रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.
पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?
या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...
HeForShe : KEY MESSAGES
* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world
* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality
* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.
ABOUT THE CAMPAIGN
HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.
अधिक माहिती :
https://en.wikipedia.org/wiki/HeForShe
***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी
पुरूषांची सामाजिक जबाबदारी -
१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.
२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.
३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.
४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.
५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.
६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.
७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.
८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.
९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.
***********************************************************************************************************
अंजली
बर्याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.
१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?
एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?
"बाफ" आणि "बेफ्या" !! विल बी
"बाफ" आणि "बेफ्या" !! विल बी नोटड अँड युज्ड इन फ्युचर व्हेअरेव्हर अप्रोप्रियट!!
बागुलबुवा, हो, हेच प्रश्न
बागुलबुवा, हो, हेच प्रश्न स्त्रियांनाही लागू आहेत. त्यासाठी तसा बीबी उघडू
स्त्रियांच्या इतर स्त्रियांबाबत असलेल्या प्रतिक्रियाही बरेच काही सांगून जातील असे वाटते.
अकु, जर हा बाफ स्त्रीयांच्या
अकु, जर हा बाफ स्त्रीयांच्या प्रश्नावलीसाठी सयुक्तिक नाही तर मग शिर्षकास अनुसरुन इथे स्त्रीयांच्या पोस्टस् ही गैरलागू ठरतात.
१. आई किंवा सख्खी बहीण सोडून
१. आई किंवा सख्खी बहीण सोडून इतर स्त्रियांचा स्पर्श हवाहवासा वाटतो का? विवाहित असाल तर पत्नी सोडून (किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तर गर्लफ्रेंड सोडून) इतर स्त्रियांचा स्पर्श हवासा वाटतो का? तो मिळावा यासाठी काही विशेष प्रयत्न करता का? उदाहरण दिल्यास बरे पडेल. हा स्पर्श त्या स्त्रीच्या संमतीने होतो का? तिची संमती तुम्हांला कशी कळते?<<<
स्त्रियांचा स्पर्श हवाहवासा वाटतो. वाटणारच! विशेष प्रयत्न करत नाही. त्यामुळे संमतीचा / असंमतीचा प्रश्न उद्भवतच नाही.
२. आपल्या स्त्री सहकाऱ्यांनी कसे, काय कपडे घातले आहेत यावर तुमची त्यांच्या आजूबाजूला वावरायची, त्यांच्याशी संवाद साधायची कम्फर्ट लेवल अवलंबून असते का?<<<
नाही. तोकडे कपडे घालूनही व्यवस्थित वागणार्या आणि अंगभर कपडे घालूनही चवचालपणे वागणार्या मुली / बायका पुष्कळ पाहण्यात आहेत. हेतूपुरस्पर अंगाशी येणार्या, लाडे लाडे बोलणार्या स्त्रियांचा प्रचंड तिटकारा येतो. अश्यांशी बोलताना कंफर्ट जाणवत नाही.
३. तुम्ही एखाद्या स्त्रीचा नकार कसा समजून घेता? म्हणजे तिचा नकार आहे हे तुम्हांला कसे कळते?<<<
नकार कशासाठी? स्त्री-पुरुष हे नाते लैंगीक अर्थाने पुढे नेण्यासाठी? इथे काय प्रत्येकजण 'कधी एकदा कुठलीतरी स्त्री हो म्हणतीय' अश्या हेतूने प्रत्येक स्त्रीशी वार्तालाप करत असतो की काय? नकार कळण्याचा प्रश्न तेव्हा येणार जेव्हा आपण काही प्रस्ताव मांडू! प्रस्ताव तेव्हाच मांडला जातो जेव्हा ते नाते तितके गहिरे, अंडरस्टँडिंग असलेले झालेले असते. त्यात नकारांनी राग येण्याचा प्रश्नच येत नाही.
४. कोणी आजूबाजूची स्त्री आपल्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे अनकम्फर्टेबल होते आहे असे तुम्हांला कधी जाणवते का? कोणत्या प्रकारच्या वागण्या / बोलण्यामुळे हा डिसकम्फर्ट जाणवतो? तो जाणवल्यावर तुम्ही तुमच्या वागण्या/ बोलण्यात काही बदल करता का? कोण्या स्त्रीने ती तुमच्या वागण्या/बोलण्यामुळे अनकम्फर्टेबल होत आहे असे तुम्हांला सुचवले किंवा स्पष्ट सांगितले तर तुमची प्रतिक्रिया काय असते? त्या स्त्रीबद्दल तुम्ही भविष्यात मनात आकस बाळगता का? किंवा तिच्यावरून जोक्स करता का? (इतर सहकारी / पुरूष सहकारी)<<<असला काहीही अनुभव येत नाही. उलट मी प्रामुख्याने एखाद्या ग्रूपमध्ये प्रत्येकजण (स्त्री व पुरुषही) कंफर्टेबल फील करेल ह्याची दक्षता घेतो.
