माझे पती सौभाग्यवती (झी मराठीची नवी मालिका)

Submitted by पियू on 14 October, 2015 - 11:04

'झी मराठी' वर सुरु झालेल्या 'माझे पती सौभाग्यवती' या ८.३० वाजता प्रक्षेपित होणार्‍या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ सामी , त्या सुरेखा चा नवरा एकदाच सुधारलेला दाखवला, नन्तर पुन्हा तेच.

त्या खर्या लक्ष्मीला सुरेखा आणि वैभवचे अफेअर आहे असा सन्शय येतो ना? त्याचे काय दाखवले ?

<<<<रस्त्याने येताजाता सगळेच पुरुष तिला वळुन वळुन बघत असतात.>>>>

ते तरी काय करतील बिचारे
समोरुन इतकं अप्रतिम सौंदर्य चालून येत असेल तर लक्ष जाणारच की .........

कणेकरांनी लिहिलंय की, जर सुरेख लावण्यवती तरुणी म्हणून वैमां शोभत असेल तर संलीभनी मस्तानीच्या रोलसाठी भाऊ कदमचा विचार करायला अजिबातच हरकत नव्हती.

वैभवलक्ष्मी >>>> Lol मस्त नाव आहे. Proud

आणि जर वैभवलक्ष्मी वर - तीन सेटवरचे, अनेको रस्त्यावरचे, काही चाळीमधले, असे अमोक पुरुष फिदा असतील, तर त्या न्यायाने भाऊ कदम खरंच मस्तानी म्हणुन चालतील. Lol

या मालिके मध्ये सुधा अशक्य असा आचरटपणा चालू आहे. लक्षुमी ची कडकलक्षुमी झाली आहे... खोटी लक्ष्मी promotion साठी मिकी आणि ए k सोबत भुर्रर गेली आहे.

...

शाळेत एखाद्या मुलाला बाईंनी स्त्री भूमिका करायला लावली तरी या वेषातून कधी बाहेर पडतो असं त्याला होतं. इतक्या लहान वयातही हे कळतं. मालिकेतला हा टोण्या विवाहीत आहे. घरी खुलं वातावरण नाही कि स्त्री भूमिकेचं अ‍ॅप्रिसिएशन होईल किंवा अगदी हसत खेळत घेतलं जाईल. हा स्वतःही कॉण्फिडण्ट नाही. मग असं असताना हॉटेलात स्त्री वेषात कुणाला भेटायला जाणं अती वाटलं. त्यातही या दोन पुरुषांकडून आपल्याला धोका आहे असं वाटल्याने मैत्रिणीला आणणे, तिला सोडून जाऊ नकोस म्हणून आग्रह करणे हे प्रसंग भयाण होते . सहनच होत नव्हतं हे सर्व पाहणं. नंतर त्या विगसंभारवतीने डोळ्यांचे जे काही विभ्रम केले त्याने कानातून धूर निघणे बाकी होतं. त्या एपिसोडबद्दल विनोदाने लिहीणेच शक्य होत नाहीये. संताप झाला ते प्रेक्षकांना गृहीत धरणं याने. मालिकेत अनावस्था प्रसंग ओढवत नाही, सगळं कसं सुरळीत पार पडतं. टकलाला विग जास्त चिकटून बसतो का ? कारण तो पडत नाही कि सरकत नाही. पण कायम त्या विचित्र केशरचनेला पाहणं शक्य नाही. रमेश भाटकर, अशोक शिंदे हे देखणे अभिनेते आहेत. त्यांच्यावर देखण्या मुली, बायका भाळत असतील. पण यांची चॉईस पाहून बिचा-यांचा फ्युज उडत असेल.

कुणी मागे लिहीलं असल्यास माहीत नाही. पण हा वेष कुठे बदलतो ते पाहीलेलं नाही. बहुतेक त्या मैत्रिणीच्या किंवा मित्राच्या घरी बदलतो असं काहीतरी आहे ना ? पण मग रोजच्या रोज एक पुरूष घरी येतो, दरवाजा बंद होतो आणि आतून बाई बाहेर पडते किंवा संध्याकाळी याच्या उलट होतं हे शेजारपाजारच्यांच्या लक्षात कसं येत नाही. विशेषतः बायकांच्या नजरेतुन असलं काही सुटणं अशक्यच वाटतं.

रमेश भाटकर, अशोक शिंदे हे देखणे अभिनेते आहेत.>> अशोक शिन्दे ठिक आहे पण, रमेश भाटकर देखणे? असो मुद्दा तो नाहिच्च्चे हे कळलय, तुमच्या पोस्टशी सहमत, एकदा वैभवने राखिची टिन्गल करायला स्त्रिवेष घेतला आणी त्याच्यासहित सगळ्या झी प्रॉडक्श्नने भलताच समज करुन घेतला अस झालय ते... मालिका बघत नाही पण जे काय एपिसोड आधी पाहिले तेच अचाट होते.

मला तर वाटतं पूर्वीच्या काळी थोर कलाकार स्त्री भूमिका करून अजरामर झाल्याची उदाहरणं हेच यामागचं कारण. बालगंधर्वांपासून ते सचिनपर्यंत, त्यांची केवळ स्तुतीच झाली. निंदा कुणाच्याही वाट्याला आली नाही. लक्ष्मीकांतच्या स्त्रीवेषाची खुद्द सिनेमातच चेष्टा केल्याने प्रेक्षकांनीही ती गंमत एंजॉय केली. या सगळ्या कौतुकाचंच आकर्षण वाटत असणार नाहीतर वैभव काय, सागर कारंडे किंवा भाऊ कदम काय सातत्याने स्त्री वेश धारण करण्यामागचा हेतू कळत नाही.

