पठाणकोट इथे काल दहशतवादी हल्ला झाला. त्यांचा डाव उधळून लावताना भारतीय लष्कराचे काही जवान शहीद झाले. त्या सर्वांना श्रद्धांजली.
आज कदाचित एखाद्या वृत्तपत्रात अशी बातमी येईल की त्या हल्ल्यामागे पकिस्तानचा हात असण्याची शक्यता आहे. पण आपल्याला मात्र खात्री आहे की पाकिस्तानचाच हात आहे.
नुकतेच मोदी पाकिस्तानचा धावता दौरा करून आल्याच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांच्या चर्चेलाही उधाण येणार हे नक्की.
या चर्चेतून दोन विचारधारा समोर येणार, एक जी सहजरीत्या येते. घुसा पाकिस्तानात आणि नायनाट करून टाका त्यांचा.
तर दुसरा विचार म्हणजे भारत सरकारने पाकिस्तान सरकारशी जी संबंध सुधारण्याची चर्चा सुरू केली आहे तिला खीळ बसावी म्हणून हे कृत्य आहे. तर आपण पाकिस्तान सरकारशी चर्चा थांबवून दहशतवाद्यांचाच डाव यशस्वी करू नये. विकासासाठी या दोन देशांतील संबंध सुधारने गरजेचे आहे.
खरे तर हे संबंध सुधारण्याची प्रक्रिया गेले कित्येक वर्षे चालूच आहे. कॉंग्रेसचे राज्य असो वा वाजपेयी सरकार, पुन्हा कॉंग्रेस असो वा आताचे मोदी सरकार.
मात्र मोदी सरकार जेव्हा आले तेव्हा विकासाबरोबरच आणखी एक मुद्दा त्यांच्या अजेंड्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होताच, तो म्हणजे पाकिस्तानचा बंदोबस्त करणे. त्यांचे सरकार आल्यावर पाकिस्तानविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाया सोशलसाईटवर अश्या फिरायच्या की तुम हमारा एक मारोगे तो हम तुम्हारे चार मारेंगे, घुस के मारेंगे. पुढे निवडणुका संपल्या तसे या विचारांचे प्रचारही थंडावले. मग मोदी सरकारतर्फेही पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे शांतता मार्गाने प्रयत्न होऊ लागले. यालाही त्यांचे समर्थक त्यांचा मुत्सद्दीपणा म्हणू लागले. अगदी आठवड्याभरापूर्वीची त्यांची पाकिस्तानभेट, यात त्यांचे धाडस शोधले गेले. पण काल जे काही घडले त्यानंतर मूळ प्रश्न जैसे थे च आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
आज मी माझ्या मोदी समर्थक मित्रांना व्हॉटसपग्रूपवर विचारले की आता सरकारची भुमिका काय असेल. निषेध करणे, चर्चा पुढे ढकलणे, काही काळासाठी क्रिकेट खेळायचे थांबवणे.. हेच नेहमीचे की आणखी काही.. पण चार तास झाले त्यावर उत्तर द्यायला कोणी आले नाही.
इथे मोदी सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभे करायचे नाही, कारण आधीही हेच चालू होते. फरक ईतकाच की यांनी थोडा विश्वास(!) जागवला होता.
तर धाग्याचा विषय हा आहे की ईथून पुढेही तेच होणार का जे गेले कित्येक वर्षे चालू आहे?
सरकार बदलले तरी पाकिस्तान प्रश्नाला हाताळायची आपली भुमिका कायम तशीच राहणार आहे का? की काही बदल आहे? असल्यास जाणकारांनी आम्हा सामान्य लोकांनाही कळवावा.
जर चर्चेने हा प्रश्न कधीच सुटणार नसेल तर वेगळे काय करायची गरज आहे आणि ते कोण करणार? कधी करणार? की उर्वरीत देशात शांतता नांदावी आणि देशाचा विकास व्हावा यासाठी सीमेवर काही जवानांचे आणि दहशतवादी हल्ल्यात काही भारतीय नागरीकांचे जीव अधूनमधून जाणे ही तुलनेत कमी किंमत आहे..
तेच कापोचे दगडा पेक्षा वीट मऊ
तेच कापोचे दगडा पेक्षा वीट मऊ फक्त दगड जास्त आवाज करतो
भारत-पाक संबंध हा एक सोपा
भारत-पाक संबंध हा एक सोपा विषय आहे अश्या प्रकारे इथे चर्चा होत आहे.
