त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी

Submitted by Rajesh Kulkarni on 30 November, 2015 - 13:25

त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी
.

सुरूवातीला केवळ चेहरा गोरा वगैरे ठेवण्यासाठी क्रिमची जाहिरात केली जाई. त्यानंतर आता दंड, पाठ, ब्राच्या बंदाखालची त्वचा हेही वेगळ्या छटेचे दिसू नयेत म्हणून अशा क्रिम्सच्या जाहिराती चालू आहेत. काही दिवसात प्रत्येक घरात या क्रीमचा एक टब ठेवा आणि गोरे दिसावे म्हणून सगळे शरीरच त्यात डुंबवावे, अशा जाहिराती आल्या तरी आश्चर्य वाटायला नको. कारण मग इतर अवयवांनी तरी काय घोडे मारले? आपण या कंपन्यांच्या काव्याला बळी पडत आहोत याची जाणीव तरी या सुशिक्षित महिलांना असते का? सूर्यप्रकाशामुळे बाह्यांखालची त्वचा व दंडाची-हाताची त्वचा यांच्या रंगात फरक पडणारच, त्यात वावगे ते काय, असा प्रश्न महिलांना पडतच नाही का?

स्त्रियांना त्यांच्या हाता-पायावरचे केस किंवा लव काढायचा आदेश आधी वडील व नंतर नवरे किंवा इतर कोणी देतात काय या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. स्त्री-पुरूष समानतेच्या गप्पा मारणा-यांपैकी किती स्त्रियांची या पुरूषांनीच त्यांच्यावर लादलेल्या बंधनातून सुटका करून घेण्याची खरोखर इच्छा असते?

मात्र करणेषु दासी, शयनेषु रम्भा हे ऐकवा, मग पहा काही जणी कसा अवतार धारण करतात ते. वर सोयीस्करपणे आम्हाला हवे ते आम्ही करू हेही ऐकवले जाते.

बुरख्याचेही काही स्त्रियांकडून होणारे समर्थन आपण पाहतोच की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हानीकारक रित्या शरीराच्या रचनेत ढवळाढवळ करायला जाणे याला माझाही विरोध आहे. शरीराचे हाल करून ठराविक मापात, आकारात राहणे या अट्टाहासात क्रौर्य आहेच.
परंतू सर्व प्रॉडक्टस व सर्व ट्रीटमेंटस हे गुलामगिरीचे प्रतिक आहे आणि म्हणून स्वची जाणीव असलेल्या स्त्रियांनी सौंदर्यप्रसाधने वापरणे, वॅक्सिंग करणे वगैरे सगळे सोडून दिले पाहिजे हा अट्टाहासही मला विनोदी वाटतो.

मला(उदाहरणार्थ) मनापासून नटायला आवडतं आणि मस्तही वाटतं. हो मी तितकी सुपरफिशियल आहे असं तुम्हाला म्हणायचं तर म्हणू शकता. हू केअर्स!

आर्थिक गणिताचे म्हणाल तर प्रत्येक जण बेसिक गरजा भागल्यावर आपल्या आवडीवर खर्च करत असतो. तसे म्हणाल तर हॉटेलिंग, दोन-तीन पेक्षा जास्त कपडे, प्रवास, पुस्तके, विविध प्रकारचे संग्रह यातले काहीही बेसिक गरजांमधे येत नाही. हे सगळे आपण आवडीखातरच करत असतो. पुस्तके, प्रवास ही आवड चांगली आणि शरीर सजवण्याची आवड कमी प्रतिची हे गृहितक विनोदी आहे.

बॉडी अडॉर्नमेंट किंवा शरीर सजवणे ही एक मानवी प्रवृत्ती आहे. या विषयाचे एक शास्त्र आहे, या विषयाची एक कला आहे आणि माणूस कपडे घालू लागला त्याही आधीपासूनचा इतिहास आहे.

वापरल्या जाणार्‍या वस्तूंमधे असलेली घातक रसायने याबद्दल जागरूक असणे योग्यच, सर्वांनीच जागरूकता दाखवावी. हळूहळू नवीन कमी घातक, अजिबात घातक नसलेल्या वस्तू वापरून प्रॉडक्टस तयार होतीलच.

