चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पाहिला काल. मला आवडला. सगळेच प्रेडिक्टेबल असले तरी मजा आलि पाहताना. फ़क्त मध्ये मध्ये फ्लैशबैक आहे हे कळत लक्षात येत नव्हते. हीरोइनचा ड्रेस तोच दिसला की ट्यूब पेटत होती

कैफ़े। spill the beans
वैभव छे आड़नाव tatwawdi असे सुरवात आणि शेवट दोन्ही वेळेस लिहिलेले. ते तत्ववादी ऎसे वाचायचे हे ईथे वाचल्याने कळले. मला हिरो जास्त आवडला..

मी काल बेबी बघितला.. मस्त थ्रिलर आहे. छोट्या छोट्या रोल्ससाठीपण कसबी कलाकार निवडलेत. ( मला तो इंजिनीयर मुलगा झालेला कलाकार फार आवडला, सुंदर अभिनय केलाय त्याने ) अनेक पुरुष कलाकारांच्या गर्दीत दोन्ही स्त्री कलाकारही चांगल्याच लक्षात राहतात.

तुर्की, नेपाळ आणि सौदी मधले चित्रण सुरेख. या तिन्ही देशातले पब्लिक त्याच देशातले वाटले ( सौदीत चित्रित झालेला पहिलाच भारतीय चित्रपट असावा हा )

अनेक बाबतीत तपशीलात बारीक लक्ष दिले असले तरी हॉस्पिटलच्या वातावरणात घोळ घातलेत. स्कालपेल, सिरींज अश्या उघड्यावर पेशंटच्या बाजूला ठेवत नाहीत. अक्षयला जी जखम होते, त्यावर एक डॉक्टर इलाज करताना दाखवलाय, पण कुठलाही डॉक्टर त्यावर टाकेच घालेल, ती जखम वाहती ठेवणार नाही.

पण बाकी सर्वच वातावरण निर्मिती अस्सल आहे.

कट्टीबट्टी तयार होताना फार रेंगाळला असावा बहुतेक. कशातच इंटेग्रिटी नाही. क्वीन आणि तनू वेड्स मनू डोक्यात ठीऊन कंगनाला बघायला जातो आपण आणि अतिरेक करत असलेला असह्य इम्रान्खान पदरात पडतो. कंगना जेवढी दिसते तेवढीही दुसरीच कुणीतरी वाटते. आजकाल फॅशन आहे म्हणून करायचं असल्यागत डाऊन टू अर्थ आणि रियालिस्टिक, रिअल लाईफ फ्रेंडली सीन्स घ्यायच्या नादात सारंच प्रकरण फार मिडिऑकर करून ठेवल्यागत आहे. धड क्लासिक फिल्मी नाही आणि धड रियलही. फ्लॅशबॅक तंत्राचा वापर फारतर मध्यंतरापर्यंत कसाबसा खिळवून ठेवतो. मंध्यतरानंतरचा पीळ तर असह्य आणि अविश्वसनीय.

कट्टी बट्टी खूप ग्रेट असा काही नाहीच. पण जितके निगेटिव्ह रिव्ह्यू आलेत, तेव्हढाही वाईट नाही वाटला. एक रिव्ह्यू वाचला त्याचं शीर्षक आहे "Boy meets girl and together they bore us".
च्यायला ! इतकाही टॉर्चर नाहीये बरं ? इम्रान डोक्यात जातो. कंगना खास नाही. पण दोघे मिळून अगदी पकवतात असंही नाहीय. हे जर पकवणं असेल, तर 'हीरो' पाहिल्यावर आत्महत्या करायला हवी होती !

कट्टी बट्टी खूप ग्रेट असा काही नाहीच. पण जितके निगेटिव्ह रिव्ह्यू आलेत, तेव्हढाही वाईट नाही वाटला.>> Pasand apni apni. You have given one star for Welcome Back. But it was a enjoyable movie definitely deserves 2.5 stars.

वीकांताला यू टयूब वर फाउल प्ले नावाचा मजेशीर सिनेमा पाहिला. रसिकांची लाड की गोल्डीहॉन
व शेवी चेस. एक मर्डर होनार असतो. वगैरे प्लॉट आहे. सिनेमात अविस्मरणीय असा एक सीन आहे तो
डडले मूर वर आहे. तिचया पाठी व्हिलन चे लोक लागलेले अस्तात. ती बार मध्ये शिरते व त्याला मला आपल्या घरी घेउन जा असा हट्ट करते. तो हुरळतो व त्याचे एक खास पॅड असते तिथे हे येतात.
हिचे लक्ष पूर्ण त्या व्हिलनच्या लोकावर असते व तो ड्रिंक देतो तर ती घेते व काही बाही उत्तरे देत असते
तेव्ढ्यात तो रंगी बेरंगी दिवे, सॅटर्डे नाइट फीवरचे स्टेइंग अलाइव्ह गाणे, वर आरसा व दिवे असलेला भिंतीत लपवलेला बेड आणि इतर तत्सम खेळणी वगैरे तयार करतो व अति उत्साहात असतो. व्हिलनचे लोक्स गेल्यावर हिचे लक्ष त्या सर्व सेटिंग कडे जाते व ती त्याला तुझे डोके ठिकाणावर अहे ना असा लुक व भाषण देते. हा फारच एंबरॅस होतो व गडबडीत सर्व सेटिंग लपवायला जातो. एक हवा भरलेली भावली उडते. वगैरे. फारच विनोदी सीन काही व्हल्गर नाही आहे. क्लायमॅक्स पण छान आहे.

