रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतृप्त..नेहमीप्रमाणेच मस्त!

टिना .. हो Happy मी उद्या रंगीत रांगोळी घेवुन येणार.. सकाळी गडबड असते म्हणुन पांढरी छोटीशी काढते... उंबरठ्याला पण हळदीकुंकु लावते आई .. म्हणुन मी पण

टीना, पिंड म्हणू नये. पिंडी म्हण स्मित पिंडचा अर्थ वेगळा होतो. >> ओके.. मला पिंड चा अर्थ कळतो.. पण मराठी भाषा लवचिक असतिल दोन अर्थ अस वाटत .. एकवचन पिंड आणि अनेकवचन पिंडी वाटत मला.. चुक असेल तर जाणकारांनी फोकस मारावा ..

चनस, ए मस्त आलीये रांगोळी...
टीना घाईत असले की मग साच्यानी काढते रांगोळी, म्हणुन ह्या पीटुकल्या देवा पुढच्या...
अ.आ.. कसली भारी आहे ती रांगो़ळी...वा!

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpf1/v/t1.0-9/11753701_876324459120508_8934777424814504246_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=f44074a9a8dbc068414b988976b2a6ff&oe=56C203C9

अतृप्त तुम्ही फोटोच्या खाली लिवत जा कसली पुजा आहे ते.. अर्थात तुमच्या रांगोळ्यांच्या पुढे ती कोणासमोर काढलीय त्यामुळे कै फरक पडत नाही म्हणा.

अतृप्त तुम्ही कधी कुठल्या मासिकासाठी सुद्धा या रांगोळ्या दिल्या होत्या का त्यावरील लेखासहीत? कारण तुमच्या गुलछडी स्पेश्शल धाग्यातल्या खूपश्या रांगोळ्या दिसल्या त्या मासिकात.

@कारण तुमच्या गुलछडी स्पेश्शल धाग्यातल्या खूपश्या रांगोळ्या दिसल्या त्या मासिकात. >> एकदाच दिल्या होत्या . दोनवर्षापूर्वी गणपतीपूर्व साप्ताहिक सकाळ मासिकात फुलपंखी रांगोळ्या नावाचा लेख लिहिला होता..त्यात फोटोही दिले होते.

http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20140823/5644165961002911277.htm

सर्व रांगोळ्या सुंदरच

चनस यांच्या पिल्लाने काढलेली सगळ्यात जास्त आवडलीये .... एकदम सुंदर .... Happy

दोनवर्षापूर्वी गणपतीपूर्व साप्ताहिक सकाळ मासिकात फुलपंखी रांगोळ्या नावाचा लेख लिहिला होता..त्यात फोटोही दिले होते. >>> करेक्ट, मी वाचला तो लेख.. मस्त लिहिला होता लेखसुद्धा. अगदी सुटसुटीत स्पेशली फुलं कापण्याबद्दल.

चनस यांच्या पिल्लाने काढलेली सगळ्यात जास्त आवडलीये .... >>> शशांक ती चनस यांच्या पिल्लाने नाही तर चनस नावाच्या पिल्लाने काढली आहे.

ही माझी पिल्लुशी रांगोळी..>>>> ओ हो - मी हे पिल्लूची रांगोळी असं वाचलं.... (वयाचा परिणाम बहुतेक... Happy )

सो सॉरी ....

सायू ____/\______

शशांकदादा Lol
चनस मी पण क्न्फुजले की हिचं पिल्लू? (ते पण रांगोळी काढण्या एवढं Uhoh Proud )

चनस नावाच्या पिल्लाने काढली आहे. >>>
Rofl

सहस्रावर्तन किंवा लघुरुद्र पूजा असताना,मुख्य अभिषेक झाल्यानंतर देवमूर्ति ठेवण्यासाठी जे तांदुळाच आसन ताम्हणात करतात,ते आम्ही अस फुलात सजवून तयार करतो.
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xaf1/v/t1.0-9/12189610_920778454675108_4828836140125880984_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=6301bd9db8e23f442980c276d530a86c&oe=56CBE3E6

पिल्लुशी म्हणजे छोटीशी असं म्हणायचा होत मला >>> आता छोटीशी असच लिही मग यापुढे, म्हणजे असे घोळ होणार नाहीत..

Pages