आता भारत पाक संबंध पुन्हा बिघडणार का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2016 - 04:25

पठाणकोट इथे काल दहशतवादी हल्ला झाला. त्यांचा डाव उधळून लावताना भारतीय लष्कराचे काही जवान शहीद झाले. त्या सर्वांना श्रद्धांजली.

आज कदाचित एखाद्या वृत्तपत्रात अशी बातमी येईल की त्या हल्ल्यामागे पकिस्तानचा हात असण्याची शक्यता आहे. पण आपल्याला मात्र खात्री आहे की पाकिस्तानचाच हात आहे.
नुकतेच मोदी पाकिस्तानचा धावता दौरा करून आल्याच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांच्या चर्चेलाही उधाण येणार हे नक्की.

या चर्चेतून दोन विचारधारा समोर येणार, एक जी सहजरीत्या येते. घुसा पाकिस्तानात आणि नायनाट करून टाका त्यांचा.
तर दुसरा विचार म्हणजे भारत सरकारने पाकिस्तान सरकारशी जी संबंध सुधारण्याची चर्चा सुरू केली आहे तिला खीळ बसावी म्हणून हे कृत्य आहे. तर आपण पाकिस्तान सरकारशी चर्चा थांबवून दहशतवाद्यांचाच डाव यशस्वी करू नये. विकासासाठी या दोन देशांतील संबंध सुधारने गरजेचे आहे.

खरे तर हे संबंध सुधारण्याची प्रक्रिया गेले कित्येक वर्षे चालूच आहे. कॉंग्रेसचे राज्य असो वा वाजपेयी सरकार, पुन्हा कॉंग्रेस असो वा आताचे मोदी सरकार.

मात्र मोदी सरकार जेव्हा आले तेव्हा विकासाबरोबरच आणखी एक मुद्दा त्यांच्या अजेंड्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होताच, तो म्हणजे पाकिस्तानचा बंदोबस्त करणे. त्यांचे सरकार आल्यावर पाकिस्तानविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाया सोशलसाईटवर अश्या फिरायच्या की तुम हमारा एक मारोगे तो हम तुम्हारे चार मारेंगे, घुस के मारेंगे. पुढे निवडणुका संपल्या तसे या विचारांचे प्रचारही थंडावले. मग मोदी सरकारतर्फेही पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे शांतता मार्गाने प्रयत्न होऊ लागले. यालाही त्यांचे समर्थक त्यांचा मुत्सद्दीपणा म्हणू लागले. अगदी आठवड्याभरापूर्वीची त्यांची पाकिस्तानभेट, यात त्यांचे धाडस शोधले गेले. पण काल जे काही घडले त्यानंतर मूळ प्रश्न जैसे थे च आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

आज मी माझ्या मोदी समर्थक मित्रांना व्हॉटसपग्रूपवर विचारले की आता सरकारची भुमिका काय असेल. निषेध करणे, चर्चा पुढे ढकलणे, काही काळासाठी क्रिकेट खेळायचे थांबवणे.. हेच नेहमीचे की आणखी काही.. पण चार तास झाले त्यावर उत्तर द्यायला कोणी आले नाही.

इथे मोदी सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायचे नाही, कारण आधीही हेच चालू होते. फरक ईतकाच की यांनी थोडा विश्वास(!) जागवला होता.

तर धाग्याचा विषय हा आहे की ईथून पुढेही तेच होणार का जे गेले कित्येक वर्षे चालू आहे?
सरकार बदलले तरी पाकिस्तान प्रश्नाला हाताळायची आपली भुमिका कायम तशीच राहणार आहे का? की काही बदल आहे? असल्यास जाणकारांनी आम्हा सामान्य लोकांनाही कळवावा.

जर चर्चेने हा प्रश्न कधीच सुटणार नसेल तर वेगळे काय करायची गरज आहे आणि ते कोण करणार? कधी करणार? की उर्वरीत देशात शांतता नांदावी आणि देशाचा विकास व्हावा यासाठी सीमेवर काही जवानांचे आणि दहशतवादी हल्ल्यात काही भारतीय नागरीकांचे जीव अधूनमधून जाणे ही तुलनेत कमी किंमत आहे..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>
साती | 4 January, 2016 - 22:16

अय्यो, बाकी कुण्णाकुण्णाला न कळलेलं ह्यांनाच कसं समजलं बाई!
कित्ती मोदी हुश्शार, किती मुत्सद्दी ते यांनाच कळतं नै!

