रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.
पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?
या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...
HeForShe : KEY MESSAGES
* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world
* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality
* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.
ABOUT THE CAMPAIGN
HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.
अधिक माहिती :
https://en.wikipedia.org/wiki/HeForShe
***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी
पुरूषांची सामाजिक जबाबदारी -
१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.
२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.
३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.
४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.
५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.
६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.
७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.
८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.
९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.
***********************************************************************************************************
अंजली
बर्याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.
१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?
एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?
पहिल्या पानावरचा माझा
पहिल्या पानावरचा माझा प्रतिसाद अनाठायी नव्हता हे मागच्या पानांवरचे प्रतिसाद वाचताना लक्षात आलं.
फा, वाक्य क्र. १
फा,
वाक्य क्र. १ "सगळे/बहुसंख्य भारतीय पुरूष असे करतात" असा वाटला नाही.
वाक्य क्र. २ "भारतात हा त्रास खूप सर्रास जाणवतो"
हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत का? भारतात त्रास खूप सर्रास जाणवतो, तर तो त्रास देणारे कोण? (उदा.) म्यानमारमधून स्पेशल त्रास देणारे येतात का इकडे? >>>
तो त्रास देणारे भारतीय पुरूषच. पण सगळे/बहुसंख्य नाही. रेल्वे प्लॅटफॉर्म वर, थिएटर मधे असे आठ दहा नग निघाले तरी हे निरीक्षण असे होऊ शकते. आणि जे अनुभव लिहीलेले आहेत अनेकींनी वरती, त्यावरून प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी काही लोक हमखास गैरफायदा घेतात असे दिसते. अशाच अर्थाचे अनुभव भारतातील मराठी पेपर्स्/मासिकांमधल्या लेखातही वाचले आहेत.
समजा तुमची ८-१० वर्षांची
समजा तुमची ८-१० वर्षांची मुलगी स्कूलबस मधून उतरून समोरच असलेल्या तुमच्या बिल्डिंगकडे येत आहे. कोणा एका माणसानं (गुंड नव्हे. लहान मुलगी एकटी आहे या संधीचा फायदा घेणार्या एखाद्या विकृत इसमानं) तिला त्रास द्यायला सुरूवात केली. रस्त्यावरून एखादाच पुरुष अथवा स्त्री जात आहे. अशावेळी त्यांनी काय विचार करावा?
जाऊ दे, त्या मुलीचा प्रॉब्लेम आहे. ती आणि तिच्या घरचे बघून घेतील. असा विचार करावा का? तोच योग्य आहे असं दिसतंय.
<< रस्त्यावरून एखादाच पुरुष
<< रस्त्यावरून एखादाच पुरुष अथवा स्त्री जात आहे. अशावेळी त्यांनी काय विचार करावा? >>
आता हेच शिर्षकात येऊदे की. "पुरुष आणि स्त्री"
एक अॅड करावंसं वाटलं
एक अॅड करावंसं वाटलं म्हणून.. बाकीचे मुद्दे इतर सर्व आदरणिय सदस्य कव्हर करतीलच.
- स्त्रियांबद्दल अत्यंत वाईट विचार असणा-या स्त्रिया आणि पुरूष यांना शक्यतो समजावून सांगणे, न समजल्यास चारचौघात पाणऊतारा करणे गरजेचे आहे. कारण त्यामुळं आणखी चार जणांना ही गोष्ट चुकीची आहे आणि याचे परिणाम असे होतात याची जाणीव होते. वारंवार सांगूनही समजत नसल्यास परिस्थितीनुसार सामाजिक, कायदेशीर उपायांचा विचार केला गेला पाहीजे.
