Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो या गाण्यात तिचा पाय
अहो या गाण्यात तिचा पाय मुरगळणार मग ते दुखणे वाढत जाणार आणि त्यातुन पाय अधु होणार
असा सीन चा सिक्वेन्स ठेवला असेल.
(आणि पाय मुरगळ्ण्याच्या मागे मस्तानीच असेल असा संशय तिच्या मनात येणार आणि मत त्यातून सांस भी कभी बहू थी टाईप भांडण तिरस्कार जळजळीत कटाक्ष चारपाच वेळा कॅमेरा विविध अँगल मधून काशीबाईचा चेहरा बाजीरावचा चेहरा मागे बॅकग्राउंड मधे शुम्म्म्म्म ऽऽऽऽऽऽ वगैरे येणार ) काय डोकेबाज भंसाली आहे.
नशिब म्हणा की यावर केकता कपूर ने सिरिअल नाही काढली.
(No subject)
काय डोकेबाज भंसाली आहे
काय डोकेबाज भंसाली आहे <<
एवढा वेळ मी काय बोलून राह्यले?
मला आवडतो रिंगा रिंगा आणि
मला आवडतो रिंगा रिंगा आणि चेकमेट पण >>> येस्स्स रिया ! चेकमेट फार अगोदर बघितला आहे .
त्याची ट्रीटमेंट मस्त आहे . फ्लॅश्बॅक , आज , काल - मस्त उड्या मारतो चित्रपट.
रिंगा रिंगा कधीपसून बघयचा होता . जॉनीची नर्सरी र्हाईम्स मस्त
मलापण आवडले रिंगा रिंगा आणि
मलापण आवडले रिंगा रिंगा आणि चेकमेट दोन्ही.
नशिब म्हणा की यावर केकता कपूर
नशिब म्हणा की यावर केकता कपूर ने सिरिअल नाही काढली. <<
दोघांच्यात काय फरक बा?
केकता ने सिरीयल काढली तरी ती
केकता ने सिरीयल काढली तरी ती गुजराती ढंगानी साड्या नेसवेन दोघीना.
बराच फरक आहे. केकताचा भरोसा
बराच फरक आहे.
केकताचा भरोसा नाही ती बाजीरावला लढाईमधे जख्मी करून त्याची विस्मृती देखील घालवेल आणि मग तो मस्तानीच्या घरी जाईल. तिथे गाणे बजावणे होईल. इथे काशीबाई सर्व मंदिर फिर फिर फिरतील. त्यात तिच्या सासूचा जाच. मेरा बाजी आयेगा नविन डायलॉग काशीबाईच्या तोंडी. तिथे मस्तानी बरोबर बाजीराव आपली स्मृती (इराणी नव्हे) आणन्याच्या मागे स्वप्नात शनिवार वाडा दिसणे तलवारीचे खणखणात ऐकायला येणे.
बरेच काही होउ शकते
हा म्हणजे फक्त शिरेल न शिनुमा
हा म्हणजे फक्त शिरेल न शिनुमा इतकाच फरक आहे.
सक्रिय
सक्रिय
भंसाळी चा देवदास ...बाप्रे.
भंसाळी चा देवदास ...बाप्रे. लाखाचे बारा हजार. आधीच ती देवदासची स्टोरीच डोक्यात जाते मग तो सैगलबाबाचा असो दिलूभाईचा. त्यात पुन्हा भंसाळी बाबाचा हात फिरलेला .
असू द्या ! शांत व्हा! आपण चिड
असू द्या ! शांत व्हा! आपण चिड चिड करून काही उपयोग नाही.
ऑफिसात जरा चिडचिडले तर 'प्रियांका आप जरा चुप रहो! आपके वजहसे इतना अच्छा मूव्ही देखनेका मूड खराब हो रहा है! पता नही आप जैसे लोगोंकी क्या प्रॉब्लेम है! अच्छा कुछ ना देखा जाता है ना बर्दाश्त होता है! इतना सुंदर डान्स किया है प्रियांका चोप्रा और दिपिकाने... पर आप जैसे लोग कभी किसी चिज को अछा नही बोलेंगे! आपको देखना है तो देखो वरना चुप रहो ! हमारा मूड मत खराब करो! हम तो फर्स्ट डे फर्स्ट शो देखेंगे!' असे उद्गार ऐकायला मिळाले.
