त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी

Submitted by Rajesh Kulkarni on 30 November, 2015 - 13:25

त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी
.

सुरूवातीला केवळ चेहरा गोरा वगैरे ठेवण्यासाठी क्रिमची जाहिरात केली जाई. त्यानंतर आता दंड, पाठ, ब्राच्या बंदाखालची त्वचा हेही वेगळ्या छटेचे दिसू नयेत म्हणून अशा क्रिम्सच्या जाहिराती चालू आहेत. काही दिवसात प्रत्येक घरात या क्रीमचा एक टब ठेवा आणि गोरे दिसावे म्हणून सगळे शरीरच त्यात डुंबवावे, अशा जाहिराती आल्या तरी आश्चर्य वाटायला नको. कारण मग इतर अवयवांनी तरी काय घोडे मारले? आपण या कंपन्यांच्या काव्याला बळी पडत आहोत याची जाणीव तरी या सुशिक्षित महिलांना असते का? सूर्यप्रकाशामुळे बाह्यांखालची त्वचा व दंडाची-हाताची त्वचा यांच्या रंगात फरक पडणारच, त्यात वावगे ते काय, असा प्रश्न महिलांना पडतच नाही का?

स्त्रियांना त्यांच्या हाता-पायावरचे केस किंवा लव काढायचा आदेश आधी वडील व नंतर नवरे किंवा इतर कोणी देतात काय या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. स्त्री-पुरूष समानतेच्या गप्पा मारणा-यांपैकी किती स्त्रियांची या पुरूषांनीच त्यांच्यावर लादलेल्या बंधनातून सुटका करून घेण्याची खरोखर इच्छा असते?

मात्र करणेषु दासी, शयनेषु रम्भा हे ऐकवा, मग पहा काही जणी कसा अवतार धारण करतात ते. वर सोयीस्करपणे आम्हाला हवे ते आम्ही करू हेही ऐकवले जाते.

बुरख्याचेही काही स्त्रियांकडून होणारे समर्थन आपण पाहतोच की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिताश्रींच्या नाही पण न्हावीश्रींच्या आज्ञेने असावं. हेअर सलॉन पुर्व काळात पुरुष अस्सं डोकं भादरलं की अस्सं काखा वर करुन उभे राहायचे. हेअरकटवर बगला फ्री असत.
गेले ते दिवस गेले....
Lol

ते काय पिताश्रींच्या आ़ज्ञेने का?
<<
हो.
दाढी करायलाही युज्वली तसंच शिकतात.
पिताश्रींची आज्ञा किंवा मोठे भाऊ वगैरे.
ज्यु कॉ बास्केटबॉलच्या टीममधे पहिल्यांदा बनियनवर ग्राउंडवर जायची गरज पडली तेव्हा पीटीच्या मास्तरांनी अख्ख्या टीमला जवळच्या न्हाव्याकडे नेऊन 'बगला मारून' आणल्या होत्या.

मग शेवटी ठरलं काय आहे? स्त्रिया गुलाम आहेत की केस काढायला स्वतंत्र आहेत? पोल कोण घेणार आहे?

१००

काही अभ्यासू सदस्य कामाला लागलेले असून मायन संस्कृती, मोहेंजोदरो - हरप्पा,ग्रीक, रोमन अणि चिनी संस्कृती यांचे संदर्भ देऊन शब्दपिपासू पोष्टी टाकणार आहेत असे गुप्तचर संस्थेच्या अहवालातून कळते.

ते भगवान ' केस ' बघून ठरवेल. >>

हो हे केस बघूनच ठरवावे लागेल की वस्तरा मारायचा की ब्लिचिंग करायचं की वॅक्सिंग?

