Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
करेक्ट... चित्रपटातल्या
करेक्ट...
चित्रपटातल्या पात्रांची नावे सोडल्यास इतिहासाचा आणि चित्रपटाअचा काहीही संबंध नाही हा एक डिसक्लेमर पुरेसा आहे. एकदा हे मान्य केले की मग पिंग्याचा काहीही त्रास होत नाही. तसाही मला झाला नव्हताच, कारण भंसालीकडुन माझ्या काडीच्याही अपेक्षा नाहीत. काही लोक कारण नसताना हाईप्ड करुन ठेवतात स्वतःला. हा इसम त्यातलाच. त्याच्यात जी काही थोडीफार प्रतिभा होती ती आता संपलीय. आता असेच येत राहणार त्याच्याकडुन.
खामोशी आणि ब्लॅक वगळता
खामोशी आणि ब्लॅक वगळता सगळीकडे भव्य दिव्य सेटस आणि चकचकितपणा.
भव्य दिव्य सेटस आणि
भव्य दिव्य सेटस आणि चकचकितपणा. >> ते फेटेवालं गाणं चक्क मुघले आझम मधलं 'प्यार किया तो डरना क्या' वरुन उचललेलं वाटतंय. आरसे महाल. तीची साईड बिंदी आणि कृष्णधवलला साजेसे वाटावे असे अगदी फिके रंगही. शेवटी सगळ्या आरशात दिसणारी मधुबाला पाहुन अकबराला त्रास होतो इथे काशिबाईला त्रास होतो!!
गुजारीश मधेही नव्हते ना सेट्स
गुजारीश मधेही नव्हते ना सेट्स वगैरे ?
हो गुजारिश विसरलेच.
हो गुजारिश विसरलेच.
हो.. दिवानी मस्तानी बघताना
हो.. दिवानी मस्तानी बघताना तेच आरसे आणि प्यार कियाची आठवण येत होती.
गुजारिश आवडलेला. चित्रप्ट आपटला पण कथा, अभिनय आणि संगित चांगले होते.
काय गंम्मत आहे बघा, कुणालाही
काय गंम्मत आहे बघा, कुणालाही त्या फेटेवाल्या गाण्याचे शब्दही आठवत नाहीत !!!
तिने मोठ्ठ्ठी नथ घातलीय आणि
तिने मोठ्ठ्ठी नथ घातलीय आणि हातात विनादांड्याच्या तंबोर्यासारखे काही घेतलेय आणि शूटिंग जरा ग्रे/बिज्/मळक्या बॅकग्राऊंड वर आहे आणि रणवीर क्युटी दिसतोय इतकेच लक्षात राहिले ट्रेलर पाहून :):)
आत्ता आठवलं: टाईड का कोणट्यातरी धुलाई साबण जाहिरातीत तो पांढरा पट्टा फिरण्या आधी धुत असलेले कपडे आणि वाळत घातलेले कपडे मस्तानी च्या कॉस्च्युम च्या रंगाचे असतात. म्हणून सारखं मला नंतर कोणीतरी 'चौक गये?' म्हणेल असं वाटत होतं
मी_अनु .. सगळीकडेच पिंगा वर
मी_अनु ..
सगळीकडेच पिंगा वर दंगा घालतायत!
गुजारिश मधे ऐश्वर्या आणि
गुजारिश मधे ऐश्वर्या आणि हृतिक दोघही आवडलीत.
ते टोपीतल गाणं पुन्हा पहावच लागेल आता, मेंडोलिन, क्युटीपाय बदिपिका, आरसे काय काय पहायच राहिलय.
दिवानी मस्तानी गाणे आहे ते.
दिवानी मस्तानी गाणे आहे ते. मला चालही लक्षात आहे.. मै दिवानी मै दिवानी मस्तानी हो गयी. भंसालीचा इतिहास वाचुन मीच दिवानी मस्तानी झालेय...
रच्याकने, तिचा ड्रेस्स आवडला त्या गाण्यातला. मस्त लेअर्ड टॉप आणि खाली पॅलॅझो पॅण्ट्स. पाहायला आवडला. असले काही कधीही विकत घ्यायचे चान्सेस नाहीयेत. आणि हो, चित्रपटाचा काळाशी कसलाही संबंध नसल्याने असल्या फॅशन तेव्हा होत्या का हे विचारु नका प्लिज.
वरती लटपट गाण्याचा उल्लेख
वरती लटपट गाण्याचा उल्लेख झाला म्हणून युट्युबवर हे गाण पाहिल, लताचा स्वर्गिय आवाज , होनाजी बाळाचे शब्द हे सगळ उत्तम असताना... जमेल तशि अर्धी वाकत , सतत चेहर्याचा स्नायु ताणून सन्ध्या त्याच्यावर जे काय अन्ग हालवते (त्याला न्रुत्य म्हणणे अवघड आहे) अरारा!..
प्राजक्ता संध्या हँगओवरमध्ये
प्राजक्ता
संध्या हँगओवरमध्ये नाचतेय असं वाटतंय.
सायो! अगदी अगदी!
सायो! अगदी अगदी!