असो! काय आता
They deserve this trash!
They deserve this trash!
त्यांना कळणार तरी आहे का पण
त्यांना कळणार तरी आहे का पण की आपण कचरा पहातोय
पेशव्यांकडे हे असलं काही नव्हतं बाबा
आता बंगाल्यांवर काय गुजरली
आता बंगाल्यांवर काय गुजरली असेल याचा थोडाफर अंदाज येतोय.
मला रणवीर कपोर अॅज अ बाजीराव आवडलाय, पीसी कंप्लीट राँग चॉइस आहे. या पिचरची खरी कास्टिंग ह्रितिक अॅश राणी हीच असायला हवी होती. अजून धमाल आली असती.
अर्थापोपिक्चर हिट जाणारच आहे यात वाद नाही. (असं लोक सांवरीया, गुझारिश्च्या वेळीपण म्हनत होते. आमेन!)
असा कचरा असेल तर मी तर जाणार
असा कचरा असेल तर मी तर जाणार बघायला
आता बंगाल्यांवर काय गुजरली
आता बंगाल्यांवर काय गुजरली असेल याचा थोडाफर अंदाज येतोय.
>>>
+१
आणि चेन्नई एक्सप्रेसच्या वेळेला तमिळनाडूमधे ही लोकं ओरडत होते ते पटतंय
मला तर दीपिका रॉन्ग चॉईस
मला तर दीपिका रॉन्ग चॉईस वाटतेय .
काल कट्यार... पाहिल्यावर , कोणीतरी अम्रुता खन्विलकरला मस्तानी म्हणून कुठेतरी घ्यावं अस फार वाटतयं
मग सईला काशीबाई म्हणून घ्यावे
मग सईला काशीबाई म्हणून घ्यावे का?
प्रोमो बघून तरी मी
प्रोमो बघून तरी मी दिपिकाबद्दल बोलणार नाही. शाहरूख आणि रण्बीरसारख्या लोकांसमोर ती ग्रेट परफॉर्म करतेच. (अमिताभच्या तर तोडीस तोड उतरली होती पिकुमध्ये) त्यामुळे ती स्क्रीनवर मस्तानी म्हणून चमत्कार करू शकेल असं मला तरी वाटतंय. सेम अबाऊट रणवीर. त्यानं आजवर केलेल्या प्रत्येक पिक्चरमध्ये खास काम केलंय (व्यक्तीरेखेला समजून उमजून वगैरे) त्यामुळे तिथंही मला थोड्याफार आशा आहेत.
पीसीचा प्रॉब्लेम हा आहे की ती मराठी दिसत नाही, मराठी बोलू शकत नाही अथवा मराठी संस्कृतीबद्दल तिचा फारसा अभ्यास नाही (व्यक्तीरेखेसाठी हे सर्व करणं तिला आजवर आवश्यकही वाटलेलं नाही. हे दिपिका रणवीर दोघंही आजवर करत आलेले आहेत)
भन्सालीच्यागाण्याच्या टेकिंगचा अट्ट्॑अहास सोडला आणि केवळ प्रेमकहाणीमध्ये गुरफटून पडला नाहीतर चांगला पिक्चर नक्कीच बनवू शकतो.
हे दिपिका रणवीर दोघंही आजवर
हे दिपिका रणवीर दोघंही आजवर करत आलेले आहेत <<
नाही.
फाइंडिंग फॅनीमधे दिपिका कुठल्याही प्रकारे गोव्यातल्या खेड्यातली कॅथलिक मुलगी वाटू शकली नव्हती.
मला फक्त "रणबीर सिंग" एकुलते
मला फक्त "रणबीर सिंग" एकुलते एक कारण दिसतत्यं , हा चित्रपट बघण्याचे .
