आता भारत पाक संबंध पुन्हा बिघडणार का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2016 - 04:25

पठाणकोट इथे काल दहशतवादी हल्ला झाला. त्यांचा डाव उधळून लावताना भारतीय लष्कराचे काही जवान शहीद झाले. त्या सर्वांना श्रद्धांजली.

आज कदाचित एखाद्या वृत्तपत्रात अशी बातमी येईल की त्या हल्ल्यामागे पकिस्तानचा हात असण्याची शक्यता आहे. पण आपल्याला मात्र खात्री आहे की पाकिस्तानचाच हात आहे.
नुकतेच मोदी पाकिस्तानचा धावता दौरा करून आल्याच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांच्या चर्चेलाही उधाण येणार हे नक्की.

या चर्चेतून दोन विचारधारा समोर येणार, एक जी सहजरीत्या येते. घुसा पाकिस्तानात आणि नायनाट करून टाका त्यांचा.
तर दुसरा विचार म्हणजे भारत सरकारने पाकिस्तान सरकारशी जी संबंध सुधारण्याची चर्चा सुरू केली आहे तिला खीळ बसावी म्हणून हे कृत्य आहे. तर आपण पाकिस्तान सरकारशी चर्चा थांबवून दहशतवाद्यांचाच डाव यशस्वी करू नये. विकासासाठी या दोन देशांतील संबंध सुधारने गरजेचे आहे.

खरे तर हे संबंध सुधारण्याची प्रक्रिया गेले कित्येक वर्षे चालूच आहे. कॉंग्रेसचे राज्य असो वा वाजपेयी सरकार, पुन्हा कॉंग्रेस असो वा आताचे मोदी सरकार.

मात्र मोदी सरकार जेव्हा आले तेव्हा विकासाबरोबरच आणखी एक मुद्दा त्यांच्या अजेंड्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होताच, तो म्हणजे पाकिस्तानचा बंदोबस्त करणे. त्यांचे सरकार आल्यावर पाकिस्तानविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाया सोशलसाईटवर अश्या फिरायच्या की तुम हमारा एक मारोगे तो हम तुम्हारे चार मारेंगे, घुस के मारेंगे. पुढे निवडणुका संपल्या तसे या विचारांचे प्रचारही थंडावले. मग मोदी सरकारतर्फेही पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे शांतता मार्गाने प्रयत्न होऊ लागले. यालाही त्यांचे समर्थक त्यांचा मुत्सद्दीपणा म्हणू लागले. अगदी आठवड्याभरापूर्वीची त्यांची पाकिस्तानभेट, यात त्यांचे धाडस शोधले गेले. पण काल जे काही घडले त्यानंतर मूळ प्रश्न जैसे थे च आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

आज मी माझ्या मोदी समर्थक मित्रांना व्हॉटसपग्रूपवर विचारले की आता सरकारची भुमिका काय असेल. निषेध करणे, चर्चा पुढे ढकलणे, काही काळासाठी क्रिकेट खेळायचे थांबवणे.. हेच नेहमीचे की आणखी काही.. पण चार तास झाले त्यावर उत्तर द्यायला कोणी आले नाही.

इथे मोदी सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायचे नाही, कारण आधीही हेच चालू होते. फरक ईतकाच की यांनी थोडा विश्वास(!) जागवला होता.

तर धाग्याचा विषय हा आहे की ईथून पुढेही तेच होणार का जे गेले कित्येक वर्षे चालू आहे?
सरकार बदलले तरी पाकिस्तान प्रश्नाला हाताळायची आपली भुमिका कायम तशीच राहणार आहे का? की काही बदल आहे? असल्यास जाणकारांनी आम्हा सामान्य लोकांनाही कळवावा.

जर चर्चेने हा प्रश्न कधीच सुटणार नसेल तर वेगळे काय करायची गरज आहे आणि ते कोण करणार? कधी करणार? की उर्वरीत देशात शांतता नांदावी आणि देशाचा विकास व्हावा यासाठी सीमेवर काही जवानांचे आणि दहशतवादी हल्ल्यात काही भारतीय नागरीकांचे जीव अधूनमधून जाणे ही तुलनेत कमी किंमत आहे..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेसबुक वर सुध्दा "शेफारलेले भक्तांची" चिडचुप आहे Wink
बाकी इथे या विषयावर "भक्त" काहीच बोलणार नाही उलट विषयांतर कसे होईल इतर वाद कसा निर्माण होईल याचा जोरदार प्रयत्न होणार.

