नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
वॉव बार्न आऊल .. किती
वॉव बार्न आऊल .. किती मज्जा..
मी त्यांना लिजन्ड ऑफ द गार्डीयन मधे बघीतले तेव्हापासुन ते खुप आवडले..
मानुषीताई खास तुझ्यासाठी
मानुषीताई खास तुझ्यासाठी आमच्याइथले वेडे राघू.
जागू, राघू चा फटू मस्तच..
जागू, राघू चा फटू मस्तच..
ठान्कू गं जागू. मीही काढलेत
ठान्कू गं जागू. मीही काढलेत गं पण आयपॅड्वर पूर्ण झूम करून फारच अस्पष्ट येतात. तुझ्यासारखा कॅमेरा घ्यायला हवा.
हे नक्की काय आहे? मुंबईला
हे नक्की काय आहे? मुंबईला आझाद मैदानाच्या आजुबाजुला हे दिसले नोवेंबर महिन्यात. . असा फोटो द्यायचा उद्देश हाच की हे जर फळझाड असेल तर इतकी अशी फळे अशा गर्दीच्या भागात झाडावर राहणार नाही. मी जेव्हा हे झाड पाहिले तेव्हा मला ते रामफळाचे वाटले. पण मग लोकांनी तोडुन खाल्ली असती ना???
नोवेंबरात लेकीच्या कॉलेजात
नोवेंबरात लेकीच्या कॉलेजात गेलेले तेव्हा उगीच टाईमपास म्हणुन आजुबाजुला फिरत राहिले. तेव्हा अचानक पानामागे सुवर्णझळाळी असलेले एक झाड दिसले. सकाळची वेळ होती त्यामुळे पुरेसा प्रकाश नव्हता. फोटो नीट नाहीयेत.
हे Chrysophyllum cainito अर्थात स्टार अॅपल म्हणजेच सुवर्णपत्राचे झाड. दिनेशदांच्या रंगिबेरंगीवर आहे याची माहिती.
वरच्या फोटोत दोन झाडे दिसताहेत. हा स्टॉप वळणाजवळ होता, त्याच्या या बाजुलाही एक झाड होते. म्हणजे एकाच जागी तिन झाडे झाली की. झाडाना फुले आलेली पण एकतर प्रकाश कमी त्यात माजा कॅमेरा पण एवढा पॉवरफुल नव्हता.
सोन्याचा रंग अग्दी उठुन दिसतोय या फोटोत.
ही कोवळी पाने.
मस्त फोटो सर्वच. साधना, आधीचं
मस्त फोटो सर्वच.
साधना, आधीचं झाड मीपण पाहिलेय डोंबिवलीच्या आसपास पण नेमकं कुठे आता आठवतच नाहीये.
साधना, ते फळवाले झाड ओळखता
साधना, ते फळवाले झाड ओळखता आले नाही पण सुवर्णपत्राला फळे लागतात. आतमधे ताडगोळ्यासारखा पण धारा असलेला ( करमळासारखा ) गर असतो. छान लागतो चवीला. मी नायजेरियात खाल्लाय तो. ( स्टार अॅपल )
मुंबईत मात्र कधीच बघितली नाहीत हि फळे. त्या भागात ३/४ वर्षे नियमित जाणेयेणे होते तरीही कधीच दिसली नाहीत. ( अर्थात ती पिवळी फळेही दिसली नाहीत. )
दिनेश, राणीबागेत सुवर्णप
दिनेश, राणीबागेत सुवर्णप त्राला फळे लागलेली आम्ही पाहिलीत. कच्ची होती ती फळे. जिस्प्याने फोटो टाकले असणार. पण बाजारात मात्र नाही येत विकायला. इतकी झाडे आहेत कुठे.
साधना ते जंगली बदाम आहे.
साधना ते जंगली बदाम आहे. चर्चगेट भागात बरीच झाडे असावीत. मला माझ्या मैत्रिणीने पहिल्यांदा दाखवले होते आणि तिनेच नाव सांगितलेले...
खालच्या लिंकमध्ये त्यांची फुले सुंदर दिसतात पण फुले असताना आम्ही ते झाड ओळखलेले नव्हते, त्यामुळे बघायची राहून गेली.
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Java%20Olive.html
शहरात खूप भारतीय झाडे अजून टिकून आहेत. त्यामानाने उपनगरात रस्त्याकडेने सगळी परदेशी झाडे लावलेली दिसतात.
व्वा मस्त गप्पा प्र.ची मानुषि
व्वा मस्त गप्पा प्र.ची
मानुषि ताई काय मस्तय ट्रेक तुझा...
टीना कसला हिरवा मखमली फोटु..:)
जागु ते वेडे राघु आत्ता आमच्या कडेही दिसु लागले, इकडे ते हिवाळ्यात जास्त दिसतात..
साधना काय सुरेख झाड आहे ते.. व्वा!
दिनेश दा छान माहिती सांगीतलीत..
लोणावळा...
लोणावळा...

(No subject)
(No subject)
काल जे घुबड मी बघितले होते ते
काल जे घुबड मी बघितले होते ते बहुतेक काही काळापासून आमचे शेजारी होते!
केवळ नवरात्रीच्या निमित्ताने थोडा प्रकाश पोहोचला आणि आम्हाला ते कबुतर नसून घुबडे आहेत हे कळले. आज तर त्यांचे घरच दिसले. हॉस्पिटलवाल्यांनी इमारतीची डागडुजी करताना भिंतीत एक-दोन भोकं का कोण जाणे ठेवलेली होती. त्यातल्या एका भोकात ह्यांचे घर आहे. सध्या पिल्ले शिकत असावीत. रात्री-अपरात्री वेगळा आवाज यायचा. आम्ही समजायचो वटवाघूळ असावेत. पण काल त्यांचा आवाज ऐकला.
हे आमच्या सोसायटीतले घंटी फुलाचे भावंड.