तसेच एक २००१ अ स्पेस ट्रॅवेस्टी नावाचा विनोदी सिनेमा भेटला. एलिअन्स नी अमेरिकन प्रेसीडेंट चे
क्लो न बनवून व्हाइट हाउसात ठेवले आहे. खरा प्रे, चंद्रावर तुरुंगात आहे. त्याला सोडवायला
एजंट जातो इत्यादि.

डबल सिट बघितला, आवडला, कथेत नाविन्य नसल तरी उत्तम अभिनयावर चित्रपट तोलला गेलाय, मुक्ता उत्तम अभिनय करते यात नविन काहिच नाही, मला अन्कुश पहिल्यादा खुप भावला, उत्तम लुक्,उन्ची आणी अभिनय सगळ असुन मला त्याची डायलॉग डिलिव्हरी नेहमी वेगळि वाटत आली, यात मात्र तो आग्दी उजवा ठरलय..सग्ळी पात्र समरसुन अभिनय करतात.
अ‍ॅरेज्ड मॅरेज करणार्‍या पति-प्त्नीत फुलणारे नाते, सहजतेने येणारे रोमॅन्टिक क्षण उत्तम जमलेत, स्वतःच्या घरकुलाचे स्वप्न प्र्त्येक जण बघत असतो , त्यामूळे हा प्रवास त्याच्या बरोबर आपल्याला ही आठवणिच्या रज्यात घेवुन जातो.

एलिअन्स नी अमेरिकन प्रेसीडेंट चे
क्लो न बनवून व्हाइट हाउसात ठेवले आहे. खरा प्रे, चंद्रावर तुरुंगात आहे. त्याला सोडवायला
एजंट जातो इत्यादि

.....

डुप्लिकेट स्टोरी आहे ही !

आमच्या गोविंदा चंकी पांडेच्या आँखेचा हा अमेरिकन रिमेक का ?

भाग्जॉनी कसा आहे ?

बाहुबलीसारखा आणखी एक मुवी येतोय... पुली

आणखी एक मुवी येतोय ... तलवार

आज दृष्यम बघितला. आवडला मला. अजय देवगण आणि सर्वच मराठी कलाकारांनी छान काम केलंय. तब्बुचा नवरा मस्त. तब्बु सो सो च वाटली, एरवी आवडते मला ती. तिची एन्ट्री तर फारंच पुचाट वाटली.

अजिबात दहशत वाटली नाही, आई म्हणूनही तिला नीट जमलं नाही.

Yes Mandard, it was shot in Abu Dhabi, actually there is a place called Al Deira in UAE also. Except for few shots of women without abaya, it was cleverly done.

Talvar - Great movie. Totally unbiased. I was staying very close to location in Noida where this double murder happened. So can relate to lot of things. Irfan rocks......

तलवार : मला आवडला सिनेमा balalnced आहे. कुठेही तलवार पुर्णपणे निर्दोष आहेत असे दाखवले नाही. इरफान मस्त. मी नोएडात त्या एरियाच्या जवळच रहात होतो जेव्हा ही घटना घडली. त्यामुळे खुप रिलेट झाला. पोलिसांचा गाढवपणा तेव्हाही जाणवला होता. कमित कमी आरुषीच्या आई वडीलांचा द्रुष्टीकोण तरी लोकांसमोर आला तसेच मिडीयाने दाखवल्याप्रमाणे आरुषी चारित्र्यहीन नव्हती एवढेतरी लोकांना कळाले. काय बोध घ्यायचा ह्यातुन तर घरात गरज नसल्यास पुर्ण वेळ नोकर ठेवायचा नाही.

'शानदार' पाहिला. बकवास आहे. कै च्या कै कॅटेगरी !!
विकास बहलने 'क्वीन' चे काही एलिमेंट्स घुसडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. पण तिथे त्या चौकटीत जे खरे वाटले ते इथे करण जोहरच्या बेगडी चकमकाटात फारच नकली वाटते. नवरीने भर मांडवात वेडिंग ड्रेस उतरवणे अचाट. अर्थात त्याहूनही काही अचाट गोष्टी ह्या चित्रपटात घडतात.
क्वीनमधल्या 'बदरा बहार'ची झाक इथे काही चालींत उतरली आहे. पण संगीताचेही तेच. जे तिथे श्रवणीय होते ते इथे विस्मरणीय झालेय !!

भरजरी कपड्याच्या चिंध्या जोडल्या तर ना त्याला शान राहते, ना त्याचा गोधडी म्हणून उपयोग करता येत. 'शानदार' डोकं जागेवर ठेवूनही बघता येत नाही आणि पूर्णपणे बाजूला काढूनही. धड परीकथाही नाही आणि युरोपमध्ये चित्रित होऊनही मनात रेंगाळत राहतील अशी व्हिजुअल्स नाहीत.
कलाकार सगळे चांगलं काम करणारे आहेत पण त्यांचा अभिनय मुद्दाम बघायला जावं असं ह्या सिनेमात काही नाही.

तिघेही एवढे सक्षम कलाकार. कथा वाचताना त्यांच्या लक्षात कसे येत नाही कि हा सेटप बकवास आहे म्हणून. शहीद बद्दल फारच वाईट वाटते. हैदर, कमीने मधल्या अवघड भुमिका पेलणारा हा कलाकार, असले फालतु सिनेमा का करतो ?

Pages