Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ख्वाडा कसा आहे ?
ख्वाडा कसा आहे ?
गेल्या आठवड्यात ,जॉर्ज
गेल्या आठवड्यात ,जॉर्ज क्लूनीचा, इनटॉलरेबल क्रुएल्टी पाहिला . जॉर्ज क्लूनी फारच आवडला .
टीनाच्या "अॅण्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर" वर भटकताना , आत्मधून ने सुचवलेला जॉक्लू चा "one fine day" नजरेस पडला .
या विकांताला निवांतपणे बघितला .
अगदी "वॉव ! आवडला " अस नाही म्हणता येणार , पण मस्त वाटला . चांगला टीपी झाला.
चित्रपटात फुल्ल बॉलिवूड मटेरियल आहे . हिरो हिरॉईनची भेट , सुरवातीला एक्मेकांशी न पटणं , लटकी भांडणं , उगाचच फुत्कारणं ,योगायोगान्ची मालिका , दोन गोंडस मुलं .
एका दिवसाची ही कथा . सिन्गल मदर मेलनी , तिचा चिमुकला मुलगा सॅमी , त्याची स्कूलमेट मॅगी आणि तिचे घटस्फोटीत वडील जॅक , काही अपरिहार्य कारणानी एकत्र येतात . मेलनी आनि जॅक मध्ये धूस्फूस होते. दोघान्च्या ऑफिसमध्ये "आज च्या आज हे व्हायला पाहिजे नाहितर नोकरी जाईल " अशी परिस्तिती निर्माण होते . त्याच वेळी दोघाना मुलाना ही सांभाळायचे असते . आपापसात काही तडजोडी केल्या जातात आणि मग ..... ...
दोन्ही मुलं फारच गोड आहेत.
पण जॉर्ज क्लूनीचा खेळकर , खट्याळ , प्रेमळ बाप हा चित्रपटाचा युएसपी आहे.
मुलगी त्या छोट्या बोक्याबरोबर खेळण्यासाठी हट्ट धरून बसते आणि त्याच्या बरोबर यायला तयार नसते .
तेन्व्हाचा तो सीन म्हणजे जॉक्लू - बापाच्या रोल मध्ये कहर आहे . तो तिच्याशी गप्पा मारतो , तिला समजावतो , ईतका क्युट वाटतो ना .
And they Live Happily .... ची
And they Live Happily .... ची कथा One fine day )१९९६) सारखी आहे. त्यात George Clooney, Michelle Pfeiffer आहेत.
ख्वाडा कसा आहे ? ख्वाडा खूप
ख्वाडा कसा आहे ?
ख्वाडा खूप चांगला आहे.
चित्रपटात फुल्ल बॉलिवूड
चित्रपटात फुल्ल बॉलिवूड मटेरियल आहे . >>> हिरो / हिरोईनला मुले असणे हे बॉलीवुडला पचवणे अंमळ जडच जाते. त्यातूनही केलच धाडस तर हिरो / हिरोईन बाबा / आईच्या भूमिकेत शिरणे महामुश्किल असते. अर्थात सन्माननीय अपवाद आहेतच.
अक्षयकुमारचा हॉलिडे पाहिला.
अक्षयकुमारचा हॉलिडे पाहिला. चांगला वाटला. एकुण चित्रपट बरीशी पकड ठेवतो.
गाणी नसती तरी चालले असते असे सारखे वाटत राहिले. बारा च्या बारा दहशतवादी एकाचवेळी उडवणे हा कथेतला भाग पण चांगला जमला आहे.
शेवटी 'तू ससपेन्स मे ही मर' म्हणून दहशतवाद्याला सहजतेने उडवून टाकणे सही आहे. दहशतवाद्यांची किंमत दाखवून टाकली आहे या सिन मध्ये.
त्याचे देशप्रेमाचे सर्व चित्रपट आवडतात. बेबी पण आवडला होता.
या चित्रपटांचा शेवट आश्वासक आहे. आणि बहुदा मला तेच पाहायला आवडते.
तसाही तो एकटाच असे असे चित्रपट देणारा...
अक्षयकुमारकडे हिरो असण्याचे सर्व गुण आहेत.
असाही दुष्काळग्रस्तांना मदत करणारा तो तसा पहिला अभिनेता आहे असे मला वाटते. त्यामुळे रियल लाईफ हिरो आहेच.
अक्षय माझा पन
अक्षय माझा पन आवडता..
त्याच्याकडे गट्स आहेत पण तो ते वापरत नै अस बरेचदा वाटत.. बाकी हॉलीडे मी मोठ्या स्क्रिनवर पाहिला होता... बहोत मज्जा आली होती बघताना..
बेबी अजुनही बघायला नै मिळाला.. त्याला वेटींग लिस्ट वर ठेवलय
अक्षय माझा पन आवडता..>> शिवाय
अक्षय माझा पन आवडता..>> शिवाय पूजा रवीना शिल्पा ट्विंकल! मॅनोंका मॅण है वह. पण सिंग इज ब्लिन्ग च्या जाहिरातीत अक्षय कुमारचे पाय देखील वॅक्स केलेले आहेत. हे चुकीचे दिसते. सरदारजी जनरली हेअरी अस्तात ना. हा अगदी मेट्रो से. फिल्म स्टार सरदारजीच्या वेषात दिसतो. तो सिनेमा बघायची हिंमत नाही.
