माझे पती सौभाग्यवती (झी मराठीची नवी मालिका)

Submitted by पियू on 14 October, 2015 - 11:04

'झी मराठी' वर सुरु झालेल्या 'माझे पती सौभाग्यवती' या ८.३० वाजता प्रक्षेपित होणार्‍या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धटली, का ते गंभीर भूमिका वठवू शकणार नाहीत का? >>>> नाही. कारण तो पप्पु जेव्हा होसुमियाघमध्ये जेव्हा आला होता तेव्हासुद्धा त्याला कॉमिक रोलमध्येच आणल होत... या मालिकेतल्या नाइलाजाने स्त्री म्हणुन काम कराव लागणार्‍या कलाकाराची ओढाताण ते दाखवतील अस मला नाही वाटत...

आणि महत्त्वाच म्हणजे आपण इथे कितीही काथ्याकुट करुन काय होणारे? कास्टिंग फायनल होउन मालिका सुरु देखील झालीय..

फू बाई फू मधे हाच आवाज त्यांनी लता मंगेशकरांची नक्कल म्हणून वापरला होता. >>>> हो हे ही आल लक्षात.

https://en.wikipedia.org/wiki/Mrs._Tendulkar

ही एक सिरियल यायची पुर्वी सब टीव्ही वर. त्यात सिमिलर कथानक होते. म्हणजे नवरा सिरियलीत स्त्री पात्र करतो असे काहीतरी.

नाही मी अमि, यात नवरा स्त्रीपात्र करत नाही.. नवरा घर सांभाळतो आणि बायको बँकेत मॅनेजर की कायशा मोठ्या पोस्टवर काम करत असते..

नवरा घर सांभाळतो आणि बायको नोकरी करते असंच होते तिथे बहुतेक पण तो सिरीयलचं लेखन करत असतो असं वाटतंय.

कालच्या भागात वैभव चाळीतल्या बाथरूमला फाईव्ह स्टार म्हणाला का?! खरंच असा शब्द आहे का सिरीयल वाल्यांनी काढला आहे?

मला तर ही सिरियल म्हणजे बहुधा कुठल्यातरी नाटक, सिनेमा वा सिरियलची पॅरोडी असेल असे वाटते.

बारुवै असणे काय, त्याच्यावर एव्हढा अनुभवी निर्माता बेहद्द खूष होणे काय, फारसे पटत नाही.
तसे मला अभिनयातले फारसे कळत नाही, पण ऑडिशनमधे जे दाखवले आहे ते काही इतके खास वाटले नाही की अनुभवी नट्यांऐवजी यालाच घ्यावे.

पॅरोडीच असणार, विचार करून बघा.
असो.

मिसेस तेंडुलकर आया या मालिकेत नायक हाउस हजबंड आहे. मालिकांचा लेखकही. एका मालिकेसाठी त्यालाच स्त्रीरूप घेऊन स्वतःच लिहिलेल्या मालिकेत नायिकेची भूमिका करावी लागते. ही गोष्ट तो अर्थातच सगळ्यांपासून, अगदी स्वतःच्या बायकोपासूनही लपवून ठेवतो.
आपल्याला ती नायिका सिंड्रेलाच्या सावत्रबहिणींसारखी वाटली तरी मालिकेतली नायकाची भूमिका करणारा अभिनेता तिच्या प्रेमात पडतो. आणखीही काही लोक तिच्या प्रेमात पडतात. तिचं प्रचंड फॅनफॉलोइंग तयार होतं.

ही भूमिका देवेन भोजानीने केली होती. ही 'सब'वरची (विनोदी) मालिका होती आणि स्त्रीरूप आणताना व पुरुष मागे लागल्याने होणारी तारांबळ मजा आणत असे.

आणि महत्त्वाच म्हणजे आपण इथे कितीही काथ्याकुट करुन काय होणारे? <<<
असे कसे असे कसे. नावे नको ठेवायला. Proud

बाकी एक अक्खा एपिसोड वैभव बाथरुममधे घाबरुन केस नीट करताना दाखवला. त्याला साधे त्या बाहेरच्या काकांना मी आहे असे सांगता येत नाही. नंतर मात्र साधारण बत्तेचाळीस सेकंदात तो सगळा मेकप उतरवुन परत वैभव होऊ शकतो. Proud

यावरुन घाला बोटे. नुसते घरी पोचायला ३ एपिसोड तर सिरीयल किती वर्ष दळतील? Lol

असे कसे असे कसे. नावे नको ठेवायला. >>>> नावे ठेउच हो कांपो, मी म्हणत होते की स्त्रीवेशात कोण सुट झाल असत याचा काथ्याकुट कशाला करायचा, त्याचा निर्णय ऑलरेडी झालाय आपण शिरेलवाल्यांच अजुन कुठे चुकतय त्याला नाव ठेउ Lol

भरत मयेकर यांनी लिहिल्याप्रमाणे तो हाउस हसबंड एका मालिकेत स्त्री पात्र साकारतो आणि दिग्दर्शक त्याच्या प्रेमात पडतो, असे कथानक होते.

सार्वजनिक टोयलेट मधे चेहेर्याचा मेकअप आणि लिपस्टिक इतक्या पटकन कशी काय काढली. माझा थोडा भाग मिस झाला का?

भीषण मालिका
कुठेस वाचलय मी की झी टिव्हीच म्हणजे आम्ही नागडे नाचू तुम्हाला बघायचय तर बघा.

बर प्रत्येक सिरीयल लपवाछपवीवर आधारीत.

तरी बर इथे फक्त झीच्याच मालिकांवर लिहीतात .

वैभवचा मित्र म्हणजे मकरंद अनासपुरेच्या 'गाढवाचं लग्न' मधला रंभेचा भर सभेत गपदिशीन हात पकडणारा शापित गंधर्व आहे ना ???

अरे पण सिरीयल आहे म्हणुन काहीही दाखवाल का?
कॉमन टॉयलेट मधे फारतर कपडे बदलता येउ शकतात. का तिथे अंघोळ पण करतात? मेकप काढणे, तोही एवढा हेवी, कपडे बदलणे, विग वै सोपस्कार एवढ्या लगेच? चाळीतल्या कॉमन टॉयलेट चा सीन गंडला.

Parava promo baghitala. Tyacha mitra bahutek Dombivlikar aahe Bodas aadnaav.

sorry for Roman.

सगळा मुर्खांचा बाजार...

वेषांतराचे गुपित मित्राला सांगू शकतो, पण दहा वर्ष जीच्या बरोबर संसार करतोय तिला सांगत नाही.

मला तर यांचे लग्न कसे जमले असावे, हा प्रश्न पडलाय.

Ho Prajakta. Mala toch vattoy. Mage kahi varshapurvi zeechya shirelit hota hero mhanun thode divas. Mag badalale tyala.

कालचा भाग थोडावेळ पाहिला. तो वैभव त्या हेअर ड्रेसरला आपली ओळख "नटसम्राट" म्हणून करुन देतो Uhoh

सगळे भाग पाहिले नाहियेत पण खरच असे काही आहे का? आणि तसे असेल तर एवढी गरिबी आणि पैशासाठी अशी स्त्री भुमिका का करतो आहे????

नटसम्राट>>>>> Uhoh

अरे पण त्या भंडार्‍याला आणि त्या सुप्रसिध्ध हिरोला एक खरी बाई आणि ह्या नटीसम्राटीत फरक कळु नये अजुनही??दिसण्याच एक जाउदे. त्यांची चॉएस तशी असेल पण इतरही गोष्टी आहेत की नाही :रागः

Pages