चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोनाक्षी सिन्हा चालली असती काशीबाई म्हणून, प्रियांकापेक्षा जास्त शोभून दिसली असती.
विद्या बालनही चालली असती.
मस्तानीच्या रोल मधे 'बोल बच्चन' मधली दुसरी नायिका, प्राची देसाई नाव बहुतेक..ती चांगली दिसली असती असं माझं मत!

हडळ वाईट शब्द म्हणून लेडी भूत >>> सिंडी ताई , अग, वाईट म्हणजे असं कोणाला पटकन हडळ म्हटल्यावर जरा कससच वाटतं Wink
म्हणून जरा सोफिस्टिकेटेड .

बुंदेलखण्डात कथ्थक? ये बात कुछ हजम नही हुई. मुजर्‍यासाठी सुपीक आहे ती जमीन.
पदुकोणीण आणि चोप्रीण बहुधा चलनी नाणी म्हणून घेतली असतील...

ते पिंगा गाणं पाहीलं. कुठेच काही पेशवेकाळातलं वाटत नाही. Uhoh खरच काहीही आहे. आणि मुळात त्या दोघी अशा नाच करणं म्हणजे पण कैच्याकै.
आणि ते दिपीकाचं फेटा(?) घातलेलं दुसरं गाणं पण पाहीलं. त्यात ती फार सुंदर दिसतेय ( म्हणजे मस्तानीची स्किन अगदी नितळ होती वगैरे दंतकथां प्रमाणे तीची स्किन दिसतेय. ) पण तो फेटा , ड्रेस आणि मुख्य म्हणजे महालही मोंगलाई वाटतोय पेशवाईतला वाटत नाहीये. फेटा काहीतरीच दिसतोय.

फेटा काहीतरीच दिसतोय.> आणि ती नाकातली रिन्ग ही .
त्या मोठ्या रिन्गमुळे तिचा चेहरा जवळजवळ झाकला जातोय .
तिच हसणं दिसतच नाही . ती रिन्ग नसती तर ती आणखी छान दिसली असती .

सायो ताई धन्यवाद . अहो- जाहो नको गं

असू द्या, आता भन्सालींनी एवढा खर्च केलाय तर वा, वा म्हणा त्याला. होतं असं. आता त्यांनी एक डिस्क्लेमर टाकून द्यावा की पिक्चरचं नाव जरी ऐतिहासिक गोष्टीवर बेतलेलं असलं तरी मूळ कथेशी आमचा संबंध नाही.

रॉबीन, मुजरा आणि लावणी दोन्ही कथ्थक चा बेस असलेली असतात.

भन्साळीने पेशवाई पंगतीत काय दाखवले असेल ?

पालक पनीर, ढोकळा, पवभाजी ???

आणि बावनखणी मधे कोण असेल, कतरीना कि करीना ??

काही कल्पना केल्या तरी त्याची धाव पुढेच असणार.

काशीबाई आणि मस्तानी नाचल्या असतीसुद्धा एकत्र आपल्याला काय माहिती.. कोणाच्या तरी मंगळागौरीत वगैरे... असेही प्रोमोतल्या आख्ख्या गाण्यात एकही पुरुष दाखवलेला नाही... Happy

कपडेपट मात्र जरा गंडलाय...

हिम्या, मंगळागौर खेळू देत की, पण मंगळागौरीत भरतनाट्यम आणि लावणीच्या स्टेप्स कायकू रे?

रेमो कोरीओग्राफर आहे हे पाहून माझ्या आशाच मावळत्या होत्या. इथे वैभवी मर्चंट किंवा सरोज खानच हवी होती.

वैभवी हवी!

नॉर्मली पिंग्यात डोके गोल फिरवतात, कंबर स्टेशनरी असते. सरोज खानने डोके स्टेशनरी ठेवून भलत्या अवयवांना पिंगा घालायला लावला असता. ती नको अजिबात!