शिवाय पूजा रवीना शिल्पा
शिवाय पूजा रवीना शिल्पा ट्विंकल! >> यातली मात्र एक बी पोरगी नै आवडत.. कितीही आवडता असला तरी बकवास फिल्म्स बघण नै होत माझ्यानं .. तरी मी मोठ्या हिमतीन क्खिलाडी ७८६ आणि बॉस सारखे सिनेमे पाहिले.. ३ ४ दिवस कोमात गेली होती मी...
प्रिचो आणि दिपिकाच पिन्गा
प्रिचो आणि दिपिकाच पिन्गा गाण्याच पोस्टर बघुन भन्साळीने कुठला इतिहास वाचलाय हाच प्र्श्न पडलाय मला, सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून काहीही दाखवायच... बहुधा प्रिचोला एकतरी गाण द्यायच प्रेशर असणार त्याच्यावर..
मी इतिहासातली जाणकार नाही पण काशिबाई आणी मस्तानी एकत्र नाचल्या असतील हे काय पटत नाय !
'कट्यार' पाहिला. अप्रतिम..!!
'कट्यार' पाहिला.
अप्रतिम..!!
बहुधा प्रिचोला एकतरी गाण
बहुधा प्रिचोला एकतरी गाण द्यायच प्रेशर असणार त्याच्यावर..
मी इतिहासातली जाणकार नाही पण काशिबाई आणी मस्तानी एकत्र नाचल्या असतील हे काय पटत नाय ! >>>
शेवटी भंसालीने मस्तानी आणि काशिबाई एकत्र नाचवल्या . पिंगा या नविन गाण्यात दिपिका आणि प्रियांका एकत्र येत आहे
इतिहासाच्या नावानं चांगभलं
भन्साळी बाबाने माधुरी आणि
भन्साळी बाबाने माधुरी आणि ऐश्वर्या ला एकत्र नाचवण्याच्या प्रेशरपायी पारो आणि चंद्रमुखी या कधी न भेटलेल्या पात्राना एकत्र नाचवले होते हे विसरलात काय तुम्ही पावणे ?
भन्साळी बाबाने माधुरी आणि
भन्साळी बाबाने माधुरी आणि ऐश्वर्या ला एकत्र नाचवण्याच्या प्रेशरपायी पारो आणि चंद्रमुखी या कधी न भेटलेल्या पात्राना एकत्र नाचवले होते हे विसरलात काय तुम्ही पावणे ?>>> तो इतिहास नव्हता. कथा होती. ही इतिहासातली पात्रं आहेत.
सहेली , भंसाली बाबा काहीही
सहेली , भंसाली बाबा काहीही करू शकतो असे म्हणायचे होते मला. त्याला शिणेम्याटीक लिबर्टी म्हणतात असे लोक्स ! इतिहासाशी प्रामाणिक राहणे ही बेनेगल, निहलानी, अॅटेनबरो यांची जबाबदारी
इतके दिवस विनोद म्हणून
इतके दिवस विनोद म्हणून "भन्साली काय मंगळागौरीच्या खेळामध्ये मस्तानी आणि काशीबाईला फुगडी घालायला लावणार का?" असं विचारलं जाई. आता विनोद राहिला नाही.
आताच नेटवर "दिस इज ट्रॅडिशनल लावनी सो बोथ लेडीज आर वेअरिंग नव्वारी सारीज इन अ टिपिकल वे" असे वाक्य वाचले आणि दिवस सार्थकी लावला.
आज झी मराठीवर 'डबल सीट'
आज झी मराठीवर 'डबल सीट' बघितला. आवडला मला. काही डायलॉग फार सुंदर होते. कामं सर्वांनीच छान केली. मुक्ता तर अप्रतिम.
काशी बाई लावणी करणार???
काशी बाई लावणी करणार??? भन्साळी तेरा जवाब नही.
हो ना.. का ही ही हा भन्साळी
हो ना.. का ही ही हा भन्साळी
विकांताला , दोन मराठी चित्रपट
विकांताला , दोन मराठी चित्रपट पाहिले : गैर आणि रिन्गा रिन्गा .
गैर : मराठितला पहिला चकचकित चित्रपट वगैरे काहितरी जाहिरात झाली होती . खरच चकचकित आहे .
अम्रुता खानविलकर खूप छान दिसते . ग्लॅमरस वाटते.
संदीप कुलकर्णी हा काही डॅशिंग,हॅण्ड्सम , यंग वगैरे वाटत नाही. पण तो ही खपून जातो .
सगळ्यात वाईट वाटत ते अंकुश चौघरी बद्दल. तो इतका वाईट दिसतो .
चेहरा गोरा आणि ओठ लिपस्टिक लावल्यासरखे लाल .
