माझे पती सौभाग्यवती (झी मराठीची नवी मालिका)

Submitted by पियू on 14 October, 2015 - 11:04

'झी मराठी' वर सुरु झालेल्या 'माझे पती सौभाग्यवती' या ८.३० वाजता प्रक्षेपित होणार्‍या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैभव इस्त्रीवेशात आल्यावर पाहू बहुतेक असं बायडी म्हणतेय. सध्या नो विंटरेष्ट

>> बर्‍याच जणांचं असंच मत आहे बहुतेक.

मी पाहतेय. वैभव छान काम करतोय. अन् लक्ष्मी पण.

लक्ष्मीचं खर नाव काय आहे? एकादशी मधलीच ना ती?

मी एकच भाग बघितला. मला नंदीता धुरी जास्त आवडली. फार सहज काम करते. तो वैभव प्रोमोमधे तरी मला एवढा बाई वाटला नाही त्या वेषात, पण अभिनय चांगला करेल.

मालिका नाही बघु शकणार, मी लांब रहाते शिरेलीपासून काही अपवाद वगळता. नो पेशन्स.

तोच तो पणा आहे वैभव मांगले मधे, तेच ते 'मालवणी जोक्स' बर्याच्दा बोर मारतं
खलनायकी भुमिकांमधून शोभुन दिसतो पण.

ती लक्ष्मी का नाही कुठे नोकरी करत? १५०० रू नवरा आणणार म्हणून हुरळूम गेलेली ती आजच्या जमान्यात विसंगतच वाटते.

Chalitil maitrini sobat parlour che kam karte ti. Navara 1500 aananar yasathi nahi huralali ti. Maza navara basun khat nahi & tyala tyachya acting talent chya joravar paise kamavata yeu shaktat, yacha aanand aahe tila. Otherwise, Lakshmi chi Aai & Bhau mhantahet ki Vaibhav ne acting cha nad sodun milel ti nokari dharavi. Acting madhe kahi tyache career hone nahi.

आई बघते..
वैभव आणि नंदिता दोघेही आवडतात म्हणुन बघते अदेमदे..
पण शिरेल बघण्याएवढा पेशन्स नै माझ्यात सो आओबे लड्डू जाओबे लड्डू चाल्लय..
बोर करतात हे लोक आणि यांच्या श्टोर्‍या .. असो.. बघु कुठवर जातय ते.. बाकी त्या लक्ष्मी ची आई न भाऊ लै म्हणजे लैच किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र करतात यार..

हा धागा मायबोलीवर सुरू झालेला आणि पहिल्या पानावर आलेला पाहून परदेशस्थ भारतीयांनी नाक मुरडले Proud
असो!

वैभव मांगले गुणी कलाकार आहे, आणि नंदिता धुरी पण. मालिकेचा प्लॉटही चांगला आहे. पण झी मराठीने सध्या 'खोटं बोला आणि लपवा, लपवण्यासाठी काय वाट्टेल ते करा आणि तेच सिरीयलीत दाखवा' हा झेंडा हाती घेतलेला दिसतोय. त्यामुळे पुढे पुढे पाणी ओतून ओतून मिसळ नेहमीप्रमाणेच पातळा होणारच.

करेक्ट मंजुडी. वैभवने बायकोला सांगायला काही हरकत नाही की तो अश्याप्रकारे काम मिळवतोय ते. त्याने स्त्रीवेश करुन काम मिळवल, त्यातुन पैसा मिळायला लागला की बायको विचारणारच ना की हे पैसे कसे मिळाले? काम मिळाल तर कुठली मालिका, कुठल्या चॅनलवर? तुझा रोल काय? वै वै...

पण लक्ष्मीसुद्धा हे विचारणार नाही.. कारण झीवाल्यांच्या हिरवीणींना असले बेसिक प्रश्न पडत नैत.. त्यांना शेजार्‍यांच कस होइल, ग्लोबल वॉर्मिंग आटोक्यात आणण्यासाठी काय कराव? मैत्रीण आणि तिच्या नवर्‍यातली भांडण कशी मिटवता येतील, त्यांनी (मत्रीण आणि तिचा नवरा) मुल होण्याबद्दल कधी विचार करावा असले कूटप्रश्न पडत असतात त्यांच्याकडे वेळ कुठाय या फालतु प्रश्नांवर विचार करायला....

वैभव आणि लक्ष्मी दोघेही खूप सुन्दर काम करताहेत. काल तर वैभवची acting एकदम अफलातून होती. सासू सुनेपेक्षा वेगळी असलेली मालीका आहे. आता तरी खूप चान्गली वाटतेय.

