मटण चॉप्स

Submitted by अमेय२८०८०७ on 2 November, 2015 - 03:25

मटण चॉप्स - 8 ते 10
(जाड असतील तर एखाद्या जड वस्तूने थोडे फ्लॅट करून घ्यावेत)

मॅरीनेशन - घट्ट दही 2 टे स्पू , आले लसूण पेस्ट 2 टी स्पू , तिखट 1 टी स्पू (किंवा आवडीनुसार), धणे जिरे पावडर - 1 टे स्पू, हळद अर्धा टी स्पू , गरम मसाला 1 टे स्पू अर्धा कांदा बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, अर्धा टे स्पू लिंबाचा रस, व्हिनेगर 1 टी स्पू, चिमूटभर साखर, चवीनुसार मीठ, पाऊण टे स्पू मैदा, अर्धा टी स्पू तेल
सर्व एकजीव करून घ्यावे.

चॉप्स परतण्यासाठी दोन-तीन टे स्पून तेल

चॉप्सना मॅरीनेशन लावून किमान अर्धा तास ठेवावे

नॉन स्टिक फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर चॉप्स पसरून घालावेत
पाच मिनिटे मोठ्या आंचेवर एका बाजूने परतून घ्यावेत
नंतर दोन्ही बाजू दहा दहा मिनिटे झाकण लावून, मध्यम आंचेवर परतून घ्याव्यात. आंच कमी असेल तर शक्यतो खाली लागणार नाहीत पण तसे दिसले तर अगदी चमचा चमचाभर पाणी मधून मधून घालत रहावे. आवडत असेल तर शेवटच्या दहा मिनिटांत हळद- मीठ लावलेल्या कांद्याच्या चकत्याही फ्राय करून घेता येतील.

चॉप्स चांगले शिजल्यावर काढून घ्यावेत.

वाह शेफने या सोबत "Curry Leaves-Coconut Rice रेकमेंड केला होता तोही लगेहाथ केला. सोपी कृती आहे

कढीलिंबाची 15-20 पाने, पाऊण वाटी खोवलेले ओले खोबरे, दोन लसूण पाकळ्या, एक छोटी हिरवी मिरची, छोटा चमचा चिंच पेस्ट आणि आवडत असेल तर अगदी थोडी कोथिंबीर थोड्या पाण्यासोबत (नारळाचे पाणीही चालेल) बारीक मसाला वाटून घ्यावा.

पाऊण वाटी तांदळाचा मोकळा भात करून घ्यावा.
कढईत तेल किंवा लोणी गरम करून त्यात कढीलिंबाचा वाटलेला मसाला परतून घेऊन, चमचाभर पाणी व मीठ टाकून भातही नीट परतून घ्यावा.

Lamb Chops2.JPG
(फोटोत फ्रीजमध्ये उरलेल्या कोल्हापुरी ओल्या मसाल्याची झटपट केलेली ग्रेव्हीही आहे,

दुसरे म्हणजे चॉप्सचा हातात धरायचा भाग मॅरीनेट करायच्या आधी सुरीने व्यवस्थित खरवडून घेतात, शेफ भाषेत त्याला Frenching म्हणतात. मी कंटाळा केला त्यामुळे टोकाशी जरा जळलेत पण बाकी चॉप्स मस्त शिजले)

ग्रेव्हिसाठी:

दोन मीडियम कांदे उभे चिरून
आले साधारण अर्धा इंच चिरून
लसूण पाकळ्या 8-10
सुके खोबरे अर्धी वाटी (कापून/किसून)
ओले खोबरे खोवून पाव वाटी
टोमॅटो दीड बारीक चिरून
तीळ तीन टी स्पून
जिरे अर्धा टी स्पून

हे सर्व थोड्या तेलात खरपूस भाजून घेणे. ओले खोबरे आणि टोमॅटो सर्वात शेवटी टाकणे.