५. स्वत:च्या संपर्कात येणाऱ्या स्त्रियांचे "चारित्र्य" तुमच्यासाठी कितपत महत्त्वाचे असते? संपर्क = प्रोफेशनल नाते, शेजारी, नातेवाईक, मैत्रीण, सहकारी, सहाध्यायी, शिक्षिका, जोडीदार वगैरे. येथे चारित्र्य शब्द हा त्या स्त्रीचे आचार, विचार, उच्चार, सवयी, वावर या संदर्भात आहे. तुमच्या संपर्कात येणाऱ्या पुरूषांचे चारित्र्य तुमच्यासाठी महत्त्वाचे असते का? कितपत?
तसेच तुमच्या घरी येणाऱ्या स्त्रीचे "चारित्र्य" तुम्हांला कितपत महत्त्वाचे वाटते? तोच नियम तुमच्या घरी येणाऱ्या पुरूषांना लागू होतो का?<<< संपर्कात येणार्या स्त्रियांच्या चारित्र्याशी मला काहीही घेणेदेणे नसते.
६. घराजवळ, नाक्यावर, ऑफिसजवळ किंवा अन्य सार्वजनिक स्थळी आधुनिक वेशातील स्त्रियांचा जथा रात्री उशीरापर्यंत जोरजोरात हसणे, बोलणे, जोक्स, टाईमपास इत्यादी करत बसला असेल तर तुमची प्रतिक्रिया काय असते? हाच ग्रुप जर मिक्स्ड ग्रुप असेल (स्त्री-पुरूष) तर तुम्ही वेगळ्या प्रकारे रिअॅक्ट होता का? किंवा हाच ग्रुप जर फक्त पुरूषांचा असेल तर तुमची रिअॅक्शन तीच असते की बदलते? कशाप्रकारे?<<<
फक्त स्त्रिया असतील तर पूर्वी नवल वाटायचे. आता विशेष काहीच वाटत नाही.
७. रस्त्याने दारू पिऊन झिंगलेला पुरूष चालताना दिसला तर तुमची होणारी प्रतिक्रिया व रस्त्याने दारू पिऊन झिंगून चालणाऱ्या स्त्रीला पाहून तुमची होणारी प्रतिक्रिया - या सेम असतात का? हेच इतर व्यसनांच्या बाबतीतही.<<<
अशी स्त्री पाहिलेली नाही, म्हणजे रस्त्यात झिंगणारी पाहिलेली नाही. खासगी / घरगुती समारंभात पाहिलेली आहे. तिच्याशी इतके छान, मैत्रीपूर्ण संबंध असतात की तिच्याविषयी काहीच वेगळे वाटत नाही, जे पुरुषाविषयीही वाटत नाही की 'कशाला प्यायची इतकी' वगैरे!
८. बायकांचे अग्रेसर वागणे तुमच्या मनावर दडपण आणते का? बाईशी स्पर्धा करायला लागल्यास व त्यात अपयश आल्यास तुम्ही ते अपयश इतर अपयशांइतके पचवू शकता का? एखाद्या बाईकडून तुम्ही स्पर्धेत मागे टाकला गेलात याचे जास्त वैषम्य वाटते का?<<<
स्पर्धेत मागे टाकला जाण्याचे वगैरे मुळीच वैषम्य वाटत नाही. पण श्रीमंती आणि सुबत्तेच्या जोरावर तोंड सोडून, आक्रस्ताळेपणा करणार्या आणि अतीशहाणपणा करणार्या बायकांचा संताप येतो. हा पुरुष व स्त्रीच्या जडणघडणीतील फरक आहे. पुरुष बेपर्वा वागत नाहीत असे नाही, पण त्यांना दुसरा पुरुष कसा वागेल ह्याचे थोडे तरी टेन्शन असते. स्त्रियांना 'आपल्याला सभ्यपणेच वागवले जाणार' ह्याची (बहुतेक ठिकाणी) खात्री असल्याने त्या बेताल बोलू लागतात. ते आवडत नाही. त्यात पुरुषी अहं वगैरे मात्र नसतो.