धागा शाहरूख खान या रुन्म्याची गर्ल्फ्रेंड, या त्याच्या सवयी इ. विषय काढण्यात येतील

<पण चार तास झाले त्यावर उत्तर द्यायला कोणी आले नाही.>

हो. कालपासून बरेच ग्रुप्स थंडावलेत. १ जानेवारी हा आपला नसलेला नववर्षदिन होऊन गेला. नटसम्राटमधल्या दीन नाना पाटेकरबद्दल बाजीराव मस्तानी किंवा दिलवालेइतकं बोलण्यासारखं काही नाही. आजच्या सावित्रीबाई फुले जयंतीशी तर काहीच देणंघेणं नाही.

३१ ला जागरण झालं असेल बाबा, आता रविवारी तरी झोपू द्या त्यांना.
संध्याकाळी/ रात्री फ्रेश झाल्यावर नवी वैचारिक कुमक कुठूनतरी मिळवून नव्या जोमाने वॉटसॅपवर येतील.
तोपर्यंत तू पण एक झोप काढून घे बघू.

आता भारत पाक संबंध पुन्हा बिघडणार का?>>>> आपले आणी शेजार्‍यान्चे सम्बन्ध जुळो वा बिघडो, काहीही होऊ शकते किन्वा नाहीही, पण तुला एक नवीन धागा काढायला नवीन विषय मिळाला हे खरे.:फिदी::दिवा:

आता भारत पाक संबंध पुन्हा बिघडणार का?
<<

मुळात धाग्याचा विषयच गंडला आहे,
भारत आणि पाकिस्तान यांचे सबंध चांगले होतेच कधी? आणि पाकिस्तानने संबध सुधरवायाचा जरासा जरी प्रयत्न केला तर भारत दरवेळी काहिना काही कुरापत काढुन सबंध बिघडवायचा प्रयत्न करतो.

भारत पाक संबंध सुधरावुन, प्रश्न सोडवुन सुख -शांती कोणाला हवी आहे? आणि असे झाले तर
शस्त्र-अस्त्रची दुकाने कशी चालाणार ? राजकारण करायला विषय कसे मिळणार?

लोकांना जाति-धर्माच्या बाड्यात बांधुन ठेवायला कोणी दुश्मन लागतो तो दुश्मन कोणाला दाखवणार?

He sambandh changle hotech kadhi n nahi zale tari kai bighdat nai ....baki Rashmi+११११ ....kase ky patapata vishay suchtat ho dhaage kadayla Lol

'आता'..... 'पुन्हा'....... स्मित
>>>

योग, तेवढी तळटीप टाकायची राहिली. शिर्षक ऋन्मेष स्टाईलने आहे.

इथे टीका करणारे एक विसरतात की पकिस्तानकडे अणुशस्त्र आहे व तिथे अनेक माथेफिरु पण आहेत त्यान्च्या सैन्यात व बाहेर. त्यामुळे सरकारला सबुरीने घेणे जरुर आहे. एक लक्षात ठेवायला हवे की निवडून येण्यापूर्वी जे बोलले जाते ते सर्व होइलच असे नाही. भारतामागे पाकीस्तानचे बान्डगुळ लावुन देउन नेहरूनी उपकार केले आहेत. परन्तु चर्चा चालु राहावी. कदाचित त्यातुन काही मार्ग निघु शकेल.
सम्पवण्यापूर्वी नमुद करु ईच्चीतो की मी मोदिन्चा किम्वा भाजपचा भक्त नाही. हे सान्गितले कारण नाहितर माझ्यावर येथील अतिरेकी शस्त्रे उगारु नयेत.

पंतप्रधानांनी शेजारी देशाला भेट दिली नसती तर हा हल्ला झला नसता अस म्हणायचं आहे का?

२-३ दिवसात सगळा प्लान झाला आणि आमलात आणला?