बेफिकीर,
हातापायावरचे केस ठेवल्याने सौंदर्याला बाधा येते व ते काढल्यामुळेच आपण सुंदर दिसू याला कोणता आधार असेल? स्वत: याबाबत विचार न करता परंपरा म्हणून ते करत राहणे यावरून स्त्रिया त्याबाबत विचार करतात असे म्हणता येईल का?
तुम्ही जे म्हणता ते टापटीप राहण्याबद्दलचे आहे. स्त्रियांनीच का, पुरूषांनीही गबाळे राहू नये.

लिंबूटिंबू,
सहमत आहात म्हणता कोठून कोठे गेलात हो?

सातीतै, आयुर्वेदिक मृत्तिकास्नान देखिल आणलय, झालच तर नक्षत्रवृक्षांचे स्नान वगैरेही अ‍ॅडू शक्ता... Wink

एकीकडे कॉन्वेन्ट स्कूलमधुन टिकली लावायला बंदी, मेंदी काढायला बंदी हे एक टोक, तर दुसरीकडे पोरगी शाळेतुन बाहेर पडली रे पडली की तिच्यापुढे "सौंदर्यवती बनण्याचा" भुलभुलैय्या... अन नाही बनलात तरचा "न्यूनगंड " रुजविणे.
त्यातुन "झिरो फिगर" चा बोलबाला तर महा घातक. (नीरजा, मला वाटते की मागे आपण इंग्लंडमधल्या त्या कमर करकचुन आवळून ठेवणार्‍या पोषाखाबद्दल बोललो होतो इथेच माबोवर, यू नो बेटर दॅन मी.)
अन या क्रिमांच्या किंमती तरी किती अफाट? येवढुश्शी पाचपंचवीस ग्रॅम वजनाची क्रीम सत्तर ऐन्शी रुपयाला....
आमची कार्टी मागे लागली होती, मग तिला हिशेब करुन दाखवला. पंचवीस ग्र्यामला ऐन्शी रुपये तर १००० ग्र्यामला किती? उत्तर आले ३,२०० रुपये. मग विचारले की ३,२०० रुपयात किती किलो लोणी येईल? तेवढे सगळे जरी नै, तरी छटाक पाव्शेर लोणी/दुधाची साय तोंडाला फासुन बसलीस तरी पुरे आहे. किती खर्च होईल त्याला? तिला तसे पटत नव्हतेच, कारण जाहिरातींची भुरळ मोठी. असो. घरोघरी हेच्च चालत अस्ते. हल्लि जिथे आयटी/इंजिनियर्/डॉक्टर वगैरेंना जास्तिचा पैका मिळतो ते करतात खर्च.
पण त्यांचे बघुन कनिष्ठ मध्यमवर्गीय, पोटाला चाप लावुन हे करु पहातात तेव्हा मात्र.... असो.
पोरीला मुलतानी माती दिली, शाडू मातीही ब्येस्ट बर्का, वर त्यात थोड गोमुत्र, गोमय, व साजुक तुप घातले तर अत्युत्तम. Wink (मी स्वानुभव घेतलाय... अन्तर्बाह्य शुद्धी होते )

>>>>> लिंबूटिंबू, सहमत आहात म्हणता कोठून कोठे गेलात हो? <<<<
अहो विषय तुम्ही काढलात, तो वरवरचा आहे.
त्याचे मूळ समाजमनात्/जीवनात कुठे कुठे घुसत रुजत चाललय ते बघत होतो.
आम्हाला आपला पेशवे बाजीरावांना मिळालेला सल्ला तोंडपाठ, फान्द्या छाटत बसू नका, मूळावरच घाव घाला.... !

मला वाटते की मागे आपण इंग्लंडमधल्या त्या कमर करकचुन आवळून ठेवणार्‍या पोषाखाबद्दल बोललो होतो इथेच माबोवर, <<<
आख्खा लेख आहे माझा.

लिंबूटिंबू, तुमच्या आताच्या कमेंटमध्ये पारंपारिक उपाय सोडून कंपन्यांची धन करण्याचा मुद्दा अगदी योग्य आहे.

Now a days, I feel that recent Garbage segregation system is taking women back by 50 years. I am posting below a latest garbage segregation guidelines suggested by our society.

