त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी

Submitted by Rajesh Kulkarni on 30 November, 2015 - 13:25

त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी
.

सुरूवातीला केवळ चेहरा गोरा वगैरे ठेवण्यासाठी क्रिमची जाहिरात केली जाई. त्यानंतर आता दंड, पाठ, ब्राच्या बंदाखालची त्वचा हेही वेगळ्या छटेचे दिसू नयेत म्हणून अशा क्रिम्सच्या जाहिराती चालू आहेत. काही दिवसात प्रत्येक घरात या क्रीमचा एक टब ठेवा आणि गोरे दिसावे म्हणून सगळे शरीरच त्यात डुंबवावे, अशा जाहिराती आल्या तरी आश्चर्य वाटायला नको. कारण मग इतर अवयवांनी तरी काय घोडे मारले? आपण या कंपन्यांच्या काव्याला बळी पडत आहोत याची जाणीव तरी या सुशिक्षित महिलांना असते का? सूर्यप्रकाशामुळे बाह्यांखालची त्वचा व दंडाची-हाताची त्वचा यांच्या रंगात फरक पडणारच, त्यात वावगे ते काय, असा प्रश्न महिलांना पडतच नाही का?

स्त्रियांना त्यांच्या हाता-पायावरचे केस किंवा लव काढायचा आदेश आधी वडील व नंतर नवरे किंवा इतर कोणी देतात काय या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. स्त्री-पुरूष समानतेच्या गप्पा मारणा-यांपैकी किती स्त्रियांची या पुरूषांनीच त्यांच्यावर लादलेल्या बंधनातून सुटका करून घेण्याची खरोखर इच्छा असते?

मात्र करणेषु दासी, शयनेषु रम्भा हे ऐकवा, मग पहा काही जणी कसा अवतार धारण करतात ते. वर सोयीस्करपणे आम्हाला हवे ते आम्ही करू हेही ऐकवले जाते.

बुरख्याचेही काही स्त्रियांकडून होणारे समर्थन आपण पाहतोच की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या लिखाणात आहे. आतली गोष्ट या नावाने.
लिंब्याला पाश्चात्य म्हणजे फक्त इंग्लंड वाटते. माझ्या लेखातले इंग्लंडाबद्दल केवळ नाहीये.

रैना, तुझे मुद्दे अचूक, नेमके आहेत. Happy

>>>> मी काय म्हणतो स्त्रीयांनाच बोलू दे. त्यांच्यावर गुलामगिरीचा आरोप आहे, पुरूषांवर नाही. <<<<<
मृणाल१ चा मुद्दा रेफर कर Proud
बाकी हे पण बरोबरच आहे म्हणा... पण आत्ताच तू/मी बोललो नाहीत, तर ही गुलामगिरी "पुरुषांनीच" लादलीये असे सिद्ध व्हायला वेळ लागणार नाही..... Wink आहे का त्याची तयारी?

>>>> लिंब्याला पाश्चात्य म्हणजे फक्त इंग्लंड वाटते <<<< नाही ग...
माझ्या मते मुम्बईच्या अरबी समुद्रापलिकडील ( Angry ) (सिंधसागरा पलिकडील) सर्व ते ते पाश्चात्य.... मग त्यात अरब कन्ट्रीज/आफ्रिका इत्यादी सर्व आले.

<<<<<<<हातापायावरचे केस ठेवल्याने सौंदर्याला बाधा येते व ते काढल्यामुळेच आपण सुंदर दिसू याला कोणता आधार असेल? >>>>>>

राकू - तुम्ही धन्य आहात.

हाता पायावरचे केस बायकांना अजिबात चांगले दिसत नाहीत. त्यात ते केस दुर्दैवाने काळ्या रंगाचे असतील तर उठुन दिसतात. हे काढायलाच हवेत. Happy
आपल्या पार्टनर ला जे जे आवडेल आणि जे आपल्याला जमेल ते स्त्री- पुरुष दोघांनी ही केलेच पाहिजे.

माझ्या मते मुम्बईच्या अरबी समुद्रापलिकडील ( राग ) (सिंधसागरा पलिकडील) सर्व ते ते पाश्चात्य....
<<
हात्तिच्या.
मला वाट्लं होतं की रेल्वे लाईनच्या इकडचं (वेस्ट) ते सगळं वेस्टर्न उर्फ पाश्चात्य, अन ईस्ट ते पौर्वात्य.

Women fall in love by what they HEAR,
Men fall in love by what they SEE,
that is why women wear make up
and Men lie.
Lol

केस उरलेच नाही का दुसर्‍या वेळा वापरायला??!!>>>> फिदीफिदी केस बक्कळ हायीत, पण असला चिकटा कोण वापरेल? आणी दिवसभर केसाला गोमुत्राचा वास, यक्क!