पिन्गातल्या बर्‍याचश्या स्टेप्स डोला रे डोला रे मधल्या सारख्या आहेत. तरीही बिग नो फॉर धिस सॉन्ग. काहिही कॅटॅगरीतल आहे गाणं.
आणि टीव्हीवर बातम्यांमधे दाखवत होते बाजीराव मस्तानीचे नविन मराठमोळं गाणं रिलिज म्हणुन. एक पिंगा शब्द सोडला तर काहीही मराठमोळं नाहिये त्यात Wink
दिपिका आणि प्रियांका बघवत नाहिय्त अगदीच.

पण रणवीरसिंग फारच मस्त दिसलाय त्या दिपिकाच्या टोपीवाल्या गाण्यात. वाटतो अगदी बाजीराव. त्याच्यासाठी बघितला तर बघिन मी सिनेमा टीव्हीवर Lol

गाणं मराठी तर एखादी मराठी कोरिओग्राफर पण चालली असती की फक्त ती उड्या मारायला लावनारी नको.

पिंगा रिलीज करुन वाटच लावली सगळ्या पिक्चरची
पण रणवीरसिंग फारच मस्त दिसलाय त्या दिपिकाच्या टोपीवाल्या गाण्यात. वाटतो अगदी बाजीराव. त्याच्यासाठी
बघितला तर बघिन मी सिनेमा टीव्हीवर >>+१

सरोज खान तरी मराठी लोकनृत्यात कुठे एक्स्पर्ट आहे ?लटके झटके कोरिओग्राफीच करते मोस्टली , माधुरीचं 'कोल्हापुरसे आयी हूं' अगदीच गंडलय !
मुळात या बायकांचं गाणं नकोच होतं , अगदीच मस्ट होतं तर मराठी कोरीओग्राफर हवी होती, मंगळागौर टाइप डान्स मधे एक्स्पर्ट !

मी काल पाहिले पिंगा. काळ, पात्रे, त्यांचा एकमेकांशी संबंध वगैरे तर गेलेच आहे खड्ड्यात, पण निदान जे दाखवले ते जरा नाविन्यपुर्ण दाखवले असते तर निदान प्रेक्षणिय तरी वाटले असते. हे तर जे आधीच पाहिलेय तेच परत पाहतोय असे वाटते. दिपिकाच्या सगळ्या स्टेप्स रामलिलामधल्या आणि प्रियांकाच्या दिल धडकने दो मधल्या. काय हे....

उडीबाबा !

सगळ्यात वाईट्ट हे की सगळ्या देशात असा संदेश जाईल की पेशव्यांच्या बायका असल्या छचोरपणे नाचत असत...

सगळ्यात वाईट्ट हे की सगळ्या देशात असा संदेश जाईल की पेशव्यांच्या बायका असल्या छचोरपणे नाचत असत... <<
काहींना उलटे बरे वाटेल की याने.

भन्साली ने सुरुवातीला 'या चित्रपटाचा आणि तो ज्या विषयावर आहे त्या खर्‍या कहाणीचा काहीही संबंध नाही' असा डिसक्लेमर दाखवायला हवा.
रणवीर साठी पाहेन हा टिव्ही वर आल्यावर.
दिपीकाची टोपी जरा विचीत्र वाटते खरी. ती कोणत्याच भारतीय प्रांतातली वाटत नाही त्या गाण्यात.

पण मी म्हणते की या दोघिंना नाचवण्यापेक्षा एखादा मंगळागौरीचा खेळ करणारा प्रोफेशनल ग्रुप घेतला असता तिथे तरी चालल असत. पण भंसाळीला कोण समजावणार??? त्या दोघिंना एकत्र नाचवण्याच्या हट्टापायी सगळा इतिहास चुलित घातलान त्याने :नाक मुरडणारी बाहुली:

डिस्क्लेमरच विचाराल तर भंसाळीला कुठे कुठे आणि काय काय डिस्क्लेमर लावावे लागतील देव जाणे. सिनेमाच नाव, कथा, त्यातली पात्र, वेष्भुषा, संवाद, स्थळ, भाषा .... इत्यादिंचा दुरान्वयेही संबंध नाहिये सत्यतेशी तर सोडाच पण एकमेककांशी पण Wink Lol

Pages