>>>निर्माण होणारे जे चित्र
>>>निर्माण होणारे जे चित्र आहे ते सर्वत्र लैंगिक शिक्षण किती, कोणत्या पातळीवर आवश्यक आहे हे तर अधोरेखित करेलच, शिवाय स्वत:ला एक आरसा म्हणूनही कामी येईल असे वाटते.<<<
लैंगीक शिक्षण आवश्यक आहे की नाही हे ठरवणे हे ह्या धाग्याचे उद्दिष्ट नाहीच. स्वतःला आरसा म्हणून जाहीररीत्या उत्तरे द्यायला लावणे अजिबात पटत नाही. (तरीही मी माझ्यापुरती उत्तरे दिली आहेत).
महत्त्वाची टीप - कोणीतरी
महत्त्वाची टीप -
कोणीतरी 'कालपासून मी तेच म्हणत आहे' अशी पोस्ट टाकण्याची शक्यता आहे. तर हा बदल केवळ गेल्या काही वेळात झालेला आहे. मूळ धागा तिकडे जात नव्हता. अरुंधतींच्या प्रश्नावलीमुळे तमाम पुरुषजातीबद्दल एक शंका (मेबी नकळतपणे) उपस्थित केली गेलेली आहे. आधीच्या चर्चेत 'सर्व पुरुषांना' कोर्टात उभे केले गेलेले नव्हते.
(अमित, हे तुझ्यासाठी नाही, तुझ्या आणि माझ्या मतांमध्ये फरक असला तरी तू असे वाद घालणार नाहीस हे माहीत आहे).
अवांतर : बागुलबुवा, कृपया
अवांतर :
बागुलबुवा, कृपया तुमची वि.पु. चेक कराल का?
धन्यवाद.
धन्यवाद बेफिकिर. बागुलबुवा,
धन्यवाद बेफिकिर.
बागुलबुवा, तुमचेही मागच्या प्रतिसादात त्वरित उत्तरे दिल्याबद्दल आभार मानायचे राहून गेले.
अकु, तु हे जे प्रश्न दिले
अकु, तु हे जे प्रश्न दिले आहेत ते या धाग्याकरता उपयोगी नाहीत. कोणत्याही सार्वजनिक धाग्याकरता उपयोगी नाहीत. या प्रश्नांची उत्तरं पुरुषांच्या वयोगटाप्रमाणे बदलू शकतात. हे प्रश्न एखाद्या संस्थेतर्फे केल्या जाणार्या सर्व्हेमध्ये फिट होतील कारण त्यावेळी अॅनॉनिमस राहून प्रामाणिक उत्तरं दिली जाण्याची शक्यता वाढते.
या प्रश्नांच्या नादात मूळ धागा (जो आधीच वादळात सापडल्यानं भिरभिर फिरला आहे) तो पारच पल्याड उडून जाईल असं वाटतं.
माझ्या मते वर हेडर मध्ये दिलेल्या नव्या माहितीच्या अनुषंगानं पुढे चर्चा सुरू करायला हवी. या नव्या माहितीमुळे हा धागा, त्याचं शीर्षक आणि त्याचा हेतू हे अवास्तव नाहीये इतपत सहमत होण्यास हरकत नसावी.
जर याउप्परही कोणाला धाग्याचं शीर्षक खटकत असेल तर इथे लिहिलं नाही तरी चालेलच. आग्रह अजिबात नाहीये. हे शीर्षक असंच आहे हे गृहित धरून पुढे चला. दुसर्या शिर्षकासाठी दुसरा धागा काढा. सिंपल!
अरुंधती ह्यांची प्रश्नावली
अरुंधती ह्यांची प्रश्नावली अतिशय हास्यास्पद आहेच त्यावरही बेफिकिर ह्यांचा प्रतिसाद फालतूपणाचा कहर आहे.
हुप्पाहुय्या हे तुम्ही योग्य
हुप्पाहुय्या हे तुम्ही योग्य भाषेत ( जसे मामीनी लिहीले आहे तसे) लिहु शकला असता, नाही का?
