टवाळा आवडे विनोद

Submitted by निनाद on 7 December, 2015 - 07:08

सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.

ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.

असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.

का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!

हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!

समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.

आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.

घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!

(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहेत सर्वच Lol
कुॠ आणि राकु चे तर अगदी अगदी .. मी सुद्धा याच विचारात आहे च्यायला हे काय होतेय.. Proud
नावेही आमची कसली उलट सुलट यमकात आहेत..

मात्र मजा आयडीज ची नावे न देता चित्र काढण्यात आहे >>> याला +७८६ , अजून आयडीही असे गुमनाममध्ये ट्राय करा

खेळीमेळीत घेतल्या बद्दल सर्व प्रतिसादकांचे आभार!
तुम्ही लोकांनी चित्रांचे डिटेलिंग लक्षात घेतल्याने मला पण मजा आली प्रतिसाद वाचायला...
Lol

kapoche, छळखाना खाना मस्तय!
कसले मल्टीपर्पज मशिन आहे.. एकाच वेळी अनेक गोष्टी छापतंय! Biggrin
चष्मा... टाय... खन्ना लै भारी दिसत आहेत Lol

प्रतिसादातला माझा टायपो लक्षात आणून देऊन
अजून एका चित्राची प्रेरणा दिल्या बद्दल केश्विनीचे अनेक आभार!!
Proud

Pages