रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.
पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?
या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...
HeForShe : KEY MESSAGES
* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world
* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality
* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.
ABOUT THE CAMPAIGN
HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.
अधिक माहिती :
https://en.wikipedia.org/wiki/HeForShe
***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी
पुरूषांची सामाजिक जबाबदारी -
१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.
२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.
३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.
४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.
५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.
६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.
७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.
८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.
९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.
***********************************************************************************************************
अंजली
बर्याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.
१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?
एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?
हुप्पाहुय्याच्या जजमेन्टल
हुप्पाहुय्याच्या जजमेन्टल बाबतच्या संपूर्ण पोस्टशी सहमत.
धाग्यावर लिहिलेल्या मजकूरात
धाग्यावर लिहिलेल्या मजकूरात असलेल्या अरुंधती कुलकर्णी यांच्या पुरुषांसाठी लिहिलेल्या सामाजिक जबाबदारीच्या नियमावलीचा त्रिवार निषेध.
मुळात दुसर्याने कसे वागावे ह्याबाबतच्या नियमावली बनवणार्या बेजबादर मनोव्रुत्तीचा निषेध.
अर्थात धागा निघाला तेव्हा याचा अंदाज आलाच होता.
बेफिकीर, ऋन्मेष व इतर आयडीज, ह्या नियमावलीविषयी आपले मत इथेच जाणून घ्यायला आवडेल.
क्रमांक एक व दोन वगळता (तेही
क्रमांक एक व दोन वगळता (तेही होमो ही शक्यता तात्पुरती बाजूला ठेवून) बाकीचे सर्वच्या सर्व शब्दश: स्त्रियांनाही लागू आहे. कारण तसं वागणार्या स्त्रियाही दैनंदिन आयुष्यात सहज सापडतात. ती स्त्रियांचीही सामाजिक जबाबदारी आहे च!
धाग्यावर लिहिलेल्या मजकूरात
धाग्यावर लिहिलेल्या मजकूरात असलेल्या अरुंधती कुलकर्णी यांच्या पुरुषांसाठी लिहिलेल्या सामाजिक जबाबदारीच्या नियमावलीचा त्रिवार निषेध.<<<
त्या नियमावलीचा निषेध करावासा वाटत नाही आहे. ते एकंदर पुरुषजातीबद्दल बोलण्यात आलेले आहे. युगानुयुगे जर स्त्री दबावाला बळी पडत आली असेल तर पुरुषांच्या जबाबदारीबद्दल आजच्या युगात तरी तिला इतके बोलायला काही आडकाठी वाटायला नको असे वाटते. तुम्ही स्त्रियांच्या जबाबदार्या सांगत नाही आहात म्हणून स्त्रियांनी पुरुषांच्या सांगू नयेत इतके साधे समीकरण ते नक्कीच नाही. स्त्री बळी पडत आलेली आहे, पडत आहे, तिला व्यक्त होण्याचा अधिकार अधिकच असायला हवा. (पुरुष बळी पडत नाहीत का, पुरुषांनी बोलूच नये का वगैरे मुद्दे वेगळे आहेत, ह्याच्याशी संबंधीत नाहीत). अरुंधतींनी जी दुसरी प्रश्नावली प्रतिसादात विचारली होती (आणि वर मनातल्या मनात उत्तरे द्या, लैंगीक शिक्षण आवश्यक आहे का ते कळेल, हा मनाचा आरसा मानता येईल वगैरे अनावश्यक डेकोरेशन केलेले होते) त्याचा मी तितक्याच तीव्रतेने निषेध करतो जितक्या तीव्रतेने तू करत आहेस. ह्याचे कारण ते प्रश्न चर्चेत सहभागी होणार्या पुरुषांना विचारल्यासारखे झालेले होते. त्यांना (म्हणजे आपल्याला) ते विचारलेच जाऊ नयेत अशी अन्याय्य किंवा एकांगी किंवा सोयीस्कर भूमिका मला अजिबात घ्यायची नाही. ते आपल्यालाही तितकेच लागू होतात जितके ते इतर एखाद्या पुरुषाला होतील. म्हणूनच आपण दोघांनी त्याची उत्तरेही दिली. पण त्या प्रश्नांमधून ह्या मोठ्या विषयाची एक शतांशही कारणमीमांसा किंवा थिअरी एस्टॅब्लिश होत नाही. (आयुष्यभर सज्जन राहिलेला एक पुरुष अचानक बलात्कार करू शकतो हे गावीही नसल्याप्रमाणे प्रश्न होते ते). आणि निषेध अश्यासाठी की एकजात सर्व पुरुष निव्वळ वासनांधपणे सर्वत्र फिरत असतात असा सूर त्यातून निर्माण होत होता.