भाजलेले जिन्नस थोड्या कोथिंबीरीसोबत आणि पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून ओला मसाला करून घ्या.

कढाईत थोडे तेल गरम करून मसाला चांगला परतून घ्या. तेल सुटले की कांदा लसूण मसाला (किंवा काश्मीरी तिखट) एक टे दीड टे स्पून धणे जिरे पावडरसोबत परता. नंतर हवा तितका पातळ/दाट रस्सा होईल इतपत गरम पाणी घालून चांगली उकळी काढा. चवीपुरते मीठ आणि गरम मसाला घालून दोन मिनिटे शिजवा.

स्रोत : वाह शेफ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेय "Curry Leaves-Coconut Rice", केला रे आज. नव-याला खुप आवडला. बरोबर मुगडाळीची साराची आमटी केली होती.

नवरा म्हणाला मी असा राईस नुसतापण खाऊ शकतो. मी फक्त थोडा बदल केला, तुप्-जि-याची फोडणी केली, थोडं हिंगपण टाकलं, राईसमधे थोडी मिरपुड घातली. Happy

अरे, कितीदा हा बाफ वर आणताय?
आता रविवारी कढिपत्ता- खोबरं भात करावाच लागेल!
Happy

जरा लगेहाथ त्या ग्रेवीची रेसिपीपण येऊ दे.

ग्रेव्हिसाठी:

दोन मीडियम कांदे उभे चिरून
आले साधारण अर्धा इंच चिरून
लसूण पाकळ्या 8-10
सुके खोबरे अर्धी वाटी (कापून/किसून)
ओले खोबरे खोवून पाव वाटी
टोमॅटो दीड बारीक चिरून
तीळ तीन टी स्पून
जिरे अर्धा टी स्पून

हे सर्व थोड्या तेलात खरपूस भाजून घेणे. ओले खोबरे आणि टोमॅटो सर्वात शेवटी टाकणे.

भाजलेले जिन्नस थोड्या कोथिंबीरीसोबत आणि पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून ओला मसाला करून घ्या.

कढाईत थोडे तेल गरम करून मसाला चांगला परतून घ्या. तेल सुटले की कांदा लसूण मसाला (किंवा काश्मीरी तिखट) एक टे दीड टे स्पून धणे जिरे पावडरसोबत परता. नंतर हवा तितका पातळ/दाट रस्सा होईल इतपत गरम पाणी (किंवा चिकन/मटण स्टॉक) घालून चांगली उकळी काढा. चवीपुरते मीठ आणि गरम मसाला घालून दोन मिनिटे शिजवा.
-------------------------------------------------------------

खरेतर कारण नसताना आलेल्या बादरायणी कमेंटबद्दल आधी चीड आली होती पण जिथे लॉजिकच फेल आहे तिथे प्रतिवाद करून उपयोग नाही हे ठाऊक असल्याने हिरीरी केली नाही, आणि भांडून-तंटून कुठली जहागीर मिळणार आहे! सो ज्याचे-त्याचे मत त्याला लखलाभ.

बाकी रेसिपी आवडलेल्या सर्वांचे आभार Happy

सही.. अंडा मसाला/ करी मध्ये कोल्हापुरी स्टाईलचा मसाला असतो तो असा का? (पुरेपूर कोल्हापूर मध्ये मिळतो तसला) फोटो वरून तसाच असेल वाटतंय. प्रचंड आवडतो तो, तो असेल तर उद्याच करणार. धन्यवाद.

आज टीनाच्या रेसिपीने स्पायसीकरी सोबत यात दिलेला राइस केला होता. मस्त होतो. कढीपत्ता आणि नारळ चा एकत्र स्वाद मस्त वाटला. मी चिंच नव्हती घातली मात्र.

