टवाळा आवडे विनोद

Submitted by निनाद on 7 December, 2015 - 07:08

सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.

ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.

असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.

का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!

हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!

समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.

आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.

घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!

(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

हा धागा आणि धाग्यावरील प्रतिक्रिया अगदी काहीच नाही आवडल फक्त ह्यातून एकच सिद्ध झाल की माबोवर टवाळखोर जनता कोण. टवाळा आवडे विनोदची छान प्रचिती येऊन गेली.

हा धागा आणि धाग्यावरील प्रतिक्रिया अगदी काहीच नाही आवडल>>>
हयला... हे लोक्स जिथे तिथे पो टाकुन ठेवणार.. अगदी एव्हढ्या संख्येने की तुमचा पाय भरल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येउ नये.. आणि ह्यांची टिंगल टवाळी केली की लगेच असहिष्णु म्हणुन टाहो...
असोच..
टवाळखोरांनो लगे रहो हम तुम्हारे साथ हे..

असेही एक चित्र येऊ द्या, त्रस्त वाचक माझ्या घरासमोर धरणे धरत आहेत, आणी मी बोलतोय... जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ Proud

हा धागा आणि धाग्यावरील प्रतिक्रिया अगदी काहीच नाही आवडल फक्त ह्यातून एकच सिद्ध झाल की माबोवर टवाळखोर जनता कोण. टवाळा आवडे विनोदची छान प्रचिती येऊन गेली. >> हे आत्ता वाचलं. धाग्याचं नावच आहे ते मग तशीच प्रचिती येणार ना! Happy

गर्व से कहो हम टवाळ है! >> हां, हम टवाळ है! Proud

Pages