निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना दिनेशदा. आणि एखाद्या गोष्टीची खूप वाट बघुन आशा सोडून दिलेली असताना, ती मिळाली की आनंद गगनात मावत नाही, हे अगदी खरं. छोटंसं ग्रील (रुंदीला, लांबीला आहे जास्त), त्यामुळे लहान कुंड्या. Happy

वा अंजू......सोनटक्का!
मला माझ्या आत्याने गुलाबी जास्वंदीचं रोप दिलं होतं त्याची पहिली फुलं बरोब्बर गणपती उत्सवातच मिळाली.
जागुले काय जबरी टिपतेस गं!

हे पक्षी फोटोत असे दिसतात की आपल्याला वाटते प्रत्यक्ष असेच दिसत असतील.. पण हाय रे दैवा.. इतके चिटुकले असतात...

वरच्या फोटोतल्या मैनेचे आमच्याकडे अमाप पिक आहे. एका वेळेस ५-६ तरी दिसतात, मी त्यांना घरटे बांधताना पाहिलेय, त्यासाठी लांब गवताचे हिरवेगार शेपुट घेऊन उडताना पाहिले.. हे सगळे पाहिले हल्ली. त्या आधी मी मैनेला फक्त फोटोत पाहिलेले. आणि फोटोग्राफर्स लोकांचे टाईट क्लोजप पाहुन पाहुन मैना कमीत कमी कावळ्याएवढी तरी असावी असा अंदाज केलेला. त्यात माझ्याकडे लहानपणी एक राघु मैनेची जोडी होती त्यातली मैना वरचीच होती आणि ती चक्क पोपटाएवढी मोठी होती. चार पाच महिन्यापुर्वी माझा भाऊ आलेला आणि त्याने टेकडीवर जाऊन एका मैनेचा फोटो काढुन आणला. ते बघुन तर माझा जळफळाटच झाला. मैना इथे माझ्या अंगणात आनि मला अजुन दिसली नाय?

दोन महिन्यापुर्वी टेकडीवर गेलेले तिथे चिमणीएवढे किंवा त्यापेक्षा जर्रासे लहान पक्षी जमिनीवर टिपताना पाहिले. आधी चिमणीच वाटले पण निट निरखुन पाहिले आणि एक मोठा अपेक्षाभंग झाला. ते चिमणीएवडढे चिटुकले पक्षी म्हणजे आपले मैनाबाई आणि मैनाबुवा..... अरे देवा.. फोटोत तर भारी दिसतात. प्रत्यक्षात एवढुसेच????? सगळ्या फोटोग्राफर्सना पोटभर शिव्या घालुन घेतल्या.

मग काय .. तेव्हापासुन ढिगानी दिसायला लागल्या ह्या मैना. वेडे राघु, चिमण्या आणि मैना एकत्रच बागडत असतात. मी आता दुर्लक्ष करते.

चूक आहे हा फोटो... कारण मूळ गाणे असे आहे.

एक डाल पर तोता बोले, एक डाल पर मैना
दूर दूर बैठे है, प्यार तो फिर भी है ना, बोलो है ना

गाणी ऐकत नाहीत वाट्ट !! Happy Happy

अहो ते गेल्या पिढीतले गाणे.... आता गेले ते दिवस दुर दुर बसुन् प्रेम करण्याचे.. मुळात आता हिरो हिरवीनीचे कसे जुळलेबिळले हे दोन मिनिटात आटपतात. पुढे महत्वाची कामे असतात... आसे दोन डालीवर बसुन राहिले तर कसे व्हायचे........

दारी झेन्डुचि फुले,
हाती आपट्याची पाने,
ह्या वर्षात लुटुया,
सद- विचाराचे सोने,
सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!!!! Happy

दिनेशदा मस्त फोटो. आपट्याची फुले पाहिली नव्हती कधी Happy

फुलांचा क्लोजअप आहे का?

जिप्स्या, हा फोटो कोलंबो मधला. आपल्याकडच्या आपट्याची फुले थोडी लहान असतात आणि संख्येनेही कमीच येतात.