- खाजगीत घाणेरडे विचार असलेले पण चारचौघात मुखवटा घेतलेले लोक हे जास्त धोकादायक असतात. कारण ते चांगल्या वाईटाची जाण असूनही हे सर्व करत असतात. अशांना एक्स्पोज करणं ही सामाजिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. काहींच्या बाबतीत अशा व्यक्ती खाजगीत कशा आहेत हे माहीत असूनही केवळ उच्च स्थानावर आहे, पैसेवाला आहे म्हणून मान दिला जातो. अशांचे भंपक विचार ऐकणे हे नुसतंच असह्य नाही तर त्या विचारांची केलेली टिंगल वाटू शकते. त्यामुळे अशा विचारांना गुळमुळीतपणा प्राप्त होण्याचा धोका असतो. अशांना मुळीच महत्त्व दिले जाऊ नये. ये काय सांगतात हे कितीही योग्य असेल तरी माणसाची ओळख क्रुतीने होत असल्याने तो एक विनोद बनू शकतो.
पण मदत न करु शकणार्यांचीही
पण मदत न करु शकणार्यांचीही काहि कारणे नक्कीच असतील. सरसकट त्यांना बेजबाबदार ठरवणं कितपत सयुक्तिक आहे ??> ही काही कारणे जर "कोण लफड्यात पडेल?" "पोलिसांचं झंझट कोण लावून् घेईल?" "मरेनात का तिकडे! अजून चार मेली तरी काय फरक पडतोय?" "दुसरं कोणीतरी बघेलच" ही असतील तर मी तरी त्या व्यक्तींना बेजबाबदार म्हणेन. मदतीची गरज नसताना मदत करा असा कोणी हाकारा पिटत नाही. पण किमान मदतीची गरज आहे का ते तरी विचारा!!! तेवढं तरी सामाजिक भान असायला हवं ही अपेक्षा चूक आहे का?
कहर, बेजबाबदार आणखी काहीही
कहर, बेजबाबदार आणखी काहीही लेबलं लावली तरी चालेल. आणखी ज्यांना कुणाला त्या वाक्याचा हवा तसा अर्थ काढून विपर्यास करायचा तर खुशाल करा. मागच्या पानावरच्या माझ्या पहिल्याच पोस्टीत मला जे लिहायचं होतं ते आलं आहे. ज्यांनी वाचलं नसेल त्यांना हे वाक्य का ही ही वाटू शकतंच. त्याबाबतीत वाद होण्याचं कारणच नाहीये.
ये क्या हुवा, कैसे हुवा, कब
ये क्या हुवा, कैसे हुवा, कब हुवा!
मला जर आत्ता मॉडरेटर केलं तर यातल्या विषयाशी संबंध नसणार्या पोस्टस उडवून बाकीच्या चांगल्या चर्चेला टाळं लागणं/ वाहता होणं या प्रकारापासून वाचवू शकेन.

स्वताचा मुद्दा पटवण्यासाठी
स्वताचा मुद्दा पटवण्यासाठी जेंव्हा काही लोक या चर्चेत ८-१० वर्षाच्या मुलीला आणतात तेंव्हा यांना कसे समजवावे तेच कळत नाही!
कुठलाही मुद्दा कुठेही घेउन जातात
बुमरँग, आत्ता खरा तुम्हाला
बुमरँग, आत्ता खरा तुम्हाला प्रॉब्लेम जाणवलेला दिसतोय.
एक अनुभव शेअर करायला
एक अनुभव शेअर करायला आवडेल.
आमच्या घरासमोर देवीचं मंदीर आहे. मंदीरात बाजुला बांबुचं छोटंस बेट आहे. तिथे अनेकदा जवळच्या कॉलेजमधले कप्ल्स येऊन गप्पा मारत बसलेले असतात. याच मंदीरात शेजारी एक घर आहे आणि तिथे रहाणारा एक माणूस देवीची पुजा वगैरे करतो.
एके दिवशी सकाळी गॅलरीचं दार उघडलं तर दिसलं एक मुलगा एका मुलीला बेदम मारहाण करत होता. लाथा - बुक्क्यांनी तुडवत होता. बांबू काढून रपारप मारत होता. ती मुलगी तिथुन निघुनही जात नव्हती. हे बघुन मी बाबांना आणि आईला बोलावलं.
बाबांनी गॅलरीतून आवाज मारला की ए काय करतोयेस रे मुला. कशाला मारतोयेस तिला? त्यावर त्या मुलाने माझ्या बाबांना आई- बहिणीवरून शिव्या घातल्या (मुल्गा माझ्या वयाचा होता) आणि म्हणाला मधे पडू नकोस नाही तर घरात येऊन मारेन. यानंतर बाबांनी सोसायटी मधे काही जणांना फोन केले तर सगळ्यांनी यात मला पडायचं नाही आणि तुम्हीही पडू नका म्हणून हात झटकले.
