रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही ग साधना. मला दिसतोय फोटो. पेज रिफ्रेश कर.. किंवा थांब थोडावेळ कारण इमेज लोड व्हायला वेळ लागतोय.. माझ्याकडेही असच झाल होत.

अ. चे फोटो दिसतच नाहीत, तिथे फोटो होते याचीही काही खुण नाही. नाहीतर फ्लिकरचे फोटो मला दिसत नाहीत पण तिथे क्रोस्स दिसतो त्याचरुन कळते की फोटो आहेत.

मी पाहिलेत ते फोटो. परवापर्यंत दिसत होते. नंतर गेले.. Sad तो नविन फोटो तर एकदम भारी होता. कसली देखणी चित्रकृती!!

अ. आ. मस्तच आणि सुबक.
अश्या कॉम्प्लेक्स रांगोळ्या तिबेटमधे पण काढतात. त्यातही बरीच मेहनत घेतात.

अआ, तुमच्या रांगोळ्या बघून प्रसन्न वाटतं...
सायुच्याही कल्पक रांगोळ्या... साधना, वेगळाच पण छान प्रकार...

सायली, अतृप्त, टिना, साधना आणि इथले सगळे मेंबर
तुम्ही सगळे खुप सुंदर रांगोळ्या काढता. हा धागा त्य मोजक्या धाग्यांपैकी आहे जिथे कधीही वाद विवाद, पाय ओढाओढी, ताशेरे झाडणे होत नाही. छान वाटतं इथे आलं की. Happy

नीरा खुप सुरेख काढलीस सरस्वती, आणि त्यावर त्या अक्षता कीत्ती गोड दिसतायत..
दक्षिणा अगदी माझ्या मनातल बोललीस, ईथे एकेमेकांकडुन खुप काही शिकायला मिळते..

आत्ता ज्या बोटांच्या रांगोळ्या टाकते आहे, त्या सगळ्या वॉट्स अप वर आल्या होत्या, त्यात थोडे बदल करुन मी काढुन पाहिल्या..:)

https://fbcdn-sphotos-e-a.akamaihd.net/hphotos-ak-xfa1/v/t1.0-9/10534540_918072408279046_2427060211132285154_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=ad87add60fee60be36aa91aad3167f15&oe=568BF748&__gda__=1454692222_56e7cbeed6b9f7108c865acee872c00d

अ. आ.- सुंदर!
अवांतर-
अशी सप्तपदि पायदळी नको वाटेल. तसेही फ़ुलांच्या पायघड्या हे पटतच नाही.

Pages