आता भारत पाक संबंध पुन्हा बिघडणार का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2016 - 04:25

पठाणकोट इथे काल दहशतवादी हल्ला झाला. त्यांचा डाव उधळून लावताना भारतीय लष्कराचे काही जवान शहीद झाले. त्या सर्वांना श्रद्धांजली.

आज कदाचित एखाद्या वृत्तपत्रात अशी बातमी येईल की त्या हल्ल्यामागे पकिस्तानचा हात असण्याची शक्यता आहे. पण आपल्याला मात्र खात्री आहे की पाकिस्तानचाच हात आहे.
नुकतेच मोदी पाकिस्तानचा धावता दौरा करून आल्याच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांच्या चर्चेलाही उधाण येणार हे नक्की.

या चर्चेतून दोन विचारधारा समोर येणार, एक जी सहजरीत्या येते. घुसा पाकिस्तानात आणि नायनाट करून टाका त्यांचा.
तर दुसरा विचार म्हणजे भारत सरकारने पाकिस्तान सरकारशी जी संबंध सुधारण्याची चर्चा सुरू केली आहे तिला खीळ बसावी म्हणून हे कृत्य आहे. तर आपण पाकिस्तान सरकारशी चर्चा थांबवून दहशतवाद्यांचाच डाव यशस्वी करू नये. विकासासाठी या दोन देशांतील संबंध सुधारने गरजेचे आहे.

खरे तर हे संबंध सुधारण्याची प्रक्रिया गेले कित्येक वर्षे चालूच आहे. कॉंग्रेसचे राज्य असो वा वाजपेयी सरकार, पुन्हा कॉंग्रेस असो वा आताचे मोदी सरकार.

मात्र मोदी सरकार जेव्हा आले तेव्हा विकासाबरोबरच आणखी एक मुद्दा त्यांच्या अजेंड्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होताच, तो म्हणजे पाकिस्तानचा बंदोबस्त करणे. त्यांचे सरकार आल्यावर पाकिस्तानविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाया सोशलसाईटवर अश्या फिरायच्या की तुम हमारा एक मारोगे तो हम तुम्हारे चार मारेंगे, घुस के मारेंगे. पुढे निवडणुका संपल्या तसे या विचारांचे प्रचारही थंडावले. मग मोदी सरकारतर्फेही पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे शांतता मार्गाने प्रयत्न होऊ लागले. यालाही त्यांचे समर्थक त्यांचा मुत्सद्दीपणा म्हणू लागले. अगदी आठवड्याभरापूर्वीची त्यांची पाकिस्तानभेट, यात त्यांचे धाडस शोधले गेले. पण काल जे काही घडले त्यानंतर मूळ प्रश्न जैसे थे च आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

आज मी माझ्या मोदी समर्थक मित्रांना व्हॉटसपग्रूपवर विचारले की आता सरकारची भुमिका काय असेल. निषेध करणे, चर्चा पुढे ढकलणे, काही काळासाठी क्रिकेट खेळायचे थांबवणे.. हेच नेहमीचे की आणखी काही.. पण चार तास झाले त्यावर उत्तर द्यायला कोणी आले नाही.

इथे मोदी सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायचे नाही, कारण आधीही हेच चालू होते. फरक ईतकाच की यांनी थोडा विश्वास(!) जागवला होता.

तर धाग्याचा विषय हा आहे की ईथून पुढेही तेच होणार का जे गेले कित्येक वर्षे चालू आहे?
सरकार बदलले तरी पाकिस्तान प्रश्नाला हाताळायची आपली भुमिका कायम तशीच राहणार आहे का? की काही बदल आहे? असल्यास जाणकारांनी आम्हा सामान्य लोकांनाही कळवावा.

जर चर्चेने हा प्रश्न कधीच सुटणार नसेल तर वेगळे काय करायची गरज आहे आणि ते कोण करणार? कधी करणार? की उर्वरीत देशात शांतता नांदावी आणि देशाचा विकास व्हावा यासाठी सीमेवर काही जवानांचे आणि दहशतवादी हल्ल्यात काही भारतीय नागरीकांचे जीव अधूनमधून जाणे ही तुलनेत कमी किंमत आहे..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> दीड मायबोलीकर | 4 January, 2016 - 23:23

ह्याउप्पर काही बोलण्यात रस नाही.
<<
आनंद आहे.
तुमच्यासारख्यांनी तोंड बंद ठेवलेलेच बरे असते. गोष्टी सांगता येतात म्हणजे आपण विचारवंत आहोत असा भ्रम बाळगू नये. शिवाय एकंदरितच विचारवंतांना श्या देणार्‍यांपैकी आहोत ना आपण?
<<<

वैयक्तीक आकस दिसून आल्यामुळे काही बोलावेसे वाटत नाही. पोस्टीत मुद्दा कोणताच आढळला नाही मूळ विषयाबाबत. असो.