Here are five easy ways to reduce reject (red bin) waste:

3. Sanitary pads
Regular pads and tampons contain host of chemicals that are harmful when absorbed. An average woman uses 10,000 to 15,000 pads. This is truly adding to our already overflowing landfills.
Do’s
Switch to menstrual cups/ cloth pads. For more info join fb group Sustainable Menstruation India

4. Diapers
Conventional diapers pose health risk to babies as they contain lots of harmful chemicals. It takes more than 500 years for a diaper to decompose and is a serious problem to our over burdened landfills. Most babies use 3000-4000 diapers before being potty trained.
Do’s
Switch to cloth diapers.For more info join fb group Cloth Diapering India

Regards,
SWM team

Switch to menstrual cups/ cloth pads. >>

रोगापेक्षा उपचार भयंकर!

बाकी डायपर्सबद्दल सहमत!

>>>हातापायावरचे केस ठेवल्याने सौंदर्याला बाधा येते व ते काढल्यामुळेच आपण सुंदर दिसू याला कोणता आधार असेल? स्वत: याबाबत विचार न करता परंपरा म्हणून ते करत राहणे यावरून स्त्रिया त्याबाबत विचार करतात असे म्हणता येईल का?<<<

कुलकर्णी, हातापायावरील केस हे डोक्यावरील केसांप्रमाणे व्यवस्थित विंचरण्याइतके नसतात. त्यामुळे ते वाढले की अनियमीत दिसू लागतात व अनियमीतता हे कुरुपतेचे एक लक्षण आहे. ते काढून टाकल्यामुळे युनिफॉर्मिटी येते जे सौंदर्याचे लक्षण आहे. ह्याशिवाय, त्वचेवरील केस हे राठपणाचे तर त्वचेवर केस नसणे हे नाजूकपणाचे लक्षण मानले जाते. (ह्याचे कारण मला माहीत नाही, पण असा पगडा माझ्याही मनावर आहेच). सौंदर्याबाबत पारंपारीकरीत्याच पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक जागरूक असल्याने स्त्रिया हे करू लागल्या असाव्यात. काही क्षेत्रातील पुरुषांनाही कदाचित हे केस काढावे लागत असतीलही.

स्त्रियाच का अधिक जागरूक ह्यावर वर आधीच झालेल्या चर्चेत मी असे म्हणालो होतो की स्त्रीला उपजतच सुंदर दिसावे असे वाटणे हा घटक अधिक प्रभावी असावा. पुरुषांनी तिला तसे करावयास लावणे किंवा इतर स्त्रियांनी तिला पुरुषांच्या वर्चस्वामुळे तसे करायला लावणे हे घटक नंतर आलेले असावेत. (म्हणजे, एकदा सौंदर्याचे निकष त्या त्या प्रांतापुरते नक्की व स्थिर झाल्यानंतर)!

लिंबूजी
तुमची गोमूत्र वापरायची कल्पना अप्रतिम.
याचा पेटंट घेउन देशभरात साखळी सौंदर्य वाटिका सुरू करा. काया, माया, बॉडी केअर, बॉडी अ‍ॅण्ड सोल, बात्रा या सर्वांना टक्कर द्या.
गायीचे चित्र असूद्या बोर्डवर.

बर्‍याच स्कीन सॉफ्टनर्समधला हायड्रॉक्सीयुरिआ हा घटक असाच कुणाकुणाच्या मूत्रातून आलेला असतो.
यावर मागे दीमा आणि मी कुठेतरी लिहिले आहे.

'एलटी स्पेश्यल गोमूत्र वाटिका' हीट जाणार!
Happy

>>>>>. ह्याशिवाय, त्वचेवरील केस हे राठपणाचे तर त्वचेवर केस नसणे हे नाजूकपणाचे लक्षण मानले जाते. <<<<
हे कुणी ठरवल?
मी असहि वाचलय कुठेतरी की माणूस मुळात एक जनावर आहे. व म्हणून नैसर्गिकरित्या त्याचे संरक्षणासाठीच त्याचे अंगाचे विविध भागावर केसही उगवत असतात. याबद्दल कुणाला काही माहिती आहे का?

