दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रॉबीनहूड,

>> या वाक्यात आक्षेपार्ह काही नाही फक्त ते टाकण्याची जागा आक्षेपार्ह आहे.

याबाबतीत तुमचे मतस्वातंत्र्य अबाधित आहे. परंतु माझं मत तुमच्या मताशी जुळत नाही. एव्हढं नोंदवून थांबतो.

आ.न.,
-गा.पै.

संरक्षण काढून घेण्याबाबत : निर्भय माणसाला संरक्षण लागत नाही. नॉर्मली ते ते नाकारतातच. त्यांचा माणसातल्या चांगुलपणा वर विश्वास असतो म्हणून. दाभोळ्करांच्या स्कूटरवर मागच्या स्टेपनी कव्हरवर 'निर्भय बनो' असा संदेश लिहिलेला असे म्हणे. अशा माणसाना संरक्षण घेताना संकोच वाटनारच. कारण निर्भयतेचा संदेश देताना स्वतः सुरक्षेच्या कोंडाळ्यात रहायचे हे त्यांच्या सदसद विवेक बुद्धीला तत्व म्हणून पटत नाही. म्हणून ते संरक्षण नाकारतात. अर्थात अशा संरक्षणाचा काहीही उपयोग नसतो हेही त्याना माहीत असते. भारताचे दोन पंतप्रधान व एक लष्करप्रमुख सुरक्षा व्यवस्थेच्या गराड्यातच दिवसाढवळ्या मारले गेले हेही सत्य आहे.

हत्येचा तीव्र निषेध. Sad
पोलीस संरक्षण बाबत जिज्ञासाशी सहमत. अर्थात रॉबीनहूड म्हणतात तसं होत असावं, पण तरी संरक्षण घ्यावं असंच वाटतं.

महेश, काळजी घ्या... देव तुम्हांला हा धक्का सहन करण्याचं बळ देवो! वडिलांना श्रद्धांजली Sad

महेश.....तुमच्या आणि समस्त कुटुंबियांच्या दु:खात मी सामील आहे. या प्रसंगातून तुम्हाला सावरण्याचे बळ ईश्वर देवो हीच प्रार्थना.

महेश,

आपल्या तीर्थरुपांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना! कृपया धीर धरा व कुटुंबियांना सावरा. Sad

महेश, तुमच्या वडिलांना चिरशांती लाभो. तुम्ही आणि तुमचे आप्तेष्ट यातून सत्वर सावरोत. Sad
आ.न.,
-गा.पै.

महेश, आपल्या तीर्थरुपांच्या आत्म्याला शांती लाभो.
देव तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना या प्रसंगातून सावरण्याचे बळ देवो!.

आयुष्याने वेळोवेळी , असे चकवले होते
मला उत्तरे सापडल्यावर प्रश्न बदलले होते
.....मनोहर रणपिसे

श्रद्धांजली

त्या ४ वर्षाच्या सिरीयन मुलाचा मृतदेह पाहून काही काळ बधीर झाले. इथे बातमी आहे. सुदैवाने फोटो असेच दिलेले नाहीत. बातमीतले फोटो धक्कादायक असू शकतात अशी सूचना आहे तेव्हा आपल्या जबाबदारीवर पहा. त्या बाळाला आणि इतर अशाच दुर्दैवी जीवांना शांती लाभो आणि हा मृत्यूचा खेळ लवकरात लवकर बंद होवो ही प्रार्थना!
http://www.bbc.co.uk/news/world-europe-34133210

ओह.. आदेश श्रीवास्तव ..खूप दिवस चालू होता त्यांचा लढा, मृत्यूशी!!! Sad Sad

श्रद्धांजली !!!

आदेश श्रीवास्तव.....

~ श्रद्धांजली वाहताना विशेष वाईट अशासाठी वाटते की कालच त्यांच्या जन्मदिवस होता आणि त्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा नेटवरून दिल्या जात असल्याचे मी पाहिले होते....आणि आज ही बातमी.

Pages