ओ त्या वस्तर्‍यातपण आजकाल लेडीज अन जेण्ट्स पेस्शल निघालेत बर्का.
आन कालिजात अस्तानी आमचं एक येडं अ‍ॅनफ्रेंच हेयर रिमूवर वापरून दाढी गायब करायचा प्रेत्न करीत असे Wink

मी दक्षिण अमेरिकेत [ ब्राझिल ] राहतेय . इथे हे सर्व काही पुरुष हि करतात . त्याच्या जाहिराती सगळीकडे असतात . माफक दरात केस काढणे , रंगविणे इत्यादी इत्यादी करून मिळते . दिप्लिसाव करणे म्हणजे केस काढणे कटिंग करण्या इतके लोकमान्य आहे . इथे पुरुषांसाठी स्वतंत्र wax मिळते . जे निळ्या रंगात उपलब्ध असते .शरीराच्या वेगवेगळ्या भागांसाठी स्पेशल wax उपलब्ध आहे . [ हे मधापासून हि केले जाते .] सर्व जण मग ते कोणत्याही वर्गातील असो सगळे काही आवडीने हौसेने करतात . ब्राझिल मध्ये दिवसातून ३ वेळेस आंघोळ केली जाते . अगदी समुद्र किनारी सुद्धा showers ची सोय आहे . इथे ह्या सर्वाकडे स्वच्छ तेच्या नजरेतून पहिले जाते . प्रत्येक खाण्यानंतर दात घासणे जसे प्रचलित आहे तसेच केस काढणे , रंगविणे सुद्धा .

काहीही हां. Lol

पर्सनल व्हायचं नाहीए अजिबात, पण तरीसुद्धा विचारावसं वाटतं आहे, ज्या कोणाला वॅक्सिंग ( केस काढण्यावर) हरकत घ्यायची आहे, त्यांना त्यांच्या बायकोचे/GF चे केसाळ हात पाय आवडतील / आवडतात का? सगळ्यांना काही खुप केस नसतात, पण काही बायका मुलींना अगदी जाडसर काळे केस असतात हात्-पायांवर. त्यांनी काढायचे नाहीत का ती पुरुषांची मानसिक गुलामगिरी आहे म्हणुन? आणि मग जर तिला स्वतःलाच जर स्वछ नितळ हात पाय छान वाटत असतील तर? शॉर्टस घातल्यावर पायाचे केस, स्लीवलेस ड्रेस / स्पगेटी ड्रेस घातल्यावर under arms साफ नसतील तर पहावेल का आजुबाजुच्यांना? काही वेळा गोष्टी बेसिक हायजिन म्हणुन करायच्या असतात. नवरा किंवा वडिलांनी आदेश कशाला द्यायला हवा?

आज आपण लावलेल्या ११ वाक्यांच्या केशवाटिकेचा १०७ घनदाट प्रतिसादांचा वृक्ष कसा झालाय हे पहायला राजेशजी इथे हवे होते!

(इथे म्हणजे या धाग्यावर! राजेश कुलकर्णी प्रथेप्रमाणे दुसर्‍या दोन धाग्यांच्या तयारीत असतील आतापर्यंत. उगाच नको तो विचार करू नका. )

वर काही जणींनी अमुकामुक पुरूषांना आवडेल का असे विचारले आहे. त्यांच्यासाठी हे विचार करण्यासाठी.
When you strip out of the last piece of clothing in front of your beloved, in the dim light of a night lamp, do you really care about whether your legs are waxed, how the stretchmarks on your slightly protruding belly that has housed a couple of babies are perceived. Or, the stray grey hair in one of your eyebrows, a stray hair around your nipple that you forgot to tweeze, and yes, the sagging breasts.
Or is it about how you feel, the warmth, the love, the sensuality, the sense of belonging? Or the passion and the ecstasy, and hunger and the surrendering? How much of it do you allow your senses to soak up with your eyes closed?
Next day, you take extra time to pluck out hair that are unwanted just because of their colour or where they have decided to show up. To shave your legs in a hurry...you need to wear that skirt to work today. Only half the legs - upto the knees for the thighs are going to be hidden anyway, it's not a miniskirt. You won't forget to wear the hipster that will hold your belly in and an underwire bra to make your breasts look perky, even if it makes you feel suffocated. And you will use the bronzer and the highlighter to create cheekbones that don't exist.
Does that mean you live two lives? Does the person who thinks you are beautiful at daytime , feel the same about you at night? Is it necessary to have two different personalities, one where you are sure of being accepted and loved for who you are, and the other for the rest of the world? Do some choose to remain the same, in and out, within and without...and do people find them beautiful, no matter what? Do some of them choose to be themselves when they are with loved ones and to be presentable for informal purposes? If so, then who defines what is presentable, is it being dressed neatly or dressed to cover your flaws?
So, if you were to strip your facade, then who are you? Are you beautiful because you celebrate your asymmetrical form and structure or because you successfully hide your 'flaws'? Are you the one who makes yourself believe that you are doing it for yourself?
Who are you beneath your clothes? Beneath your skin?
C/p Anupama joshi tl

