छत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड

Submitted by केदार on 2 September, 2015 - 09:08

तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की

औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.

मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.

अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते. Wink

अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.

shivaji_tweet.JPG

आता शोएबच्या लेखाचे खंडन.

Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे

१. Aurangzeb built more temples than he destroyed -

हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.

औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.

Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.

Fatva_1.JPG

काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.

त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.

Fatva_2.JPG

जामा मशिदीच्या पायर्‍यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.

Fatva_4.JPG

मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -

Fatva_3.JPG

काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.

माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )

२ Music flourished in India during Aurangzeb’s reign

शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.

Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,

होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.

३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal

ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.

औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.

४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.

५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time

अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.

शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्‍या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.

ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.

अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.

पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचार म्हणजे उदबोधन असे बौद्धिक आम्हास मिळाले होते. त्यामुळे केदार यांचा हा धागा हा प्रचारकी नसून वैचारिक उदबोधन करणारा आहे.

औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले आणि त्यानंतर देश्द्रोही आणि सगळे जग हिरवे व्हावे या मिशनवर असणारे औरंगजेब किती चांगला, सर्वधर्म सहिष्णू, मंदिरे बांधणारा, मंदिरे नाईलज म्हणुन तोडणारा, हिंदुंचा कैवारी, बाप आणि भावावार खुप प्रेम असणारा / आदर करणारा राजा होता असा
खोटा प्रचार करुन दंगे भडकवण्याचा प्रयत्न झाला आणि,

वैचारिक उदबोधन करणारे धागे निघाले.

केदार ह्यांचे आतापर्यंतचे जे काही लिखान मी वाचले आहे ते pro-BJP,PRO-sangh आहे.He is quite open about it.अशी commited माणसेव्च BJPची strength आहेत.

congress चे ground level network weak होत गेले आणि पराभव झाला.ह्याला कारण commitment नसलेले कार्यकर्ते आणि मतदार.फक्त ideologies चाण्गल्या असुन चालत नाही.

औरंगजेब हे नाव भारतीय इतिहासातील मुस्लिम धर्र्मांधतेचे ठळक प्रतिक आहे. त्याची भलामण करणारेही आहेत हे पाहून भरुन पावलो.

ए आर सी,

मला असे वाटते की हा तुमचा प्रतिसाद राजकीय पक्षांच्या उभारणीशी आणि टिकाऊपणाशी अधिक सबंधीत आहे.

औरंगजेब असहिष्णू होता की नव्हता ह्याबाबत तुम्ही काय म्हणाल?

ऐकीव इतिहासानुसार तो कट्टर व कडवा होता. त्याचे नांव असलेल्या रस्त्याचे नांव बदलून कलामांचे नांव देणे हा एक राजकीय निर्णयसुद्धा असू शकतो हेही मान्य! पण म्हणून औरंगजेब चांगला व सर्वधर्मसमभाव मानणारा होता असे चित्र उभे करणे योग्य नाही असे माझे मत!

कोण भालमण करत आहे.
औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले याला इथे कोण विरोध केला आहे
आता इतिहासात डोकावायचे म्ह्टल्यावर मग तो हिरवा,भगवा, bग्रेड, cग्रेड निघत जातो ना.

अहो साती, आर्क लिहितात, "He is quite open about it." त्याचा अर्थ ... असो. आता तुमचे समाधान झाले ना मग ठिक तर !