बाकी इतरः.... लौकरच लिंबीच्या शेतावर मी गोशाळा स्थापुन गोमुत्राचा व्यवसाय सुरु करणार आहे. गोमुत्राचे स्याम्पल तुम्हाला नक्किच देईन. Proud

प्लिज बायकांनो, हाता, पायावरचे अन मिशीचे केस कृपया काढून टाका. बरे दिसत नाहीत. Proud

हे आपलं असंच. कुळकर्णी एकदम केसांवरच घसरले म्हणून !

बाकी रैना म्हणते ते अघोरी आहे पण आय लायनर लावने, मेकप करणे अन केस काढणे हे आजकाल मिनिमम आहेच की.

रैना तुमच्या काळात जरी तुम्ही शाळेत व्हॅक्सिंग केले नसले तरी आजकाल ८ -९ वी च्या मुली करतात. ( प्रायव्हेट शाळांमधून) कारण ड्रेस मध्ये हाफ पँट असते. तुम्हा लोकांना शाळेत हाफ पँट नव्हती. त्यामुळे फक्त तेवढी तुलना योग्य वाटत नाही. म्युन्सिपाल्टीच्या आणि मराठी संस्थांच्या शाळात तू म्हणतेस तसेच अजूनही आहेच.

बाकी लिंबूभौ, हिंदू संस्कृती मध्ये ही "नटायची" कल्पना आहे बरं का. अरे आपल्या देवांना दाढ्या अन मिशाही नाहीत भौ. टेक्नॉलॉजीच तशी होती म्हणे ! मुदलात माणसंच जर दाढी मिशा काढत असतील तर मग बायकांना कशाला असतील?

इनफॅक्ट http://www.sjsu.edu/faculty/watkins/indus.htm येथील चित्रात इंडस सिव्हिलायझेशन मधील माणसाने दाढी देखील कोरलेली दिसेल.

ज्जे बात है केदारभाउ, आता कशी जरा तारतम्यातिल पोस्ट (म्हणजे एकांगी नसलेली) वाचल्यासारखे वाटले.

>>>> अरे आपल्या देवांना दाढ्या अन मिशाही नाहीत भौ <<<<
अरे ते आत्ताही करता येते माणसांनाही. जन्म झाल्यावर नाळ कापतात, ती जिथे जिथे केस उगवायला नको असतील तिथुन फिरवतात. म्हणजे तिथे तिथे केस येत नाहीत असे म्हणतात. आता हे झाले देशी "विज्ञान(?)", ते प्रयोगशाळेत जोवर सिद्ध होत नाही तोवर त्याला व ते सांगणार्‍याला किंमत नाही. पण आई सांगायची त्यानुसार, नाटकशाळा वगैरे व्यवसायातील बालिकांचे बाबतीत हे हमखास केले जायचे. असो.

बाकी सायकल चालविताना घामाने निथळुन घाम डोळ्यात जाऊ लागला की भुवया भरगच्च असण्यामागचे कारण उमजते, व भुवया भरगच्च नसण्याचे वैषम्य! ज्योतिषानुसार मात्र भुवयांची जाडी, रुंदी, लांबी, दोन भुवयांतील अंतर इत्यादीवर बरेच ठोकताळे आहेत.

आता याच हिशेबाने ओठावरील केस म्हणजे मिशा का असतात? Wink अन त्या स्त्रीयांनाच का नसतात? यावर संशोधन होणे गरजेचे आहे. अन हेच सुत्र लावायचे झाले, म्हणजे कपाळावरिल घाम डोल्यात जाउ नये म्हणून भुवया, तर अर्थातच गळके नाक ओठातुन तोंडात पोहोचू नये म्हणुन मिशा हा सरळ साधा तर्क, नै का?
पण मग म्हणजे, फक्त पुरुष तेव्हडेच शेंबडे अस्तात का? अन स्त्रीया नाहीत? ..... निरिक्षण वाढवा......
मी शेंबडे पुरुष हव्वेतितके बघितलेत, पण शेंबडी स्त्री बघितल्याचे मला स्मरणात नाही. अगदी सर्दी झालेली असली तरीही... ! काय बरे गौडबंगाल आहे या मागे?

