निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कढिलिंबाच्या (फॉर अ चेन्ज कडूलिंब नाही ! :फिदी:) झाडावर बुल्बुल कुटुंब आहे. हॉलच्या खिडकीतून एकमेकांना चिकटून बसलेली पिल्लं दिसतात. काही वेळाने आईबाबा येतात. आई/बाबा कुणाच्या तरी चोचीत काहीतरी हिरवं ...किडा, टोळ असं काही असावं का? कारण बुलबुलाची चोच अगदी पूर्ण फाकलीये, त्या तोंडातल्या हिरव्यामुळे. फांदीवरच्या एका पिल्लाच्या वासलेल्या चोचीत मोठा बुलबुल ...ते हिरवं अलगद ठेवतो. पिलूही मजेत ते खाऊन टाकतं.
फक्त खिडक्यांना मॉस्किटो नेट असल्याने नीट फोटो येत नाहीत. पण एक फायदा म्हणजे अगदी जवळून नीट पहाता येतं.
सध्या वेडे राघू, होले, कॉपरस्मिथ बार्बेट, असे कित्येक पक्षी दिसतात.

मानुषी, अगदी हेवा वाटतोय. बुलबुलांना पिल्लाना लवकर मोठे करायचे असते कारण ते स्थलांतर करतात. तसाही पिलांचा आहार जास्तच असतो.

जिप्सीभाऊ तुझी ही पोस्ट w a वर फिरतेय. तुझं नाव नाही आणि २ नं. फोटोपण. >>>>> हो अन्जू.मीही चकित झाले तो मेसेज पाहून.
गेल्यावर्षापासून मी, ह्या लोंब्या ३खिडक्यांना बांधायला सुरुवात केली आहे.१ चिमणीवरून ३ चिमण्या झाल्या(१ मेल्,२फिमेल).माझ्या शेजारणीकडे भाताच्या लोंब्याच्या जुड्या आणून ठेवल्या होत्या.त्या भरपूरच होत्या.'तुमच्या चिमण्यांसाठी चालतील का' म्हटल्यावर माझी मजा झाली.गेल्या महिन्यापर्यंत चिमण्यांचे खाणे होते.नंतर एका वाटीत बाजरी,तांदूळ मिक्स करून कमी प्रमाणात घालत होते.४-५ दिवसांपूर्वी एक कावळा ते धान्य खातोय.मजा म्हणजे त्याच्या चोचीत १ किंवा २ दाणे गेलेले दिसतात.
पण त्यामुळे,चिमण्या जरा थंडावल्या आहेत.त्यांच्यासाठी एक घर घेतले होते.त्या वाटीशेजारी ठेवले आहे.त्या घराच्या होलमधून त्यांची ये-जा हल्लीच चालू झाली होती.लोंब्याच्या काड्या त्या घरात टाकत होत्या.
यावेळी परत लोंब्या बांधल्या आहेत.

हो अन्जू ते वाचलं. पण अध्या वॉअ‍ॅ आणि फेबुवर असंच काही फिरत रहातं आणि मुख्य म्हणजे ज्याचं त्याला क्रेडिट देत नाहीत. मध्यंतरी अवलचंही असंच झालं होतं

धन्यवाद दोस्तहो Happy
आज व्हॉट्सअप वर हा मेसेज फिरत होता, मलाही आला Happy
यावेळेस मात्र कुणी कुणाच्या नावाने पाठवला/क्रेडिट दिले कि नाही याबद्दल विचार न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहचला/पोहचतोय, बर्‍याच लोकांना हे मनोमन पटंल/पटतंय हे वाचुन्/पाहुन जबरदस्त आनंद होतोय Happy

सुप्रभात!
कुणी कुणाच्या नावाने पाठवला/क्रेडिट दिले कि नाही याबद्दल विचार न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहचला/पोहचतोय, बर्‍याच लोकांना हे मनोमन पटंल/पटतंय हे वाचुन्/पाहुन जबरदस्त आनंद होतोय स्मित>>>>>>>>>> ह्यो हाय खरा निसर्गप्रेमी! कीपीटप गुर्जी!