वैयक्तिक आकस हाच मुद्दा आहे, बेफिकीर. फर्स्ट ब्लड काढण्याचा मान तुमच्याकडेच आहे स्मित
>>

वैयक्तिक आकस ... वाह वाह ... क्या बात दीड!

धन्यवाद वैद्य.
आमच्यात आम्हाला उद्देशून लिहिलेल्या (आडवळणी पोस्टींनाही) जशास तसे, व तात्काळ उत्तर देण्यात येते. त्यामुळे ते उत्तर वैयक्तिक कसे नसावे याबद्दलचे मार्गदर्शन इन्व्हाईट करीत आहोत. इथे अवांतर होईल. तिकडे लिहा.

साती,

सोर्री टू से, धावत तर तुम्ही लोकस माझ्यावर आलेत अस दिसतंय. तसं नसेल तर तुम्हास क्षमस्व बर, आणि जयंत तुम्हासही.

नरेश माने, हो.

तात्या, तुमच्यावर का धावणार? तुम्ही तर योग्य तेच लिहित आहात.
'काही' लोकांना त्यातला अर्थ कळत नाही आहे.

आंतरराष्ट्रीय दडपण आले तर भारत पाकिस्तान संबंध पाकिस्तानला त्यांच्यापरीने विवश होऊन सुधारावे लागतील. पाकिस्तानी नेत्यांना त्याच दिशेला नेण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी मुत्सद्दीपणे केलेला आहे. जगासमोर हे उघड झाले की भारताचा नेता पाकिस्तानात स्वखुषीने व नातेसंबंध सुधारण्यासाठी जातो आणि लगेचच भारतावर हल्ला होतो. ह्यातूनच आंतरराष्ट्रीय दडपण निर्माण होते. ह्यापूर्वी अमेरिकन अध्यक्षांशी झालेल्या भेटींचा उपयोग आता खराखुरा होईल.

हा एक हल्ला म्हणजे भाजप सरकारचे अपयश किंवा भाजप सरकारला खोटे पाडण्याची संधी न मानता खरेतर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची बाब मानली जायला हवी आहे.

असे आपले माझे मत!

वैयक्तीक लिहिणे व वैयक्तीकच लिहिणार असे म्हणणे ह्याबाबत मला काही म्हणायचे नाही.

अर्थातच, वेगळे सांगणे न लगे की हुतात्मा जवानांच्या शहीद होण्याचे दु:ख आहेच. सीमेपासून दूर, शांत जीवन जगणार्‍या सर्वांनाच ते दु:ख जितके व्हायला हवे आहे तितकेच दु:ख आहे.

साती, मी या धाग्यावर लिहिलेल्या पहिल्या प्रतिसादाबद्दल तुमचे म्हणणे काय आहे यातच रस आहे.

बाकी तुमच्या कडून ही कंपूबाजीची अपेक्षा नव्हतीच.

>>तर धाग्याचा विषय हा आहे की ईथून पुढेही तेच होणार का जे गेले कित्येक वर्षे चालू आहे?<<
हो, जोपर्यंत काश्मिरचा प्रश्न सुटत नाहि तोपर्यंत हे असंच चालणार. हाव्वेवर, पाकिस्तानचे अंतर्गत इशुज (इकॉनॉमी, बलुचिस्तान, टेररिज्म) एस्कलेट करुन, तो देश अजुन खिळखिळा करुन या प्रश्नाची तीव्रता कमी करता येउ शकते...

पहिला प्रतिसाद वाचून लिहिते.
कंपूबाजीची अपेक्षा माझ्याकडून का नव्हती बरे? मी ऑफिशीयली एक कंपू चालवते आणि माझ्या विचारधारेच्या इंधनावर बाकीचा कंपू चालतो असे हे महामहोपाध्यायच सगळीकडे लिहित असतात ना!
Happy

हा एक हल्ला म्हणजे भाजप सरकारचे अपयश किंवा भाजप सरकारला खोटे पाडण्याची संधी न मानता खरेतर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची बाब मानली जायला हवी आहे. >> या हल्ल्याला सरकारचं अपयश कोण म्हणलंय? सरकारच आधीच डिफेन्सिव मोडमधे जाउन चेस्ट थंपिंग करतंय की आम्ही महत्वाच्या अ‍ॅसेट्सचं कसं नुकसान होउ दिलं नाही (तेपण अजूनही काही अतिरेकी त्या तळावर असतानाच). पण याच सरकारला असं चेस्ट थंपिंग करताना हे समजत नाही की २४ तासापेक्षा जास्तवेळ हे अतिरेकी एका पोलिसांच्या गाडीतून पठाणकोटच्या आसपास फिरत होते त्यांना पकडता आलं नाही यांना. शिवाय जे सैनिक आणि अधिकारी मारले गेलेत ते देशाचे महत्वाचे अ‍ॅसेटसचं होते की असल्या अ‍ॅसेटसची सरकारला पर्वा नाहिये?