मुनिया आणी वेराचे मस्त फोटॉ आहेत जागू.

द्सर्^याच्या शुभेच्छा लोक्स Happy

काही आठवड्यांपुर्वी घरच्या बर्डफीडरवर नवे पाहुणे येईन गेले. घरातून थोडे फोटो काढून ठेवलेत अजून आय डी करायला वेळ मिळाला नाही.

navinpakhru.jpg

वॉव.. चक्क आपट्याच्या फुलांसक्कट फोटोज.. ग्रेट/.... कधीच पाहिले (ऐकलेही) नव्हते..
वेका.. क्यूट आहे गं तुझं बर्डी फीडर.. टाक लौकर फोटो

गेल्यावर्षीचीच पोस्ट पुन्हा एकदा शेअर करतो Happy

दसरा गेला आता दारावरची तोरणं निर्माल्य म्हणुन टाकुन देणार, फक्त एकच काम करायचं त्या तोरणामधील भाताच्या लोंब्या काढायच्या आणि गॅलरीत/खिडकीच्या ग्रीलला बांधुन ठेवायच्या. अगदी काही तासातच चिमण्या येऊन सगळा भात खाऊन जातात आणि फक्त तुस उरतात. मी दरवर्षी हेच करतो. यंदा शनिवारी तेलबैलाचा ट्रेक करून आलो आणि येताना शेतातुन आणखी थोड्या भाताच्या लोंब्या आणल्या होत्या. Happy निर्माल्यात फेकण्यापेक्षा चिमण्यांना तो भात खाऊ घालायला मला आवडतो, तुम्हालाही आवडेल. Happy

सुप्रभात निगकर्स!!!
आज सकाळी आम्ही जॉगिंग ट्रॅककडे जाण्यासाठी निघालो...तिकडे जाण्यासाठी अगदी मेन गावातून जावं लागतं.
संपूर्ण गाव क्रॉस करून मग आर्मी एरिया लागतो.
पण काय दृश्य होतं? गावात सगळीकडे "सोनं" विखुरलेलं. झाडणार्‍यांच्या लोखंडी हातगाड्या भरून वहात होत्या. जिकडे तिकडे आपट्याच्या झाडांच्या फांद्या, पानं पडलेली होती. आणि हे सकाळी अगदी लवकर गेल्यामुळे फार जाणवलं. आपट्याची किती झाडं नष्ट केली असतील! काळाप्रमाणे या अश्या प्रथांमधे काही बदल घडायला हवेत ना?
जिप्सी आणि जागू ........भारी फोटो.
दिनेश आपट्याची फुलं प्रथमच पहातेय. सुंदर.
वेका बर्ड फीडर मस्त. अजून फोटो टाक पक्ष्यांचे.

आपट्याच्या बाबतीत जितकी पाने बाजारात लागतात त्यापेक्षा कितीतरी जास्त बाजारात आणली जातात. त्याला किम्मत त्याच दिवशी, दुसर्‍या दिवशी तो कचराच.

त्याचा एखादा औषधी उपयोग असला आणि प्रचार झाला तर लोक ती पाने जपून ठेवतील.

किमान एखादी अफवा तरी...

उदा... याचा काढा करून प्यायला तर मधुमेह हमखास बरा होतो किंवा पाने कपाटात ठेवली तर लक्ष्मी प्रसन्न होते.. अशी ( जस्ट जोकिंग )

उदा... याचा काढा करून प्यायला तर मधुमेह हमखास बरा होतो किंवा पाने कपाटात ठेवली तर लक्ष्मी प्रसन्न होते.. अशी ( जस्ट जोकिंग )>>>>>>>>>> +१००

जिप्सीभाऊ तुझी ही पोस्ट w a वर फिरतेय. तुझं नाव नाही आणि २ नं. फोटोपण. मला जिथे आली तिथे मी सांगितली की माझ्या मित्राने लिहिलंय हे आणि मागच्यावर्षीपासून तो सांगतोय हे आणि फोटोपण त्याचा आहे. मी तुझं नाव पण सांगितलं तिथे.

Pages