आर्क. Happy

२०१३ मधे प्रशिक्षणाच्या निमित्तान मी जर्मनीत सहा महिने लाईप्झिग या शहरात राहिलो.मॅक्स प्लँक स्त्रास्से व फोयबाख स्त्रास्से छेदत तिथे माझ घर होत. बिथोवेन स्त्रास्से, वॅग्नर स्त्रास्से अशी जर्मनांना आदरणीय वंदनीय अशी महान लोकांची नावे असलेले अनेक रस्ते मी पालथे घातले पण ज्याचे नाव घेऊन विरोधी विचाराच्या लोकांवर पुरोगामी (?) सेक्यूलर (?) म्हणवणारे वर्षानुवर्षे दुगाण्या झाडत आलेत, त्यांना फॅसिस्ट म्हणत आलेत "त्या" च्या नावाचा "अ‍ॅडॉल्फ हिटलर स्त्रास्से " ( अ‍ॅडॉल्फ हिटलर मार्ग ) मला कुठेच दिसला नाही. च्यायला येडेच आहेत जर्मन्स. आम्हा भारतीयांकडून शिका म्हणा काही. पहिल्या महायुद्धात वाईट अवस्था झालेल्या देशाला दुसर्‍या महायुद्धात सगळ्या जगास वेठीस धरण्या इतका शक्तीशाली देश बनवणार्‍या हिटलरला अपवाद वगळता आपण कुणी महान म्हणत नाही तद्वत च किती ही मोठ्या साम्राज्याचा अधिपती झाला म्हणून औरंगजेबास ही महान म्हणता येत नाही (मला तरी). लाखो लोकांकरता धर्मपरिवर्तन करा वा प्राणाला मुका, ते ही सहजगत्या नव्हे तर शरीयत मधे सांगितल्या बरहूकूम हाल हाल करून / राज्य हाकण्यासाठी तुमची गरज आहे म्हणून जिझीया कर लादतोय अन तुम्हाला जिवंत राहु देतोय अशी स्थिती निर्माण करणार्‍याला... बुतशिकन हे बिरुद लावून ज्याचा गौरव केला गेला त्याला.... काही मंदीरांना दाने दिली , टोप्या विणून गुजारा करीत असे म्हणून आदरणीय म्हणावे / त्याच्या नावाच्या रस्त्याच नाव बदलल म्हणून उर बडवावा हा शुध्द बिनडोकपणा आहे.. गुरु तेगबहादूरांचा चांदणी चौकात शिरच्छेद व संभाजी राजांची अनन्वित हाल करून केलेली हत्या यांची ऐतिहासिक कागदपत्रांमधील वर्णने थोड शोधून वाचून बघा. ( ही गौरवपर वर्णने आहेत. जणू ही व शी अनेक नृशंस कृत्ये म्हणजे काही तरी महान काम होते ) प्राचीन पुरातत्वीय ठेवा म्हणाव्या अशा वास्तू, मूर्तीकला तोड फोड करून नष्ट करणारे, लैंगिक गुलाम म्हणून वापर करण्यासाठी लहान मुली व स्त्रियांची बाजार भरवून विक्री करणारे, नृशंस कृत्ये करणारे आयसिस चे लोक आज ही तसच वागतात व त्यात भूषण ही मानतात. औरंगजेबाची विचारधारा या पेक्षा काय वेगळी होती ? तुलना करायचीच झाली तर औरंगजेब अन हिटलर अशीच होउ शकते. " कलामांच नाव दिल्याने रस्त्यांचे खड्डे बुजत नाहीत, बुजलेच तर लोकांच्या मनावरचे घाव बुजतात ! " कुणी अयोग्य व्यक्तींची नावे दिली असतील असेल ते चूकच. किंबहुना मी म्हणेन औरंगजेब रोड असा रस्ता राजधानीत असण हेच मुळात लांछनास्पद ! कलामांच नाव देऊन एक चूक दुरुस्त केली गेली आहे. हिटलरचा उल्लेख करण्यास तिथे जर्मनीत कायद्या नुसार बंदी आहे. मी तेथे होतो त्या वेळी एक बातमी पाहीली होती. चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनी मुद्दाम शाळा / महविद्यालयात जाउन इतिहासाचा तास घेतला व नव्या पिढीला इतिहासातील चुकांबद्दल सांगितल. अन हाच फरक आहे जर्मनी अन भारतात. हिटलरचे नाव ही घेतले जाऊ नये ( आदरपूर्वक सोडाच ), कुणी त्याला हीरो / आदर्श बनवणार नाही अशी व्यवस्था अगदी कायदा करून त्यांना करावीशी वाटते. आपल्या कडे... .....
या संदर्भात आय आय टी तून शिकलेल्या एका दीडशाहाण्याने फेसबुकवर ए पी जे कलामांना मूर्खविदूषक होते (बफून) अस लिहिलेल वाचून नुकताच धन्य झालोय व पुरेसा उद्विग्न ही . तेव्हा आता थांबतो व माझ्या पुरता विषय संपवतो.

