बेसन, साखर, तूप, दूध, वेलची पूड , केशर, सुका मेवा
ही स्वातीने पार्ल्यात टाकलेली कृती
शोनूसाठी बेसनाच्या लाडवांची माझी कृती :
हमखास बेसन लाडू :
प्रमाण - बेसनाच्या (वजनी) अर्ध्या पटीत तूप आणि पाऊण पटीत साखर लागते सहसा.
बेसन थोड्या तुपावर भाजायला घ्यायचं. सगळं तूप एकदम घालायचं नाही, नाहीतर मिश्रण फसफसतं. थोडं थोडं तूप घालत बेसन पूर्ण भिजेल इतकं व्हायला हवं. मग मध्यम आचेवर कंटाळा येईपर्यंत किंवा हात भरून येईपर्यंत (यातलं जे शेवटी होईल ते.) बेसन भाजायचं. रंग अगदी चांगला पालटला पाहिजे आणि खमंग वास सुटला पाहिजे. बेसन जसं भाजू तसं परतायला हाताला हलकं लागायला लागतं.
हे होत असतांनाच एकीकडे थोडंसं दूध तापवायचं. उदा. एक किलो बेसनाला पाऊण कप दूध. थोडं जास्त झालं तरी चालेल, कमी नको.मी या दुधातच केशर घालते म्हणजे छान मिसळतं आणि लाडवांना मस्त रंग येतो. दूध घालतांना जरा जपून कारण बेसन एकदम आनंदाने फुलून येतं. आणि एव्हाना परतायला हलकं लागत असतं ते पुन्हा जड लागायला लागल्यामुळे आपण वैतागतो. पण आता दिल्ली जवळ आलेली असते. (हत्ती भाजून झालेला असतो, शेपूट राहिलेलं असतं - असं म्हणणार होते पण ते कसंतरीच वाटलं लिहितांना!)
मग अजून एक ४-५ मिनिटं परतून गॅस बंद करून टाकायचा. वेलचीची पूड बेसनात नीट मिसळून घ्यायची. आता जितकं बेसन घेतलं होतं त्याच्या पाऊण पट साखर, आणि आवडीनुसार सुकामेवा - बेदाणे, काजू, बदाम वगैरे जे काही घालायचे असतील ते - ही जमवाजमव करायची. बेसन निवलं की त्यात साखर मिसळायची आणि दुखर्या हाताचा राग काढल्यासारखं ते मिश्रण मळून घ्यायचं. त्याने हात आणखी भरून येतो, पण निदान राग निघतो. आता मिश्रणातच सुकामेवा मिसळता येतो. पण मग ’मुखी कुणाच्या पडतो काजू.. कुणामुखी बादाम..’ असं होऊ शकतं. हा अन्याय टाळण्यासाठी सुक्या मेव्याच्या वाट्या हाताशी ठेवून प्रत्येक लाडू वळताना त्यात तो सारख्या प्रमाणात घालणं हा एक उपाय मी करते.
लाडू वळून ताटात किंवा परातीत ठेवतांना अगदी चिकटून ठेवायचे नाहीत - जरा सुटे सुटे ठेवायचे. नाहीतर नंतर दुनियाकी कोईभी ताकत उन्हें फोडेबगैरे एक दूसरे से अलग नहीं कर सकती.
कधीकधी परिस्थितीच्या उष्ण झळांनी वळलेले लाडू बसल्याजागी बसतात! असे बसलेले लाडू निरखून पाहिले तर पारंपारिक भारतीय नवर्यांप्रमाणे दिसतात असं माझं एक आपलं मत आहे. अशा वेळी दोन पर्याय असतात. टूथपिक्ने त्यांच्यावर सोंडबिंड कोरून त्यांची त्या सपाट बुडानिशी देव्हार्यात प्रतिष्ठापना करून इहपरलोकी कल्याण करून घेता येऊ शकतं (म्हणजे दुसर्या शब्दांत वाढीव काम टाळता येऊ शकतं) किंवा हौस असेल तर ते जन्मजात वळण मोडून डब्यात भरण्याआधी त्यांना पुन्हा आपल्या मनासारखा गोल आकार देता येऊ शकतो. (हा प्रयोग पा.भा. नवर्यांच्या बाबतीत करण्यात आलेला नाही. इच्छा जरूर आहे. असो.)
