माझे पती सौभाग्यवती (झी मराठीची नवी मालिका)

Submitted by पियू on 14 October, 2015 - 11:04

'झी मराठी' वर सुरु झालेल्या 'माझे पती सौभाग्यवती' या ८.३० वाजता प्रक्षेपित होणार्‍या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण आवडते ती (हेअर ड्रेसर चं काम केलेली) एलतिगो मध्ये पण छानच काम केलं होतं. मग कॉमेडी शो मध्ये पण होती बहुतेक. (ढाबळ बहुतेक) थोड्याच काळात बरिच मेहनत करून पुढे आली.
हिंदितल्या भारती सिंग ची आठवण येते मला हिला पाहिलं की.

वडगबाळकर का?

मोठे आडनाव या क्लु वरुन गेस केलय Happy

योगायोग म्हणजे ती मिसेस तेंडुलकर सिरियल मध्ये सुद्दा होती.

बालगंधर्वांच्या काळातली स्त्रीवेषाची अपरिहार्यता होती. पुढे Mrs. Doubtfire मुळे हे स्त्री भुमीका करणे अनेकांना अनेक प्रयोग करायला प्रोत्साहन देऊन गेले. पैकी चाची ४२० चांगला प्रयोग होता. . मराठीत त्या आधी आलेली बनावाबनवी जरा तरी सुसह्य होती. पण वैभवला स्त्री वेषात पहाणे जरा कटकटीचेचे आहे.

वैभवचे खांदे रुंद आहेत, हाताचे पंजे बळकट आहेत. चेहरा सुध्दा रापलेला आहे. कधी काळी लता मंगेशकर यांचा आवाज काढतो इतकीच काय ती उपलब्ध सामग्री. या जोरावर स्त्री ची भुमिका म्हणजे जरा जास्तच होते.

बाकी वर आलेल्या तांत्रीक बाबी थोडा वेळ दुर्लक्ष केल्या तरी फारच काहीच सुसह्य नाही.

स्त्री वेषात वैभवचे १-२ अ‍ॅगलच कॅमेरामनला/ दिग्दर्शकाला सापडावेत ? तेच हास्य, तोच अ‍ॅगल ? कशी सिरीयल पुढे नेणार कोण जाणे ?

वैभवचे खांदे रुंद आहेत, हाताचे पंजे बळकट आहेत. चेहरा सुध्दा रापलेला आहे. कधी काळी लता मंगेशकर यांचा आवाज काढतो इतकीच काय ती उपलब्ध सामग्री. या जोरावर स्त्री ची भुमिका म्हणजे जरा जास्तच होते.>>आणखी विग घालायला ट्क्कल पण आहे ना. ज्याचा फायदा पण आहे तोटा पण. तोटा या करता कधीही सुळ्ळ्कन घसरु शकतो विग. Proud

भाऊ कदम चांगले विनोदी अभिनेते आहेत. पण त्यांना आणि सागर कारंडेला स्त्री भूमिका करायला लावणे हे थांबायला पाहीजे. यात स्त्रियांचा अपमान असतो अनेकदा. या कॉमेडी शोजमुळेच हे खूळ वाढलंय.

दिलीप प्रभावळकर यांनी केलेली स्त्री भूमिका ही मराठीतली आजवरची (माझ्या मते) सर्वात सुंदर भूमिका आहे. इतके बारकावे टिपलेले आहेत की खरी बाई सुद्धा फसेल. हॅट्स ऑफ !

दिलीप प्रभावळकर यांनी केलेली स्त्री भूमिका ही मराठीतली आजवरची (माझ्या मते) सर्वात सुंदर भूमिका आहे. इतके बारकावे टिपलेले आहेत की खरी बाई सुद्धा फसेल. हॅट्स ऑफ >>सहमत!

वैभवने राखि सावन्त च एक विडबन खुप छान केलेय पण ते विनोदासाठी होत त्यामूले थोड ओव्हरबोर्ड जाणे पण ठिक होते , इथे ते विचित्र वाटतय, अगदी एके च काम करणारा नटही फोटोसेशन एपिसोड मधे त्याच्यापुढे नाजुक वाटतोय,

बनवाबनवीत लक्ष्याला स्त्रि रुपात दाखवताना सचिनने नौवारीत, कोल्हापुरची, भरभ्क्कम अशी बरोबर जुळवणी केली होती

त्यापेक्षा हिच कथा एखाद्या struggling नायिकेची दाखवण जास्त चान्गले वाटले असते.

भाऊ कदम चांगले विनोदी अभिनेते आहेत. पण त्यांना आणि सागर कारंडेला स्त्री भूमिका करायला लावणे हे थांबायला पाहीजे. <<< +१००..
एकाद्यावेळी विनोदासाठी स्त्री भूमिका करणे वेगळे आणि परत परत तेच करणे वेगळे ... ते बघवत नाही.
वैभवही 'फू बाई फू' मधल्या विनोदी प्रहसनासाठी एकदोनदा बरा वाटला, पण महिनोंमहिने चालणार्‍या शिरेलीत तो स्त्रीवेष करणार म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे...

