त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी

Submitted by Rajesh Kulkarni on 30 November, 2015 - 13:25

त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी
.

सुरूवातीला केवळ चेहरा गोरा वगैरे ठेवण्यासाठी क्रिमची जाहिरात केली जाई. त्यानंतर आता दंड, पाठ, ब्राच्या बंदाखालची त्वचा हेही वेगळ्या छटेचे दिसू नयेत म्हणून अशा क्रिम्सच्या जाहिराती चालू आहेत. काही दिवसात प्रत्येक घरात या क्रीमचा एक टब ठेवा आणि गोरे दिसावे म्हणून सगळे शरीरच त्यात डुंबवावे, अशा जाहिराती आल्या तरी आश्चर्य वाटायला नको. कारण मग इतर अवयवांनी तरी काय घोडे मारले? आपण या कंपन्यांच्या काव्याला बळी पडत आहोत याची जाणीव तरी या सुशिक्षित महिलांना असते का? सूर्यप्रकाशामुळे बाह्यांखालची त्वचा व दंडाची-हाताची त्वचा यांच्या रंगात फरक पडणारच, त्यात वावगे ते काय, असा प्रश्न महिलांना पडतच नाही का?

स्त्रियांना त्यांच्या हाता-पायावरचे केस किंवा लव काढायचा आदेश आधी वडील व नंतर नवरे किंवा इतर कोणी देतात काय या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. स्त्री-पुरूष समानतेच्या गप्पा मारणा-यांपैकी किती स्त्रियांची या पुरूषांनीच त्यांच्यावर लादलेल्या बंधनातून सुटका करून घेण्याची खरोखर इच्छा असते?

मात्र करणेषु दासी, शयनेषु रम्भा हे ऐकवा, मग पहा काही जणी कसा अवतार धारण करतात ते. वर सोयीस्करपणे आम्हाला हवे ते आम्ही करू हेही ऐकवले जाते.

बुरख्याचेही काही स्त्रियांकडून होणारे समर्थन आपण पाहतोच की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सस्मित अग मुद्दाम इथेच लिहीले. शेवटी केस ते केसच ना, मग डोक्यावरचे असले तरी काय झाले?:खोखो:

पण ही तेलाची गुलामगिरी माझ्या आवडीची आहे. केस छान रहायचे त्या आवळा तेलाने. आता वेळच मिळत नाही करायला.:अरेरे:

थोडे दिवस जिलब्या बंद होतील.
<<
<<

Lol

त्यांनी धाग्यांचे शतक करायचे मनावर घेतले आहे, तेंव्हा नो चांन्स.

या मूळ लेखावरः
क्रिम तयार करणार्‍यांचा तो धंदा आहे आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून ते जास्तीत जास्त क्रिमं वापरायला सांगणारच. (अगदी स्त्री नसलेल्यांना पण सर्व जाहीरातीबरहुकून वागायचं तर किती क्रिमं आणि पावडरी वेगळ्या विकत घ्याव्या लागतील?)
अँटी एजिंग क्रिम्स वाले तर 'आता तरुणपणी तिशीतच आमचं क्रिम लावून तुमचा तिशीतला चेहरा फ्रिझ करुन ठेवा'(असं असतंय का कधी???) म्हणून मागे लागलेयत.
सनस्क्रिन पण त्यांच्या म्हणण्याबरहुकून वापरायची तर 'घरात पण टँनिंग होत असतं, घरात पण वापरा, उन्हात पाच मिनीट गेलात तरी वापरा, पावसाळ्यात वापरा, पायावर वापरा,ओठावर वापरा' असं एक आठवडा करुन पाहिलं होतं, ११० ची बाटली आठवड्यातच संपली.
आपण काय काय वापरायचं आणि कुठे थांबायचं आपल्यावर आहे.