मुळात दुसर्याने कसे वागावे ह्याबाबतच्या नियमावली बनवणार्या बेजबादर मनोव्रुत्तीचा निषेध.<<<
ह्याबाबत वर मत नोंदवलेले आहे. पुरुषांनी कसे वागावे ह्याबद्दल बोलायचा हक्क स्त्रीला निदान आज तरी दिला जायलाच हवा. त्यातही काही खोट्या केसेस होऊ शकतील, काही इतर प्रकार होऊ शकतील, पण वाचाच फुटू द्यायची नाही हे पटत नाही.
अर्थात धागा निघाला तेव्हा याचा अंदाज आलाच होता.<<< हेही जजमेन्टल विधानच आहे ना?
बरं HeForShe या इनिशिएटिव्ह
बरं HeForShe या इनिशिएटिव्ह बद्दल काय मत आहे धाग्याला विरोध करणार्यांचं?
पुरुषांना सामाजिक जाणीवेबद्दल
पुरुषांना सामाजिक जाणीवेबद्दल प्रश्न विचारला म्हणजे बायकांनी काही न करता गप्प बसायचं असा काहीतरी टोकाचा अर्थ काढू नका हो.
मी उद्या एक आंबावडीचा धागा
मी उद्या एक आंबावडीचा धागा काढणार आहे. त्यावर मला आंब्याचीच का वडी? अंजीराची का नाही? अशा टाईपचे प्रतिसाद आले तर कसे वाटेल.. तसे हे प्रतिसाद वाटत आहेत. आशूडी - व्हेरी सर्प्राईझिंग (& बिट शॉकींग) टू सी सच पोस्ट्स फ्रॉम यू! - [आय अॅग्री, स्त्रियांनी सबल व्हायला हवे आहे. पण तो चर्चेचा मुद्दा नाहीये इथे.. रादर तो ग्रुहितच धरला असेल मामीने ह्याबाबत मला खात्री आहे.. ह्या धाग्यात वेगळ्या पर्स्पेक्टीव्हने बघायचे असेल, तर काय चुकीचे आहे? ]
आजवर ह्या विषयावर स्त्रीच्या बाजूने, त्यांनी काय करावे, स्वसरंक्षण, कपडे इतर सर्व मुद्दे आले आहेत इतर चर्चेत. ह्या धाग्यात फक्त पुरुषांबद्दल डिस्कशन होण्यास काय हरकत आहे? असा धागा आला म्हणजे काही सर्व स्त्रिया काहीही न करता पुरूषांनीच संरक्षण केले पाहीजे अशा पवित्र्यात नाही बसणार आहेत!.
सुरवातीची काही पानं, सर्वांनी खूप चांगली चर्चा केली आहे. गेले काही दिवस मात्र नको त्या ट्रिव्हिअल गोष्टीत धागा फिरत आहे.
माझे मतः अशा धाग्याची जरूरी वाटते व पुरूषांनी त्यात डिफेन्सिव्ह होण्याचे काही कारण नाहीये. जेव्हा रस्त्यावर कळत नकळत असे प्रकार होत असतात तेव्हा ती स्त्री गप्प बसतेच बसते पण इतर बघेही काही करत नाहीत ही तर फॅक्ट आहे. (अॅक्चुअली बघे हा प्रकार सगळ्यात संतापजनक आहे. अपघाताच्या बाबतीत देखील. असे बघत काय बसलाय, हॉस्पीटलला न्या, पोलिसांना कळवा..) तसेच ह्याही बाबतीत, निदान त्या शोषण करणार्या माणसाला जोरात हटका!, त्या स्त्रीला विचारा जोरात, "ताई/बेहनजी काही मदत हवीय का?" ही माणसं भेकडच असतात, जरा हटकले तर भिऊन पळून जातील. पण ना ती स्त्री हटकते, ओरडते.. ना ते बघे.. त्यामुळेच अशी जमात जास्त निर्लज्ज व बेदरकार बनत जाते.