बाबा पोलीसांना फोन करणार होते पण आम्ही त्यांना ते करू दिलं नाही कारण आम्हाला आमच्या बाबांची काळजी जास्त आहे त्या मुली पेक्षा (स्वार्थी म्हणा किंवा काहीही पण हे खुप नॉर्मल आहे. त्यावेळेला घरातली परिस्थीती आणि त्या मुलाचा धमकी द्यायचा टोन बघता आम्हाला हेच करणं योग्य वाटलं)
यानंतर जवळपास तास दिड तास त्या मुलीला खुप मारल्या नंतर तो मुलगा आणि मग ती मुलगी निघून गेले (मंदिरात लोकांचं येणं जाणं चालूच होतं)
नंतर मी त्या देवीची पुजा करणार्या काकांना जेंव्हा विचारलं की तुम्ही यात का पडला नाहीत तेंव्हा त्यांनी सांगितलं मगे एकदा एका कपलला त्यांनी तिथे बसून भांडणं करण्या बाबत हटकलं होतं तेंव्हा त्या मुलाने आणखी ५-६ लोकं घेऊन येऊन (हा आणि तो मुलगा एकच नाही पण मुलं एक सारख्याच बॅकग्राऊंड मधली होती) या काकांना बेदम मारहाण केलेली आणि तेंव्हा पासून ते कोणाच्याही मधे पडत नाहीत.
अर्थातच हा प्रसंग इथे या चर्चेत यावा असा नाही पण लिहिण्याचं कारण हेच की असल्या लोकांशी एकट्याने डिल करणं शक्य नाही. जमावाने साथ द्यायला हवी.
अशा जमावाचा आपण नक्की भाग व्हावं एवढं खरे!
सुरुवात झाली तरच कुठे तरी progress होईल.
माझ्या समोर छेडखानीची कुठली घटना घडत असेल तर मी मधे पडेन की नाही माहीत नाही पण त्या घटनेला सोशल मिडियावर फेमस करण्याचा प्रयत्न नक्की करेन.
पण्यात त्या मुलीने मला साथ दिली नाही तर मात्र मी शांत बसणं प्रेफर करेन
रीया संतुलीत योग्य
रीया संतुलीत योग्य पोस्ट.
असल्या लोकांशी एकट्याने डिल करणं शक्य नाही.
अशा जमावाचा आपण नक्की भाग व्हावं एवढं खरे! +१
तीन, चार समांतर चर्चा
तीन, चार समांतर चर्चा चाललेल्या दिसत आहेत. त्या अश्या:
१. स्त्रियांना सामोरे जावे लागण्याच्या लैंगीक अपराधांमध्ये स्त्रियांची जबाबदारी काय, बाकीचे घटक कितपत कारणीभूत हे थोडा वेळ बाजूला ठेवून एकंदरीत कोणीही पुरुष काय भूमिका घेऊ शकतात / इच्छितात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे - मूळ चर्चाप्रस्ताव
२. मला जाणवलेल्या दुसर्याच्या (किंवा माझ्यासुद्धा) संकटासाठी तिसर्याने जबाबदारी स्वीकारावी हे म्हणणे अनाठायी आहे - बागुलबुवांचे म्हणणे! - ह्यावर असे म्हणणे आहे की अनेक अनेक कारणांपैकी 'पुरुषी मानसिकता' ह्या एका विषयावर मते मागवलेली दिसत आहेत. इतर कारणे नाहीत असे म्हंटले गेलेले दिसत नाहीत. टेक्निकली शीर्षक आणि लेखांची शब्दरचना ह्यावरून हरकत घ्यायची झाली तर मायबोलीवरील अनेक धागे रद्दबातल ठरू शकतील. हे माझे नम्र व प्रामाणिक मत! नो ऑफेन्स!