भाषांतर Rofl

मराठी लोकांचं हिंदी धाग्यावर 'आजा मेरे अंग पे, ले ले मेरी जान' आणि 'ओट्या के उप्परसे धप्पकन पड्या' किस्से होते त्यानंतर हाच किस्सा Rofl

खतरनाक भाषांतर आहे :D. मॅन ऑफ द मॅच बद्दल टोटली Happy

रॉहू - ते ज्ञानेश्वरी लावून खाली गिरणीसारखा डबा लावण्याची कल्पना अचाट आहे. तो डबा लावलेला एकदम डोळ्यासमोर आला पिठाच्या फक्क्यांमधे Happy

नंदिनी चा 'इलाज' आवडला. तसेच करायला पाहिजे.

ऑन अ सिरियस नोट, व अवांतर.

गूगलचे मराठी सुधारणे आपल्याच हातात आहे.

थोडा रिकामा वेळ आपल्याकडे असेल, तर गूगल ट्रान्सलेटचे पान उघडा. डाव्या चौकटीत bra टाईप करा, उजवीकडे मराठी भाषांतर निवडा.

तिथे अमितादीदी येतीलच, त्या खाली, भाषांतर दुरुस्तीचाही ऑप्शन मिळेल. कृपया, तिथे देवनागरीत ब्रा किंवा कंचुकी हा शब्द टंका. (माबोवरून कॉपीपेस्ट करा), सेव्ह करा. जितके जास्त लोक योग्य प्रतिशब्द गूगलला सांगतील, तितका तो शिकेल. अनेक भाषांचे चक्क काँप्रिहेन्सिबल भाषांतर इंग्रजीत होते, तसे ते मराठीत होत नाही, कारण आपणच गूगल अल्गोरिदमला शिकवत नाही, हे आहे.

हीच बाब गूगल मॅप्स इ. अ‍ॅप्सचीही आहे. लोकहो, प्लीज गूगलला शिकवा. ते आपणच करायचे आहे, व आपल्याच फायद्याचे आहे.

(ता.क. कंचुकीऐवजी दुसरा अधिक योग्य शब्द असेल तर तो जाणकारांनी कृपया सांगावा)

बाकी दिडम्याचे भाषांतर माबो च्या ऑल टाईम क्लासिक्स मध्ये गेले आहे. जसे की आईने अकबरी. माझ्या त दडलेले मूल , इत्यादी.

अरे त्या गूगल ट्रान्सलेट्रचा उप्येग फक्त खालील अथवा तत्सम वाक्यांपुरताच मर्यादित आहे.

रामा गावाला जातो
सीता आंबा खाते
मगन हरण बघ
रशीद कमळ बघ....

उद्या तुम्ही त्यात ज्ञानेश्वरी टाकाल. आणि बाहेर गिरणीसारखा डबा ठेवाल !

>>>
गुगल ट्रान्सलेटर...
शांतता ! भाषांतर चालू आहे...

images (5)_0.jpg

<<रच्याकने, पुरुष अंडरआर्म्स (बगला /खाका) साफ करतात, ते काय पिताश्रींच्या आ़ज्ञेने का?>>
<<प्लिज बायकांनो, हाता, पायावरचे अन मिशीचे केस कृपया काढून टाका. बरे दिसत नाहीत>> Rofl

खरंच ऑल टाईम क्लासिक होणार ते. मी अजूनही तिसर्‍या ओळीपुढे वाचू शकलेलो नाही लोल झाल्याने :). पुलंच्या खुर्च्या मधल्या त्या भाषांतरासारखेच झाले आहे ("कर्ता, कर्म, क्रियापद रानोमाळ हरवलेले...") Happy

दक्षी तुझ्या शिकवणीमुळे लक्षात आलं ,आधी कोणी तरी इंग्रजी शब्दांचे मराठीत अर्थ टाकले आहेत तर मग ब्रा साठी अमितादीदी हे काय प्रकरण असावं? कुठुन आला हा शब्द? याचा संदर्भ काय असेल? मला जामच उत्सुकता वाटते या शब्दाच्या मागच्या इतिहासाची. Wink