कुणी कुणाच्या नावाने पाठवला/क्रेडिट दिले कि नाही याबद्दल विचार न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहचला/पोहचतोय, बर्‍याच लोकांना हे मनोमन पटंल/पटतंय हे वाचुन्/पाहुन जबरदस्त आनंद होतोय स्मित>>>>>>>>>> ह्यो हाय खरा निसर्गप्रेमी! कीपीटप गुर्जी!>>>>>>>+११११११

मस्त गप्पा चालल्यात इथे!
आज एक गम्मत बघितली माझ्या बागेत. सद्ध्या बागेकडे जास्त लक्ष देता येत नाहीये आणि कबुतरं फार त्रास देताहेत. त्यामुळे कितीतरी दिवस काही कुंड्या नुसत्याच पडून आहेत. आज त्या साफ करायला घेतल्या. त्यात एक रोप दिसलं. कसलं असावं हे? या चौकोनी कुंडीत अनेक गोष्टी लावून झाल्यात, आणि गेल्या काही महिन्यात कबुतरांनी यात काहीही टिकू दिलेलं नव्हतं. त्यामुळे कसलं रोपटं आहे ते कळेना. शेवटी म्हटलं जरा उकरून बघावं आलं किंवा असा कुठला कंद इथे राहून गेला होता का म्हणून. जरासं उकरल्यावर हे दिसलं:

From pearls ...

केरातून पडलेली खजुराची बी रुजून झाड आलंय! आतापर्यंत तरी या रोपट्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलंय. पावसाचं जे काही पाणी मिळालं असेल तेवढंच. आणि अगदी थोडं ऊन. टिकेल का हे रोप? कशी काळजी घ्यायला हवी याची? जगलंच तर मोठं झाल्यावर कुठे लावता येईल बरं हे?

गौरी वॉव, खरीच ग्रीन फिंगर्स आहेत तुझी ही.. टाकून दिलेल्या खजुराच्या बिया तूनही झाड आलंय.. व्वा!!

मानुषी , क्यूट चकचकीत नवीन स्किन चं पिल्लू.. गाना गा अब

मेरा बुलबुल खा रहा है, शोर तू न मचा Lol

जिप्सी ग्रेट यार!!! जौ दे.. मेसेज पोचतोये फार इंपॉर्टंट..

गौरी, खजूराचे झाड खुपच कणखर असते. खरे तर त्याला पाणी वगैरे मुद्दाम घालायची गरजच नसते. वाळवंटात कुठे कोण पाणी घालते त्यांना ? तिथे तर अक्षरशः कुठेही हि रोपे उगवतात आणि वाढतातही. हे झाड आता बाहेर मोकळ्यावर लावले पाहिजे. पाणी कधीतरी दिले तरी चालेल. टोकदार पाने असल्याने तसा त्याला धोकाही नसतो, कुणापासून. खजूर लागायला मात्र काही वर्षे लागतील.

वर्षूदी, मी फक्त जास्तीत जास्त दुर्लक्ष केलंय या झाडाच्या बाबतीत! Lol
दिनेशदा, जास्त पाण्याने मरणार नाही ना ते झाड? पुण्यातल्या पावसात (?) टिकेल ना ते?

सुप्रभात!
मेरा बुलबुल खा रहा है, शोर तू न मचा >>>>>>> Proud वर्षू किती जुनं गाणं पण खूप गोड!
खजुराच्या/खारकेच्या बीया कुठही पटकन यआणि येते असा माझा अनुभव आहे. पण पुढे त्याचं काहीच होत नाही.
आमच्या मळ्यातालं भुभु

आमच्या कढिलिंबावरचा पाहुणा .........बुलबुल आणि फॅमिली ज्या फांदीवर बसतात तिथे हा बसला होता. तेवढ्यात आईबाबा बुलबुल आले आणि त्यांनी कलकलाट करून त्याला झक्कपैकी हुसकावून लावलं.

काही महिन्या पुर्वी रस्त्यावर एक चाफ्याचे झाड छाटलेले दिसले, एक फांदी आणुन कुंडीत लावली, तर त्याला चक्क
कळ्या आल्या आहेत..

आणि हे आज उमललेले..

Pages