[ हे ही सर्व आहेच. पण मला मुळात प्रॉब्लेमॅटीक वाटते ती कायद्याची भिती न वाटणे, व कायदा असला तरीही त्याची अंमलबजावणी नीट न होणे. हे अतिशय गंभीर प्रॉब्लेम्स आहेत. मात्र त्यासाठी आपण काय करू शकतो ह्याबाबत काही आयडिया नाही. ]
बेफी, मी अंदाज आला होता
बेफी, मी अंदाज आला होता म्हंटलय, आणि हे जजमेन्टल विधान नाही कारण ते सत्य ठरल्यानंतरच हे विधान मी केलय.
<< पुरुषांनी कसे वागावे ह्याबद्दल बोलायचा हक्क स्त्रीला निदान आज तरी दिला जायलाच हवा.>> आजच का ? नेहमीच असायला हवा. मग स्त्रीयांनी कसे वागावे ह्यावरचे लिम्बूदांचे विचार का बरे स्वीकारले जात नाहीयेत ?
<<ते एकंदर पुरुषजातीबद्दल बोलण्यात आलेले आहे. >> यक्झॅक्टली... हेच तर खटकतय मला. हा धागाच एकदंर पुरुषजातीबद्दल काढण्यात आला आहे मित्रा, गुन्हेगार विरुद्ध इतर असं स्वरुप असत तर मी असं बोललोच नसतो.
<< तेव्हा ती स्त्री गप्प
<< तेव्हा ती स्त्री गप्प बसतेच बसते पण इतर बघेही काही करत नाहीत ही तर फॅक्ट आहे. >> मग ह्या इतर बघ्यात फक्त पुरुषच असतात का बस्के ? मला जे मांडायचय तेच अचूक शब्दात सांगितलत तुम्ही.
नाही. स्त्रिया पण असतातच!
नाही. स्त्रिया पण असतातच! दोघेही आहेतच जबाबदार ह्या सगळ्याला.
पण पुरूषांचा जनरली एक फायदा असतो तो म्हणजे आवाज.उदा: माझा आवाज अतिशय लहान मुलीचा आहे. मी ओरडून बोलले तरी शेजारच्यालाही ऐकू जाणार नाही. पण हे एखाद्या दमदार आवाजाच्या पुरूषाने हटकले तर जरब बसू शकते. शिवाय शारिरीक ठेवण हाही मुद्दा आहेच! सिंपल मुद्दे आहेत. [ आता एखादी स्त्रीदेखील असू शकते दमदार आवाजाची वा कराटे, ताएक्वांदो शिकलेली. पण सगळ्याच तश्या नसतील तर काय हरकत आहे सर्व कम्युनिटीने एकत्र होऊन वाईट गोष्टींना आळा घालायला? एव्हढेच माझे म्हणणे आहे. ]
केली आहे. गेले काही दिवस
केली आहे. गेले काही दिवस मात्र नको त्या ट्रिव्हिअल गोष्टीत >> देअर यू आर बस्के. माझा या धाग्याला सुरवातीपासून विरोध मुळीच नव्हता. तो नेमका कुठून सुरू झाला हे शोधून काढ असं म्हणायाचा वेडेपणा मी नाही करणार. पण ज्या पध्दतीने येणार्या प्रत्येक पोस्टचा रोख बदलत गेला (अगदी ताजं उदाहरण म्हणजे कालची अकुची पोस्ट, त्याआधी माझ्यासारख्यांवर शेरेबाजी करणारी हिणकस पोस्ट) त्यामुळे तुझ्यासारख्या अनेकांच्या होणार्या गैरसमजांचा धोका पत्करून मी इथे लिहीत आहे. आणखी एक कारण हे की, एखाद्या स्त्रीला ही सरसकट सगळ्याच पुरूषांबद्दल केल्या जाणार्या समज गैरसमज अपेक्षांचा निषेध नोंदवावासा वाटतो हे दाखवून देणे. त्याला "यू टू?" ही प्रतिक्रीया मिळणं अपेक्षित, स्वाभाविक आहे.