औरंगजेब हे प्रकरण म्हणजे भारतीय इतिहासातील दृष्ट पर्व आहे. आता औरंगेजेबाद्दल बोलायचेच झाले तर तो एक इस्लामी मुलतत्ववाद्यांनी घेरलेला बादशहा नव्हता त्याने त्याच्या उमेदीची वर्षे दख्खन सुभा काबीज करण्यासाठी घालवली होती. जिझया कर लादण्यामागे त्याचा इस्लाम धर्म वाढवण्याचा हेतु होता हे स्पष्ट आहे. कारण त्याच्या आधीही मुघलांच्या बादशहांनी हिंदुस्थानावर राज्य केले पण त्यांचा असा मनसुबा नव्हता.

दख्खनेत येऊन इस्लामी राजवट हिंदुस्थानभर कायम करायची हिच त्याची ईच्छा होती. १६८० मध्ये जेव्हा तो ५ लाखाची फौज घेऊन नर्मदा उतरला तेव्हा त्याला विश्वास होता की मराठ्यांचे हे राज्य दोन वर्षात धुळीला मिळविन आणि हिंदुस्थानभ्रर माझेच राज्य असेल.

मराठ्यांचे राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य जे छत्रपती शिवरायांनी स्थापिलेले हिंदवी स्वराज्य होते हो हिंदवी स्वराज्य कारण "हे राज्य व्हावे हि श्रींची ईच्छा" हे राज्य स्थापने मागील प्रमुख उद्दिष्ट होते. कारण रयत सुखी तर राजा सुखी हे महाराज्यांचे तत्वज्ञान होते. म्हणूनच त्यांच्या मागे महाराष्ट्रातील जनता आपल्या राजासाठी आणि स्वाभिमानासाठी लढली आणि त्या औरंगजेबाचे थडगे ह्या महाराष्ट्रातल्या मातीत बांधले गेले.

संभाजी राजांची अनन्वित हाल करून केलेली हत्या यांची ऐतिहासिक कागदपत्रांमधील वर्णने थोड शोधून वाचून बघा.>>>>.

रायगडावर हल्ला करण्याची औरंगजेबाची मोहीम होती. पण त्यासाठी औरंगजेबाला रायगड

माहित नसल्यामुळे गडाची प्रतिकृती (मॉडेल) हवी होती. ही प्रतिकृती तयार करण्याची जोखीम कुलेशाने

घेतली. त्या बदल्यात औरंगजेबाने कुलेशाला खूप पैसा दिला. कुलेशाने हे काम त्याच्या मुलाकडे

सोपविले. म्हणजे कुलेश संभाजीसोबत राहून औरंगजेबाला मदत करीत होता. राजांच्या निर्मळ आणि

प्रेमळ मनाचा कुलेशाने गैरफायदा घेतला. म्हणजे कवि कुलेश हा औरंगजेबाचा हितचिंतक होता आणि

राजांचा शत्रू होता. राजांना पकडून देण्याची जबाबदारी कवि कुलेशानेच स्विकारली. औरंगजेबाने कवि

कुलेशाला खूप पैसा दिला. राजे रायगडावर जाण्यासाठ निघाले, वाटेत संगमेशर येथे थांबले. तेव्हा राजे

कवि कुलेशाला म्हणाले, ‘आपण लवकर रायगडाकडे जाऊ. या ठिकाणी धोका होण्याची शक्यता आहे.' तेव्हा कुलेश म्हणाला, ‘‘येथे कोणीही येणार नाही." कविकुलेश अनुष्ठानास बसला. तेव्हा राजांनी

कविकुलेशाला लवकर निघण्याचा आग्रह केला परंतू कविकुलेशानेच अनुष्ठानात जाणीवपुर्वक वाढ केली.

संभाजीराजांना कविकुलेशाने संगमेशर येथे रोखून धरल्याची खात्रीलायक बातमी औरंगजेबाला

समजली. आणि लगेच औरंगजेबाने मुकर्रबखान आणि इखलासखानाला कोल्हापुरावरुन संगमेशरला

पाठविले. त्यांनी तातडीने येऊन संभाजीराजे व कुलेशाला पकडले. पण या प्रसंगी राजे घोड्यावर निसटले

होते पण कुलेश ओरडला ‘महाराज मै गिर गया'! निसटलेले राजे कवि कुलेशाला वाचवण्यासाठी परत

फिरले आणि लगेच त्यांना पकडण्यात आले (संदर्भ- निकोलाओ मनुची लिखीत "असे होते मोगल" पृ.