तरी बरं तिकडे हल्ले होत होते तरी इकडे हे लोक 'चंद' लोक किती मूर्ख आहेत अश्या पोष्टी टाकत होते.
स्मित

जयंत.१ | 4 January, 2016 - 22:18

अतिरेक्यांनी भाजपाच्या तोंडात मारलेला मास्टरस्ट्रोक भक्तांनी पाहीला नाही कारण तो त्यांच्या सुध्दा थोबाडीत होता म्हणून सर्व भक्त बिळात लपून बसले आहे

जयंत.१ | 4 January, 2016 - 22:20 नवीन

च गिरीचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे बेफीचा प्रतिसाद
थुंकून चाटणे याला म्हणतात जे भक्तांना करायची सवय लागली आहे
<<<

मायबोलीच्या नशीबी आलेली नेहमीची भाषाशैली अंगिकारण्यात आलेली आहे. ह्याउप्पर काही बोलण्यात रस नाही.

विषय संयतपणे पुढे गेल्यास अवश्य बोलूयात.

जाऊद्या हो जयंत.
इथे त्यांनी कितीही मोदींच्या हुशारीचे गोडवे गायले तरी कुणाला तरी ते पटणार आहे का? (त्यांना स्वतःलाही ते 'आतून' पटत नसेल)
तुम्ही कशाला त्रागा करून घेताय.

>>> जयंत.१ | 4 January, 2016 - 22:29 नवीन

बेफी मुर्खपणाची हद्द ओलांडलीस तर असेच उत्तर मिळणार
<<<

कृपया भाषेला आवर घालावात अशी नम्र विनंती Happy

वरच्या बेफिंच्या पोस्टित ते कॉग्रेसला शिव्या घालाव्यात कि मोदिंचे तोंडभरुन कौतुक करावे कि भारत पाक संबधाबाबत लिहावे अशा अडचणित सापडलेले दिसतात.त्यांच्या मते जग चकित झाले काय नि काय,पण जगाला चकित व्हायला काय जाते आमचे सैनिक मरतायत इथे.सारे जग नववर्षाचे स्वागत करतेय नि आपल्याइथे सैनिक मरतायत काय चाटायचीय असली मुत्सद्देगिरी. मोदीं च्या बोलघेवडेपणाचे कौतुक करणारी जनता सैनिकांची प्रेते त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहुन मौन झाली आहे.
सरकारने कमिपणा न मानता इतर पक्षियांशी चर्चा करावी. बोलबच्चनगिरी खुप झाली आता तोंड बंद ठेउन शांत डोक्याने विचार करण्याची वेळ आहे.

निर्लज्ज मानसिकता आहे यांची तोरस्याची
रोम जळत होते नीरो फिडल वाजवत होता

पठाणकोट घडत होते मोदी योगावर प्रवचन देत होते

पगारेंची ही भाषणवजा पोस्ट अतिशय उत्तम उदाहरण आहे की जनमत आपल्याकडे वळवून घ्यायला कसे बोलावे लागते. त्यात तथ्य असो नसो, वाचकवर्गाला आपले म्हणणे त्वरीत पटावे असे बोलण्याचे कसब आहे ते! क्षणभर हे कसब बाजूला ठेवून पाहिले तर सैनिक प्रथमच मेले किंवा नववर्षानिमित्त हे झाले म्हणजे काहीतरी भयंकर झाले असा भावनिक आमंत्रण करणारा संदेश उपजतो. जो प्रत्यक्षात निरर्थक आहे. सैनिक आजवर हजारोंनी मारले गेलेले आहेत. नेत्यांची भाषा बदललेली आहे व तीही शत्रूपक्षाच्या नेत्यांची, हे दुर्लक्षिण्याची कारणमीमांसा इतकीच आहे की 'आता नेमके काय म्हणावे' ह्या पंचायतीत विरोधक अडकलेले आहेत. पगारेंनी केलेले विरोधी पक्षाचे उदात्तीकरण हे अंधभक्तीचे निदर्शक असून प्राप्त परिस्थितीत हा असा अंतर्गत विरोध निव्वळ दुर्लक्षणीय आहे.