कुठं थांबायचं हे न कळल्यानं हाती आलेलं यश घालवलेला धागा म्हणून माझ्या लक्षात राहील ही चर्चा.
<< सर्व कम्युनिटीने एकत्र
<< सर्व कम्युनिटीने एकत्र होऊन >> नाही कोण म्हणतय, पण धाग्याच एकदंरीत सूर "ह्या पुरुषांच काय करायच ते त्यांनीच सांगा बाई" असा लागलाय
इतक्यावेळा सांगूनही पुन्हा
इतक्यावेळा सांगूनही पुन्हा पुन्हा धाग्याच्या विषयाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे त्यांच्यासाठी ......
Veteran actor Anupam Kher has been appointed a UN ambassador for the ‘HeforShe’ campaign for gender equality.
The “HeforShe” campaign has been initiated by UN Women. Its goal is to engage men and boys as agents of change for the achievement of gender equality and women’s rights, by encouraging them to take action against inequalities faced by women and girls.
>>>> ही बातमी आणि युएनचा इनिशिएटिव्ह या धाग्याच्या विषयासंबंधीच आहे. ज्या हेतूनं हा धागा काढला आहे तोच हेतू युएनच्या इनिशिएटिव्ह मागे आहे.
स्त्रीविषयक प्रश्न, स्त्रियांवरील अत्याचार आणि स्त्री-पुरुष समानता या गोष्टींमध्ये पुरुष आणि मुलगे यांना सजग करून सामिल करून घेणे हा त्यांचा विचार आहे.
मामीन्चा धागा काढण्याचा
मामीन्चा धागा काढण्याचा उद्देशच बहुतेकान्च्या लक्षात आला नाहीये.:अरेरे:
बस्केची पोस्ट आवडली कारण
बस्केची पोस्ट आवडली कारण मुद्दे ठाम आणी आत्मविश्वासपूर्ण वाटले.
तसं नाही रश्मी, झोपलेल्यांना
तसं नाही रश्मी, झोपलेल्यांना उठवता येतं झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवता येत नाही.
आम्ही एक मुद्दा मांडला, मग त्यानंतर तो चुकीचा ठरला तरीही आम्ही त्यावरच ठाम राहून दंगा करत राहणार. जर वेगळे विचार खुलेपणानं समजून घेतले तर हा विषय समजेल. त्यात काही कठीण नाही. पण मुद्द्यापेक्षाही इगो जेव्हा मोठा ठरतो तेव्हा विचारांची देवाणघेवाण करण्याची शक्ती नाहीशी होते.
आता युएनच्य इनिशिएटिव्ह बद्दल वाचून विचार करून आपले विचार तपासून, बदलून घेता येतीलही. पण तशी इच्छाच दिसत नाही. मग भलभलते आरोप करायला सुरूवात होते - धाग्याचं शिर्षक काय, धाग्याचा सूर काय, धाग्याचा हेतू काय ... सगळं सगळं मग चुकीचं दिसायला लागतं.
बस्केची पोस्ट आवडली कारण
बस्केची पोस्ट आवडली कारण मुद्दे ठाम आणी आत्मविश्वासपूर्ण वाटले. >>> रश्मी + १
मिटीन्ग आहे, दुपारी लिहीते. २
मिटीन्ग आहे, दुपारी लिहीते. २ जवळच्याच आणी माझ्याबाबतीत पण १ अशा घटना लिहीणार आहे. म्हणूनच मामी काय म्हणत आहेत ते मला समजले आहे. ( काही म्हणतीलच उद्देश तुला समजला तर तू का नाही लिहीत म्हणून)
मग ह्या धाग्यावर मांडलेली
मग ह्या धाग्यावर मांडलेली विरुद्ध बाजूची मतं का स्वीकारली जात नाही आहेत ? हा धागा अत्यंत एकांगी विचारसरणीने चालवला जात आहे.......