पण महिनोंमहिने चालणार्‍या शिरेलीत तो स्त्रीवेष करणार म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे...>>>१
सिरियल सुरु होताना, वैभव मांगले च्या अभिनयक्षमतेमुळे तो स्त्री पात्र कसं उभं करेल याबद्दल खरंच उत्सुकता होती. पण एखादा तीन तासाचा सिनेमा करणे आणि महिनों महिने... कशाला वर्षानुवर्षे चालणार्‍या सिरियल मधे, ज्यात एका ओळीत सांगता येईल अशी स्टोरी २-३ भागात खेचतात, असंख्य क्लोज अप्स दाखवतात, त्यात हे नाही चालणार. आता त्या मर्यादा सिरियल पाहताना जाणवत आहेत.
काल 'नवरा माझा नवसाचा' लागला होता. त्यातला हेल्मेटवाला वैभव मांगले आणि आताचा, यात अंगापिंडाने चांगलाच फरक आहे. ही सिरियल त्याला जरा उशीराच मिळाली म्हणायची Happy

Ka re durava madhe Nayak Nayika chalit rahat hote, ithe hi Lakshmi & Vaibhav pan chalit rahat aahet. Katha punha ekda lapava lapavi chi aahe. Nayaka chya mitra che nav punha donhi thikani "Suhas" ch aahe. Vegale nav dekhil suchu naye, mhanje kevadhe aaschary.....

मला एक कळत नाही, आपला नवरा अ‍ॅक्टर आहे, काम आवडतंय म्हणतोय, तर बायको विचारत कशी नाही की नक्कि काय काम आहे? कोणत्या सिरियल मध्ये? कसला रोल, सिरियलचं नाव काय आणि कधी टेलिकास्ट होणार आहे इ? Uhoh

दक्षि ताई, तु तो भाग मिसलास बहुतेक. तो अ‍ॅनिमेशन करीता डबिंगच काम करतो असं त्यानं सांगितलेय लक्ष्मीबाईला Happy

स्निग्धा हो बहुतेक मि मिसलाय मग भाग. असं सांगितलं असेल तर ठिक आहे मग. नशिब तिथे तर शिरेलवाल्यांनी डोकं चालवलंय ते.

अत्यन्त वाईट मालिका

झी टीव्हीचा सगळ्यात अपमानस्प्द भाग म्हणजे कलाकारांची नावे न देणे.

कानाकोपर्यातल्या माणसांची नाव असतात पण कलाकारांची नसतात.

तो वैभव मांगले भयानक दिसतो.
आणि हास्यस्पद म्हणजे तो डायरेक्टर प्रेमात तिच्या(वैभवच्या).

हॉर्रिबल..................

मी शक्यतो टिव्ही बघत नाही. कुणाकडे गेलं तरच. काल जबरदस्तीने या मालिकेचा भाग पहावा लागला. दारु पिण्याच्या अभिनयातला तोचतोचपणा जाणवला. सॅण्डी आणि लक्ष्मी (हेच नाव आहे ना ?) यांच्यातला प्रसंग छान जमला होता. असे काही प्रसंग असतात म्हणून लोक चिकटतात मालिकांना.

कित्येक वेळा समोर चाललंय ते पाहणे एव्हढाच उद्देश असतो. अपेक्षा वगैरे नसतातच. पुढे काय झालं ही उत्सुकता असते. इथे नाही का ठराविक बाफना नावं ठेवत पुन्हा वाचायला जातातच सारे ! Proud

हल्ली कसदार नाटकांची संख्याही रोडावली आहे. सिनेमे चांगले येतात. त्यामुळं मनोरंजन मर्यादीत करून घेतलेलं बरं. मालिकांना जोवर प्रेक्षक आहे तोवर दर्जा सुधारावा असं कुणालाही आवर्जून वाटणार नाही. आपणच लोकाश्रय देत असताना टीका करणे बरे नव्हे.

काल लक्ष्मीने आईला आणि भावाला ऐकवले. आज जानीची टर्न आहे.

बहुदा खलनायिक असलेल्या मोतोश्रींना स्पष्टपणे ऐकवणे हा ट्रेंड आहे सध्याचा Wink

खरतर लक्ष्मीची आई तशी खलनायिका वाटत नाही मला. १०-११ वर्षांनंतरही ह्यांचे काही मार्गी लागत नाही ह्याचा राग काही फारसा चुकीचा नाही.

तोचतोचपणा डोक्यात जायला लागलाय वैभव मांगलेचा आता. काही नाविन्य उरले नाहीये बिलकुल

तो डायरेक्टर आणि तो मुख्य अभिनेता, तेच तेच डॉयलॉग्ज.

नशीब ईथे यु.के. मध्ये "Record, Pause, Rewind and Forward" ची सुविधा आहे. मी विकांताला सगले भाग साधारणतः प्रती भाग ३ मिनिटांत पाहून संपवतो Happy

सासू सुन सोडुन काही नवे म्हणून बघायला सुरवात केली. पण इथेही एकच दळण चालू आहे कळल्यावर बघायचे सोडुन दिले.

Pages