असू द्या हो तात्या.
त्यांच्या लाडक्या नेत्यांची भक्तीगीते ते नाही लिहिणार पुन्हा पुन्हा तर कोण?
बेफी, तुमचं चालू द्या.
तुमच्यामुळे बरीच नवी आणि मनोरंजक माहिती मिळते आहे.
धन्यवाद!

बिहार दिल्लीत जनाधारने थोबाडीत वाजवली विसरले का?
2०१४ एकच तुणतुण वाजवत फिरतोय किव येते

जेव्हां दहशतवादी हल्ला होतो तेव्हां एक तरी अतिरेकी जिवंत पकडला जावा असे प्रयत्न करणे आवश्यक असते. त्यामुळे चौकशी करता येते. आतापर्यंत जेव्हढे हल्ले झाले, उदा. संसदेवरचा हल्ला, संकटमोचन हनुमान मंदीर हल्ला, हजरतबल दर्गा हमला, अक्षरधाम मंदीर हल्ला. या सर्वांमधे सर्वच्या सर्व दहशतवादी मारले गेले. एकाही घटनेत एक तरी अतिरेकी जिवंत पकडला गेलेला नाही.

आजच्या घटनेत एसपीने दिलेल्या माहीतीनुसार निवासी भागात लपलेल्या अतिरेक्याला पकडण्यासाठी मोहीम लांबली गेली. त्या ला जिवंत पकडण्यात आले. लष्कराने आपले काम चोख बजावले आहे. जर मोहीम फसली असती तर ती चूक लष्कराची पण फत्ते झाली तर सरकारचा विजय हे थांबायला हवं. कुठले का सरकार असेना !

लष्कराला एकदा ग्रीन सिग्नल मिळाला की त्याला आपले काम कसे करायचे याची माहीती असते. लष्करच नाही तर निमलष्करी दलांचे जवान सुद्धा चोख काम बजावतात. शांततेच्या काळात लष्कर नसते सीमेवर. निमलष्करी दलेच असतात. त्यांच्या कामाचे कौतुक क्वचितच होते. अनेकदा सीमेपलिकडून घुसणा-या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात याच दलांची भूमिका असते. काश्मीरच्या खो-यात जिथे पहारा देता येत नाही तिथून होणा-या घुसखोरीचा अपवाद आहे.

आपली ही दले उत्तम काम करत असताना ज्या राजकीय पक्षांनी सरकार चालवले आहे त्यांची आज एनडीटीव्हीवरची झुंज देशासाठी लाजिरवाणी होती. भाजपच्या प्रवक्त्यावर कडाडून हल्ला चढवताना संजय निरूपम यांनी शांततेच्या गप्पा बंद केल्या पाहीजेत असे बेजबाबदार विधान केले. अशीच बेजबाबदार विधाने मोदी करायचे, भाजपचे अनेक भूखंड करायचे. बुलेट का जवाब बुलेट, आंख का बदला आंख अशी काही मुक्ताफळे या पक्षाची आहेत. आमचे जवान शहीद होत असताना शांततेच्या गप्पा करणारे सरकार वगैरे ऐकून फार दिवस झालेले नाहीत.

पण सरकार मधे आल्यानंतर यू टर्न घेतला हे बरे झाले. सरकार मधे असताना किमान डोकं ठिकाणावर येतं ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. पण विरोधी पक्षात असताना आपण किती बेजबाबदार विधाने करावीत याची स्पर्धाच दोन्ही पक्षात असते. यात भाजपची सरशी होताना दिसते.