बादवे ह्यावरही भरपूर प्रवाद आहेत आणि त्याविरुद्ध जगभरात आवाह उठवला गेलेला आहेच. आशा करतो की ते मुद्देही विचारात घेतले गेले असतीलच ... ;फिदी:
http://time.com/3432838/emma-watson-feminism-men-women/
http://www.avoiceformen.com/feminism/feminist-lies-feminism/four-reasons...
http://www.blackgirldangerous.org/2014/09/im-really-emma-watsons-feminis...
http://www.huffingtonpost.com/xojane-/emma-watson-feminism_b_5884246.htm...
आणि बाकी काही वाचलं नसेल तर हे नक्की वाचा.
http://www.xojane.com/issues/emma-watson-he-for-she
Positioning men as the saviors of oppressed women isn’t productive, and devalues the work that feminists have been doing for decades. -- AMY MCCARTHY SEP 24, 2014
<< तसं नाही रश्मी,
<< तसं नाही रश्मी, झोपलेल्यांना उठवता येतं झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवता येत नाही.>> कबुलीजबाबाबद्दल धन्यवाद
कशी गन्मत आहे बघा इथे
कशी गन्मत आहे बघा
इथे पुरुषांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केल्यावर स्त्री वि पुरुष वाद चालू झाले , हेच तुमच्या कुटुंबावर कोणी काही बोलायला लागले की स्त्री पुरुष भेद विसरुन तुम्ही समोरच्याला भिडता, तेच देशावर आले की घरचा बाहेरचा असले भेद विसरुन गळ्यात गळे घालून शत्रूला शिव्या देता, परग्रहवासीयांचा विषय आला की देशाच्याही सीमा गळून पडतात
माणूस एकटा एकटाच खरा असतो, समुहात गेला की तो बदलतो, समुहाचा होवुन जातो
आणि म्हणूनच माझा असल्या कुरापतखोर धाग्यांवर राग असतो!
आशुडी.. अकुची पोस्ट मी मिस
आशुडी.. अकुची पोस्ट मी मिस केली पण वर आलेल्या उत्तरावरून कळली होती. अकुने प्रश्न इथे विचारले तरी ते केवळ इथल्याच लिहित्या असणार्या पुरुषवर्गाला उद्देशून नाहीत ना? मायबोली रोमात किती तरी लोकं वाचतात. इथे कोणी तसे नाहीत ह्याची खात्रह्ही देऊ आपण,पण ज्याअर्थी असे अनुभव पुरुषांकडून येतात त्या अर्थी आहेतच पुरुष असेही. ते प्रश्न कितीही स्नूटी वाटले तरी चर्चा करण्यास उपयुक्त असू शकले असते. (मला समजू शकते येथील पुरुषवर्ग का वैतागला असेल ते. पण बिगर पिक्चर पाहता, टीनेजर्ससाठी सर्व्हे घ्यायला असे प्रश्न उपयोगी पडतीलही.)
अमित आणि आशूडी, पुरुषांची
अमित आणि आशूडी,
पुरुषांची ह्या संदर्भात जबाबदारी काय हा विषय चर्चेला घ्यायचा असल्यास शीर्षक व विषयाची मांडणी कशी असायला हवी ह्याबद्दल मत द्याल का? (हा धागा निघाला त्या वेळेसची मूळ धाग्याची मांडणी मला विस्कळीत वाटली होती व तसे मी माझ्या अगदी पहिल्या प्रतिसादात म्हंटलेलेही आहे - थोडे वेगळ्या शब्दांत). पण नंतर अॅडिशन्स होत गेल्या. आता ह्या धाग्याची मांडणी आणि शीर्षक कसे असायला हवे होते ह्याबद्दल तुमचे मत वाचायला आवडेल.
(बाय द वे आशूडी - मला अजूनही असेच वाटत आहे की तुमच्यात व धागाकर्तीमध्ये झालेले वाद सहज टळले असते, निव्वळ दोन्हीकडच्या गैरसमजातून ते खटके उडले व पुढे तेच ताणले गेले. चु भु द्या घ्या).
तुम्ही का विचारताय बेफि ?
तुम्ही का विचारताय बेफि ? तुम्ही बदणार आहात का शीर्षक ?
सरळ साधा सोपा प्रश्न आहे माझा. जर जबाबदारी सर्वांची आहे तर......
