निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभे आहाहा माझी बालपणीची आवडती फुले. खुप प्रसन्न पहाट असायची ह्या फुलांसोबत लहानपणी.

धन्यवाद अदिजो. गोव्याला जेव्हा पहिल्यांदा दुरून पाहिले तेव्हा मिरच्या लागल्यात वाटलेले Happy

टीना, शोभा फुले सुरेख.

काही वर्षापूर्वी ठाण्याला कापुरबावडी जंक्शनला खाली ट्राफिक आणि वर अशी कावळ्यांची शाळा भरलेली. माझ्या त्यावेळच्या सो-सो फोनकॅमेराने एक वेगळाच फील दिला फोटोला...

व्हीटी, ते वाकेरी.. वाकेरीचे मूळ,, वाकेरीचे भाते म्हणून औषधी आहे. पण याच्या खोडावर उलटे काटे असतात आणि भयंकर टोचतात.

अर्रे किती मस्त शाळा भरलीये..
टीना ,वीटी२२०,सुशोभा खूप सुंदर फुलं.. शोभे च्या म्हंजे सुशोभा च्या फुलांचे नांव काय आहे?? कुठेतरी पाहिली होती खूप वर्षांपूर्वी..

Roses need well drained soil that is rich in organic material and at least 6 hours of full sun to flourish. Do not place the container directly touching the floor or saucer. Place it on two blocks such that the drainage is not blocked.

Also you can use a slow release fertilizer. Most fertilizers will (should) list N P And K values in that order. Try to get one with very high P . In the us some people use super phosphates (0,45,0) fertilizers. Bone meal is a good addition if it is readily available.

During hot weather days you may need to water twice a day especially if your container is small. But make sure there is good drainage first.
pH between 6.0 and 7.0 is ideal , but in General roses are tolerant of wider ranges too.

>> शोभे च्या म्हंजे सुशोभा च्या फुलांचे नांव काय आहे?? कुठेतरी पाहिली होती खूप वर्षांपूर्वी....>>

ओ वर्षुताई... काय हे! बुचाची फुलं नाही ओळखता आली ?
Happy
बुचाच्या फुलांना 'गगनजाई' असेही म्हणतात.

लेख आत्ता वाचला जागु..
मोबाईल वर वाचण खुपच जीवावर येत म्हणुन मग मी राखुन ठेवते मोठ्या स्क्रिनवर वाचायचे लेख..
व्हिटी, लिंक बद्दल धन्यवाद..

लेख छानच लिहिलायस...अन्नसाखळी वगैरे पन ठिकच..आणि सापांबद्दल असलेल माझं जबरदस्त आकर्षण सुद्धा एकाजागी पण त्या एवढूश्या जीवासाठी उगाच मन हळहळलचं.. Sad

दोन दिवसांपूर्वी नॅशनल जिओग्राफिक वर एक प्रोग्राम बघत होती ज्यात दोन प्राण्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चाललेल्या लढती दाखवतात..त्यात पहिल्यांदा मी माझ्या आवडत्या कार्टून शो 'रोड रनर' मधल्या त्या रोड रनर ला बघीतलं.. कसं ना, कधी कधी एखादी गोष्ट बहोत आवडून सुद्धा तिच्याबद्दल माहिती वाचावी हे सुटूनच जात..तर त्यात खाण्याकरीता हा पक्षी एका प्रॉपर अडल्ट असलेल्या रॅटल स्नेक ला जाऊन भिडला.. खुप आक्रमक पवित्रे घेतलेले दोघांनीही आणि शेवटी स्वतःला वाचवायच्या नादात त्या सापान त्या रोड रनरच्या पायाचा चावा घेतलाच.. तो पक्षी बेचारा एकदम शांतच होऊन गेला त्यानंतर मरणाची वाट पाहत...
त्या क्षणी त्या रोड रनरची पहिली आक्रमकता जाऊन मग त्याची छाती.. तिची खरं तर पाहणं खुपच हलवून गेलं..
वास्तविक पाहता त्या सापाचा खरा दोष नव्हताच..तो आपला मस्त उन्हात शेकत बसलेला पण खाण्याकरीता तिनचं त्याच्यावर हल्लाबोल केला..

आपल्याला एखादी व्यक्ती , गोष्ट आवडत असेल तर तिला काहिही झालं तरी आपल्याला दोष समोरच्याचाच वाटतो याचा परत एकदा अनुभव आला...

अन्नसाखळी..
आपल्याला भावना दिल्या त्याचा किती तो गवगवा करतो आपण.. बरय एवढे तोंडाचे वेडेवाकडे एक्स्प्रेशन इतर कुठलाच सजीव प्राणी करत नाही.. करत असते तर त्या रोड रनर च्या चेहर्‍यावरचे भाव बघण आणखीनच जड गेलं असत कदाचित मला.. Sad

लेख आत्ता वाचला जागु..
मोबाईल वर वाचण खुपच जीवावर येत म्हणुन मग मी राखुन ठेवते मोठ्या स्क्रिनवर वाचायचे लेख..
व्हिटी, लिंक बद्दल धन्यवाद..>>>>>

मला हेच लिहायचे होते टीना ने लिहुन दिले.
अजुन असेच भरपुर वाचायला मिळूदेत.

टीना, मलाही पुर्वी असेच वाटायचे. पण प्राणी आणि पक्षी, मृत्यू फार सहजपणे स्वीकारतात. शोक करत नाहीत असे नाही, पण त्यात फार गुंतत नाहीत ते. आपण जगण्याचा आणि मरणाचाही सोहळा करून ठेवतो.

सगळ्यांचे धन्यवाद. मीपण दोन दिवस मोबाईलवर ऑनलाईन शोधत होते माझा लेख लिंक द्यायला पण मिळाला नाही. व्हीटी धन्यवाद.

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

लेख मायबोलीवर टाकला आहे. डिटेलमध्ये आहे. पेपर मध्ये वाचलाअसेल तरी परत वाचा. कारण शब्द्मर्यादेमुळे पेपरमध्ये पूर्ण नव्हता.
http://www.maayboli.com/node/56016#comment-3687902

वेलकम भरत.

भरत हा पर्यावरण दक्षता मंच चा सदस्य आहे. तो अनेक पर्यावरण विषयक उपक्रम राबवतो. भरत प्लिज इथे तुझ्या उपक्रमांविषयी लिहून फोटो दे.

भरत हा पर्यावरण दक्षता मंच चा सदस्य आहे. तो अनेक पर्यावरण विषयक उपक्रम राबवतो. भरत प्लिज इथे तुझ्या उपक्रमांविषयी लिहून फोटो दे>>>

खुपच छान! अहो भाग्य हमारे.

वेलकम

Pages