प्राजक्ता
प्राजक्ता
प्राजक्ता, ते संपुर्ण गाणंच
प्राजक्ता, ते संपुर्ण गाणंच अफाट विनोदी कोरिऑग्राफ केलय. हा नाच / अभिनय होता? बापरे!!! संध्या (कधीच नाही आवडली) आणी ते बाकीचे काय अफाट मर्कटलीला करतायेत. ते जर ओरिजिनल गाणं असेल, तर भंसाळी ला काय बोल लावणार?
मी पुन्हा पाहिलं. प्रचंड
मी पुन्हा पाहिलं. प्रचंड विनोदी आहे. काय ते तिचे डोळे नी काय ती माना वेळावतेय. शेवटी शेवटी तर त्या बसलेल्या दोघातिघांच्या अंगावर ऑलमोस्ट पडलीच. ह्यालाच अॅक्टींग म्हणत असावेत. संध्याची एकमेव जमेची बाजू म्हणजे व्ही. शांतारामची बायको असणं. त्याच्या जोरावर केले थोडेफार पिक्चर तिने.
काय अशक्य नाच आणि अभिनय
https://www.youtube.com/watch?v=xODpqB8cuzo
संध्याची मान कायम खुंटीला
संध्याची मान कायम खुंटीला टांगल्यासारखी लटकते आणि अस्थिर असते !
चांगली लटपट तर नाचते आहे !
चांगली लटपट तर नाचते आहे !
धन्यवाद मानायला पाहिजे की
धन्यवाद मानायला पाहिजे की पिंगा मधे मागे नाचायला आज-काल सगळ्याच गाण्यात असतात तश्या गोर्या नाही घेतल्या.
बाकी गाण आणि नाचही काही खास वाटत नाही.
कारमधे लावता येणार्या
कारमधे लावता येणार्या स्प्रिंगच्या बाहुलीत देवाने जीव ओतला व संध्याचा जन्म झाला यावर माझा ठाम विश्वास आहे.
केपी
केपी
कारमधे लावता येणार्या
कारमधे लावता येणार्या स्प्रिंगच्या बाहुलीत देवाने जीव ओतला व संध्याचा जन्म झाला यावर माझा ठाम विश्वास आहे.>>
अगदी अगदी.....
खालील दुव्यावर पण पाहा....मंगळागौरीच्या गाण्यात सुद्धा लावणीत नाचावे तशी मान हालवते संन्ध्याबाई
http://www.huffingtonpost.in/2015/11/16/pinga-bajirao-mastani_n_8573428....
खालील दुव्यावर पण
खालील दुव्यावर पण पाहा....मंगळागौरीच्या गाण्यात सुद्धा लावणीत नाचावे तशी मान हालवते संन्ध्याबाई
\
ती खरेच तमाशाकरीण असते म्हणुन मंगळागौरीतही तमाशासारखे नाचते. कथा माहित नसताना टिका करु नका हो. संध्या मलाही कधी आवडली नाही, बहुतेक व्ही शांताराम सोडून कोणालाच आवडली नसावी त्यामुळे तिचे नावही कुठे ऐकु आले नाही नंतर. पण दिग्दर्शक जे सांगेल ते अगदी जशास तसे करणारी ती एक गुणी अभिनेत्री होती.
संध्याला सोडा आता सारखं सारखं
संध्याला सोडा आता
सारखं सारखं त्याच झाडावर काये
बाजी-मस्तानी-पिंगा पण सोडा.
बाजी-मस्तानी-पिंगा पण सोडा.
धाग्याचं नाव वाचा.
वरती लटपट गाण्याचा उल्लेख
वरती लटपट गाण्याचा उल्लेख झाला म्हणून युट्युबवर हे गाण पाहिल, लताचा स्वर्गिय आवाज , होनाजी बाळाचे शब्द हे सगळ उत्तम असताना... जमेल तशि अर्धी वाकत , सतत चेहर्याचा स्नायु ताणून सन्ध्या त्याच्यावर जे काय अन्ग हालवते (त्याला न्रुत्य म्हणणे अवघड आहे) अरारा!..>>>> +१
तिचे लटपट चालणे, लटपट न वाटता एखाद्या दारूने झिंगलेल्या व्यक्तीचे चालणे जास्त वाटते.
पण हे गाणे बघितल्यावर खूप खूप आवर्जून वाटले की कुणा चांगल्या कोरीओग्राफरने उत्तम रीतीने हे गाणे बसवावे! It deserves a great presentation!
विनोदी नाचण्याचा विषय निघालाच
विनोदी नाचण्याचा विषय निघालाच आहे तर राजकुमार (जानी फेम) चे झनक झनक तोरी बाजे पायलिया किंवा मिलो न तुअ तो हम घबराये ह्या गाण्याचे पडद्यावर केलेले खून आवर्जून पहावेत. बिचार्या मन्नाडे / लता वगैरे मंडळींनी 'मुंबईहून बालिष्टर आणून हाय-कोडतापर्यंत धिंड' कशी नाही काढली कुणास ठाऊक?
अश्या नाचांचा आनंद घ्यायचा
अश्या नाचांचा आनंद घ्यायचा असेल तर गाणे म्युट करुन बघावे :)) गाणं चालु असेल तर नाचावर च लक्श्य उडत
Pages