२८८) जेव्हा राजांना पकडण्यात आले तेव्हा ते पुर्ण सावध होते. राजे कोणत्याही विधीत मग्न नव्हते.

या उलट राजे लवकर निघण्याचा आग्रह कुलेशाला करत होते. म्हणजे राजांना दुरदृष्टी होती. पण

कुलेशाने अनुष्ठानाचे निमित्त करुन राजांना औरंगजेबाचे सैन्य येईपर्यंत अडवून धरले होते.

संभाजीराजांसारख्या सरळ मनाच्या राजाचा अशा प्रकारे कविकुलेशाने काटा काढला व बदनाम केले

राजांच्या गणोजी शिर्के व नागोजी शिर्के या मेहुण्यांना. कुलेशाला निर्दोश सोडण्यासाठी ब्राह्मणी

इतिहासकारांनी राजांना गणोजी आणि नागोजी शिर्के यांनी पकडून दिले असे धादांत खोटे लिहिले.

राजकारणात कितीही स्वार्थ असला तरीही आपल्या बहिणीचे कुंकू पुसावे असे कोणत्याही भावाला

वाटत नसते. गणोजी-नागोजी हे येसुबाईचे भाऊ होते. त्यांनीच राजांना पकडून दिले असा अपप्रचार

ब्राह्मणी लेखकांनी केला. म्हणजे कु्रर, स्वार्थी, लबाड कविकुलेशाला निर्दोष सोडण्यासाठी नागोजी-

गणोजीला बदनाम करुन बहिण-भावाचे पवित्र नात्याला देखील अनेक पक्षपाती लेखकांनी

कलंक लावला आहे. (कविकुलेश याच्या फितुरीमुळेच संभाजीराजांना औरंगेबाने पकडले असा स्पष्ट

उल्लेख ईश्वरदास नागर, रॉबर्ट आर्म, निकालाओ मनुची या परकीय लेखकांनी केलेला आहे. संदर्भ- छ.

संभाजी स्मारक ग्रंथ. पृ. १७०, १९४, १९५, १७१)

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)

कोल्हापुरावरुन संगमेशरला पाठविले. << हे अंतर किती आहे. त्या काळात टोळी सहित जाण्यास किती वेळ लागला असेल, २ तास / ३ तास

कवी कुलेश असे कोणते अनुष्ठान करत होते

सकुरा ,

कुलेश जर फितूर होता तर त्याला संभाजी राजा प्रमाणे हाल हाल करून का मारले ? ज्या ज्या यातना संभाजी राजाना झाल्या त्यांची रंगीत तालीम कुलेश वर च झाली होती. मारायचा होता तर संभाजी राजा ला मारून मग कुलेश ला मारला असता.

आणि असे असेल तर शिवाजी सावंत आणि विश्वास पाटील ह्यांनी चुकीचा इतिहास लिहिला का आपापल्या कादंबरी मध्ये ?

कमल गोखले लिहित 'शिवपुत्र संभाजी' मिळाल्यास वाचा म्हणजे निकोलाई मनुची बद्दल अजून माहिती मिळेल

तळटीप : 'शिवपुत्र संभाजी' हा पी .एच डी चा प्रबंध असून ९ वर्षाहून अधिक काळ संशोधन करून लिहिला आहे ज्या मध्ये संभाजी राजांची अनेक अप्रकाशित पत्र पण आहेत. ह्या प्रबंधाला महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार ह्यांनी वाचून मान्यता दिली आहे

नाव बदलले ते आवडले आहेच पण ते सरळ मान्य करणे जीवावर येते आहे असे एकंदरीत दिसते.
औरंगजेब वाईट होता एकदम १००% वाईट, पण तो भारतीय होता का हो? आमच्या इतिहासाचा तो भाग आहे की नाही?