नीधप चा प्रतिसाद मनापासून पटला.
ज्या मुलींना आणि स्त्रियां ना स्वतः च्या आंनदासाठी आणि सवयीमुळे व्यवस्थीत आणि प्रेसेंटेबल रहाणे आवडत असेल तर ते गुलामगिरीचे प्रतिक कसे काय होऊ शकते. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो ज्याला त्याला ठरवू दे.

>>>> तर ते गुलामगिरीचे प्रतिक कसे काय होऊ शकते. <<<<
सुंदर राहण्याचा/दिसण्याचा प्रयत्न करणे हे गुलामगिरीचे लक्षण नाहीच्चे.....
पण या इच्छेचा वापर करित, काहीही उपाय, काहीही क्रीम अत्यंत भरमसाठ किमतीला गळ्यात मारण्याचे जाहिरातीतुनचे उपाय, व त्याला बळी पडलेल्यांची गुलामी असा खरे तर विषय आहे असे मला वाटते.

बाकी सायकल चालविताना घामाने निथळुन घाम डोळ्यात जाऊ लागला की भुवया भरगच्च असण्यामागचे कारण उमजते, व भुवया भरगच्च नसण्याचे वैषम्य! ज्योतिषानुसार मात्र भुवयांची जाडी, रुंदी, लांबी, दोन भुवयांतील अंतर इत्यादीवर बरेच ठोकताळे आहेत. >

अरे देवा !

अरे त्याला भूवया जाड असायची गरज नाही रे मित्रा, तर डोक्यावर हेल्मेट खाली एक कापडाची पट्टी बांधली की घाम नाहीसा होईल. चला आता जोतिष्यशास्त्र आलेच आहे तर नवग्रह पुजा कशी करायची हे ही विचारून घेतो.

अन त्या स्त्रीयांनाच का नसतात? >>
त्यांनाही मिशा असतात रे भाऊ ! जाऊ दे .

विषय कुठून कुठेही नेण्याची तुझी कला वाखानन्याजोगी आहे.

मी काय म्हणतो स्त्रीयांनाच बोलू दे. त्यांच्यावर गुलामगिरीचा आरोप आहे, पुरूषांवर नाही.

कॉस्मेटिकवाले सोडा,
पण कोणतीही स्त्री/पुरुष/व्यक्ती बहुतांशी वेळा अपोझिट सेक्सला अ‍ॅट्रॅक्टिव्ह दिसावे यासाठीच धडपडत असते. तेव्हा स्त्रीला (एक लिंग) सुंदर केव्हा म्हणावे, याची कन्सेप्ट पुरुषी नजरेतून (अपोझिट लिंग) नाही तर काय एल्जीबीटी नजरियातून येईल कि क्वॉय - +१
नीधप ला पण +१

ए मला आमच्या शेजरच्यानी गोमुत्र असलेली शाम्पुची बॉटल आणुन दिली होती, म्हणजे विकली होती, म्हणजे गळ्यात मारली होती. तर ती बॉटल बहुतेक आसाराम बापुन्च्या सेवेश्रमातली होती. तेव्हा आबापुनी रन्गपन्चमी खेळलेली नसल्याने ते जरा फेमस होते, आणी लय प्रभाव होता त्यान्च्या उत्पादनान्चा. पण आम्ही काही तो शाम्पु परत दुसर्‍या वेळेस वापरलाच नाही.

पण आम्ही काही तो शाम्पु परत दुसर्‍या वेळेस वापरलाच नाही. >> केस उरलेच नाही का दुसर्‍या वेळा वापरायला??!!

>>>मुळात सुंदर दिसण्याच्या ज्या कल्पना प्रचलित आहेत त्या पुरुषांनी व आता कॉस्मेटिक्सच्या कंपन्यांनी स्त्रियांवर लादलेल्या आहेत.
स्त्रिया त्यालाच आपले स्वातंत्र्य समजून त्याच्या आहारी जातात हा मुद्दा आहे >> बरोबर. हेडर मध्ये टाका.