काही तळटिपा :
काहींच्यात लाडवांसाठी सरसरीत बेसन वापरतात. इथेही इन्ग्रोमधे 'लाडू बेसन' म्हणून निराळं मिळतं. पण इतर काहींना बारीक दळलेलं बेसनच आवडतं. ('काही' ही गाळलेली जागा समजून आवडीनुसार भरावी.) बेसन सरसरीत वापरलं तर पिठीसाखर वापरावी. फाइन बेसन वापरलं तर इथली साखर (जी पुळणच असते) तशीच घालते मी, म्हणजे लाडू जरा रवाळ लागतो खातांना. रवाळ लाडू आवडत असेल तर यातच थोडा रवाही तुपावर भाजून मिसळता येतो.
तर अशा रीतीने ही बेसनाच्या लाडवांची पाचा उत्तरांची कहाणी साठा उत्तरांत सुफळ संपूर्ण!
ही स्वातीची कृती , तिने पार्ल्यात टाकलेली. वाहून जाऊ नये म्हणून अन या कृतीने लाडू केल्यावर फोटो काढून इथे लावता येतील म्हणून हा प्रपंच
besan ladoo recipe in marathi
सशल, बेसन लाडू खूप मस्त दिसत
सशल, बेसन लाडू खूप मस्त दिसत आहेत. रंग पण सुरेख आला आहे
थँक्यू .. आता पुढच्या वेळेला
थँक्यू .. आता पुढच्या वेळेला तूपाचं प्रमाण वाढवण्याचा हुरूप आला ..
(No subject)
मस्तं आहेत सगळ्यांची लाडु
मस्तं आहेत सगळ्यांची लाडु व्हर्जन्स !
स्वातीचे बे.ला. हसतायेत किंवा चन्द्रकोर टिकली लावली आहे
डीडी,
मस्तं सजावट, बायकोला जोरदार सरप्राइज का ?
स्वातीचे बे.ला. हसतायेत किंवा
स्वातीचे बे.ला. हसतायेत किंवा चन्द्रकोर टिकली लावली आहे >> डीजे! पणत्या आहेत बहुधा, अर्थात तु लिहलेले पण अप्लाय होतेच आहे
ओह बरोबर दिवाळीचे बे.ला
ओह बरोबर दिवाळीचे बे.ला म्हणजे पणत्या शक्यता जास्त :).
दिवे लावलेत हो!
दिवे लावलेत हो!
निनावी तैंचे लाडू म्हणजे
निनावी तैंचे लाडू म्हणजे स्माईल्या वाटताहेत....
हेमट्या हातानं म्हणजे काय हो.
हेमट्या हातानं म्हणजे काय हो.
हिमट्या/ हेमट्या हा टिपिकल
हिमट्या/ हेमट्या हा टिपिकल नगरी शब्द आहे आणि काही लोक मुंबई पुण्यात तळले , अमेरिकेत घोळले तरी आपली मूळ श्रीरामपुरीय संस्कृती विसरत नाहीत::फिदी:
त्या शब्द्दचा अथ आहे कंजूष , कमी देण्याची सवय असलेला/ली
असं काय करतोय हिमट्यावानी वगैरे वगैरे...
हेमट्याचा अर्थ कंजुष
हेमट्याचा अर्थ कंजुष असा असेल तर तो पुण्याबद्दलचा शब्द आहे का?
लाडवाचा मुहूर्त लागला फायनली!
लाडवाचा मुहूर्त लागला फायनली! या प्रमाणात पर्फेक्ट झाले. दुधात केशर घातल्यामुळे रंग पण मस्त आलाय.
छान चान. पण आकार छोटा वाटतोय
छान चान. पण आकार छोटा वाटतोय बोरासारखा....
मैत्रेयी, मस्त झालेत लाडू.
मैत्रेयी, मस्त झालेत लाडू. दुध आणि केशर किती घेतलास इतका लाडवांसाठी? मला वाटत एक किलो असेल बेसन.
मै, लाडु बघून केशर पेढ्यांची
मै,
लाडु बघून केशर पेढ्यांची आठवण झाली
मै, मस्त दिसताहेत लाडू. रॉहु,
मै, मस्त दिसताहेत लाडू.
रॉहु, अहो श्रीरामपुरीय संस्कृती भरभरून देण्याची आहे. लाडू बेसन मागा ना, गोणी आणून टाकतो दारात. साखर मागा, कारखान्याहून परस्पर पोच करतो. पण लाडु-बिडू करायचे म्हटलं की हात हेमटा होतो बघा
सर्वांचे फोटू भारी आहेत!
