टवाळा आवडे विनोद

Submitted by निनाद on 7 December, 2015 - 07:08

सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.

ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.

असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.

का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!

हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!

समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.

आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.

घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!

(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक चित्र त्या आपल्या त्या ह्यांच्यावरही काढा.. एक विहिर काढा. विहिरीच्या आत टिपापा बसलेले आहेत बाह्यजगाला नावे ठेवत आहेत असे दाखवा आणि विहिरवर चढणारे टिपापाप्रेमी दाखवा. आणि विहिरीमधून डराव डराव असा आवाज येतो असे किरणांनी दाखवा. वाघोबाच्या मिशासारखे ते किरण काढा तिथे. मलाच असे चित्र काढायचे आहे पण सध्या वेळ नाही म्हणून तुम्हाला ही आयडीया देतो आहे.

एक चित्र मृण्मयीवर काढा. विदर्भातून काढता पाय घेऊन पुण्यात पाय घट्ट रोवला आणि पुणेकरांच्या हृदयात तिने जागा मिळवली असे दाखवा.

एक चित्र असे काढा मायबोलिवर वाद झाले रे झाले की त्या व्यक्तीला फेसबुकावरुन अनफ्रेन्ड करणारे दाखवा. खास करुन पुणेकर अनफ्रेन्ड करणारे.

मग तिच्या बंगलोर मधल्या मुक्कामाचे काय करायचे? तूच काढ़ बर बी छान छान चित्र!
आणि हो वेलकम टू टवाळखोर ग्रुप!

इथे ज्याला ज्याला वाटतात चित्रे काढायची त्यांनी काढून इथे टाकावे. उगाच वाद निर्माण करून निखळ मनोरंजन होणार्‍या धाग्यावर बिब्बा घालू नये. ज्याला स्वतःवर बनवलेले आवडत नाही त्यानी इथे स्पष्ट सांगावे. म्हणजे भविष्यात होणारे वाद टाळता येतील

वत्सला, मी चित्र आउटसोर्स करत आहे.

अजून एक चित्र सायो डोक्याला हात लावून बसलेली आणि मग हा खालचा संवाद त्या चित्रात दाखवा:

सायो: शी गं बाई आजचा दिवस अगदी वाया.. कंटाळवाणा जाणार आहे Sad
सिन्ड्रेला: काय झालं ताई? आपण इतक्या उदास का?
सायो: अग बघ ना आज सगळे धागे चांगलेच दिसत आहे एकही धागा असा मिळत नाही की ज्यावर आपण इथे चर्चा करु शकु? जळले मेले ते धागे Sad
इतक्यात धावत धावत बुवा येतात..
बुवा: मिल गया.. हमको धागा मिल गया..

आणि मग सगळे जण बुवांचे गालगुच्चे धरतात.

Happy

एक चित्र माबोबाहेर दिवाळी अंकासाठी लिहिणार्‍यासाठी..

लेखकः तर मग कुठला लेख देऊ दिवाळी अंकाला?!!!
संपादकः त्यात काय इतका विचार ज्या लेखावर तुम्हाला माबोवर सर्वाधिक अभिप्राय मिळालेत त्या लेखाला आम्ही घेऊ Happy
लेखक : दे टाळी Happy अन घ्या लेख Happy

एका महिन्यानी फेसबुकवरः
लेखक : माझा लेख आला आहे दिवाळी अंकात. अवश्य वाचा!
कमेन्ट - छान Happy मला वाटत पुर्वी वाचला होता Happy

Nasheeb Ninad la English yeta! >>>> तरीही त्याला ती विपु वाचता येईलच याची ग्यारंटी नाही, वत्सला.

साती नमस्कार घ्यावा! पोहण्याचा ड्रेस लै आवल्डा!
आणि ती भव्य ढेरी, चष्मा, मिशा आणि पोतडी... जबरी आहे.

पण मी 'त्यांना' सोडू नका असे म्हणालो होतो ना? Happy

हायला बी राव स्वतः!!
वा वेलकम टू टवाळखोर ग्रुप!

बी रावांनी तर अक्खी व्यंगचित्र मालिकाच कथन केली की!
झकास!
वत्सला, मी चित्र आउटसोर्स करत आहे.
नाही नाही असे नाही चालणार!

बनवा चित्र... इतके काही अवघड नसते!

निनाद, स्पेलिंग बी .... Lol मस्त आहे.

हा धागा म्हणजे कायमची 'कुजबुज' आहे.

धम्माल धाग्यात अ‍ॅड करूयात का? काय म्हणता लोक्स?

Pages