आणि हे उत्तन किनार्यावर सुकत घातलेले बोंबील

अग जंगली बादाम मलाच काय निग
अग जंगली बादाम मलाच काय निग वर बऱ्याच् जणांना माहीत आहे. माझा फोटो जंगली बदामाचा नाही. दिनेश ना पण हे झाड़ माहीत नाही. आता शशांक न शांकलि सांगतिल
मग हे असावे
मग हे असावे का?
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Big-Leaf%20Mahogany.html
हो ग.फळ तर तेच आहे. थैंक्यू
हो ग.फळ तर तेच आहे. थैंक्यू ग.
पिवळे टिकोमा आहे।
पिवळे टिकोमा आहे।
Manushi tai you might be
Manushi tai you might be talking about coppersmith barbet. Check on net.
Chrysophyllum cainito अर्थात
Chrysophyllum cainito अर्थात स्टार अॅपल म्हणजेच सुवर्णपत्राचे झाड - पुण्यात कोणाला पहायचे असेल तर बागूल उद्यानात (पर्वती पायथ्या वरुन गजानन महाराज मंदीर ओलांडून या बागेत जाता येते. सारंग स्टॉप जवळ) आहे हे ...
सायली - एकदम लोणावळ्याला कशी काय पोहोचलीस ????
थॅन्क्स वेका. पण आत्ताच
थॅन्क्स वेका. पण आत्ताच जागूशी बोलले. तर खूप इन्टरेस्टिन्ग गोष्ट कळली.
तिने फेबुवर चक्क वेडा राघू आणि रेड मुनिया यांचा गुजगोष्टी करतानाचा फोटो दिलाय. मग मला क्लिक झालं की "तो" तोच असावा. जागू म्हणाली तिलाही वे.रा. आणि रे.मु. एक्त्र दिसतात.
याला म्हणतात निसर्ग. किती मजेशीर मैत्री आहे ना!
ओह्ह्ह.....अगं वेका आत्ताच कॉपरस्मिथ बार्बेट सर्च मारला तर आमच्याकडचा वे.रा. बरोबरचा तो पक्षी रेड मुनिया न वाटता तो कॉस्मि.बार्बेटच असावासं वाटतय.
वीटी छान फोटोज.. शशांकजी दोन
वीटी छान फोटोज..
शशांकजी दोन महिन्या पुर्वी गेले होते..:)
सायु,मस्त फोटोज.. मानु.. ठरलं
सायु,मस्त फोटोज..
मानु.. ठरलं का मग कोणेतो??
वेडा राघूबद्दल एक माहिती
वेडा राघूबद्दल एक माहिती -
उडणारे सर्व प्रकारचे कीटक हा वेडा राघू खात असतो. यात मधमाश्याही असतात, मात्र मधमाशीला मटकावण्यापूर्वी तिची नांगी काढून टाकणे आवश्यक आहे हे त्याला जन्मजात माहित असते. मधमाशी चोचीत पकडून एखाद्या कठीण गोष्टीवर तो अशी आपटतो की ती विषारी नांगी निघून जाते व निर्विष माशी खायला हा वेडा राघू मोकळा ....
हो वर्षू . मी म्हटलं ना की
हो वर्षू . मी म्हटलं ना की इतके कमी सेकंद तो दिसतो की डोक्यात रजिस्टरच होत नव्हता. म्हणूनच फेबुवरचा जागूचा फोटो(वे.रा. आणि रे.मु.) पाहिल्यावर वाटलं की तो रेड मुनियाच असावा की काय!!!. पण वेकाबाईंनी सांगितल्याप्रमाणे गुगलल्यावर लख्ख प्रकाश पडला....की तो कॉपरस्मिथ बार्बेटच! १००%
काल अजून एक गंमत झाली. वेळ मिळाला की सांगते.
शशांक मग का रे या राघवांना वेडा म्हणतात. ??? त्रिवार णिशेद!(:फिदी: अनेकवचन! जसे: लाडू लाडवांना तसेच राघू ....राघवांना!)
साधना.. आता झाडावर पाटी लावून
साधना.. आता झाडावर पाटी लावून ये.. सौजन्य वेका असे पण लिही.
मानुषी, तो उडताना किटक जसा उडेल तसा उडतो, आपल्याला किटक दिसत नाही त्याचे वेडेवाकडे उडणेच दिसते, म्हणून हे नाव.
जागूच्या घराजवळ भरपूर खाऊ असतो, सगळ्यांना पुरेल इतका, मग का भांडा, असा विचार करतात पक्षी !
दिनेश वीती२२० यांनी
दिनेश
वीती२२० यांनी ओळखलेय..
हिरवा म्हणौन राघू, आणि
हिरवा म्हणौन राघू, आणि गिरक्या घेतो म्हणुन वेडा. आपल्याकडे मनमौजी असलेले चालत नाही, त्याला वेडा ठरवले जाते, पण वेड्या राघुला काSSSSSSSहीही फरक पडत नाही. वेडे म्हणा नैतर अजुन काही, तो आपला गिरक्या घेत उडत राहतोच.
अरेव्वा.. हा तर शहाणा राघू
अरेव्वा.. हा तर शहाणा राघू आहे..
एक मला पूर्वी पासून पडलेला प्रश्नय ..पोपट आणी राघू मधे काय फरक असतो??
Pages