एका गावातल्या राजाला आगळ्या वेगळ्या गोष्टी जमवायचा छंद असतो. त्यासाठी तो कितीही मूल्य द्यायला तयार असतो. तीन लबाड माणसं हे हेरतात आणि एक डाव आखतात. विणकर असल्याचं भासवून राजाच्या नगरीत शिरतात. हातमागावर, हातात काहीही धागा दोरा नसताना काम करत असल्याचं दिवसरात्र नाटक करतात. कुणी विचारताच, अत्यंत मौल्यवान राजवस्त्र विणत असल्याचं सांगतात. कुठे आहे? असं विचारताच, तुम्हाला ते वस्त्र पाहायचीही कुवत नाही म्हणून तुम्हाला ते दिसत नाही, असं उत्तर देतात! बातमी वार्यासारखी राजापर्यंत पोहोचते. राजा ते राजवस्त्र घेऊन त्यांना दरबारात बोलावतो. यथोचित नाटक करत ते तिघे तिथे जातात. राजाच्या प्रश्नांना चटचट उत्तरे देत हजारो सुवर्ण मोहरांना ते राजवस्त्र चक्क विकतात! राजाला ते (नसलेले) वस्त्र घालून नगरात हत्तीवरून मिरवणूकही काढायचा आग्रह करतात! राजा भोळा. सगळे उंची कपडे उतरवून बसतो अंबारीत. मिरवणूकीचा गाजावाजा सुरू होताच तिघे लबाड नगरातून चोर्या करत पोबारा करतात. सगळी प्रजा अचंबित होऊन विवस्त्र राजाकडे बघते आहे. राजाही अवघडलेला आहे. पण वस्त्र पाहायची आपली कुवत नाही हे कुणी कबूल करत नाही. शेवटी एक लहान पोर ओरडते - 'ए, आपले महाराज उघड्याने का फिरतायत? कपडे चोरले काय कुणी?' ते ऐकून राजा चपराक बसल्यासारखा जागा होतो...

आता आपल्या कहाणीतले लबाड कोण, राजा कोण, प्रजा कोण आणि ते मूल कोण हे कळले म्हणजे झाले. Happy

झी मराठी वर लागणार्या एकापेक्षा एक फालतु सिरियल्सच्या लिस्टमधे ही टॉपवर आहे. किती unbearable आणि unrealistic. घरी आलेल्या आत्या ७ तेस१०.३० सगळ्या सिरियल्स पहायच्या. त्यांच्या बरोबरीने बर्‍याच सिरियल्सची झलक मिळाली, पण यासारखी अचाट हीच.
वैभवलक्ष्मी वर फिदा असणार्या ( म्हणजे सिरियलामधे खोटं का होइना तसं दाखवावं लागणार्या) त्या तिन्ही हिरोजची दया येते.

घरी आलेल्या आत्या ७ तेस१०.३० सगळ्या सिरियल्स पहायच्या. >> अगं, आमच्याकडे रोजच या सगळ्याच शिरेली जेना पाहतात आणि आम्हाला त्या सहन कराव्या लागतात. Uhoh

आशुडी पोस्ट मस्तं.

झी मराठीने थापा मारायाच्या सिरीयल्स सुरू केल्यात अशी चर्चा या धाग्यावर पण आहे. यात सर्वात वरचा नंबर का रे दुरावा म्हणत जवळ जवळच २४ तास राहणा-या फेकू कपलचा. दुसरा क्रमांक वैभवलक्ष्मीचा.

आता टीनेजर्सचे पण मूल्यशिक्षण व्हावे म्हणून संत आहे मुलगी ही मालिका सुरू झाली. आपलं घर बुरसटलेल्या विचारसरणीचं आहे हे माहीत असताना हा नायक फॉर्वर्ड (त्यातल्या त्यात) मुलीला गटवतो. त्याला चालून आलेल्या मुलीने बिचारीने त्याला सत्य सांगितलं तर हा तिला स्मृती इराणी बनवायच्या मार्गावर आहे. पळून जावं लागेल वगैरे. पण स्वतःच्या घरी सांगायची हिंमत नाही. चालून आलेल्या मुलीला पळवून लावलं की परस्परच अनेक प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होणार. मग यांचं वाजणार बहुतेक. पण यापेक्षा हिंमत नाही तर प्रेमाच्या भानगडीतच नको पडायला किंवा सरळ सांगून टाकावं असं काही होत नाही.

थोडक्यात चालूगिरी कशी करावी हे शिकून झी चे प्रेक्षक राष्ट्राचा उद्धार करणार लवकरच. पण यामुळे चालूगिरीची यत्ता झी ला पण वाढवत न्यावी लागेल.

मध्ये कधीतरी चुकून या सिरियलचा एक भाग पाहिला, त्यात उदय सबनीस (लक्ष्मी चे वडील ) वैभवलक्ष्मी ला फोन करतात.
वैभव तर ऑल टाईम एकच फोन (एकच नंबर) वापरताना दिसतो आहे. मग उदय सबनीस जेव्हा फोन करतो लक्ष्मी (नटीला) तेव्हा त्याच्या फोनवर आपोआप वैभव चं नाव कसं काय दिसत नाही? Uhoh कारण त्याने तर तो नंबर जावयाच्या नावाने सेव्ह केलेला असणार ना?

फारच फाल्तू प्रश्न आहे माहित आहे, पण अगदीच राहवलं नाही म्हणून विचारलं.

हा प्रश्न मला फार अगोदरपासून पडला होता .
पण तो डुअल सीम फोन वापरत असेल असं वाटून मी गप्प बसले.

पण माझा एक वेगळा प्रश्न आहे ,
तो भंडारी वैभवलक्श्मी ला चेक कुठल्या नावात्ने देतो ? तो एनकॅश कसा होतो ??

Pages