मंजूडी,
झी मराठीने सध्या 'खोटं बोला आणि लपवा, लपवण्यासाठी काय वाट्टेल ते करा आणि तेच सिरीयलीत दाखवा' हा झेंडा हाती घेतलेला दिसतोय. +११११

काही म्हणा, झीमराठीवाले नशिबवान आहे..... कसल्याही प्लॉटवर बेतलेल्या सेरियलीं करता यान्ना कलाकार मात्र अफलातून अचूक मिळताहेत.
वैभव व नंदिता धुरी (वर नाव कळाले) दोघांचेही काम उत्तम. तो भंडारी झालेला कोणे? तो पण चांगला... खरे तर प्रत्येक व्यक्तिरेखाच चपखल व्यक्तिंनी खुलते आहे.

तो भंडारी झालेला कोणे? >>> अहो रमेश भाटकर तो... कॅरेक्टर चांगल आहे ते पण रमेश भाटकरचे डायलॉग्ज कळत नैत अज्जिबात.. जीभ प्रचंड जड झालीय..

रमेश भाटकर, उदय सबनीस, वैभव, नंदिता सगळ्यांचीच कामे खूप आवडली. नंदिताच्या आईचे पण. सध्या तरी प्रत्येक पात्राच्या तोंडची वाक्यं, हावभाव सगळं पटतंय म्हणून आवर्जून बघते ही सिरीयल. भाटकरांचा भंडारी क्लास.

कोणतीही सिरीयल बघण्याचा संयमच राहीला नाहीये माझ्याकडे.
झी मराठीने सध्या 'खोटं बोला आणि लपवा, लपवण्यासाठी काय वाट्टेल ते करा आणि तेच सिरीयलीत दाखवा' हा झेंडा हाती घेतलेला दिसतोय. +१
ती नंदीता धुरी ए ए मधे आवडली होती. इथे तोंडभर हसली की मला राग येतो. Happy ह्या अतिगुणी नायिका डोक्यात जातात.

मी पाहते ही सिरियल. नंदिता धुरी छानच करते अभिनय. शिवाय उदय सबनीस.
वैभव मांगले ला थोडे आगाऊ आणि शिष्ट डायलॉग दिलेत ते खटकले. दहा वर्ष स्ट्रगल करूनही माणूस जरा देखिल वरमत नाही हे पटत नाही. बहुधा त्याला काम आहे पण पुरेसं नाही.

बाकी प्रोमोज मध्ये एकदा रमेश भाटकर स्त्री वेषातल्या वैभवला तु खूप सुंदर दिसतेस असं म्हणाला तेव्हा 'हे देवा हे ऐकण्या अगोदर माझे कान का फुटले नाहीत' हा हिंदी भाषांतरीत डायलॉग आठवला Proud

आणि जर का तो स्त्री भुमिका करतो आहे हे बायको पासून लपवलं असेल किंवा त्याची त्याला लाज वाटत असेल तर तो कलाकार आहे आणि अभिनय करायला इतका आसुसला आहे हे दाखवणं अत्यंत चुक ठरेल. कारण हाडाच्या अभिनेत्याला कोणत्याही भुमिकेचं वावगं नसतं.

आणि जर का तो स्त्री भुमिका करतो आहे हे बायको पासून लपवलं असेल किंवा त्याची त्याला लाज वाटत असेल तर तो कलाकार आहे आणि अभिनय करायला इतका आसुसला आहे हे दाखवणं अत्यंत चुक ठरेल. कारण हाडाच्या अभिनेत्याला कोणत्याही भुमिकेचं वावगं नसतं. >>>> हो दक्षे, प्रोमोजमध्ये तस दाखवल आहे.. तसच त्या शिरेलीच्या टायटल साँगातपण एक शॉट आहे असा.

आणि जर का तो स्त्री भुमिका करतो आहे हे बायको पासून लपवलं असेल किंवा त्याची त्याला लाज वाटत असेल तर तो कलाकार आहे आणि अभिनय करायला इतका आसुसला आहे हे दाखवणं अत्यंत चुक ठरेल. कारण हाडाच्या अभिनेत्याला कोणत्याही भुमिकेचं वावगं नसतं. >>>> हे त्याला बायकोपासुन लपवायचे नसेल तर सासु-मेव्हण्यापासुन लपवायचे असेल कारण ते आधीच त्याचा राग करतात (आठवा तो सीन ज्यात नाट्यगृहाच्या बाहेर तो स्त्री भुमिका करत असताना त्याच्या मेव्हण्याच्या चेहर्‍यावरचे भाव) पण तो बायकोपासुनही यासाठी लपवेल कारण तीला माहित झाले की ती दुसर्‍यांनाही सांगेल ('तुम्हा बायकांच्या तोंडात ना तीळ भिजत नाही' असा एक डायलॉग मारलाय त्याने आधीच्या एपिसोडमध्ये :डोमा:)