१. ह्या धाग्यावर मांडलेली विरुद्ध बाजूची मतं का स्वीकारली जात नाही आहेत ?
२. पुरुषांनी सामाजिक जबाबदारीने कसे वागावे हे ठरवताना, बायकांनी कसे वागावे हा विषय का हेटाळला जातोय ?
३. दुसर्याने कसे वागावे हे तिसर्याने ठरवण्याचा अधिकार ह्यांना कोणी दिला ?
म्हणूनच मी म्हणतोय की, हा धागा अत्यंत एकांगी विचारसरणीने चालवला जात आहे.......
ही माणसं भेकडच असतात, जरा
ही माणसं भेकडच असतात, जरा हटकले तर भिऊन पळून जातील.
>>
अश्या आशयाचा सूर भरपूर प्रतिसादांमध्ये आढळला. म्हणून लिहितोय.
हे सरसकटीकरण जरा धोकादायक वाटत. उद्या कोणी इथन स्फूर्ती घेऊन हटकले आणि जर मंडळी त्याच्यावर उलटली आणि त्या सदगृहस्थाला मार खावा लागला तर? भेकड मंडळी परत जाउन त्यांची माणसं घेऊन आली तर?
दिमा यांची, बस्के ची पोस्ट
दिमा यांची, बस्के ची पोस्ट आवडली.
अकुची लेटेस्ट पोस्ट ( प्रश्नावली) अॅनॉनिमस सर्व्हे साठी एखाद्या लिंग निरपेक्ष संस्थेने, आणि स्त्री पुरुष दोघांनाही देण्यासारखी आहे. ती पब्लिक फोरमसाठी फारशी उपयोगी नाही.
बाकी धाग्यात बहुतेक मुद्दे बोलुन झालेत.
आत्ता मी लिहीतेय ते फक्त वरच्या पोस्टमधल्या मुद्दा ३बद्दल
<<३. दुसर्याने कसे वागावे हे तिसर्याने ठरवण्याचा अधिकार ह्यांना कोणी दिला ?>> एक्झॅक्टली. तुमचा मुद्दा अगदी पटलाय. नक्कीच दुसर्याने कसे वागावे हे तिसर्याने ठरवण्याचा अधिकार कोणालाच नाही. आणि खरं म्हणजे इतके वर्ष विविध आवाजातुन स्त्रिया हेच सांगत आहेत.
त्यामुळेच एखाद्या स्त्रिनेही किती वाजता बाहेर जावे, कुठले कपडे घालावे/ घालु नये इत्यादी ठरवण्याचा अधिकारही इतर कुठल्याच पुरुषाला किंवा स्त्रीलाही नाही.
( बाकी या धाग्यातल्या काही चांगल्या पोस्ट, मुळ मुद्दा म्हणजे अधिकाराने सांगणे नसुन, एकत्र काम करण्यासाठी मदतीला बोलावणे आहे असे मला वाटते. - काही पोस्टसनी गालबोट लागले मात्र ते पब्लिक फोरमवर होणारच- चांगल्या समाजाने एकत्र काम केलं तर समाजातील वाईट गोष्टी दुर करता येतील. यात पुरुषांबद्दल विचारले गेले कारण स्त्रियांबद्द्लच्या अशा चर्चा सहसा झालेल्या आहेत. यात पुरुष असे शिर्षकात लिहीले नसते तर फारशी चर्चा झालीच नसते, बहुतांश पुरुष या धाग्यावर आले नसते, आणि काही आले असते तरी पुन्हा, कपडे वेळा यापलिकडे चर्चा गेली नसती असे मनापासुन वाटते. )
मुळात या सगळ्याकडे स्त्री
मुळात या सगळ्याकडे स्त्री विरुध्द पुरुष असं का बघितलं जातंय?
मुंबईत लोकल ट्रेनमध्ये गर्दीत जेंट्सच्या डब्यात पुरुषांकडून पुरुषांनाच abuse केल्याच्या घटना घडतात. बायका निदान लेडीज डब्यात सेफ असतात, पुरुष कुठे जाणार?