प्रतिसादांतल्या कॉन्स्पिरसी थिअरी फारच विनोदी आहेत. कॉस्मेटिक कंपन्यांच्या जाहिरातींना बळी पडून स्त्रिया गोरेपणाचा हट्ट धरत आहेत म्हणे. जसंकाही कॉस्मेटिक कंपन्या येण्याआधी बायकांमध्ये अधिकाधिक काळी दिसण्याची चढाओढ होती! गोरं दिसायचं असतं ह्यांनाच आणि उगा फेअर ॲण्ड लवली चं नाव
आणि क्रीमच्या टबात अंघोळ करण्याची आयडिया जुनीच आहे. क्लिओपात्रा म्हणून एक ताई होऊन गेल्या दोन हजार वर्षांपूर्वी त्या नव्हत्या का गाढवीच्या दुधात नहात.

>>>> मुळात साधी राहणी हेच एक स्टाइल स्टेटमेंट आहे. खादीसारखेच. <<<<< नी, आख्ख्या पोस्टशी सहमत.

मला एक ठाऊके, जातीच्या सुंदरीला/सुंदराला काहीही घातले तरी छानच दिसते. Happy
मूळात व्यक्तिमत्व प्रसन्न असले पाहिजे, चेहर्‍यावरचे प्रसन्न हसु कुठल्याही कॉस्मेटिकमुळे येत नाही, हां आता एखादी गालावरची खळी वगैरे प्लॅस्टीक सर्जरीने करतही असतील निर्माण, पण तरिही, चेहर्‍यावरील प्रसन्न हसु, वा प्रसन्नता मुळात विचारात असावी लागते, व ती "नजरेतुन" बाहेर डोकावते, बाकीच्या रंगरंगोटीमधुन नाही इतके भान असले तर निव्वळ स्वःच्छता, नीटनेटकेपणा इतकाच निकष शिल्लक उरतो.

एक निरीक्षण, चुकीचेही असू शकते.

मुली कपडेलत्ते आणि पादत्राणे खरेदी करताना काय चांगले दिसेल याला प्राधान्य देतात,
तर मुले कम्फर्टला प्राधान्य देतात.

अर्थात यात काही चूक बरोबर नाही, बस आपापली चॉईस ..

@ गफ्रे बॉफ्रे, येस्स थोडा हिशोब बदलू शकतो. प्रेमात पडलेली मुले सुरुवातीचा काळ मुलींसारखे वागतात, मुलींना आवडेल या हेतूने.

>>>> @ गफ्रे बॉफ्रे, येस्स थोडा हिशोब बदलू शकतो. प्रेमात पडलेली मुले सुरुवातीचा काळ मुलींसारखे वागतात, मुलींना आवडेल या हेतूने. <<<<
बरोबर आहे ऋन्मेषा तुझे, पण एक सावधानता बाळग बर्का....
नैतर गफ्रेसारखे वागायचे म्हणत, गफ्रेला गुलाबाचे फुल आवडते म्हणुन तिला द्यायचे सोडून स्वतःच कानावर माळून घेशील.... Proud कायेना हल्लिच्या पिढीचे कै सांगता येत नै बोवा...... मेरी मर्जी वाले लोक तुम्ही... Wink

कुलकर्णी साहेबांनी ते इंग्रजी भाषेत काय लिहिलेलं आहे? गूगल ट्रान्सलेट करूनही नीट समजलं नाही.
मला इंग्रजी भाषा येत नसल्याने प्लीज कुणीतरी मदत करून भाषांतराची करेल का कृपा?
समजवून किंवा गूगलचे सांगेल भाषांतर धन्यवाद.