>>> आगाऊ, हे तुझ्या प्रश्नाबद्दल. यात गैर काय आहे समजले नाही. मला जर कोणी विचारले की नाव बदललेले आवडले का तर मीही हो म्हणेन. आत्ता करायची गरज होती का? तर नव्हती. नसते केले तरी चालले असते. आय डोण्ट केअर. केदार हेच म्हणतोय.

त्यावरून औरंगजेब चांगला होता वगैरे जर कोणी क्लेम करू लागले व त्याबद्दल काही संदर्भ देऊ लागले, तर त्याविरोधी पुरावे तोही देतोय - तीच चर्चा येथे होणे अपेक्षित आहे.

धाग्याचा उद्देश क्लिअर आहे की - "नाव बदला, बदलू नका. पण औरंगजेब चांगला होता असे म्ह्णत असाल तर हे घ्या पुरावे". आता ते खोडून काढण्यासारखे असतील, तो चांगला असण्याच्या बाजूने पुरावे असतील तर लोक त्यांना पटेल तसे देत आहेत - होउ दे त्यावरून चर्चा.

मराठवाड्यात आजही एखाद्याच्या मनाविरुद्ध काही करवून घ्यायचे असेल तर म्हणतात की कशाला त्याला मारुन मुसलमान करताय.किंवा मारुन मुसलमान करण्यात काय अर्थ.

मुस्लिमांनी नालंदा तक्षशिला ही महान विद्यापिठे पेटवुन दिली जी महिनोन महिने जळत होते.त्यांना कोण चांगले म्हणेल का?
पण त्यांना या कामात मदत करणारे आपले घर भेदी होते ना.ते कोण होते हा पण इतिहास पाहिला पाहिजे ना?
सत्तेसाठी संपत्ती साठी कुठल्या ही कारणासाठी का असेना आत्याचार करणारे आणि त्याला साथ देणारे दोन्ही सारखेच ना?

गांधीजींच्या चळवळी मुळे देश आजाद झाला.गोर्‍यांच्या तावडितुन मुक्ती मिळाली.ज्या इंग्रजांना गांधीनी सळो की पळो करुन सोडले त्यांनी गांधीना मारले का? एका भारतियांनीच त्यांना मारले ना?

काय म्हणायचे आहे समजले नाही. मुसलमानांना त्यांच्या असहिष्णू कृत्यात मदत करणारे आपलेच (/आपलेही) होते म्हणून मुळात (ते विशिष्ट निर्णय घेणारे) मुसलमान चांगले कसे ठरतात? गांधीहत्येची तुलना अस्थानी वाटली. गांधी आणि त्यांना मारणारा एकाच धर्माचे होते आणि त्या हत्येमागे 'धर्म' हे कारण नव्हते, जे औरंगजेबाच्या अनेक कृत्यांचे प्रमुख कारण होते असे पुरावे वर देण्यात आलेले आहेत.

असो परत चर्चा तू नावबदलावर वळवत आहेस. मला खरंच तिथे जायचे नाही. >> धागा तुझा आहे एखाद्या मुद्द्यावर चर्चा नको असेल तर ठीक आहे.

फारेंडा, पुढील चर्चा विपूत करु.

पुढील चर्चा विपूत करु.
<<
आम्ही येतो वाचायला.

इथला एकंदर उन्मादी बावळटपणा व ढेकूण, माश्या इ. पाहून इकडे परत लिहायची इच्छा झाली नाही.

रच्याकने,
केदारजी,

>>वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे. <<

महाराजांचीही फारसी भाषेत लिहिलेली अनेक पत्रे आहेत ना? ती त्या काळची सरकारी कामातली 'इंग्रजी' सारखी होती ना? शिवाय तत्कालीन पत्रे ही कारकुनांनी लिहून त्यावर फक्त शिके व मोर्तब होत असे, असे काहीसे वाचल्याचे आठवते.

तस्मात, पत्रे फारसीत आहेत याचा अर्थ त्याची मातृभाषा फारसी असा होतो का?

या प्रश्नाच्या पाठी औरंगजेब चांगला की वाईट याबद्दल नव्हे तर तुम्ही केलेल्या युक्तिवादाबद्दल शंका आहे इतकेच कृपया ध्यानी घ्या.

तुम्ही केलेल्या युक्तिवादाबद्दल शंका आहे इतकेच कृपया ध्यानी घ्या. >> राईट. शंका योग्य.