देवा वाचव रे....
@ सीमंतिनी आणी रश्मी......कित्ती कित्ती असहिष्णु आहात तुम्ही दोघी, देव तुम्हाला कध्धी कध्धी माफ नाही करणार. गोमतेच्या प्रॉडक्टला असं नाव ठेवता.
असहिष्णु कुठल्या.........उम्म्म्म !

मला असं वाटू लागलय् की गुगि चा विरोध केला पाहिजे. आजपासून पुरूषांनी दाढी, कटींग बंद करावे. कलप करू नये. स्त्रियांनी. मेक अप, कॉस्मेटिक सर्जरी, वॅक्सिंग बंद करावे. फारतर बॉण्डपटात उत्कटदृश्यात जॉन अस्वले आणि जिनी अस्वले दिसतील.

रच्याकने, स्त्रिया आणि मेकअप याविषयी बाळबोध लिंक.

http://googleweblight.com/?lite_url=http://makeup.lovetoknow.com/Why_Do_...

वत्सला, भारतात शाहरूख "फेअर अ‍ॅण्ड हॅण्डसम" ची जाहिरात करतो. त्याबद्दल बोलतोय तो बहुतेक.
>>
हो अर्थात, भारताबाहेरील पुरुषांना फेअरगिरीचे कौतुक नसेल. इथे आहे तर चुना लावला जातो.

वर उल्लेखलेल्या बाकी सगळ्या बायकी गोष्टी आहेत (आणि म्हणुन पुरुषांसाठी वाईट आहेत) आणि पुरुषांनी त्या करु नये हे कोण ठरवत?
>>>

स्पॉक, वाईट आहेत असे कुठे म्हणालो मी , बस्स शोभत नाहीत.

आता एखाद्या पुरुषाला पुरुष जोडीदारही शोभत नाही पण करतात ना लग्न. तसेच हे.

बाकी माझ्या दोन्ही पोस्टमध्ये ३०-३५ टक्के वाक्ये उपरोधाची होती. ती ओळखलीत तर तुम्हाला गम्मत समजेल नाही तर अनंत काळाचा वाद Happy

ऋ, तु फेअरगिरी करण्यसाआठी चुना लावतोस चेहर्‍याला?
>>
अहो तो चुना नाही, ते अच्छे दिन वाले लावतात तो चुना..

>>>>> अहो तो चुना नाही, ते अच्छे दिन वाले लावतात तो चुना.. <<<< ( अस्थानी पेरलेल्या या वाक्याचा निषेध)
ओह, म्हणजे आधीची ६०/६५ वर्षे काय फक्त "चुनकळी" लावत होते काय? Proud उगा चून्याची निवळी ढोसल्यागत कैतरी बोलु नका.... Wink

बस्स शोभत नाहीत. >> हे आणि या पुढची सगळी वाक्ये हे जनरलायझेशन आहे. फॅक्ट नाही.

३०-३५ टक्के वाक्ये उपरोधाची होती >> याचा तु स्टॅम्प बनवुन घेतला असशीलच ना आत्तापर्यंत?

आता गांधीजींचे निरामय जीवनशैलीविषयक विचार, त्याला सावरकरांनी घेतलेली हरकतअस्शा टप्प्याने जाउद्या

म्हणजे आधीची ६०/६५ वर्षे काय फक्त "चुनकळी" लावत होते काय?
>>
माहीत नाही, तेव्हा माझा जन्म झाला नव्हता, घरी विचारून सांगतो.
बाकी मी कोणत्या पक्षाचा नाही. चार शिव्या आणखी हासडा त्यांना. मला काही फरक पडणार नाही.
वरचे विधान मी धाग्यात राजकारण आणायला लिहिले नव्हते, वा मोदी सरकारवर मुद्दाम टिका करायला लिहिले नव्हते.
पटकन जे समर्पक उदाहरण सुचले ते दिले Happy

कृपया धागा पुन्हा ब्यूटी पार्लर वर आणावा

मुळात साधी राहणी हेच एक स्टाइल स्टेटमेंट आहे. खादीसारखेच.
गोर्‍या रंगाचे ऑब्सेशन आणि त्यातून येणारे गोरेपणाचा निष्कारण चिकटलेले गुण वगैरे याप्रमाणेच साधेपणा या स्टाइलचे आहे.
गुलामगिरीच म्हणायची तर दोन्ही टोकांना आहे.

मुळात साधी राहणी हेच एक स्टाइल स्टेटमेंट आहे. खादीसारखेच.
>>>
कपड्यांबाबत वा काही सवयींबाबत हे शक्य आहे पण विचारात साधेपणा सदासर्वदा आणने ते उपजत असल्याशिवाय जमणे कठीण आहे.

सलमानचा पार्टनरमध्ये डायलॉग होता. स्टाईल सिखाई जा सकती है, सादगी नही.