आता चांगली चाललेय शिरेल म्हणुन जरा कौतुक काही दिवसांनी शिव्या घालायच्याच आहेत Wink

वैभव, नंदिता आवडले. वैभवच कॅरेक्टर माझ्या नवर्‍याशी मिळतजुळत आहे (तसाच आगाऊ आणि शिष्ट पण बायकोवर प्रेम करणारा Blush ) त्यामुळे जास्त आवडली हि सिरीयल Lol

मग फसलंच की वैभवचं कॅरेक्टर.
जर त्याला अभिनयाची आवड आहे आणि तो फक्त अभिनयातच करियर करणार इतर कोणतीही नोकरी करणार नाही असं ठासून सांगत असेल, तर स्री भुमिका करून आपण पैसे मिळवतोय हे का लपवायचं? Uhoh
मग पैसे मिळवायला अभिनय केला काय आणि इतर कोणतंही काम करून पैसे मिळवला काय, दोन्ही सारखंच. मग अभिनय अभिनय म्हणून इतका माज करणारं कॅरेक्टर कशासाठी? Uhoh

आणि कळतंयकी तो वैभव आहे, घरात आजुबाजुला बाई वेषात असलेली शिरेल बघितली तरी कळणार नाही असं दाखवणार हा तद्दन मुर्खपणा. एवढा काही तो बाई वाटत नाहीये, मला तरी.

तसं नाहीये दक्षिणा. परवा त्याची सासूही म्हणते मुलीला की त्याच्या आई वडीलांसारखंच आम्हालाही नाही आवडत त्याने तोंडाला रंग फासलेला. म्हणजे मुळातच तो हा अभिनय सगळ्यांच्या मनाविरूध्द करतोय. आता स्त्री भूमिका करणं लपवायचं का, तर तो खरा स्त्री नसून पुरूष आहे हेच मुळी त्याला जगापासून लपवायचं आहे. त्या सिरीयलमध्ये कलाकारातही त्याचं नाव 'वैभव' असं नाही तर कुणी तरी स्त्री नटी (वैभवी ही लावेल कदाचित) म्हणूनच लागणार आहे. त्याची खरी ओळख तो सर्वांपासूनच लपवणार आहे. हीच त्याच्या अभिनयाची कसोटी असणार आहे.
हे सगळं कशासाठी? तर त्यासा नोकरी करायची नाही. अभिनय करूनच मोठं व्हायचं आहे. अभिनयासाठी पुरेशा संधी मिळत नाहीत, मिळाल्या तर पुरेसे पैसे मिळत नाहीत. आपल्यामुळे बायकोला आणखी हाल सोसावे लागू नये म्हणून मिळेल ते काम - पण अभिनयातलंच, करायला तो तयार झालाय. भंडारी सारखा प्रोड्यूसर,.डायरेक्टर आणि हीरोईनचं काम मिळणार असेल तर बक्कळ पैसा हे ही गणित आहेच ना.
तो स्त्री भूमिका नाईलाज म्हणून करतोय,अभिनय करण्यासाठीही अभिनय करावा लागणार आहे त्याला. बायकोला न सांगण्यामागचं कारणही हेच असेल की जगाला फसवून त्याने असं काही करावं हे तिला आवडणार नाही. त्यापेक्षा नोकरी कर म्हणेल ती.

आणि कळतंयकी तो वैभव आहे, घरात आजुबाजुला बाई वेषात असलेली शिरेल बघितली तरी कळणार नाही असं दाखवणार हा तद्दन मुर्खपणा. >>>>

हो ना हे गंडलयच. त्याच्या घरात बरेच विग ठेवलेले दाखवले होते म्हंजे त्याच्या बायकोला माहित आहे की तो बायकांचे केस लावुन कसा दिसत असणार ते. तरीही तो तिच्यासमोरुन जातो आणि ती ओळखत नाही असे दाखवलयं.

जीभ प्रचंड जड झालीय..>> अनेक वर्ष दारुचा परीणाम आहे. बाकी स्त्रीपात्र करणे हे फॅड झाल्य खरे तर. त्यात लपवायचे काय. उग्गाच काहीतरी.

Pages