Child abuse cases मध्येही लहान मुलगेही शिकार होतात. अशा बातम्या वाचनात येतात. सत्यसाईबाबा, माइकल जॅक्सन अशा हाय प्रोफाइल केसेसमध्ये alleged victims हे मेल्स होते- लहान /तरुण मुलगे. अपहरण फक्त कोवळ्या मुलींचं होतं का? मुलांचंही होतं आणि लैंगिक शोषणही होतं. लहानपणी कोणा पुरुषाकडून लैंगिक शोषण केलं गेलं , पुढे त्याचीच सवय झाली आणि मोठेपणी 'गे' बनलो, स्त्री सहवास नकोसा वाटतो असं सांगणारे तरुण पुरुष असतात. बरं एखाद्या मुलीवर अत्याचार झाल्यास लोक दयेने बघतात पण पुरुषावर दुसऱ्या पुरुषाकडून वा स्त्रीकडून abuse झाल्यास 'असा कसा रे तू लेचापेचा तुझ्यात दम नाही का काही' असं म्हणतात
या समस्येकडे शोषण करणारे विरुद्ध शोषणाला विरोध करणारे असं बघितलं तर? आणि पुरूष असं वेगळं काय कर्तव्य पार पाडणार? एक हीरो १० गुंडांना भारी पडला हे फक्त सिनेमात असतं. प्रत्यक्षात हे शक्य नाही. अजून आपण पुरुष जमातीकडून 'knight in shining armour' टाईप टीनेज अपेक्षा ठेऊन आहोत का?
इथे स्त्री पुरुष दोघांकडून प्रॅक्टिकल सजेशन्स वाचायला आवड़तील की स्वताला आणि स्वताच्या मुलीला/मुलाला pretadors पासून कसं वाचवावं?
सावली, जसं << एखाद्या
सावली, जसं << एखाद्या स्त्रिनेही किती वाजता बाहेर जावे, कुठले कपडे घालावे/ घालु नये इत्यादी ठरवण्याचा अधिकारही इतर कुठल्याच पुरुषाला किंवा स्त्रीलाही नाही.>> तसच पुरुषांनी असं वागाव हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीयांना नाही हे मान्य केलत ना ? बास झालं.
cnw
शिर्षकासकट सगळा धागा बोम्बलून सांगतोय....... "पुरुषांनी कसे वागावे"
ह्यालाच तर आक्षेप घेतलाय मी.......पण लक्षात कोण घेतोय ?
बाकी सर्व सोडून द्या, एका
बाकी सर्व सोडून द्या, एका मायबोली वर्षाविहारात, एक पुरुष सदस्य पोहोण्याचे कपडे घालून वावरतं हि तक्रार करणार्या सर्वजणी स्त्रीयाच होत्या.......
आहे ह्यावर उत्तर ?
तुम्हाला तुमचा मुद्दा मान्य
तुम्हाला तुमचा मुद्दा मान्य करुन घ्यायची फारच घाई बाबा.
वर्षानुवर्ष / दशकामागुन दशक स्त्रियांनी काय करावे किंवा करु नये याबद्दल अनेक नियमावली, आज्ञा निघत असताना दुसर्याचे अधिकार वगैरे कधीच फारसे कोणाला जाणवले नाहीत. मात्र आता एखादा चुकार धागा इथे आणि हिफॉरशी सारखी संस्था स्थापन झाली आणि शब्दश: ' पुरुषांनी काय करावे' हे न सांगता ( डिक्टेट न करता) 'सामाजिक जबाबदारी काय असावी' ( नोट - असावीच असे नाही, पण असावी का? असल्यास काय असावी ) अशी चर्चा जर कोणी करु पहात असेल तर लगेचच डिफेन्सिव मोडमधे जाण्याचीही गरज नाही.
धागा काहीच बोंबलुन सांगत नाहीये, चर्चा करु पहातोय. ज्या काही पोस्ट चुकीच्या वाटल्या त्याला स्त्री आणि पुरुष दोघांनीही आक्षेप घेतलेलाच आहे. मला धाग्याबाबत जे काय सांगायचं होतं ते मी माझ्या या आधीच्या पोस्ट मधे आणि या पोस्टच्या पहिल्या परिच्छेदात सांगितले आहे.
Pages