परंतू सर्व प्रॉडक्टस व सर्व ट्रीटमेंटस हे गुलामगिरीचे प्रतिक आहे..... >> नी, एक्झॅक्टली! मला इतर अनेक प्रतिसाद पाहून वाटले की मलाच लेख समजला नाही का काय. हे फक्त स्त्रियांच्या या गोष्टी वापरण्याच्या अतिरेकाबद्दल असते तर एकवेळ ठीक होते ("एकवेळ" - कारण कोण कसला अतिरेक करत आहे हे अत्यंत सापेक्ष आहे, ते दुसरा कोणी ठरवू शकत नाही. अनेकांना/अनेकींना दुसरी व्यक्ती अती गबाळी राहते/अती-मेकअप करते असेही वाटत असेल. हे लिंगनिरपेक्ष असावे. हापिसात कपाळापासून मानेपर्यंत कर्व्ह वाल्या रेषा मारल्यासारखी हेअरस्टाईल जेल लावून करणार्‍या मेल कलीग बद्दल झालेली चर्चा वगैरे मजेदार उदाहरणे लक्षात आहेत Happy ). पण यात प्रीमाइस हे आहे "आम्ही तसे सांगितले तर बघा कशा सोयीस्करपणे...." - जे मला झेपले नाही. व्यक्तिगत चॉईस हा महत्त्वाचा फरक आहे दोन्हीत.

सलमानचा पार्टनरमध्ये डायलॉग होता. स्टाईल सिखाई जा सकती है, सादगी नही. <<
सलमान आणि पार्टनरचा लेखक हे विचारवंत म्हणून गणता काय? धन्य!

व्यक्तिगत चॉईस हा महत्त्वाचा फरक आहे दोन्हीत. <<< करेक्ट पण हेडरमधे लेखकाने व्यक्तिगत चॉइस मूर्खपणाच असतो हे बुरख्याचे उदाहरण देत सांगितले आहे.

इतके सारे लोक, साधी राहणी करा आणि जे करत नाहीत त्यावर मोराल जजमेंट करताना बघून गम्मत वाटली. 'हे करायचा कंटाळा कसा येत नाही?' इ. सुप्रिमसी टाईप प्रश्न विचारून मागील पानावरून पुढे चालू. ज्याचा त्याचा प्रश्न. पूर्णविराम. Happy

व्यक्तीगत चॉईसची निर्मीतीसुद्धा संस्कारांमुळे होते असेही वाटते. चु भु द्या घ्या

फा म्हणतोय तसा व्यक्तीगत चॉईस आहेच. नीचा पहिला प्रतिसादही पटला.
मूळ लेखात सगळ्या स्त्रियांना हे असंच वाटतं, वाटलं पाहिजे असं काहीतरी गृहित धरून लिहिलेलं आहे त्यामुळे त्याबद्दल बोलण्यात पॉईंट नाही.
स्वतःवर सर्जर्‍या करून चांगलं, वाईट दिसायचा अट्टाहास हे एक्स्ट्रिम आहेच पण तो ही त्या त्या व्यक्तीचा चॉईस आहे. ती व्यक्ती जर कन्व्हिन्स्ड आहे की तिला हे हे केल्यानेच छान दिसणं शक्य आहे, ते करायला तिच्याकडे व्हिटॅमीन 'एम' आहे, तर आपण कोण ऑब्जेक्शन घेणारे?
तीच कथा रोज मेकप करून ऑफिसला जाणार्‍यांची किंवा वाट्टेल त्या वयापासून वॅक्सिंग, थ्रेडींग किंवा अगदी लेझर करून घेणार्‍यांचीही. सरसकट त्यावर बोट ठेवण्यात काय अर्थ आहे? तुम्हांला नाही पटत तर करू नका इतकं सोप्पं आहे ते.

हातापायावरचे केस ठेवल्याने सौंदर्याला बाधा येते व ते काढल्यामुळेच आपण सुंदर दिसू याला कोणता आधार असेल? >>>> सौंदर्यासाठीच नव्हे तर हातापायावरचे केस काढल्याने स्वतःला खूप स्वच्छ वाटते इतके पुरेसे नाही का?उन्हाळ्यात वगैरे स्वतःलाच छान वाटते. उलट ते करावेच असे मी म्हणेन. बर्‍याच बायकांच्या हाताचे लांब लांब केस पाहून यॅक वाटायचे.काही सुविधा आहेत त्या जरूर घ्याव्यात.बाकी मेकप, फेअरनेस क्रीमबद्दल जिला आवडत असेल ती लावेल.अतिरेक केव्हाही वाईट.

लव काढायचा आदेश आधी वडील व नंतर नवरे किंवा इतर कोणी देतात काय या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही >>>हे म्हणजे काहीतरीच.
रच्याकने, पुरुष अंडरआर्म्स (बगला /खाका) साफ करतात, ते काय पिताश्रींच्या आ़ज्ञेने का?

Pages