काही काही फेस ऑफ्फ सीन्स मस्त आहेत. चित्रपट शेवटापर्यत खिळवतो .
शेवट मात्र अनाकलनीय . अ आणि अ कॅटेगरीतला.
रिन्गा-रिन्गा :
) .
सगळ्यान्च्या भूमिका त्यान्च्या ईमेजला छेद देणार्या वाटल्या .
भरत जाधव , संतोश जुवेकर , अजिन्क्य देव ( हा माणूस अजूनही कसला फिट दिसतो
सोनाली कुलकर्णी ही नेहमीची बायकोच्या भूमिकेत , पण चांगला प्रभाव पाडते.
रहस्याचा अंदाज येतो ,पण तरी शेवट काय असेल याचा विचार करत असतो आपण .
अगदी ग्रेट नाहीयेत पण विकांताला काहेतरी वेगळे, रहस्यमय बघायचे असेचेतर प्रयत्न करू शकता.
मला आवडतो रिंगा रिंगा आणि
मला आवडतो रिंगा रिंगा आणि चेकमेट पण
पिंगा बघितलात का ? दोघी सुंदर
पिंगा बघितलात का ?
दोघी सुंदर दिसल्यात, सुंदर नाचल्यात, साड्यांचे रंग छान आहेत, फोटोग्राफी छान आहे..
पण हाय रे दैवा..
पिंगा कसा घालतात हे रेमो ला माहीत तरी आहे का ? पेशवाई काळात तमाशा कलाकार तरी अश्या साड्या नेसत होत्या का ?
गाण्याची काय टोटलच लागत नाही. पहिल्यांदा संध्याच्या दोन मराठी गाण्यांचे मुखडे ढापले आहेत. मग गाणे कुठे भरकटलेय त्याचा पत्त्याच नाही.
पेशवाई लावणी सादर करणारे मधु कांबीकर सारखे कलाकार अजूनही आहेत ( तिची नेसली पितांबर जरी.. बघितली का ? ती खास कार्यक्रम करत असे ) तिच्याकडून दिपि़काला अदा शिकवता आल्या असत्या.
काशीबाई नाचल्या असतील यावर माझा विश्वास नाही बॉ. हे गाणे सिनेमात बाजीरावाचे स्वप्नरंजन असू दे रे बाबा...
नाहीतर रणवीरला पण भन्साळी नाचवेल, काय नेम नाय !!!
त्या साड्या आहेत? मला वाटलं
त्या साड्या आहेत?
मला वाटलं सलवार-पदर-चोळी अशी काहीतरी नवीन स्टाइल डिझाइन केलीये पेशवाईतल्या आयटम साँगसाठी...
सो इनोव्हेटिव्ह!
पहिल्यांदा संध्याच्या दोन
पहिल्यांदा संध्याच्या दोन मराठी गाण्यांचे मुखडे ढापले आहेत. <<
संध्याची गाणी?
होनाजी बाळा या शाहिरांच्या लावण्या आहेत त्या. हे होनाजी बाळा नक्की लक्षात नाही पण बहुतेक तरी दुसर्या बाजीरावाच्या काळातले.
हळूच सत्तरेक वर्ष मागे नेले बहुतेक त्यांना.
इतना कौन देखता है!
द ट्रीटमेंट इज सो इनोव्हेटिव्ह!!
GaaNee sandhyavarach chitreet
GaaNee sandhyavarach chitreet jhaaleet, aaNi pingaa ga poree pingaa, he paN honajee baaLaanche aahe ka ?
GaaNee sandhyavarach chitreet
GaaNee sandhyavarach chitreet jhaaleet, >>पण लटपट लटपट ही पारंपारिक लावणी आहे. "संध्याची" नाही.
तुम्ही म्हणता म्हणजे तसेच
तुम्ही म्हणता म्हणजे तसेच असले पाहिजे. व्ही शांताराम यांनी होनाजी बाळांना संध्यावर चित्रित करण्यासाठी लावणी लिहून द्या असे सांगितले असेल.
लटपट लटपट ही होनाजी बाळा
लटपट लटपट ही होनाजी बाळा यांनी व्ही शांताराम यांच्या सांगण्यावरून संध्यासाठी लिहिलेली लावणी.
पिंगा ग पोरी पिंगा हे पारंपरीक खेळातले संध्या यांच्यावर चित्रित करण्यासाठी परंपरेने लिहिलेले गाणे.
पीसी एक नंबर दिसलीये आनि
पीसी एक नंबर दिसलीये आनि नाचली पन आहे.हे गाण खास तिचच.
पीसी एक नंबर दिसलीये आनि
पीसी एक नंबर दिसलीये आनि नाचली पन आहे.हे गाण खास तिचच. <<
बघा म्हणजे...
सल्वार-पदर-चोळी इतका इनोव्हेटिव्ह टेक.. काशीबाईचा अधू पाय पण गडबडत नाही.. त्यात तेव्हासाठीच्या भविष्यकाळातून आयात केलेल्या शाहिरांच्या लावण्या....
सो सो सो इन्नोव्हेटिव्ह!
Pages