पाकिस्तानची निर्मिती त्यामुळे होणारे दुष्परिणाम, फाळणी, तत्कालीन राज्यकर्त्यांची भुमिका आणि सर्वात महत्वाचा घटक काश्मीर प्रश्न यांचा समावेश चर्चेत होणे गरजेचे आहे.
भारतीय राज्यकर्ते नेहमीच चर्चेसाठी अनुकूल असणे आणि पाकिस्तानी लष्करशहा किंवा लष्कराच्या अधिन असलेले लोकनियुक्त सरकार अशी जोपर्यंत चर्चेची पातळी राहिल तो पर्यंत अशी चर्चा नेहमीच निष्फळ राहणार आहे.
डबल पोस्ट. म्हणून संपादित.
डबल पोस्ट. म्हणून संपादित.
http://boltahindustan.com/rav
http://boltahindustan.com/ravish-kumar-on-pathankot-terrorist-attack/
रविश झणझणीत अंजन घालतो
All commentators are blaming
All commentators are blaming the Central Government but do not say what it should or should not have done. These commentators have only one qualification and that is hatred of Modi. It seems to me that this hatred comes from the fact that in Maharashtra the Government is led by BJP and not by Shivasena. Pathankot base was in the hands of the defence forces and Modi was not in-charge there. Therefore the fault does not lie with Modi or Parrikar or Rajnath Singh. India's Home Secretary knew what was going on and has given detailed interviews. The defence force has to take all the responsibilty and Modi should ask for explanation. Remember when Paris was attacked no one asked for anybody's resignation there. Someone has criticised Modi because he was attending a yoga meeting. Does this person think that Modi was incommunicado and does he expect Modi to be in Pathankot with a machine-gun a la James Bond? I am positive that defence would have kept the minister informed if it has not then action must be taken against whoever failed to do so.
कृपया मराठी मधे लिहावे.
कृपया मराठी मधे लिहावे.
Pathankot base was in the
Pathankot base was in the hands of the defence forces and Modi was not in-charge there.The defence force has to take all the responsibilty
अहो थोडीतरी लाज बाळगा.
धन्यवाद दिगोचि, पंतप्रधान,
धन्यवाद दिगोचि,
पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि गृहमंत्री यांच्या अखत्यारित न येणारे आणि केवळ लष्करच सर्वेसर्वा असणारे 'पठाणकोट' हे ठाणे अस्तित्वात आहे हे आज तुमच्यामुळे समजले.
इतके दिवस हे माहितच नव्हते.
अजून अश्या प्रकारची किती आणि कोणती ठाणी भारतात आहेत याची दिगोचि किंवा अन्य कोणास माहिती आहे का?
असल्यास आमच्या ज्ञानात भर घालावी.
पुन्हा एकदा धन्यवाद!
दिगोची एकदा तुम्ही शान्तपणे
दिगोची एकदा तुम्ही शान्तपणे काय लिहीलत हे पुन्हा वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/pathankot-terror-attack-mo...
एक्स्ट्रिम भक्तीझम
जयन्त तुम्हाला यात कुठला
जयन्त तुम्हाला यात कुठला भक्तीझम दिसला?:अओ: उलट दिगोची यानी किती चूकीचे लिहीले आहे, हे त्याना कळावे याकरता मी ती लिन्क दिली. प्रत्येकाला आपल्या चष्म्यातुन मोदी भक्त समजणे सोडा. मग आम्ही कॉन्गीना सोनिया भक्त म्हणले तर चालेल ना?
अहो रश्मी , ते तुम्हाला म्हणत
अहो रश्मी , ते तुम्हाला म्हणत नाही आहेत.
तुमची आणि त्यांची पोस्ट एकाचवेळी पोस्ट झालीय ते पहा ना!
मग आम्ही कॉन्गीना सोनिया भक्त
मग आम्ही कॉन्गीना सोनिया भक्त म्हणले तर चालेल ना?
<<
कॉंग्रेजमध्ये भक्त वगैरे हा प्रकारच नसतो. तिथे एकतर चापलूस असतात नाहीतर चाटूगीरी करणारे.
प्रसाद तुझी चाटूगिरी योग्य
प्रसाद तुझी चाटूगिरी योग्य ठिकाणी दिली आहे
मज्जा येईल तुला
ओह सॉरी जयन्त. धन्यवाद साती.
ओह सॉरी जयन्त. धन्यवाद साती.
प्रसाद सारखे डोक्यावर आपटले
प्रसाद सारखे डोक्यावर आपटले प्राणी यांना भक्त म्हणतात
हो बरोबर आहे ऋऽऽन्मेष सर.. हे
हो बरोबर आहे ऋऽऽन्मेष सर..