दीपिकाचे ते दुसरे गाणे,
दीपिकाचे ते दुसरे गाणे, डोक्यावर हॅट घालून आणि गिटारसारखे काहितरी घेऊन केलेय ते पण काहितरी विचित्रच वाटतेय..
मस्तानी बुंदेलखंड मधली होती ना ? मग कथ्थक शिकलेली असणार ना ? तसा काहितरी अभिजात नाच हवा होता तिथे.
गिटारसारखे काहितरी घेऊन केलेय
गिटारसारखे काहितरी घेऊन केलेय >>> मँडोलिअन असे काहीसे म्हणतात
नृत्य म्हणून ते उत्तम आहे.
नृत्य म्हणून ते उत्तम आहे.
पण....
मस्तानी बुंदेलखंडी नाचते भरतनाट्यम
काशीबाईच्या कोल्हाटणीला लाजवेल अश्या अदा.
रेमो डोक्यावर पडलाय. मग मनात विचार आला
अरे दिपिकाने तिच्या आईला विचारल अस्त तरी पिंगा म्हणजे काय कळल असत? तिची आई मुंबईतली मराठी आहे.
ते सर्व सोडल तरी भन्साळी गिरगावात वाढलेला.
या cinematic liberty वरून आठवल.
मन मोराचा कसा पिसारा फुलला सारख गाण आणि जयश्री गडकर सारखी नायिका
किती शालिनता आहे.
खानदानी पेशवीण असलेल्या
खानदानी पेशवीण असलेल्या काशीबाई मस्तानीबरोबर आयटेम लावणीवर थिरकताना पाहून डोळ्यांचे पारणे फिटले! त्या साड्याही शिफॉनच्या, जरदोसी, कुठल्याही अंगाने मराठी वाटत नाहीत :(, तसेच दोघीपैकी कोणीतरी आतून काळे लेगिंग्ज घातले आहेत ते एका कुठल्यातरी स्टेपच्या वेळी दिसून येतात!
अर्र चीकू, काशीबाईंचं डिझायनर
अर्र चीकू, काशीबाईंचं डिझायनर मंगळसूत्र राहिलंच.
आधी रेमोने वेगळ्या स्टेप
आधी रेमोने वेगळ्या स्टेप देवुन केल होत म्हणे, भन्साळीने रिशुट केल म्हणे गाण, सिनेमॅटीक लिबर्टी इतिहासाबाबत कशि घेवु शक्तो,? सगळ भव्य दिव्य करण्याच्या नादात भन्साळी बरच काही हरवुन बसलाय.
डिझायनर मन्गळसुत्र?म्या मिसल
बाकि सगळ्यावर जास्त खर्च झाल्याने इतिहासावर रिसर्च करायला पैसा उरला नाही वाटत?
अॅक्टिंग वगैरे सोडाच, दीपिका
अॅक्टिंग वगैरे सोडाच, दीपिका दिसतेय काय भयाण प्रोमोज मधे तरी
हा वरचा फोटोही बंडल आणि दीवानी मस्तानी होगयी , अतिशय दगडी तेलीण बंडल आणि अॅनिमिक! कॅरॅक्टर मधे तर मुळिच फिट नाही.
दोन्ही बायका फॅन्सी ड्रेस केल्या सारख्या दिसतायेत !
ऐश्वर्याच त्यातल्यात्यात मस्तानी वाटु शकेल कॅटॅगरी होती !
नशीब समझा सलमान खानला नाही बघावं लागलं बाजीरावाच्या रोप्पत !
अॅनिमिक >>>> अगदी बरोब्ब्बर
अॅनिमिक >>>> अगदी बरोब्ब्बर ! ती पालखी/मेण्यातून उतरून येते . एखाद्या भूतपटात , लेडी भूत(हडळ हा जरा वाईट शब्द झाला ) जशी निर्विकार आणि पांढर्या चेहर्याची दिसेल , तशी ती दिसते .
रच्याकने , हा महान डान्स कुठे पहायला मिळेल ?
तुनळीवर नक्की लिन्क सापडली नाही .
Pages