मग काय? अहो अमित शहा यांनी काय सांगितलेले निवडणुकि पुर्वी. " मोदी पंतप्रधान झाल्यावर एकाही घुसखोराची भारतात पाऊल टाकायची हिंमत होणार नाही"
निवडणुकिपुर्वी प्रचाराच्या स्टेजवरून डरकाळी फोडणारे कागदी वाघ प्रत्यक्षात काय करतात? तर नवाजच्या घरी जाऊन बिर्याणी ओरपून येतात.

जर चर्चेने हा प्रश्न कधीच सुटणार नसेल तर वेगळे काय करायची गरज आहे आणि ते कोण करणार? कधी करणार? >> तुमच्या सारख्या नवतरूणांनी एमेन्सी सोडून सैन्यात जावे व कर्तुत्व गाजवावे.

मुंबई अटॅक नंतर तत्काळ पत्रकार परिषद घेऊन डरकाळी फोडणारे मोदी काल ऑपरेशन चालू असताना "योगा वर प्रवचन" देण्यात मश्गुल होते. आणि आधी शुल्लक गोष्टींवर सुध्दा ट्विट करणारे परवापासून चालू असणार्‍या घटनेवर एक ट्विट केले नाही. वर "हल्ला करणारे मानवतेचे दुश्मन विकास विरोधी आहे" असे नविन संबोधन दिले. पाकिस्तानी दहशतवादी हा शब्द अजिबात उच्चारला नाही. ही पण त्यांची थोर "कुटनिती" असेल Wink

अमा, कुठल्यातरी नंबरला मिस्ड कॉल देऊन एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व घेणे इतकी सोप्पी आहे का सैन्यात भरती होणे ही गोष्ट?
आमच्या समजा कितीही मनात आले तरी सैन्यात भरती करून घ्यायचे काही नियम असतात.
आणि झालो भरती म्हणून लगेच कुणी आमच्या मनाने पाकिस्तानाशीच लढायला पाठवेल असे नाही.

हा प्रश्न सोडवावा किंवा सोडवला गेला पाहिजे अशी इच्छा सामान्य भारतीय नागरिकाने केली तर असा हेटाळणीचा सूर लावणे बरोबर नाही. उलट सामान्य भारतीय नागरिकाने अशी मागणी करणे हा त्यांचा अधिकारच आहे.

हल्ली कुठे काही बदल घडला पाहिजे अशी इच्छा करताच 'तुम्हीच का नाही जात' असे माबोवर फार वाचण्यात येते.
(मागे कुणीतरी सलमानच्या खटल्यात त्याच्याविरुद्ध कोर्टात का चांगला बकील दिला नाही असे विचारले होते , याच पद्धतीने)

एक नागरिक म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करू शकतील असे राज्यकर्ते निवडून देणे आमचे कर्तव्य आहे.
इतकी वर्षे 'पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याचे काम' एका पक्षाच्या राज्यकर्त्यांनी केले नाही आणि दुसर्‍या पक्षाचे राज्यकर्ते 'आम्ही ते झटक्यात करू' अशा घोषणा करत होते.
साहजिकच लोकांना या पक्षाकडे या झटकेदार प्लानची काही ब्ल्यू प्रिंट असेल असे वाटले होते.
त्यामुळेही लोकांनी त्यांना निवडून आणले.
पण या नव्या पक्षानेही याबाबत भ्रमनिरास केला तर 'केवळ आपण सैन्यात भरती झालो नाही' या काँप्लेक्समुळे तो बोलूनही दाखवायचा नाही का?

पण या नव्या पक्षानेही याबाबत भ्रमनिरास केला तर 'केवळ आपण सैन्यात भरती झालो नाही' या काँप्लेक्समुळे तो बोलूनही दाखवायचा नाही का?
>> त्यांनी ते सर्व लिहून दाखवलेच आहे. पण चर्चे व्यतिरिक्त काय करता येइल असा प्रश्न शेवट विचारलेला आहे त्याला एक सजेशन दिली आहे फक्त. धागाक र्ता निव्वळ २२ वयोमान आहे. त्यांना अजूनही सक्रीय सहभाग करणे शक्य आहे. आर्मीत/ एअर्फोर्स मध्ये सहभागी होउन देश सेवेचे काम करणे असे सांगणे ह्यात मी तरी त्यांची हेटाळणी केलेली नाही. तुम्हाला तसे का जाणवले?