अकु, ह्या धाग्याच्या
अकु, ह्या धाग्याच्या हेडरमध्ये टाकलेली तुझी पोस्ट आणि अंजलीचे प्रश्नही संतुलित आहेत. माझ्या मते शीर्षकात जो प्रश्न विचारलाय त्याचं ते अगदी खणखणीत आणि ( जे तसं वागत नाहीत त्यांना ) अंतर्मुख व्हायला भाग पाडणारं तुझं ते उत्तर आहे. ते मुद्दे कोण कसं अप्लाय करतं ह्याचे वैयक्तिक अनुभव सांगण्याव्यतिरिक्त वेगळी जबाबदारी आता काय सांगितली जाणार असे वाटले.
पण हे नवीन प्रश्न मात्र ( विशेषतः प्रश्न क्रमांक १ आणि ३ ) मला अनावश्यक आक्रमक आणि योग्य सामाजिक वर्तन असणार्या पुरुषांना अपमानकारक वाटू शकतील असे वाटले.
दीड मायबोलीकर, तुमची पोस्ट उत्तम आहे पण रोग होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आणि रोग झाल्यावर त्याचा संसर्ग रोखण्यासाठी घ्यायची खबरदारी हे दोन स्वतंत्र विषय आहेत. हा धागा संसर्ग रोखण्याच्या खबरदारीबाबत आहे.
रमा, सूज्ञ स्त्रियांना कुठल्या ठिकाणी कुठला पेहराव करावा ह्याचे भान असतेच. गर्दीच्या ठिकाणी किती टक्के स्त्रियांनी खरंच उत्तान म्हणता येतील असे कपडे घातलेले असतात ? फार फार तर पाच-दहा टक्के ? बाकीच्या सगळ्या स्त्रिया योग्य समाजमान्य वेषांतच असतात तरी त्यांना असभ्य नजरांना, स्पर्शांना सामोरं जायला लागते ही वस्तुस्थिती आहे. भारतातल्या सार्वजनिक जागी वावरणार्या बहुसंख्य स्त्रिया 'योग्य' कपड्यांतच असताना 'अंगभर कपडे घालून स्वतःला झाका असं सांगितलं तर राग येतो' हे वाक्य लिहिणे त्यामुळे अगदीच निरर्थक ठरते. विकृत पुरुषाला स्त्रीने काय कपडे घातलेत ह्याच्याशी कर्तव्य नसते आणि नॉर्मल पुरुष उत्तान कपडे घातलेली स्त्री बघूनही मर्यादा ओलांडणार नाही ह्यावरुन कपडे आणि लैंगिक शोषण ह्यांचा एकमेकांशी म्हणावा तसा संबंध नाही हे लक्षात येते.
अरुंधती , तुमच्या
अरुंधती , तुमच्या प्रश्नावलीची प्रींटआउट काढून मी मुलाला व नवर्याला भरायला देते बघु काय उत्तरे येतात.
हो, रमा यांच्या मुद्द्याला
हो, रमा यांच्या मुद्द्याला उत्तर द्यायचं राहिलंच.
अगो + १.
पण तरीही त्यातूनही समजा कोणी स्त्रीनं तसे कपडे घातले म्हणून तिला शारीरिक अथवा शाब्दिक त्रास / शिक्षा करण्याचा आपल्याला अधिकार आहे असं काही पुरुषांना वाटतं ते भयावह आहे.
उत्तरे जाहीर रीतीने लिहिली
उत्तरे जाहीर रीतीने लिहिली नाहीत तरी चालेल. पण या प्रश्नांची उत्तरे स्वत:शीच तपासून अवश्य बघावीत. स्त्रीबद्दलची धारणा गेल्या शतकात बाह्यत: बरीच बदलली. केवळ संपत्ती, भोगवस्तू, एक दासी, गुलाम यांपासून ते व्यक्ती, माणूस म्हणून तिला अनेक ठिकाणी मिळणारी वागणूक हे त्याचेच प्रतीक आहे. परंतु ही वागणूक सर्वकालीन, सर्वदेशीय, सर्वस्थितीतील स्त्रियांना मिळत नाही हेही तितकेच सत्य आहे. घडणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांमागे ही असमान वागणूक बऱ्याच अंशी आहे हेही एक सत्य आहे याबद्दल दुमत नसावे.
अगोला अनुमोदन ! बेफिकिरींच्या
अगोला अनुमोदन !
बेफिकिरींच्या १७:४७ च्या पोस्टीलाही अनुमोदन.
३. तुम्ही एखाद्या स्त्रीचा नकार कसा समजून घेता? म्हणजे तिचा नकार आहे हे तुम्हांला कसे कळते? >>>> हा प्रश्न अगदी 'टू मच !!' प्रकारचा वाटला.