हे जुन घोंगड बराच काळ असचं भिजत पडलय..
धड वाळवताही येत नाही आणि नीट धुताही येत नाहीये..
कदाचित साबणाच पाणी ( सरकार ) बदलले तरी हा इश्शू अजुन तसाच आहे...
हो बरोबर आहे ऋऽऽन्मेष सर.. हे
हो बरोबर आहे ऋऽऽन्मेष सर..
हे जुन घोंगड बराच काळ असचं भिजत पडलय..
धड वाळवताही येत नाही आणि नीट धुताही येत नाहीये..
कदाचित साबणाच पाणी ( सरकार ) बदलले तरी हा इश्शू अजुन तसाच आहे...
भारत-पाक संबंध हा एक सोपा
भारत-पाक संबंध हा एक सोपा विषय आहे अश्या प्रकारे इथे चर्चा होत आहे.
<<
हे माने अगदी परफेक्ट आहेत सैन्यात जाऊन पाकिस्तानशी लढण्यासाठी. हाईटवेटमधे बरोब्बर बसतील.
दुसरे आपले ते हे आलरेडी गणवेशात संचलनं करीत असतातच.
अन तिसरे ते प्रसाद. डोक्यावर पडल्यागत पाकिस्तानात अणुबाँब फेकून या सांगताहेत. मागे नुसता घरच्याघरी वाज(पेयू)वून पाहिला होता बाँब. अजून बोंब सुरू आहे त्याची. तसंच ते गरीबी हटवायचं. सध्या गल्ली बोळातल्या भाजपेयींची गरीबी किती फटाफट हटते आहे, ते यांना दिसत नसले, तरी लोकांना दिसते आहेच.
या सर्व प्रखर राष्ट्रभक्तांना सैन्यात जायच्या, किंवा ते जमत नसल्यास पाकिस्तानास 'जशास तसे' उत्तर देण्यासाठी शुभेच्छा! नुसतं ट्वीट नका करू. बंदुका मी स्पॉन्सर करतो. तिकडे जाऊन विजयी व्हा. इकडे मी रंभा उर्वशींना स्वर्गात तुमची जागा सजावट करून सज्ज ठेवायला सांगतो.
दरम्यान सध्या भाजपा सर्कारात ट्यालेंट कमी पडतेय म्हणे. यांच्यातल्या ज्येष्ठांना अवघड विषय हाताळायला संसदेत पाठवू आपण. असंही लोकांना सर्वज्ञ म्हणत स्वतः किती जास्त आंतर्ज्ञानी आहोत, असे हवाबाण हे सोडतच असतात.
लवकरच आले.
लवकरच आले.
तिथल्या कट्टरपंथीनी हल्ला
तिथल्या कट्टरपंथीनी हल्ला केला
(असल्यास;))
मग इथले कट्टरपंथी मेळावे काय करत बसले? घ्या काठी आणी जावा जरा दम दाखवून या
कंपूबाजी.
कंपूबाजी.
माने तुमच्यासारखे नाही
माने तुमच्यासारखे नाही सगळे
अांधळ्याला सगळीकडे अंधार दिसतो
>>>दरम्यान सध्या भाजपा
>>>दरम्यान सध्या भाजपा सर्कारात ट्यालेंट कमी पडतेय म्हणे<<<
टॅलेंट ही गोष्ट आवश्यक आहे हे समजू शकणारे सरकार आल्यामुळे असे झाले असावे. नवीनच काहीतरी, नै का?
भारत पाक शत्रुत्व हा चिंतेचा
भारत पाक शत्रुत्व हा चिंतेचा विषय आहे.युध्द करणे शक्य नाही हे दोन्हीकडच्या राज्यकर्त्यांना ठाउक आहे.कॉग्रेस आणि मित्रपक्षांचे सरकार असताना त्यांना पाकिस्तानची खोड चांगलीच माहिती असल्याने ते पाकिस्तानपासुन अंतरच राखुन होते.पण देशाच्या दुर्दैवाने मोदी सरकारमध्ये ती समज नाही. त्यांचा मित्रपक्ष शिवसेना पाकिस्तानबाबत मोदींच्या भुमिकेची निंदा करत आहे, सैनिक मरत आहेत, सोनिया गांधिसारख्या नेत्या देशाच्या सुरक्षेबाबत चिंता करत आहेत नि मोदी हे योगावर प्रवचन देत फिरत आहेत हे चित्र खेदजनक आहे. विरोधि पक्षांनीही विरोध सोडून ह्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सरकारला मदत करायला हवी कारण सत्ताधारी पक्ष हा दुबळा आणि अननुभवि आहे हा प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यात नाही.निवडणुकीआधी मोदींची प्रतिमा ही उजळवली गेली होती मोदी पाकिस्तानला धडा शिकवतील अशी वेडी आशा दाखवली गेली होती मात्र तेव्हा उजळवलेल्या प्रतिमेचा उजळपणा जाउन तिचे काळवंडलेले स्वरूप स्पष्ट दिसत आहे.मोदी सरकारने सर्वपक्षिय बैठक बोलावुन ह्या प्रश्नांवर विरोधकांशी चर्चा करून तोडगा काढला पाहिजे.
