निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा मानुषी..
लय्यच मज्जा..
जॉगिंग करत जा पण नै तर अरे हे झाड अरे तो पक्षी म्हणत एवढा ट्रॅक पूर्ण करायला सकाळी ७ ते सकाळी १० व्हायचे Wink .. बाकी लक्की यु..
नै तर मी राहते त्या ठिकाणी झाड कमी न माणसच जास्त आहे ..

मस्त मानुषीताई.

सुप्रभात.

माझे सासर गाव पेण ची हिरवीगार शेती.
DSC01320.JPG

मानुषी, जागु.. आहाहा..हिरवाई!!! सुंदर ट्रेक
साधना>>> Lol काय गा असं करतेस... जा की वॉक ला

लहानपणी आमच्या गोरेगावच्या घराच्या बागेत होतं हे झाड. पण त्याला पिवळी फुले यायची. त्याला फळे असलेली आठवत नाहीत. हा भगवा रंग मस्त आहे. नाव त्या वेळेस माहित नव्हते. मागे कधीतरी फ्लॉवर्स ऑफ इंडिया साईटवर मिळालेले पण आता विसरले. आज परत शोधण्याचा पेशंस नाहीय... :-o

इन्द्रा..किती क्यूट नाजुक फूल आहे, बाजूला एक शुभ्र पान ही दिस्तंय..कसल ?

कपडे लहान झाले.. शोभे तिला चल शुरू हो जा, नयी शॉपिंग को..असा आशिर्वाद दे Proud

सर्वांना आवडला ना आमचा जॉगिन्ग ट्रॅक ...मस्त!
जॉगिंग करत जा पण नै तर अरे हे झाड अरे तो पक्षी म्हणत एवढा ट्रॅक पूर्ण करायला सकाळी ७ ते सकाळी १० व्हायचे डोळा मारा .. बाकी लक्की यु..>>>>>>>>> टिने खरंंय गं बाई. मग कधी तरी मुद्दाम असं ....हे झाड ते झाड हा पक्षी तो पक्षी करायला आय पॅड घेऊन निवांत फिरते.



हा रणगाडा(टॅन्कर) बघून कळलंच असेल की पूर्ण गार्डनच मेन्टेन्ड बाय आर्मी.

वॉव सुपर लाईक, मानु. लक्कीश!!! मी आले तर तिथे रोज सकाळ संध्याकाळ ५,५ किमी जॉग/वॉक करता जाईन..

मी पण मी पण... मस्तच दिसतोय ..

वर्षू, Happy

इंद्राने म्युसांडाचा फोटो टाकलाय. त्याला एक पांढरे पान येते आणि सोबत एक चिटुकले फुल. हिरवे पांढरे भगवे सगळे त्याचेच रंग. रच्याकने, आपला राष्ट्र ध्वज झाला की हा.... Mussenda

छान आहे तो एरिया मानुषी.
इंद्राच्या फोटोत दोन वेगवेगळी झाडे ( त्यापैकी एक वेल ) आहे का ?

वरच्या मेसेंडाच्या फोटोत लेफ्ट एज ला मध्यावर जी ब्राउनिश कड असलेली पानं आहेत ती मेडन हेअर फर्न उर्फ अ‍ॅडिअ‍ॅण्टम ची असावीत. ब्राउनिश कडा म्हणजे त्यांचे स्पोअर्स.

सोसायटीत नवरात्रीसाठी दिवेरोषणाई केलीय... म्हणून की काय, खिडकीसमोरच्या हॉस्पिटल बिल्डींगवर दोन घुबडं येऊन बसलीत. बहुतेक बार्न ऑउल प्रकारातली. सफेद रंगाची आहेत. पण जिथे बसलीत तिथे खूपच कमी प्रकाश असल्याने दुर्बीण किंवा माझ्या साध्या कॅमेरात येणार नाहीत...

इंद्रधनुष्यच्या फोटोतले मुसांडा भारतात पश्चिम घाटातले नेटिव आहेत. मराठीत त्याला भूतकेश नाव आहे.
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Dhobi%20Tree.html

आमच्याकडे गोरेगावला ड्वार्फ मुसांडा होते. ते नेटिव नसले तरी इकडल्या मातीत रुळले आहे. लहानपणची आठवण जागी झाली. ते मुद्दाम लावलेले झाड नव्हते. त्याकाळी त्याच्या नावाची बरीच शोधाशोध केलेली होती...
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Dwarf%20Mussaenda.html

सुप्रभात मंडळी
जागूची हिरवाई नेहेमीच मस्त आणि डोळ्यांना थंडावा देणारी!
माझ्या साध्या कॅमेरात येणार नाहीत...>>>>>>> व्हीटी२२०..........खरंच काही वेळा असं होतं . सध्या माझ्या कडुलिंबावर सकाळी ११ १२ च्या सुमारास वेड्या राघूंचा एक थवा येतो आणि मग कडुलिंबावरून आजूबाजू इतके ते भिरभिरत काय काय हवाई शो करत रहातात! पण माझ्या आयपॅडच्या कॅमेर्‍यात नाही पकडता येत त्यांना. तरी मी चाहूल लागली की लगेच भर उन्हात पळत गच्चीवर जाते आणि पाण्याच्या टाकीमागे लपून बसते. (सो एक्साइटिन्ग Proud )
गंमत म्हणजे त्याच वेळी एक छोटासा लाल डोक्याचा पक्षी येतो पण तोही इतक्या कमी वेळ दिसतो की इथे वर्णन करायला डोक्यात अजून काही रजिस्टरच झालेलं नाही. एवढं कळलंय की कोणता तरी वेगळाच पक्षी आहे. नेहेमी येणार्‍यातला नाही. आज बघू .............................................................

Pages