आता अरूंधती उत्तरे जाहीर लिहिली नाहीत तरी चालेल असे म्हणते आहे. पण मुळात हा तीन नंबरचा प्रश्न मी मला विचारावाच का ? नकार नक्की कशासाठी ?
प्रत्येक पुरूष हा संपर्कात येणार्या प्रत्येक स्त्रीकडे फक्त आणि फक्त लैंगिक दृष्टीकोनातूनच किंवा भावनेतूनच बघतो असा समज असेल तर तो कृपया काढून टाका. हा एक प्रकारचा फोबिया आहे असं मला वाटतं आहे.
समस्त पुरूष जातीला आरोपीच्या पिंजर्यात उभं करायचा हेतू नाही हे मामींनी स्पष्ट करून तसा अर्थ निघणारी (जरी हेतू तसा नसला तरी) स्वतःची पोस्टही एडीट केली होती. पण विषय परत परत तिकडेच जातो आहे. (स्त्रीयांच्या वागण्यावर, कपड्यांवर घसरणार्यांना 'पालथे घडे' इथे म्हणातात, तर मग समस्त पुरूषांचं सरसकटीकरण करणार्यांना 'उलट्या कळश्या' म्हणावं का ?
(पालथ्या घड्यांना सपोर्ट करत नाहीये.. पण जस्ट अ थॉट.. )
उत्तरे जाहीर रीतीने लिहिली
उत्तरे जाहीर रीतीने लिहिली नाहीत तरी चालेल.
>> कदाचित अकु, जर हे प्रश्न म्हणून न लिहिता, मुद्दे म्हणून लिहिलेस तर जास्त प्रभावी ठरतील असं मला वाटतं.
३. तुम्ही एखाद्या स्त्रीचा
३. तुम्ही एखाद्या स्त्रीचा नकार कसा समजून घेता? म्हणजे तिचा नकार आहे हे तुम्हांला कसे कळते? >>>> हा प्रश्न अगदी 'टू मच !!' प्रकारचा वाटला. > +१
प्रश्न फार चुकिचा आहे. कुठल्याही स्त्रीला देखील हा प्रश्न उलटा करून विचारला तर अपमानास्पद वाटेल.
>>>पण या प्रश्नांची उत्तरे
>>>पण या प्रश्नांची उत्तरे स्वत:शीच तपासून अवश्य बघावीत. <<<
ह्यावर 'आम्ही आमचे बघून घेऊ' अशी उत्तरे देणारे वीर येथे आहेत हे कृपया लक्षात घ्यावेत अशी विनंती! सर्वत्र काळोख पसरला, चिडीचूप शांतता झाली की ते येऊन असे काहीतरी लिहून जातात.
कोणाला मी विचारलेले प्रश्न
कोणाला मी विचारलेले प्रश्न खटकले असतील तर मनापासून सॉरी! पण स्त्रीचा नकार नक्की कोणत्या प्रकारे एखाद्या पुरूषाला त्या नकाराची खात्री पटवतो? याचे काही उत्तर मिळाले तर बघावे म्हणून विचारला होता तो प्रश्न. एखादी मुलगी/ बाई तोंडी नकार देते तेव्हा "ती जास्त भाव खाते आहे" असे चमत्कारिक निष्कर्ष याअगोदर ऐकले आहेत.
एखादी मुलगी/ बाई तोंडी नकार
एखादी मुलगी/ बाई तोंडी नकार देते तेव्हा "ती जास्त भाव खाते आहे" असे चमत्कारिक निष्कर्ष याअगोदर ऐकले आहेत. >
पहिले विचारले काय आहे नकार कुठल्या गोष्टीसाठी मिळाला आहे हे तर बघुन घ्यायला हवे. "ती जास्त भाव खात आहे" हे निष्कर्ष १०० पैकी ९६ वेळा तरी प्रेमप्रकरणात / मैत्रीप्रकरणात काढले जातात. यात "लैगिंक विचार" बर्याचदा नसतात. सामान्य पुरूष / मुलगा यांची सुरुवात "वन नाईट स्टँड" या मानसिकतेने नसते. आणि ज्यांचे असतात ते असे कॉलेजटाईप निष्कर्ष काढत नसावेत.