>>

तेव्हा आपण खरोखर आपल्या किंचित protruding बेली वर ताणून गुण दोन ठेवलेल्या आहे की कसे, आपले पाय झाले आहेत किंवा नाही हे काळजी करू, रात्री दिवा मंद प्रकाश, आपल्या प्रिय समोर कपडे शेवटच्या तुकडा बाहेर पट्टी बाळांना समजले जाते. किंवा, आपल्या भुवया एका मोकाट राखाडी केस, आपण tweeze विसरले की आपल्या स्तनाग्र सुमारे एक हरवलेला केस, आणि हो, स्त्रिया स्तन.
किंवा आपण, प्रेमळपणा, प्रेम, विषयलोलुप्त, राहण्याचे अर्थ कसे वाटते आहे? किंवा आवड आणि ब्रह्मानंद, आणि उपासमार आणि परत? किती तो आपण आपल्या डोळे बंद सह जागे भिजवून करण्याची परवानगी आहे का?
दुसऱ्या दिवशी, आपण फक्त कारण ते अप दर्शविण्यासाठी निर्णय घेतला आहे जेथे त्यांच्या रंग किंवा नको आहेत केस काढून टाक अतिरिक्त वेळ घ्या. घाई मध्ये आपले पाय हजामत ... आपण आज काम करण्यासाठी, परकर बोलता करणे आवश्यक आहे. केवळ अर्धा पाय - मांड्या साठी गुडघे तरीही लपविले जात आहेत पर्यंत, तो एक miniskirt नाही. आपण आपल्या स्तन हे आपण कोंदणे करते जरी, आनंदी दिसत करण्यासाठी आणि underwire अमितादीदीला आपल्या पोटात बसतील असं hipster बोलता विसरणार नाही. आणि आपण अस्तित्वात नाही की cheekbones तयार करण्यासाठी bronzer आणि highlighter वापरेल.
की आपण दोन जीवन जगू याचा अर्थ असा होतो का? तुम्ही दिवसा सुंदर मत कोण व्यक्ती, रात्री आपण बद्दल समान वाटत आहे का? तो आपण स्वीकारले जात खात्री आहे आणि आपण कोण आहात प्रेम, आणि इतर जगाला इतर जेथे, दोन वेगळ्या असणे आवश्यक आहे का? काहीही असली तरीही, काही समान राहतील ठरवले व, आत आणि बाहेर ... आणि लोक त्यांना सुंदर शोधू नका का? ते प्रिय आहेत तेव्हा त्यांना काही स्वत: असल्याचे निवडा नका आणि अनौपचारिक कारणांसाठी पुढे असेल? असे असल्यास, तर ते सुबकपणे कपडे किंवा आपल्या राजकीय वाद कव्हर कपडे जात आहे, पुढे काय आहे व्याख्या?
आपण आपल्या बाह्य पट्टी होते तर, नंतर तुम्ही कोण आहात? आपण आपल्या नसलेला फॉर्म आणि रचना किंवा आपण यशस्वीरित्या आपल्या 'दोष' लपवा कारण साजरा कारण सुंदर आहेत? आपण स्वत: ला आपण स्वत: साठी करत आहेत की विश्वास करतो आहेस काय?
आपण आपल्या कपडे खाली कोण आहेत? आपली त्वचा खाली?
सी / पी अनुपमा जोशी TL
<<

धन्यवाद, हॉर्न थँक्यू प्लीज.

Pages