सप, मस्तं पोस्ट!
सप, मस्तं पोस्ट!
आज विरोधी पक्षात असणार्यांनी
आज विरोधी पक्षात असणार्यांनी रंगवलेले सत्ताधारी पक्षाचे स्वरूप हे विरोधी पक्षाची हतबलता दर्शवणारे आहे. सोनिया गांधी लवकरच पक्षाध्यक्षपदाचा त्याग करून ते पद पक्षातील सर्वात पात्र अश्या उमेदवारास देण्यास सज्ज झालेल्या आहेत. हा उमेदवार तूर्त भारत नावाच्या देशात वास्तव्यास नसून सुट्टीवर इतरत्र आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकारी नेते म्हणजे पंतप्रधान हे मुखदुर्बळ व कठपुत़ळीसम असल्यामुळे पाकिस्तानात जाण्याचे बळ त्यांच्यापाशी नव्हते. काँग्रेस पक्षाचे हायकमांड हे घराणेशाहीतून आल्यामुळे आधीच्या विचारांचा पाठपुरावा करत राहणे हे त्यांनी स्वतःचे कर्तव्य मानले. जनाधाराच्या पाठबळामुळे निवडून आलेल्या इतर पक्षियांनी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या केलेल्या प्रयत्नांना पाकिस्तानातील दहशतवादी गटाने फोल ठरवण्याचे प्रयत्न करणे हे संपूर्ण जगाने धिक्कारास्पद मानले. इतकेच नव्हे तर पाकिस्तानशी भारताने स्वतःहून चर्चा करणे हे संपूर्ण जगाने स्तुत्य मानले. मात्र ह्या घटनेकडे सध्या विरोधी पक्ष बनलेल्या नागरिकांनी टीकात्मक दृष्टीने पाहिले.
प्रमुख विरोधी पक्षाला नेमका कोठेही स्वबळावर जनाधार मिळत नसल्यामुळे त्यांची होत असलेली कुचंबणा पावलोपावली दिसून येत आहे. पुढची तीन, साडे तीन वर्षे ह्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. असे असूनही हवे ते गांभीर्य ह्या पक्षाच्या नेतृत्त्वाकडे व अनुयायांमध्ये दिसून येत नाही.
भारत पाकिस्तान संबंध ह्या बाबतीत नरेंद्र मोदींनी मारलेला मास्टर स्ट्रोक अवघ्या जगाला चकीत करून गेलेला आहे. आजवर जे शरीफ 'पाकिस्तानचा ह्या हल्ल्याशी संबंध नाही' असे म्हणायचे ते आता 'आम्ही दहशतवाद टिकू देणार नाही' असे म्हणत आहेत. शत्रूच्या तोंडून जगासमोर काय आणि केव्हा वदवून घ्यायचे हे समजण्यासाठी तितकी मुत्सद्देगिरी आवश्यक असते ह्याचे उदाहरण घालून देण्यात आलेले आहे.
अय्यो, बाकी कुण्णाकुण्णाला न
अय्यो, बाकी कुण्णाकुण्णाला न कळलेलं ह्यांनाच कसं समजलं बाई!
कित्ती मोदी हुश्शार, किती मुत्सद्दी ते यांनाच कळतं नै!
तरी बरं तिकडे हल्ले होत होते तरी इकडे हे लोक 'चंद' लोक किती मूर्ख आहेत अश्या पोष्टी टाकत होते.

अतिरेक्यांनी भाजपाच्या तोंडात
अतिरेक्यांनी भाजपाच्या तोंडात मारलेला मास्टरस्ट्रोक भक्तांनी पाहीला नाही कारण तो त्यांच्या सुध्दा थोबाडीत होता म्हणून सर्व भक्त बिळात लपून बसले आहे
च गिरीचे मुर्तीमंत उदाहरण
च गिरीचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे बेफीचा प्रतिसाद
थुंकून चाटणे याला म्हणतात जे भक्तांना करायची सवय लागली आहे
Pages