सर्वांचे फोटू भारी आहेत! डीडी, काय XX - आय मीन आकर्षक दिसतायत लाडू!
रॉहू, कस्चं कस्चं.
मला पाकाचे करता येतात, हे जमत
मला पाकाचे करता येतात, हे जमत नाहीत.. ह्या वेळी करून बघितले. आधी तूप कमी पडले असावे, कारण सगळे कोरडे झाले, लाडू वळेनात. मग वरती सिंड्रेला ने म्हटल्याप्रमाणे थोडे जास्त दूध्,तूप घालून एक चटका दिला. सगळे लाडू मस्त वळल्या गेले, आता मला सांगा, दूध असल्यामुळे हे लाडू फ्रीज मधे ठेवायचे, की बाहेर? बाहेर किती दिवस टिकतील?
सिं-ड-रे-ला पाळीव प्राणी
सिं-ड-रे-ला पाळीव प्राणी ऐका ना
दिवाळीशिवाय लाडवांना हात न लावायचा मनाइ हुकूम असेल तर फ्रीजमध्येच ठेवा मी जे काही चार-दोन लाडू करते ते नेहमीच फ्रिझमध्ये ठेवते आणि खाताना धा सेकंद मावेमध्ये गरम करून त्यावर थेंबभर तूप घालून खाते. भारी लागतात.
बे ला, बुं ला, र ला, र + बे
बे ला, बुं ला, र ला, र + बे ला, ऑलमोस्ट कुठलाही लाडू प्रकार मावेत गरम करूनच खावा. अप्रतिम चव येते. एक माणून तीन तीन खाऊन जातो गरम लाडू..
एक माणून तीन तीन खाऊन जातो
एक माणून तीन तीन खाऊन जातो गरम लाडू.. स्मित >> सिंडीच्या मैत्रिणीसारखा एक माणूस का योकोबा ?
बुंला थोड्याशा तुपावर परतून
बुंला थोड्याशा तुपावर परतून खात जा रे योकोबा. चांगलं बाळसं धरशील
या कृतीने लाडू केले. छान
या कृतीने लाडू केले. छान झाले. तूप थोडे कमी लागले इथे दिलेल्या प्रमाणापेक्षा.
आज लाडू केले. मी तुपात अजिबात
आज लाडू केले. मी तुपात अजिबात चिकडूपणा करत नाही. मस्त सतेज सोनेरी दिसतायत आमचे लाडू. फोटो काढलेला नाही. जमला तर काढीन. केशर नाही घातलं.
अर्धा किलो बेसनाला, अर्धा किलो लोण्याचं जेवढं होईल त्यापेक्षा कमी तूप लागलं. म्हणजे बहुतेक पाव किलो तूप लागलं असावं. साखर मी आधी अंदाजाने आणि मग चव बघूनच घालते कारण चिट्ट गोड मला आवडत नाहीत त्यामुळे ती मोजली नाही. २४ लाडू झाले मोठ्या आकाराचे.
मला घाट घालून पाहायचाच आहे बे
मला घाट घालून पाहायचाच आहे बे लां चा, येत्या विकांताला करून पाहू बहुतेक मी अने बायडी.
ए भा प्र - दूध घातल्यानी नक्की काय होईल?
आई, आजीला कधी दूध घालतांना पाहीलं नाहीये बेसनांच्या लाडवात..
दूध घातल्याने बेसन फुलतं आणि
दूध घातल्याने बेसन फुलतं आणि लाडू खाताना टाळ्याला चिकटत नाही.
>>लाडू खाताना टाळूला चिकटत
>>लाडू खाताना टाळूला चिकटत नाही
पण लाडू खाताना ते डोक्यावर ठेवावेच का म्हणते मी
ओके स्वाती! राखी! इथे टाळू
ओके स्वाती!
राखी!
इथे टाळू म्हणजे तोंडाच्या बोळक्याचा जिभेच्या वरचा कॉनकेव्ह पार्ट
त्याला टाळ्याला असं म्हणतात
त्याला टाळ्याला असं म्हणतात ना? उचलली जिभ लावली टाळ्याला फेम टाळे.
"उचलली जीभ नि लावली टाळ्याला"
"उचलली जीभ नि लावली टाळ्याला" वालं टाळु हो हे!
आमच्याकडे ही वरची म्हण सोडली तर "आटाळ्याला चिकटला लाडू" असा उल्लेख असतो. असो. खमंग लाडवांवर एकदम टाळू काय!
Pages