पराग, आरोपीच्या पिंजर्यात
पराग, आरोपीच्या पिंजर्यात कोणालाच उभं केलेलं नाहीये. झालं काय की पुरुषांना प्रश्न विचारल्यामुळे बरेच पुरुष डिफेन्सिव्ह मध्ये गेले. आणि त्यामुळे त्यांनी बर्याच गोष्टींचे उलटेसुलटे (आणि अनेकदा सोयीचे आणि सवयीचे) अर्थ काढून वाद घालायला सुरूवात केली.
कळायचे त्याना बरोबर कळलेले
कळायचे त्याना बरोबर कळलेले असते रश्मी, तुम्ही नका लोड घेउ
फक्त त्यांच्याकडे उत्तरे नसल्याने तेच तेच बोलून धागा घुमवत ठेवतात!
नकार स्त्रीसहकाऱ्याला 'साथ
नकार स्त्रीसहकाऱ्याला 'साथ में कॉफी पीने चलते हैं क्या?', 'घरपे छोड दूँ क्या?' इथपासून ते एखाद्या परिचित स्त्रीशी सलगी वाढवायचा प्रयत्न येथपर्यंत कोठेही मिळू शकतो. मिळालेला नकार पचतोच असे नाही. त्यामागे तिचा छुपा होकारच आहे किंवा आणखी पाठपुरावा केला तर ती 'पटेल' असा विचार करणारे पाहिलेत. मग तिला विनाकारण फोन, एसेमेस वगैरे. तिने कोणापाशी तक्रार केली की तेही आवडत नाही. यातूनही विनयभंगाच्या केसेस घडतात हेही कदाचित बातम्यांमधून वाचले असेल. हे 'प्रेमप्रकरण'ही नसते व मैत्रीप्रकरणही नसते. पण तरी गुन्हे होत राहातात.
मी विचारलेले प्रश्न उडवून टाकते. धागा भरकटवायचा उद्देश अजिबातच नाही व नव्हता.
आरोपीच्या पिंजर्यात कोणालाच
आरोपीच्या पिंजर्यात कोणालाच उभं केलेलं नाहीये. झालं काय की पुरुषांना प्रश्न विचारल्यामुळे बरेच पुरुष डिफेन्सिव्ह मध्ये गेले. >> हाऊ जजमेंटल, बट नथिंग अनयुज्वल, धागा ऊघडला तेव्हाच ' आय एम बीईंग जजमेंटल' असे बोल्डमध्ये लिहिलेले सगळ्यांना दिसले नाही ह्याचे नवल वाटले.
मामी आणि अरुंधती कुलकर्णी (ज्यांच्या आधीच्या पोस्ट्स कन्सट्रक्टिव आणि संतुलित वाटल्या) ह्या आयडींच्या पोस्ट्स आता 'सेल्फ पिटी' आणि 'फिअर माँगरिंग' टाईप्स होत/झाल्या आहेत.
अगो +1
अगो +1
एखादी वस्तू किवा व्यक्ती
एखादी वस्तू किवा व्यक्ती हवीशी वाटणे यात काही गैर नाही.
त्यानंतर ती वस्तू किवा व्यक्ती आपल्याला मिळणार नाही हे माहित असताना आपण कसे वागतो हा खरा मुद्दा आहे. आणि बहुतेक वेळा इथेच आपल वागण चुकत.
जर सर्वांनी याचा विचार केला आणि आपल्या वागण्याने दुसर्याला त्रास होत नाही याची काळजी घेतली तर बरेच प्रश्न उद्भवणारच नाहीत. पण दुर्दैवाने असे सहसा होत नाही.
कोणत्याही बाबतीत नकार पचवण्याची क्षमता नसणे हे बहुतेक सर्व प्रकारच्या हिंसेचे (शारीरिक, शाब्दिक, मानसिक इत्यादी) मुख्य कारण असते.
जोपर्यंत असा विचार प्रयत्नपूर्वक करायला आणि आचरणात आणायला आपण शिकत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारेल असे वाटत नाही.
आता हा धागा बंद करावा
आता हा धागा बंद करावा का?
कोणाच्या डोक्यात काही मुद्दे राहिले असल्यास, ते मांडायचे असल्यास काही दिवसांनी त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने साधारण याच आशयाचा नवा धागा सुरू करावा.
अन्यथा धाग्याच्या पुर्वार्धात जी काही चांगली, बरी, ठिकठाक चर्चा झाली तिचा ईफेक्टिवनेस कमी होण्याची शक्यता आहे.
असे मला वाटते.
धागे काढायचा आणि बंद करायचा
धागे काढायचा आणि बंद करायचा काय एकेक उत्साह असतो लोकांना!
(No subject)
Pages