माझे पती सौभाग्यवती (झी मराठीची नवी मालिका)

Submitted by पियू on 14 October, 2015 - 11:04

'झी मराठी' वर सुरु झालेल्या 'माझे पती सौभाग्यवती' या ८.३० वाजता प्रक्षेपित होणार्‍या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रमेश भाटकर अनेक वर्षापूर्वीपासुनच डोक्यात जायला सुरुवात झाली होती. या शिरेलीत तर भयानक लाऊडपणा करुन आणखी डोक्यात जातोय.

पण मध्यंतरी अस ऐकल की त्याने केलय वजन कमी या रोलसाठी. >> हो मी पण असं वाचलय कुठेतरी. आणि मुळातच बर्‍यापैकी उंची आणि पुरुषी राकटपणा या गोष्टी त्याच्याकडे आहेत त्यामुळे तो अगदी झिरो फिगर झाला तरीही बाईचा नाजूकपणा त्याच्याकडे येणं कठीणच आहे.

हो ना.. रमेश भाटकर एक तर एक शब्द कळत नाही काय बोलतो ते, त्यात हा नक्की लंपट आहे की माजोरडा यात दिग्दर्शकाची गफलत झालीय त्यामुळे अख्ख कॅरेक्टर गंडलय..

मला तर वाटतय ही मालिका प्रेक्षकांच्या विस्मृतीत गेलेल्या कलाकारांना परत आणण्यासाठी काढली गेलीय... मॅक्झीमम कलाकार अनेक वर्ष पडद्यावरुन गायब झालेले इथे दिसतायत... रमेश भाटकर, उदय सबनीस, अशोक शिंदे, ते वैभवला नटसम्राट म्हणुन हाक मारणारे शेजारी... मंजुषा गोडसेसुद्धा असंभव, एलदुगो नंतर इथेच दिसलीय. वैभवचा मित्र कम शेजारी ज्याला वैभव खर सांगतो तो सुद्धा या आधी आईशप्पथ मध्ये तरुणपणीच्या रिमा लागु झालेल्या उर्मिला कानिटकरचा मित्र..

कन्ताला आलाय या पन सिरियलचा. किती अतिशयोकती ती Sad
एक ती वैभवची बाय्को सोदली तर कुनाला बघवत नाही. उदय सबनीस पन मस्त. बाकी बेक्कर

तो लक्ष्मी ला सिस्टर म्हणणाराही छान काम करतो. बाकी अशोक शिंदे आणि वैभव मांगले दोघेही वयस्कर वाटतात.
रमेश भाटकर नक्की लंपट आहे की माजोरडा यात दिग्दर्शकाची गफलत झालीय त्यामुळे अख्ख कॅरेक्टर गंडलय.. > +१

>>>> तर स्री भुमिका करून आपण पैसे मिळवतोय हे का लपवायचं? <<<<
दक्षे, तुम्हारे बेसिक मे लोचा हो रएला है.... Proud
त्याला ती भुमिका मिळाली आहे, ती "तो स्त्रीवेषातच" गेला म्हणून, वैभव म्हणुन गेला, अन त्याला ती भुमिका मिळाली असे झालेले नाहीये, अर्थातच जिकडेतिकडे लपवालपवीच करावी लागणार.
कारण त्याच्या मेक अप आड वैभव दडलाय असे भंडारीला कळले की त्याला खाली डोके वर पाय करुन लटकवणार नै का? काम जाईल ते जाईलच, शिवाय फटके पडतील ते वेगळेच.... ! म्हणुन ही गुप्तता.

सहमत...रोल साठी बारीक होणे वैगरे गोष्टी मराठी कलाकारांना पटतच नाहीत.>> अरेरे सामी!! जनरलायजेशन नको गं बाई.... जरा जितेंद्र जोशीबद्दल अधिक माहिती मिळव.

