षण केली नाही. तसे प्रयत्नही केले नाहीत याची परतफेड काँग्रेसने सुद्धा वेळोवेळी केली. गुजरात दंग्यांमधे, श्रीकृष्ण आयोग अशा अनेक प्रकरणात हे दिसून आलेले आहे.
रॉबर्ट वद्रा जमीन प्रकरण आणि ललित मोदी, व्यापम शांत झालेच की एकाच वेळी.
Pages