आणि त्यावरचे उत्तर

फारसी ही भाषा "आपली" नव्हती हेच मी म्हणतो आहे. जशी इंग्रजी नव्हती तशीच. "मोडी" मध्ये आपली बहुतांश लोकल पत्रे आहेत. म्हणजेच फारसी ही लादली गेलेली भाषा. अगदी इंग्रजीसारखीच.

जर ते आलेच नसते तर पत्र मोडी, पाली, संस्कृत, तामिळ, इत्यादी इत्यादी भाषेतच लिहिली गेली नसती का? ते आली त्यांनी भाषा आणली. हा युक्तीवाद आहे. अन्यथा मोडी मध्ये पत्रे लिहियाची गरजच नव्हती.

तत्कालीन पत्रे ही कारकुनांनी लिहून त्यावर फक्त शिके व मोर्तब होत असे, असे काहीसे वाचल्याचे आठवते. >>

तेंव्हाच का आत्ताही तसेच होते. पंत्रप्रधान सेक्रेटरिएट वरच अवलंबून आहे ना. त्याकाळी राजा मसुदा सांगतो. चिटनीस लिहितो, लिहीलेले राजाला वाचून दाखवतो, शिक्कामोर्तब होते आणि पत्र पाठवले जाते हीच प्रोसेस असणार ना. शेवटी मोहोर महत्त्वाची. एकदा ती लागली की ते माझे पत्रच नव्हते असे नाही म्हणता येत.

इंग्रज येथे असताना काही लोकांना (इंग्रजी) मराठी देखील येत असे. तर त्यांची मातृभाषा मराठी थोडी होईल. अगदी तसेच काहीसे.

धन्यवाद. माझी माहिती योग्य निघाली.

इतिहासकालातील अमुक व्यक्तीची मातृभाषा, किंवा रोजच्या बोलण्याची भाषा नक्की कोणती होती, किंवा त्याला/तिला लिहिता/वाचता येत होते का? हे कशा पुराव्यांवरून ठरते?

तेंव्हाच का आत्ताही तसेच होते. पंत्रप्रधान सेक्रेटरिएट वरच अवलंबून आहे ना....इ.

<

प्वाइंट हा आहे, की औरंगजेबाने(शिवाजीने/अशोकाने/अमुकतमुक इ.) डिक्टेट हिंदीत (किंवा इंग्रजीत) केलं, तरी कारकून हे फारसीत कन्वर्ट करून लिहित असत का?

अवघड आहे असे रॅन्डम ठरवणे. तुमची मातृभाषा मराठीच का? ह्या प्रश्नाचे उत्तर देणे जसे अवघड तसेच.

तो मुळ मुद्दा माझा नाही शोएबचा आहे. की तो हिंदी बोलू / समजू शकत होता. त्यावरून तीच त्याची मातृभाषाआहे हा त्याचा दावा आहे माझा नाही. मी तो खोडतोय.

तो राजा / व्यक्ती लिहितो वाचतो की नाही हे समकालीन लोकांनी जर रेकॉर्ड करून ठेवले असेल तरच कळेल अन्यथा नाही. काही राजांना लिहिता वाचता येते. उदा संभाजी. त्यांनीच बुधभूषण ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला आहे. पण संभांजीची संस्कृत ही मातृभाषा नाही. उद्या उठून मी जर म्हणालो की त्यांनी बघा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला तीच त्यांची मातृभाषा, तर ते हास्यास्पद विधान होऊ शकते.

तसेच शोएबचे स्टेटमेंट आहे. त्याला तर ग्रंथही नाही, बाबाजी धम धम ही तीन वाक्ये आहेत फक्त.

आता ह्यावरून जर औरंगजेबाला लिहिता वाचता येतच नसेल तर तो जी मोहोर उठवेल आणि जी उठली त्याला नक्की तोच कसा काय जबाबदार, त्याचा सेक्रेटरी जबाबदार अश्या किंवा ह्या युक्तीवादाकडे गाडी जात असेल तर माझा पास आहे भौ.

मे बी वरच्या माझ्या दोन लाईन औरंगजेबाला चांगले ठरविण्याला येथील काही लोकांच्या.कामास येतील.

Pages