विरोधी पक्ष आणि सरकार पक्ष यांच्या डिबेटमधून लोकशिक्षण देखील व्हायला पाहीजे. पूर्वीच्या नेत्यांमधील डिबेट्स त्या साठी अभ्यासण्यासारखे आहेत, महाराष्ट्र विधानसभा, संसद यातील विरोधी पक्ष आणि सरकार यातील भाषणे पाहिली तर प्रगल्भ लोकशाहीची फारच कमी वर्षे आपल्या वाटेला आली असे वाटते. अजूनही काही सदस्य अभ्यासपूर्वक बोलत असतात, लवकरच ते ऑड वन आउट होतील अशी भीती वाटते.

पाकिस्तानशी युद्ध शक्यच नाही हे आजच्या पिढीला सांगण्याची आवश्यकता नाही. या पिढीचा आयक्यू जास्त आहे असे ऐकून आहे. ब्रेन वॉश्ड लोक सोडून... ते मागच्या नव्वद वर्षात आहेत . आजही त्यांना अखंड भारताची स्वप्ने पडतात. अशा लोकांसाठी या सरकारला खरे काय ते सांगण्याची हिंमत होणे कठीण आहे. त्यामुळे त्यांच्याच मातृसंघाने आता युरोपीय समुदाया चे अनुकरण करावे ही लोहियांनी युरोपीय समुदाय बनण्याआधी मांडलेली कल्पना पुन्हा मांडली. हीच कल्पना मुलायमसिंह यांनी मांडली होती तेव्हां त्यांना गद्दार, मुल्ला मुलायम अशा उपाध्या चिकटवण्यात आल्या होत्या.

या पद्धतीने भारत पाक संबंध कसे सुधारतील हा पहिला प्रश्न आहे.
पाकिस्तान सुधारेल तेव्हां सुधारेल, पहिले आपण सुधारू शकतो का ?

>>> जयंत.१ | 4 January, 2016 - 22:35

पगारे मस्त लावली
<<<

>>> जयंत.१ | 4 January, 2016 - 22:39

निर्लज्ज मानसिकता आहे यांची तोरस्याची
रोम जळत होते नीरो फिडल वाजवत होता

पठाणकोट घडत होते मोदी योगावर प्रवचन देत होते
<<<

>>> जयंत.१ | 4 January, 2016 - 22:43 नवीन

बिहार दिल्लीत जनाधारने थोबाडीत वाजवली विसरले का?
2०१४ एकच तुणतुण वाजवत फिरतोय किव येते
<<<

ह्या भाषाशैलीत इतर कोणी बोलत आहे काय?

लेख लिहीणारे विद्वान वेगळे आहेत तात्या. काही जण तर निकाल लागण्याआधीही लेख टाकू शकतात... आपली कशी बरोबरी होणार ?

तात्या, खरेच.
मी सुद्धा हेच लिहीणार होते.
हा प्रतिसाद लेख म्हणून टाका.

अत्यंत संयत आहे.
अशीच एक प्रतिक्रीया सोन्याबापू यांनी इतरत्र दिली आहे. ती सुद्धा आवडलीय.

सांख्यिकी नुसार ही फ़क्त सुरुवात होती. कारगिल अथवा २६ नोवच्या लेव्हलचा हल्ला होउ शकतो.

तसाही भाजपचा पंत प्रधान अथवा सरकार असेल तर हल्यांची तीव्रता अधिक असते Wink

ह्याउप्पर काही बोलण्यात रस नाही.
<<
आनंद आहे.
तुमच्यासारख्यांनी तोंड बंद ठेवलेलेच बरे असते. गोष्टी सांगता येतात म्हणजे आपण विचारवंत आहोत असा भ्रम बाळगू नये. शिवाय एकंदरितच विचारवंतांना श्या देणार्‍यांपैकी आहोत ना आपण?

तसाही भाजपचा पंत प्रधान अथवा सरकार असेल तर हल्यांची तीव्रता अधिक असते
<<
डोळे मारून वाक्याची सत्यता लपवायचा केविलवाणा यत्न करू नये.
भाजपच्या राज्यात ना दंगे होतात ना अतिरेकी येतात, असला उन्मादात्मक खोटा प्रचार करणारे तुम्ही व तुमचे संघिष्टच ना? @ वैद्य.

Pages