रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ना पुढच्या जन्मात राणी होणारे आणि माझ्या नवरत्नांच्या दरबारात या दोघांना घेणारे रंगावली मंत्री म्हणुन.. सायुताई राजवाड्याच्या दरवाज्यापुढे रांगोळी काढेल आणि अतृप्त राजवाड्याच्या आत फुलांच्या सजावटी करतील.

अग काय करु सुंदर, मस्त, सुबक, व्वॉव्व्व, सहीच, भारीच, लय भारी, १ नंबर, काय कलाकार आहात, तुमच्या हातात जादु आहे इ. इ. इ. याच्यापलिकडे असतात यांच्या रांगोळ्या..

आभार निरा, हेमा ताई,मुग्धा...
मुग्धे, मुजरा स्विकारावा राणी सरकार... Happy

सायु मी आता इथे रोज यायचं ठरवलंय. बघू किती जमतं.

तुझी शेडिंगची भौमितिक रचनेसारखी रांगोळी मस्त आहे. शेडिंग सुरेख जमलं आहे.
मला साधे ठिपके पण सरळ रेषेत नाही काढता येत. हेवा वाटतो तुमच्यासारख्य कलाकारांचा.

अतृप्त तुमची पण फुलाची रांगोळी अप्रतिम आहे एकदम.

सायु, तुम्ही नवीन टाकलेल्या रांगोळ्या मी "आपल्या मैत्रीचा वेल" नावाचं फेसबुक पान आहे तिथे बघितल्या आहेत. त्याच पानावर आणखी डिझाइन्स आहेत.

मी ना पुढच्या जन्मात राणी होणारे आणि माझ्या नवरत्नांच्या दरबारात या दोघांना घेणारे रंगावली मंत्री म्हणुन.. सायुताई राजवाड्याच्या दरवाज्यापुढे रांगोळी काढेल आणि अतृप्त राजवाड्याच्या आत फुलांच्या सजावटी करतील. http://www.sherv.net/cm/emo/laughing/yellow-laughing-smiley-emoticon.gif

अ.आ मनपुर्वक आभार..
सिंडरेला, हो का , धन्स अजुन नविन डीझाईन्स मिळतील.. Happy
मला या सगळ्या वॉट्स अप वर आल्या होत्या.

सायुतै.. बोटांनी काढलेल्या रांगोळ्या मस्त!
मी आज एक ट्राय केली पण नीट जमली नाही.. मग त्याचचं ५ पाकळीच फुलं बनवल Happy

हसु आले म्हणून >>>>> काहीही हां अतृप्त Lol तुम्ही हसा किंवा काही करा माझ्या दरबारातल्या नवरत्नांमध्ये तुम्ही आणि सायुताई असणार म्हणजे असणारच.

@काहीही हां अतृप्त >>> चित्र हुब ह्रायल डोळ्यासमोर Lol राणी मुग्धटलीदेवी ऑर्डर सोडतायत..अस! Lol

ऑर्डर कशाला सोडायला हवी? ते तुमच रोज नेमुन दिलेल काम असणार आहे, त्यामुळे मी कै ऑर्डर वै सोडणार नाही. डिझाईन कोणत, त्यासाठी लागणारी फुले, पाने गोळा करणे याचे अधिकार पूर्णपणे तुमच्या स्वाधिन..

खुप दिवसांनी आली इथ..
एकापेक्षा एक रांगोळ्या सायली..बोटांच्या नवनवीन सुंदरच..इतक्यात काढलेल्या रांगोळ्यांचा फोटोच काढणं नै होतयं माझ्यानं..जास्त नै चार पाचच काढल्या म्हणा तरी..सद्ध्या तरी रोजच्या घरापुढच्या रांगोळ्या माझी आक्काची मुलगी , लहान बहिण उषाच काढते.. तिच्या टाकत जाईल..
शेंडीग खुप छान करते यार सायली तू..
माझ्या गेटसमोरची जागा पण खडबडीतच आहे म्हणा..म्हणून रंग खुप दाट टाकावे लागतात..आत तुळशीसमोर काढत नै कारण दिसत नै ना कुणाला Wink Lol

अतृप्त..तुमार्‍या सेज बी मस्तच.. Happy

Pages