पूर्वीच्या सरकारांना हल्ले थोपवता आलं नव्हतं पण त्यांनी असलं फाल्तूचं चेस्ट थंपिंग तरी कधी केलं नव्हतं

नरेश माने,

<<भारत-पाक संबंध हा एक सोपा विषय आहे अश्या प्रकारे इथे चर्चा होत आहे.>>
बरोबर. पण इथे साधारण अमेरिकेच्या राज्याध्यक्षांच्या निवडीपासून ते मुंबईवरचा दहशतवादी हल्ला इ सगळ्या विषयाबाबतच आपल्यालाच काय ते कळते अश्या चर्चा होत असतात. अश्या चर्चा होणं हे जीवंत पणाचे लक्षण आहे.

<<पाकिस्तानची निर्मिती त्यामुळे होणारे दुष्परिणाम, फाळणी, तत्कालीन राज्यकर्त्यांची भुमिका आणि सर्वात महत्वाचा घटक काश्मीर प्रश्न यांचा समावेश चर्चेत होणे गरजेचे आहे.>>
अर्धे बरोबर. पाकिस्तानची निर्मिती झाली नसती तर कदाचित याहून वाईटही काही घडले असते. निर्मिती होऊन आणि पुन्हा काश्मिर प्रश्न निर्माण झाला नसता तरी भा - पा युद्ध झालेच असते.

<<भारतीय राज्यकर्ते नेहमीच चर्चेसाठी अनुकूल असणे आणि पाकिस्तानी लष्करशहा किंवा लष्कराच्या अधिन असलेले लोकनियुक्त सरकार अशी जोपर्यंत चर्चेची पातळी राहिल तो पर्यंत अशी चर्चा नेहमीच निष्फळ राहणार आहे.>>
हे मात्र अगदी खरं आहे. भा पा प्रश्न धुमसत ठेवण्यात भारताच्या कुठल्याही पक्षाच्या पंतप्रधानांचा काही छुपा अजेंडा आहे असे वाटत नाही. मात्र पाकिस्तानी राजकारणी आणि लष्करशहांचा फार मोठा अजेंडा आहे हे लक्षात येते.
पण हे मला एक सामान्य भारतीय म्हणून भारताच्या बाजूने वाटते. तिकडच्या सामान्य नागरिकाला कदाचित अगदी उलट वाटत असू शकेल.

धन्यवाद!

महामहोपाध्यांकडे किंवा सर्वज्ञानी यांच्याकडे ठरविण्यात आलेलेच मत प्रदर्शन करणे म्हणजे सातीचे किंवा नरेश मानेचे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

असो मी निंद्रादेवीच्या अधिन होत आहे.

बरोबर, मनिष.

आताच्या सरकारात असलेल्यांनी मात्र चेस्ट थंपिंग करीत उन्माद पसरविणारे अनेकानेक भाकड क्लेम्स केले होते. यावेळच्या विरोधी पक्षांनी आम्ही सरकारबरोबर आहोत अशी नि:संदिग्ध भूमीका यावेळी घेतली. तेव्हांच्या विरोधी पक्षांनी काय केले होते?

अन असे असताना जेन्युइनली या समस्येबद्दल चर्चा करताना भक्तगणांनी मांडलेला हैदोस पाहून चिडचीड झाली.

असो. यांना उत्तरे देण्यात धागा भरकटतोय.

भाजप सरकारचं अपयश किंवा भाजप सरकारला खोटे पाडण्याची संधी - असे म्हणालो होतो. तुम्ही एकाच बाबीवर बोललात हा तुमचा निर्णय! अपयश आहे ह्या अर्थाच्या काही पोस्ट्स मायबोलीवर इतरत्र येऊन गेलेल्या आहेत. कोणाकडून आल्या असतील हे सूज्ञांस सांगणे न लगे. ते एक असो.

अतिरेक्यांना सरकार पकडत नाही आणि जे पकडतात ते नेहमीच आधीच्यांइतके यशस्वी ठरतीलच असे नाही. परिस्थिती बदलत असते. तुम्हा-आम्हाला इथे बसून अ‍ॅसेट्स कशाला म्हणायचे हे ठरवता येतंच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाच्या गोष्टी असू शकतात हे नाकारण्यात काय अर्थ आहे? उदाहरणार्थ, काही जवान शहीद झाले हे वाईटच पण त्याहूनही काहीतरी वाईट होऊ दिलं गेलं नाही असं म्हणण्यात येत असेल तर ते खोटं आणि प्रचारकीच कशावरून?

Pages