नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सायु, हिरव्या चाफ्यासारखी
सायु,
हिरव्या चाफ्यासारखी वाटताहेत फळं.
ती पुत्रंजीवीची फळे आहेत
ती पुत्रंजीवीची फळे आहेत बहुतेक. याच्या माळा लहान मुलांच्या गळ्यात घालतात, दृष्ट लागू नये म्हणून.. आणि म्हणूनच हे नाव.
दा
दा ---------/\---------
तुम्ही सांगताय त्या नावाने सर्च केले तर तेच झाड दिसते आहे ज्याचा मी वर फोटो टाकलाय..
दिनेशदा ग्रेट (as always).
दिनेशदा ग्रेट (as always).
खरचं दिनेश दा ग्रेटच आहेत.
खरचं दिनेश दा ग्रेटच आहेत.
दिनेश ला डोळे झाकूनही
दिनेश ला डोळे झाकूनही नुस्त्या वासा किंवा आकारावरून पान , बी सुद्धा ओळखू येते बर्का!!!
काटेरी सौंदर्य
काटेरी सौंदर्य
वर्षु, फार सुंदर.
वर्षु, फार सुंदर.
वर्षु, फार सुंदर.
वर्षु, फार सुंदर.
आमच्याकडे एक आबोलीसारखे
आमच्याकडे एक आबोलीसारखे दिसणारे छोटे झाड आहे. एका सोसायटीच्या कुंपणाबाहेर उगवलेले उपटून आणले होते. त्याला आबोलीसारखीच पण निळ्या आकाशी रंगाची फुले येतात. फुलाला चार नाजुक पाकळ्या आहेत. त्यातली एक पाकळी अगदी अविकसित नुसत्या रेघेसारखी. फुलांच्या मंजिर्या (तुरे) आबोलीसारखे पण घट्ट चिकटलेले नाहीत. थोडेसे उघडलेले, मोकळे. ही नक्की आबोलीच का असा प्रश्न पडलाय.




हीरा - ते हे फूल असावे -
हीरा - ते हे फूल असावे - Ecbolium linneanum Family: Acanthaceae (Barleria family)
येस. ती रान आबोलीच असावी.
येस. ती रान आबोलीच असावी. कदाचित निळी कोरांटी असेल या अंदाजाने ते उपटून आणले होते. एक दोन फुले झाडावर होती ती अगदीच मरगळलेली कारण झुडूप भर रस्त्यावर उगवले होते. पाने कोरांटीसारखी दिसत नव्हतीच पण म्हटले पाहू या घरी नेऊन. घरी निगा राखल्यावर झाड भराभर वाढले. तुरे देखील छान आले. पण फुले मात्र अशक्त ती अशक्तच. मग लक्ष्यात आले की मुळात ती जातीनेच तशी असणार.
खूप धन्यवाद, शशांक.
सर्व फ़ुलांचे, पक्षी गटगचे,
सर्व फ़ुलांचे, पक्षी गटगचे, इतर पक्ष्यांचे फ़ोटो मस्तच.

जागू, तो पेरू मी घेतला.
दिनेश ला डोळे झाकूनही
दिनेश ला डोळे झाकूनही नुस्त्या वासा किंवा आकारावरून पान , बी सुद्धा ओळखू येते बर्का!!!++++ १००%
हिरा ती आकाशी अबोली माझ्या कडे पण आहे..:)
शशांक जी, क्या बात है! लगेच् शोधुन दिलीत..
हा magpie robin च ना?
कवटी चाफा, ग्राउन्ड फ्लोअर
कवटी चाफा, ग्राउन्ड फ्लोअर ला एका मैत्रीणी राहाते, तीच्या कडचा...




हरभर्याचे झाड नाजूक असते
हरभर्याचे झाड नाजूक असते बरं...
हीरा, तिला आम्ही निळी अबोली म्हणतो. याचा गजराही छान दिसतो. खरा तर हा रंग थेट निळा नाही त्यात हिरवी झाक असते.
सायु, मैत्रिणीचे झाड आपलेच असते.
आम्ही पण निळी अबोलीच
आम्ही पण निळी अबोलीच म्हणतो.
सायु, कवठी चाफ्याला पण छान असतो वास. फोटो छान आलाय. आमच्याकडे गावाला आहे हा चाफा. ह्याचं नाव किती समर्पक! फुल कवठा सारखचं दिसत अगदी.
दा हो हेमा ताई, खुप सुरेख
दा
हो हेमा ताई, खुप सुरेख आकार, सुवास, रंग सारे काही अनोखेच..
मला ह्याचे क्रफ्टेड रोप हवय, नागपूर ला मिळतच नाहिये.. एखाद्या माळ्या़कडुन करुन घेता येईल का?
आम्ही पण निळी अबोलीच
आम्ही पण निळी अबोलीच म्हणतो.>>>>>>>>+१
Photo sarvach sundar. Me
Photo sarvach sundar.
Me jambhali Aboli mhanate tyala. Nalasoparyala khup disaychi.
Sorry for Roman.
काय मस्त फोटो आहेत
काय मस्त फोटो आहेत सगळ्यांचे.
ही नवी पानं पहा कशी वाटताहेत.
http://www.maayboli.com/node/56211
खोपा २ : बुलबुलच घरटं
http://www.maayboli.com/node/56212
खोपा ३ : शिंपी पक्षाचं घरट
फुल पाखराचे फुल.. आम्ही
फुल पाखराचे फुल.. आम्ही लहानपणी म्हणायचो.. क्याक्टस कुळातले असावे..
पण नाव ठाऊक नाही... कोंणी सांगेल का?
दिनेश दां च्या श्रीलंका मालिकेत पण आहे हे फुल..
सायली, फुल खरच फुलपाखरा सारख
सायली, फुल खरच फुलपाखरा सारख दिसतय. प्रथमच पहातेय.
बादवे माझी रिक्षा. अनुभवा नवरात्र कोकणातलं..
http://www.maayboli.com/node/56160
हे कुठले झाड, गडद केशरी छोटी
हे कुठले झाड, गडद केशरी छोटी छोटी फुल आणी कंच हिरवी पानं लक्ष वेधुन घेत होती..:)
हेमा ताई या रिक्षाची मना
हेमा ताई या रिक्षाची मना पासुन वाट बघत होते...
धन्स सायु. नॉट शुअर पण हे
धन्स सायु. नॉट शुअर पण हे आफ्रिकन ट्युलिप ( स्पॅथोडिया ) आहे असं वाटतय. खूप सुंदर दिसत हे झाड.
सायली - ते फूल आहे- Scarlet
सायली - ते फूल आहे- Scarlet Cordia, Cordia sebestena
कॉर्डीया आहे ते.
कॉर्डीया आहे ते.
ग्रेट शशांक जी आणि साधना तु
ग्रेट शशांक जी आणि साधना तु पण...:)
फुल पाखराचे फुल.. आम्ही
फुल पाखराचे फुल.. आम्ही लहानपणी म्हणायचो.. क्याक्टस कुळातले असावे..>>>>> याची पाने वगैरे कशी असतात - त्या झाडाच्या बाकीच्या भागांचे जरा फोटो टाकशील का ????
Pages