त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी

Submitted by Rajesh Kulkarni on 30 November, 2015 - 13:25

त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी
.

सुरूवातीला केवळ चेहरा गोरा वगैरे ठेवण्यासाठी क्रिमची जाहिरात केली जाई. त्यानंतर आता दंड, पाठ, ब्राच्या बंदाखालची त्वचा हेही वेगळ्या छटेचे दिसू नयेत म्हणून अशा क्रिम्सच्या जाहिराती चालू आहेत. काही दिवसात प्रत्येक घरात या क्रीमचा एक टब ठेवा आणि गोरे दिसावे म्हणून सगळे शरीरच त्यात डुंबवावे, अशा जाहिराती आल्या तरी आश्चर्य वाटायला नको. कारण मग इतर अवयवांनी तरी काय घोडे मारले? आपण या कंपन्यांच्या काव्याला बळी पडत आहोत याची जाणीव तरी या सुशिक्षित महिलांना असते का? सूर्यप्रकाशामुळे बाह्यांखालची त्वचा व दंडाची-हाताची त्वचा यांच्या रंगात फरक पडणारच, त्यात वावगे ते काय, असा प्रश्न महिलांना पडतच नाही का?

स्त्रियांना त्यांच्या हाता-पायावरचे केस किंवा लव काढायचा आदेश आधी वडील व नंतर नवरे किंवा इतर कोणी देतात काय या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. स्त्री-पुरूष समानतेच्या गप्पा मारणा-यांपैकी किती स्त्रियांची या पुरूषांनीच त्यांच्यावर लादलेल्या बंधनातून सुटका करून घेण्याची खरोखर इच्छा असते?

मात्र करणेषु दासी, शयनेषु रम्भा हे ऐकवा, मग पहा काही जणी कसा अवतार धारण करतात ते. वर सोयीस्करपणे आम्हाला हवे ते आम्ही करू हेही ऐकवले जाते.

बुरख्याचेही काही स्त्रियांकडून होणारे समर्थन आपण पाहतोच की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्यायला ला गुगल काका Long म्हनत्याती! Lol

मामीच्या धमाल धाग्यांत टाकला का हा धागा...
भाषांतर - अमितादीदी, परकर बोलता करणे ..... अशक्य आहे!!

फ्रस्ट्रेट झाले तर मामीचा धम्माल धाग्यांचा धागा धुंडाळून मस्त पोटभर हसून घेते!!

लोल.. हे बघा:
बुरख्याचेही काही स्त्रियांकडून होणारे समर्थन आपण पाहतोच की.
>> Burakhyacehi support a few women that you pahatoca.

Woman on the castle हे गुलामगिरीचेच प्रतीक आहे.
म्हणजे हे सगळं विषयाला धरूनच चाललेलं आहे.

कळ्ळं! Wink

Pages