मी शाकाहारीच आहे. त्या धाग्यावर कुणीतरी इथे दंगल झालीये म्हणून पाहीलं. सगळंच फुस्स !! Biggrin

मांसाहाराची माहीती आहे मात्र. पण मटण चॉप्स असतात हे पहिल्यांदाच कळ्ळं. चिकनच लॉलीपॉप असतात हे माहीत होतं. बक-याला कुठे पंख असतात ?

अमेयने वरच्या रेसिपित कढीलिंबाच्या पानांचा मसाला घालुन राईस बनवलाय ना, मग बाकी जण कढिपत्ताचा राईस म्हणतायत, कढीपत्त्याची वेगळी रेसिपि दिलिये का?

ओह

अमेय्दा राइस नि ग्रेव्ही करून बघनार मी, मस्त वाटतंय Happy
सिगरीमधे कढीपत्ता चिकन कबाब होते एकदा.. त्याच मेरीनेशन पण तू राइसला लिहलयस तसं होत फक्त खोबरं नाही असं कलाल आहे Wink

खत्रा डिश आहे .. भातासकट त्या मटण चोप्सवर तुटून पडावेसे वाटतेय ..

अवांतर प्रतिसादांनीही मनोरंजनच केले. तसेच तिथल्या धाग्यावरील प्रतिसादांचा संदर्भ इथे लागला.
आस्तिक-नास्तिक आणि शाकाहार-मांसाहार हे नेहमीचे हिट टॉपिक आहे, कारण प्रत्येकाचे बेंचमार्क भिन्न असतात. दोन शाकाहार्‍यांमध्येही कधी एकमत नसते, तर ते दोन मांसाहार्‍यांमध्येही नसते.

पण असो, मटण चॉप्स आवडीचेच, चिकनपेक्षा आमच्या घरात हेच जास्त खाल्ले जाते.

आज केले, छान झाले. फोटो जमेल तसे टाकते. आधी न वाफवता शिजवायला ज़रा धाकधुक वाटत होती पण मस्त शिजले.

थैंक्स अमेय. बाकीच्या दोन कृतिहि करून पाहीन लवकरच.

आज टीनाचे वर्‍हाडी चिकन,अमेय २८०८०७ यांचा राइस आणि ग्रेव्ही केली आहे.मटनाऐवजी चिकन वरील पद्धतीने मॅरिनेट करून फ्राय केले आहे जेवायच्या आधी लिहितेय.

राइस आवडला. चिकन खात नसल्याने नो़ कॉमेंट्स.ग्रेव्ही जरा गंडली.वाटलेला मसाला अजून परतायला हवा होता.एक वेगळा प्रकार म्हणून आवडला.

शाकाहारी असुनही पाकृ चमचमीत वाटली.:फिदी: आधी लिहीणार होते पण म्हणल किती फटाके फुटतायत ते बघु.

अगदीच अवान्तर पण सत्यः- माझी आई एकदा गिरणीत गहु दळायला गेली. आमच्या दळणाच्या डब्याशेजारी अजून एक धान्याचा ( ज्वारी+ चणाडाळ ) डबा. झाकण नव्हतेच पण त्यात किड्यान्ची असन्ख्य पोरे तरन्गत होती. अख्खा डबा त्यानेच भरलेला पाहिल्यावर आईने गिरणीवाल्याला विचारले की हा कोणाचा डबा? आणी साफ का नाहीये? जरी गव्हावर गहु टाकले जात असतील तरी मागुन जी बाई/ बुवा ज्वारी/ बाजरीचे दळण घेऊन येईल, त्याना हा प्रसाद मिळेलच की.

गव्हाचे व भाकरीचे पीठ वेगळे दळुन मिळायचे. गिरणीवाला म्हणाला, काकु आपल्या गिरणीसमोर जो भेळवाला बसतोय ना, त्याच्याच फरसाणसाठी हे दळण आहे, त्याचेच आहे. आई चक्रावली आणी म्हणाली बाबारे तू का हे पाप माथी घेतोस? त्याला ( भेळवाला) सान्ग की दळण साफ करुन पाठव. तो म्हणाला बर सान्गतो. त्या दुकानातुन बरेच लोक कोरडे फरसाण घ्यायचे.