>>>> रमेश भाटकर नक्की लंपट आहे की माजोरडा यात <<<< दोन्हीचे फ्यामिली मिक्श्चर चहा सारख आहे ते प्रकरण.. गंडलेले नाहीये! (असे माझे मत)

बाकि शेरीयली बघताना मी तुम्हा कुणाइतका बारकाईने विचार नै करु शकत....
मी आपला रंगुन जातो कथा सुत्रात, डॉयलॉग्ज काय आहेत ते ऐकतो, शब्दरचना नीट उतरली आहे ना ते बघतो, शब्दफेक नीट साधलीये ना ते अभ्यासतो, जसे की तोच डॉयलॉग वेगळ्या पद्धतीत उच्चारला तर काय, जरा वेगळे शब्द वापरले तर काय.... झालच तर क्यामेराचा अ‍ॅन्गल, फ्रेममधे बशिवलेले दृष्य, आऊट डोअर शुटिंगला लावलेला क्यामेरा, त्याचा झूम, अन झालच तर प्रसंग/डॉयलॉगबरहुकुम अ‍ॅक्टरच्या चेहर्‍यावरील माशा उडताहेत की नाही ते बघणे, नेपथ्य की काय अस्ते ते, ड्रेपरी, असले बरेच सटरफटर बघत बसतो झाले.... मला काय तुमच्यासारखे भारि भारी नाही कळत.

सहमत...रोल साठी बारीक होणे वैगरे गोष्टी मराठी कलाकारांना पटतच नाहीत.>> अरेरे सामी!! जनरलायजेशन नको गं बाई.... जरा जितेंद्र जोशीबद्दल अधिक माहिती मिळव. <<< नटरंगसाठी अतुलनेही बरीच मेहनत घेतली होती असं वाचलं होतं (आणि पडद्यावरही ते जाणवत होतं.)

सहमत...रोल साठी बारीक होणे वैगरे गोष्टी मराठी कलाकारांना पटतच नाहीत.>> अरेरे सामी!! जनरलायजेशन नको गं बाई.... जरा जितेंद्र जोशीबद्दल अधिक माहिती मिळव....>> अशी उदाहरणे हाताच्या बोटावर मोजण्या एवढी च. दुनियादारी आणि हल्लीच्या सिनेमातील कॉलेज कुमार आणि कुमारिका पाहून असे म्हणावेसे वाटते.

अरे तो मांगले सांगतोय की त्याने ७ किलोपर्यंत वजन कमी केलेय आणि डाएट सांभाळतोय. वाटत नाही ते सोडा ;).

दुनियादारी आणि हल्लीच्या सिनेमातील कॉलेज कुमार आणि कुमारिका पाहून असे म्हणावेसे वाटते.>> मग सरसकट सगळ्या मराठी कलाकारांना लेबल नको... जे मेहनत घेतात त्यांच्यावर अन्याय नको ना Happy

वैभवचा मित्र कम शेजारी ज्याला वैभव खर सांगतो तो सुद्धा या आधी आईशप्पथ मध्ये तरुणपणीच्या रिमा लागु झालेल्या उर्मिला कानिटकरचा मित्र.. >>> हा मित्र स्त्रीवेषात जास्त नाजूक दिसेल वैभवपेक्षा असं त्याला बघताना सतत वाटतं. भूमिकेसाठी मेहनत घेऊन कमावलेले दंड कमी केले तर नक्कीच.
वैभव मांगले कितीही गुणी कलाकार असला तरी तो सुंदर स्त्री दिसू शकत नाही.

पण एखादी गोष्ट सतत हॅमर करत राहिली की प्रेक्षकांना त्याची सवय तरी होते नाहीतर ती चक्क आवडायला लागते त्यामुळे काही दिवसांतच वैभव स्त्रीसारखा न दिसता तृतीयपंथीयांसारखा दिसतो हे बहुतांशी लोक विसरुन जातील !!

नटरंगमध्ये अतुल कुलकर्णी नाच्याच्या भूमिकेत होता त्यामुळे तिथे तो शोभला होता. शक्यतो स्त्रीवेषामध्ये पुरुष तृतीयपंथी भूमिकेत असतात. तसे रूप कथेत सर्वमान्य असते.
अशी ही बनवाबनवी सारखे काही चित्रपट आहेत ज्यात खरोखरच स्त्रीची भूमिका केलीय. कथेची गरज आणि विनोदनिर्मिती वगैरेसाठी ती चाललेली होती.
पण इथे तेव्हढेच नाहीय. इथे कथेतल्या पात्राला टीवी मालिकेत मुख्य स्त्री पात्राची भूमिका निभवायची आहे. तेव्हा केवळ स्त्रीपण निभावणे नाही, एका विशिष्ट परिमाणात सुंदर दिसणे सुद्धा अपेक्षित आहे. त्या परिमाणात वैभव बिलकुल सुंदर दिसत नाही. त्याने स्त्रीपण कितीही प्रामाणिकपणे निभावले तरी जाता येता रस्त्यातला कुठलाही पुरुष स्त्रीरूपातल्या वैभववर लाळ पाघळेल हे दाखवणे खूपच अति आहे.