काय चाललंय काय ?
परंपरेच्या नाड्या ओवून जिथे आम्ही संस्कृतीचे पायजमे शिवले तिथे संस्कृतीचेच असे धिंडवडे निघतांना पाहून आमच्या मनास किती यातना जाहल्या याचं वर्णन तरी काय म्हणून करावे ? जिथे फुले वेचली तिथे केस वेचण्याची पाळी यावी यापेक्षा दुर्दैव ते काय ? स्त्रियांना दाढ्या काय, पुरूषांनी मिशा भादरायच्या काय, घोर कलियुग यालाच म्हणत असावेत. आज आमचे गुरू हयात नाहीत हे सुदैवच म्हणायचं. हे सगळं वाचून त्यांनी राम म्हटलं असतं खात्रीने.

धागालेखक एक महान चळवळ चालवत आहेत. शहाणे करून सोडावे सकळ जना ! अशा वेळी त्या उद्देशाला चुना फासण्याचे काम इथे होत आहे.

साधा विषयानुरूप प्रतिसाद आपणास देता येऊ नये ?

'चन्द्र' हे नाव धारण करणारा (चन्द्राह्व) पराक्रमी आणि एकछत्री राज्य स्थापन करणारा राजा ह्या स्तंभाचा निर्माता आहे. त्याने दक्षिणसागर ..... ही पद्धति सध्याच्या चुनकळी खनिजाबरोबर वितळवण्याच्या प्रक्रियेहून भिन्न आहे. जोवर पाणियातील गड असतील, तोवर आपली नाव चालेल, असा विचार करून अगणित गड, जंजिरे भूमीवर आणि पाणियात वसविले. देश काबीज केला. गुराबा ... वाळू धुतलेलीच वापरणे, चुनकळी घाटावरोन उटण पाठवित आहो. रोजभरा हररोज देत जाणे. त्यासाठी मोरचूद, चुनकळी, क्‍लोरोपायरिफॉस, डायक्‍लोरोव्हास व स्टिकर इत्यादी घटकांचा वापर करावा. - झाडांना वळण व आकार देणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. झाडांची वाढ मर्यादित दहा फुटांपर्यंतच ठेवावी. कित्येक ठिकाणी चुनकळी, मँगनीज व लोखंडहि सांपडतें. ..... ह्या हल्यांत यशवंतरावाचें नाव होऊन लोक भराभर त्यास मिळत चालले.

हे वाचून हसण control च होत नाही आहे.
please वाचवा कुणीतरी….>> हसणच control च होत नाही ना?? माझ्या तर अंगावरचे केस उभे झाले

जयंत.१ | 2 December, 2015 - 04:24
पटकन कापून टाका

मुक्तेश्वर कुळकर्णी | 2 December, 2015 - 04:27
पटकन कापून टाका>>नाय त्या बाया कापतात हा विषय आहे
आणि ते अमितादीदी काय आहे?
<<
That, is Google, in its infinite wisdom.
हे बघा:
amita2.jpg

<<<<< काल पासून फक्त हेच सगळ आठवून हसतेय…
आई ग…
आज पण दिवसाची सुरुवात ह्याच धाग्यावरच्या प्रतिक्रिया वाचून…

माझ्या मते, स्त्रीयांनी (वा पुरुषांनीही) (आरशात स्वतःलाच वा दुसर्‍या कोणाला) सुंदर दिसण्या/भासण्यासाठी काही एक उपाय केले तर त्यास कोणीच कसलीच गुलामगिरी वगैरे म्हणणार नाही.
मात्र, स्त्रीपुरुषांनी विशिष्टप्रकारेच दिसण्या/भासण्यासाठी विशिष्ट कम्पन्यांचीच मलमे चोपडा अशा स्वरुपाच्या जाहिरातींच्या रतिबाला बळी पडुन शेवटी ते ते प्रॉडक्ट घेतले जाते (उपयोग किति होतो ते ब्रह्मदेवच जाणे), कंपन्यांची कमाई होते, तर अशा जाहिरातींच्या रतिबाला बळी पडणे, ते म्हणजे मानसिक गुलामगिरी होय.
असे माझे मत.

Pages