तात्पर्य काय तर कुठल्याही शाकाहार्‍याने कितीही नाकाने कान्दे सोलले तरी आपल्या आयुष्यात त्याने कधी न कधी, कुठल्या न कुठल्या स्वरुपात मान्साहार केलेलाच असतो हे पक्के लक्षात ठेवावे.

हॉटेलमध्ये जाऊन खाता तेव्हा बघता का की फ्लॉवर, कोबी, भरताची वान्गी अगदी स्वच्छ किडेविरहीत आहेत ते? दळण आणताना कधी विचार केला का की दुसर्‍याचे तेवढेच साफ असेल का ते? परदेशात पॅटिस ( व्हेज ) खाताना कधी विचार केला का की त्याच कव्हरच्या साट्यात डुकराची चरबी असते ते? नाही ना? मग दुसर्‍याच्या खाण्याला नावे का ठेवता?

अमेय सॉरी खूप अवान्तर लिहीले, पण राहवले नाही. दुसर्‍याला कायम बोलणार्‍याला कधी तरी बोललेच पाहीजे. हो ना!

अहो रश्मीताई, खरंय तुमचं म्हणणं. मी शाकाहारी असून जपानमध्ये रहात असताना, भाषा नीट येत नसताना चुकून खाल्लंय नॉनव्हेज. व्हेज पदार्थांमध्येही बर्‍याचदा नॉनव्हेज बेस वापरले जातात. सॅलड ड्रेसिंगमध्ये अँचोव्हीज असतात, बर्‍याचदा पास्ता सॉसमध्येही वापरतात. कधीकधी नाकाने कांदे न सोलता निमूट खावं लागतं. पण ते सगळ्यांना कळेल असं नाही.

सायो, मी खर तर व्हेज- नॉनव्हेजवाल्याना उद्देशुन नाही लिहीले हे, तर बी ने जे लिहीलय, त्याला उद्देशुन लिहीलय. खरे तर सणाचा वाद नको म्हणून लिहीत नव्हते. आज नरकचतुर्दशी त्यातुन हा धागा वर आला म्हणून लिहीले.

मी स्वतः शाकाहारीच आहे. पण दुसर्‍याच्या खाण्याचा आदर करते. पण बी ने जेव्हा सगळ्याना नावे ठेवायला सुरुवात केली तेव्हा मात्र रहावले नाही. बर्‍याच वेळा नीट वाचल्यानन्तर लक्षात आले की परदेश तर सोडा आपल्या देशात सुद्धा अगदी नकळत तरी आपल्या पोटात काहीतरी जातेच. त्यामुळे मी हे लिहीले.

पॅटीस कव्हर बाबत नेटवर वाचल्यावर कळले आणी मी हबकले. अर्थात, बी च एकटा असा आहे की जो खोलात जाऊन सत्य जाणु शकत नाही, पण दुसर्‍याना मात्र बोलतो, सतत नावे ठेवतो. .यातुन कुणाही शाकाहार्‍याना दुखवण्याचा माझा खरच उद्देश नाहीये, पण बी सारखे लोक जे दुसर्‍याचा मनाचा विचार करत नाहीत, त्यानी मात्र विचार करावा.

आता माझ्या विपुत बी ची नेहेमीप्रमाणे एक धमकावणी असेलच, पण मी मनावर घेणार नाही.:स्मित:

जाउ द्या हो रश्मी, बी सारखी लोक फक्त विपु मधेच लोकांच्या संस्र्कुती आणि सभ्यपणाबद्दल बोलु शकतात. समोरचे बोलायला लागले की माञ पळ काढतात. अशा लोकान्चे बालिश बोलणे मनावर घेउ नये.

Pages