वैभव मान्गले खरच गुणी कलाकार आहे. अगदी उस्फुर्त आहे. पण स्त्री म्हणून शोभतच नाही.:अरेरे: त्यातुन ही सिरीयल त्या मन्देची. ( होसुमीयाघचा डायरेक्टर मन्दार देवस्थळी) मग आणखीन काय म्हणणार? आधीच्या सिरीयल सारखी ही पण ताणत राहील आणी प्रेक्षकान्चा अन्त बघेल.

हा वैभव मांगले भूमिकेसाठी नक्की मेहेनत घेईल, अदा दाखवायचा प्रयत्न करेल. डायेटींगपण करत असेल पण मुळात स्त्री म्हणून पटत नाहीये. असो मी बघत नाही.

हा मित्र स्त्रीवेषात जास्त नाजूक दिसेल वैभवपेक्षा असं त्याला बघताना सतत वाटतं. >>>> अगो, चेहरा नाजुक आहे पण बांधा आडवाच आहे याचा पण आणि आता तर पिक्चरमध्ये बघितल्यापेक्षा अजुन सुटलेला वाटतो.. त्यामुळे हा ही सुटेबल नाही..

हो, त्याचे फीचर्स नाजूक आहेत आणि चेहेराही निमुळता आहे. पण त्याला खूपच वजन उतरवावं लागेल अशी भूमिका करायची तर.

मध्ये एका कुठल्यातरी गाण्यात तीन मराठी अ‍ॅक्टर्स स्त्रीवेषात होते. पण ते गाणं आणि कलाकार कोण हे अजिबात आठवत नाहीये.

अग वजन उतरवल कितीही तरी त्याच्या शरीराची बेसिक ठेवणच आडवी आहे.. बायकाही असतात डबल हाडाच्या पण इतक्या नाही..

मध्ये एका कुठल्यातरी गाण्यात तीन मराठी अ‍ॅक्टर्स स्त्रीवेषात होते.

>> मला अशोक सराफ, अजिंक्य देव आणि प्रशांत दामले आफ्रिकन बायका बनून एका बारश्याला जातात ते आठवले.

मांगलेपेक्षा एकवेळ शिडशिडीत सागर कारंडे (चला हवा येऊ द्या वाला) बाई म्हणून चांगला दिसतो हेमावैम.

तो सिनेमा वाजवा रे वाजवा. प्रकाश इनामदार पण असतात त्यांच्यासोबत. निदान त्यांच्यात हे आफ्रिकन बायकांसारखे दिसतात हे सांगण्याचा प्रामाणिकपणा तरी होता. त्यामुळे आफ्रिकन बायकांनी बारश्याला जायची सिनेम्याटिक लिबर्टी प्रेक्षकांनीही खूप एंजॉय केली. Lol

मला अशोक सराफ, अजिंक्य देव आणि प्रशांत दामले आफ्रिकन बायका बनून एका बारश्याला जातात ते आठवले. <<< तो वाजवा रे वाजवा. बारश्यात की काय जातात बायका बनून हहपुवा.

सागर कारंडे किंवा गेला बाजार तो टक्कल असलेला एक कलाकार आहे (ज्याने त्या रायाच्या मालिकेत गायकाचे काम केले होते. राया म्हणजे तो आपल्या पक पक पकाक मधला मुलगा. श्या, एका कलाकाराच्या नावासाठी किती खाणाउखाळ्या काढाव्या लागल्या!) तोही चांगला वाटला असता. किंवा अंशुमन विचारेनेही आजवर जेवढे स्त्रीपात्राचे पर्फॉर्मन्स दिलेत ते अगदी हश्या वसूल होते!

गजानन, पण इथे हश्या वसुल करायचा नाहिये ना.. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते तिघेही नाही चालणार..

तुम्ही म्हणताय तो टकल्या आठवला मला.. होसुमियाघमध्ये सरुमावशीसाठी पप्पु नावाच एक स्थळ आल होत तो हा..

दिसणं जाऊ दे. पण वैभव स्त्रीचा आवाज काढतो तो ही किती नाटकी! फू बाई फू मधे हाच आवाज त्यांनी लता मंगेशकरांची नक्कल म्हणून वापरला होता. तो स्त्रीपात्र बोलायला लागला की नाजूक लताबाईच आठवतात आणि समोर हे उदंड रूप. काही टोटलच लागत नाही. Uhoh

Pages