माझे पती सौभाग्यवती (झी मराठीची नवी मालिका)

Submitted by पियू on 14 October, 2015 - 11:04

'झी मराठी' वर सुरु झालेल्या 'माझे पती सौभाग्यवती' या ८.३० वाजता प्रक्षेपित होणार्‍या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पपई कुमार का म्ह्णायचं त्याला?>>> कारण अशोक शिन्दे अजूनही हया वयात फिट आहे, ते सतत पपई खातत. त्यान्च्या फिटनेसचे रहस्य पपई आहे. Happy

हो ते अशोक शिन्दे फार फिट दिसतात, एक वैभवच पात्र सोडल तर तशी बाकी मन्डळी काम बरी करत होती.पण सिरियलची टॅगलाइन आणि एकदरित मामला जमुनच नाही आला. मलातर लक्ष्मिच्या आइच काम करणारी पण आवडली होती... सतत मुलिला साभाळुन घे,पडत घे अस प्र्त्यक्षात सान्गणार्‍या आयापेक्षा तरी जावयावर जरा वचक ठेवणारी अशी वेगळी भुमिका होती ती.

सतत मुलिला साभाळुन घे,पडत घे अस प्र्त्यक्षात सान्गणार्‍या आयापेक्षा तरी जावयावर जरा वचक ठेवणारी अशी वेगळी भुमिका होती ती.>>>> हो ना, पण तिलाच खलनायिका ठरवले आहे.

यातली लक्ष्मी जयश्री गडकर ची मुलगी आहे का?>>>> ए, जयश्री गडकर च्या नवर्याचे नाव बाळ धुरी आहे. मग, हे शक्य असू शकेल की नन्दिता धुरी त्यान्चीच मुलगी असेल.

https://en.wikipedia.org/wiki/Bal_Dhuri

Actually,नन्दिता धुरी ही Theater artist आहे. सुरुवातीला ती college च्या एकान्कीका मधून काम करायची,नन्तर तिचा व्यवसायीक नाटके, चित्रपट असा प्रवास सुरु झाला. हि तिची पहीली मालिका आहेत. तिला नाटकातल्या, एकान्कीका मधल्या performances पुरस्कारही मिळाले आहेत. पण तिने कधी आपण जयश्री गडकरची मुलगी असल्याच कधी उल्लेख केला नाही.

मी म.टा. मध्ये तिची मुलाखत वाचली होती,पण त्यातही तिच्या background चा उल्लेख आला नाही. Uhoh

मुलगी आहे असं वाटत नाही, बाळ धुरी आणि जयश्री गडकर यांना एक मुलगा आहे, आनंद नाव बहुतेक. खूप वर्षापूर्वी दूरदर्शनवर झालेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की त्यांना एक मुलगा आहे.

पण तिने कधी आपण जयश्री गडकरची मुलगी असल्याच कधी उल्लेख केला नाही.>
बाळ धुरी आणि जयश्री गडकर यांना एक मुलगा आहे, आनंद नाव बहुतेक. > ओके. मला कोणीतरी असं सांगितलं तेव्हापासून मला तिची जिवणी, डोळे जरा जयश्री गडकर सारखेच दिसताहेत असं वाटायला लागलं:P ; म्हणून विचारलं.

नंदिता धुरीसाठी हि मालिका मी अधुनमधुन पहात होते. झी मराठीवरच्या इतर सगळया मालिकांप्रमाणे अर्धवट शेवट करण्याची परंपरा याही वेळी राखली गेली. सुरेखाच्या दारूडया नवऱ्याचे, चंदूचे काय झाले? वैभव आणि लक्ष्मीच्या घराचे काय झाले? त्यांच्या घरात पाळणा हलणार होता, त्याचे काय? सगळेच प्रश्न नेहेमीप्रमाणे अनुत्तरित!

शेवटच्या भागात ,
भाउ वैभवला सांगतात की तु जगाला निडरपणे सामोर जायला पाहिजे. कधीना कधी सगळ्याना कळायलाच हव की खर काय आहे. थोड्या ब्रेन वॉशनंतर , वैभव युनिटला मेसेज करून कळवतो की त्याला सगळ्यान्शी काहितरी महत्वाचे बोलायचे आहे.
कट टु सेट : सगळे कपाळाला हात लावून बसलेय्त . तेवढ्यात सुरेखा नेहमी प्रमाणे केसांची बट कानामागे ढकलत येते. एके तिच्यावर कावतो की तिची मॅडम कुठे आहे . आम्ही लवकर आलो आहोत की तिला काहितरी महत्वाचे सांगायचे आहे. तेवढ्यात पडद्यामागून आवाज येतो , सर येउ का? . आणि मग हो हो वगैरे झाल्यावर वैभव आणि लक्श्मी अवतरतात . सगळे परत आश्चर्यचकित . मग लक्श्मी सांगते की हीच तुमची नायिका .
पहिल्यान्दा सगळे वैतागतात , आरडाओरडा करतात , मी तुला बघून घेइन , काय फालतुपणा आहे वगैरे करतात . पण वैभव-लक्श्मी च्या युक्तीवाद आणि भाषणामुळे सगळ्यान्चे मत परिवर्तन होते.

विराजला काहिच प्रोब्लेम नसतो कारण वैभवचा अभिनय उच्च प्रतिचा असतो . त्याने पुरुश असून स्त्री भूमिका केली यात त्याला काही वाटत नाही .
एके ४ वेळा वै. ला भामटा म्हणतो . पण मग ल. त्याच्यासमोर सेन्टी मारते की तुम्हाला नशिबवान आहात. आम्ही फार खडतर आयुश्य काढल आहे . स्ट्रगल म्हणजे काय ते तुम्हालाही माहित असेल ई.ई. .
मग ५ मिनिटापूरवी वै. ला बरबाद करणाच्या गोष्टी करणारा एके म्हणते की तो नेहमीच रोमान्सचा बादशहा रहाणार . आणि यापुढे लोकांना दाखवणार की त्याला असं का म्हणतात. मग त्याच्यासमोर पुरुश असो की स्त्री . मित्रा वैअगिरे म्हणून वै. ला मिठी मारतो .
अशाच काहितरी गोष्टी सान्गून दत्ताभाउही द्रवतात.
मग भंडारी पेटतो . वै आणि ल परत काहीतरी सांगतात . मग भंडारी ला साक्शात्कर होतो की त्याच्यावरही प्रेम करणारी एक बायको आहे . तो वै ला साथ देणार्या ल च कौतुक करतो .
शेवटी सौभाग्यवती म्हणते , की मी पडद्यामागे तुमच्या सारखाचीच एक स्त्री आहे. मी हि माझी नेहमीची काम करते , घर सांभळते ई. ई. . विराज सीन कट करतो .
मग वै आणि ल. प्रेमाच्या आणि लटक्या रागाच्या चार गोष्टी बोलतात.
संपली मालिका . .. हुस्श्स्श

थोडक्यात मी अंदाज व्यक्त केल्यापरमाणे कारे दुरावा प्रमाणे सगळे गोडगोड करुन मो़कळे झाले. Proud

म्हणावा तितुका गोड वाटला नाही. शिरेल संपवायची म्हणून संपवली असे वाटले. बरेच प्रश्न अनुत्तरित ठेवले.. शेवट अजून रंगवता आला असता.

म्हणावा तितुका गोड वाटला नाही. शिरेल संपवायची म्हणून संपवली असे वाटले. बरेच प्रश्न अनुत्तरित ठेवले.. शेवट अजून रंगवता आला असता.>>>> सहमत.

Pages