प्रत्येक वेळेस स्वत: विचार न करता, त्या त्या काळाच्या रेट्यातील प्रचलित संस्कृतीला (बरं दिसत नाही, लोकं काय म्हणतील, चारचौघी करतात ते, नाही केले तर नवरा सोडून जाईल, दुसर्या स्त्रीकडे आकृष्ट होईल) धरुन वहावत जाणे, influence होणे या मागे शिक्षण मिळाले तरी कणखर निर्णयक्षमता विकसीत न करणे, किंवा सामाजिक दबावाच्या बळी पडुन किंवा त्याच्या आड लपून ती विकसीत होऊच न देणे अशी वृत्ती दिसून येते.

आणि हो दोन्ही टोकं अजिबात मान्य नाहीत पण मध्यम मार्ग तो कुठला म्हणे ?

पण पर्यावरण पोषक किंवा निदान कमी हानिकारक पर्याय मात्र यायला हवेत.

केदार - हो रे. तेच. शॉर्टस आहेत. आम्हाला allowed नव्ह्ते त्याकाळी त्यामुळॅ वॅक्सिंग पण उशीरा सुरु केले हे बरोबर. पण मुद्दा तोच आहे ना?
हाता, पायावरची लव नॅचरल असते. पण म्हणून १२-१३ वर्षाच्या मुलींना त्याची लाज वाटण्यासारखे काय आहे?
आणि बर्‍याच ब्युटीट्रीटमेंटसचे किमान वय हळूहळू घसरत चालले आहे, हे नजरेआड करता येण्यासारखे नाही.

तसेच frequency ही सरासरी वाढत चालली आहे. म्हण्जे पूर्वी सोयीनुसार किंवा महिन्यातून एकदा वॅक्सिंग करत लोक्स. आणि कधी असे जरुर होत असे की वेळ मिळाला नाही. त्यात फार काय कमीपणा मानायचे कारण नव्हते.
वॅक्सिंग हे minimum hygiene मध्ये गणले जाऊ लागले इतका काळ आणि सामाजिक संकेत (आणि जीवनावश्यक बाबींची व्याख्या) बदलत गेल्या.

साती- पटले. मला तर वाटतं नवी बाजारपेठ म्हणूनही अचानक त्या सुंदर मानल्या जाऊ लागल्या.
अरेच्या त्या प्रीवेडिंग ग्रुमिंग चे दातांच्या क्लीपांसकट फॅड आले ऑलरेडी ?
मला एक गोष्ट कळत नाही. Dental hygiene ठीक आहे पण एका समारंभासाठी केवळ दंतपंक्तींची ठेवण बदल्यासाठी एवढे कष्ट घ्यायचे, इतके कसे बदलले सर्व ?

आणि हो. वॅक्सिंग हा फारच जेंटल पर्याय आहे असे काही नाही. ऑबव्हियसली त्वचेवरचे केस असे उचकटून काढताना थोडे दुखणारच. पण त्यात काय. बायकांचा जन्म. करायलाच हवे ! अगदी ११-१२ वर्षांच्या छोट्या मुलींनीही करायलाच हवे. पण का ? त्यात काही खटकण्यासारखे वाटत नाही का ?

तुमच्या मतानुसार रेग्युलर वॅक्सिंगसाठी मुलींचे किमान वय काय असावे लोकहो?

बाय द वे.
मध्यंतरी कुठल्यातरी news channel बातमीदारांच्या बाबतीतला एक प्रयोग झाला होता. एक स्त्री अँकर आणि एक पुरुष अँकर. पुरुष अँकर ने एकच सूट वर्षभर घालून बातम्या दिल्या. लोकांना त्यात काही कळले ही नाही.
पण या उलट स्त्री अँकर ने असे केलेले चालेल का ? हे पहा.
http://www.theguardian.com/lifeandstyle/womens-blog/2014/nov/17/male-tv-...

केस उरलेच नाही का दुसर्‍या वेळा वापरायला??!!>>>> Proud केस बक्कळ हायीत, पण असला चिकटा कोण वापरेल? आणी दिवसभर केसाला गोमुत्राचा वास, यक्क!

मला वाटते की मागे आपण इंग्लंडमधल्या त्या कमर करकचुन आवळून ठेवणार्‍या पोषाखाबद्दल बोललो होतो इथेच माबोवर, <<<
आख्खा लेख आहे माझा.>>>>
नीरजा प्लीज लिंक द्या. मला तो लेख सापडला नाही.

Pages