माझे नातेवाईक आर्मीत आहेत/ होते. व पठाण कोटात पोस्टिंग पण होती. मी तिथे गेलेली आहे.
ते ले. कर्नल जे पस्तिशीचे वारले त्यांच्या डॉक्टर पत्नी व दोन वर्शाची मुलगी ह्यांच्या दु:खाची संपूर्ण जाणीव मला आहे त्याची कल्पना करावी लागणार नाही.

इंटेल असतानाही अशी बहुमुल्य जीवने जावीत हे फार दु:खद आहे.

माबोवरील इतर धाग्यावर जाणवलेला बायस कृपया माझ्या पोस्टीला जोडू नये. असो.

प्रत्येक बावीस वर्षाचा माणूस मनाला आलं म्हणून सैन्यात भरती होऊ शकतो का?
की काही नियम वगैरे असतात.
सैन्यात भरती झाल्यावर आपल्या मनाला वाटेल ती पोस्टींग मिळते का?

हेटाळणी जाणवली कारण खास धागाकर्त्यावर 'एम एन सी सोडून' असा वैयक्तिक रोख जाणवला.
इथे धागाकर्त्याने 'आपण काय करू शकतो' हा आपण अ‍ॅज अ होल कंट्री प्रश्न विचारला होता. त्याला तुम्ही धागाकर्त्याच्या सध्याच्या कर्यक्षेत्राचे नाव घेऊन वैयक्तिक परिमाण दिलेत.
त्यात उपहास नाही असे मला तरी जाणवले नाही.
असोच!

Is working in MNC anti national or people working in MNC should not comment on present issues of India? Sati +1 for all your above post.

अरे सरकारने काय करायला पाहिजे ते लिहा. धागाकर्ता काय करतोय त्याकडे काय लक्ष देतात?
आधी नाही का सरकार कशी निष्क्रिय आहे , यांव करायला हवे त्यांव करायला हवे, घरात घुसून मारायला हवे, गुजराती शेर आल्यावर कशी पाकिस्तानाची चिडिचूप होईल. इ. कमेंट्स यायच्या तश्या आजकाल येत नाही Wink

प्रत्येक बावीस वर्षाचा माणूस मनाला आलं म्हणून सैन्यात भरती होऊ शकतो का?>> मनात येतं किती जणांच्या हा गोल्डन प्रश्न आहे.

की काही नियम वगैरे असतात.
http://joindefence.com/what-requirements-join-indian-army-after-12th-125...
इथे आहेत. आता बावीशीच्या तरुणांना प्रवेश नसेल तर माय बॅड.

सैन्यात भरती झाल्यावर आपल्या मनाला वाटेल ती पोस्टींग मिळते का?
>> परीक्षा द्यावया लागतातच. त्यात पास व्हायची गॅरेंटी नाही. तसेच फिजिकल चेकप मध्ये देखील पास होउ शकेल असे खात्री नाही. मनाला वाटेल तसे पोस्टिंगही जगात कुठल्याच आर्मीत दिले जात नाही. हे आपणास विदीत असेलच. पण देशसेवा करताना एक ठोस कदम नक्की घेउ शकतो. मानसिक तयारी पाहिजे. भारतीय आर्मी ही नियम बद्ध संस्था आहे.

जिथे नाना पाटेकर पंचावन्न ते साठ दरम्यान आर्मी साठी योगदान देउ शकतात तिथे सळसळत्या तरूण रकताच्या तरुणाईला निदान हा ऑप्शन पण आहे. हे माहीत हवे.

त्यासाठी १४ ते १९ वर्ष ही लष्करी सेवा देण्यासाठी सक्तीची करावी. त्यानंतर ज्यांना प्रत्यक्षात आर्मीमधे जायचे आहे त्यांनी खुशाल जावे.

जिथे नाना पाटेकर पंचावन्न ते साठ दरम्यान आर्मी साठी योगदान देउ शकतात >> काय योगदान दिले ? Uhoh

योगदान म्हणजे काय?
ते पाकिस्तानविरुद्ध बॉर्डरवर लढायला जातात का?

आम्ही आमची स्विकारलेली कामे योग्य रितीने करतो आणि निवडणूकीत योग्य राज्यकर्ते निवडून आणायला वोट देतो ते काहीच योगदान नाही का?

Pages