३. धागाकर्तीने प्रश्नाचे सरसकटीकरण केलेले असून इतर स्वरुपाच्या पण सिमिलर संकटांमध्ये तिर्हाईत पुरुषांकडून काहीच अपेक्षा कशी काय करता येईल - आशूडी - मला असे वाटते की सरसकटीकरण हा शब्द थोडासा गैरसमजुतीतून आलेला असावा. अॅक्च्युअली सगळ्याच स्त्रियांना हे सगळेच प्रॉब्लेम्स भेडसावत असावेतच. वाद केवळ 'तिर्हाइताकडून अपेक्षा का ठेवावी' इतकाच असताना वाक्पटूत्व किंवा अधिकाधिक अचूक प्रतिसाद देऊन 'आपली भूमिका अचूक असल्याचे' ठसवण्याचा निष्कारण प्रयत्न होत आहे दोन्हीकडून! थिएटर काय, गणेशोत्सव काय, लोकल ट्रेन काय किंवा कोणतीही गर्दी काय! मूळ धाग्यामध्ये 'आजूबाजूला -तथाकथित (?) - किंवा खरेच सभ्य असणारे पुरुष असताना त्यांच्याकडून सहाय्याची अपेक्षा करताही येऊ नये इतकी त्यांची मानसिकता अलिप्त आहे का असा असावा. किंवा, अश्या अलिप्त वगैरे राहणार्यांनी 'आता ह्यापुढे काय करायचे ठरवले आहे' असा सवाल असावा. हा सवाल कोणतीही स्त्री विचारू शकते. तिने तो आधी तिच्यावरच्या संस्कारांना, मनात कायम असलेल्या भीतीला, गर्दीत वगैरे न जाण्याच्या सर्वमान्य पॉलिसीला विचारावा ह्या सर्व शक्यता काही वेळ बाजूला ठेवून पुरुषांनाच विचारला आहे इतकेच.
४. डुप्लिकेट आय डीं नी चालवलेले मुद्दे - नो कमेंट्स
मला जाणवतंय की मुळात
मला जाणवतंय की मुळात आजूबाजूला काही घडतंय किंवा घडत असेल तर त्याकडे डोळेझाक करून आपल्या(च) कामाशी मतलब राखायची वृत्ती जागोजागी वाढत चालली आहे. माझ्या शेजारच्या इमारतीतून भांडणाचे आवाज येतात. कोणीतरी ओरडते, कोणी रडते, कोणी किंचाळते. मला जोवर कोणी थेट मदत मागत नाही तोवर मी कशाला लक्ष घालू, असा विचार करून मी गप्प बसते. (कदाचित मी इथे पोलिस हेल्पलाईनला संपर्क करू शकते. पण ते मलाच १०० प्रश्न विचारतील किंवा नंतर वैताग आणतील अशी शंका येते.) हा शहरीकरणाचा दोष की बोथट जाणिवांचा, ते माहीत नाही. एकीकडे मदत न मिळाल्याने घडणारे निर्घृण अपराध आहेत तर दुसरीकडे मदत करायला गेल्यावर गोत्यात येणारी किंवा वेळप्रसंगी जीव गमावणारी मंडळी आहेत. तुमच्या घरातील कोणाचा मदत न मिळाल्यामुळे जीव गेला तर चालेल? किंवा मदत करायला गेल्यामुळे जीव गेला तर चालेल? मी स्वत:ला हे दोन्ही प्रश्न विचारले व उत्तर नकारार्थी आले.
कोणाला विरोध करणे सोपे आहे. पण ती व्यक्ती उद्या तुमच्या जीवावरही उठू शकते हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. विरोध करताना जमतील तेवढे साक्षी पुरावे जमवणे उचित ठरेल. आणि शरमेची बाब ही की एवढे करूनही गुन्हेगार मोकळा फिरेल, त्याला कोणतीही सजा होणार नाही याची व्यवस्था येथील भ्रष्टाचार शक्य करेल. :|
(सॉरी, पण हा हताशपणा जायचा तर सामूहिक हालचाल हेच प्रभावी साधन ठरेल. कोणा एकाला टारगेट व्हावे लागणार नाही.)
रीया, तुझ्या जागी तु बरोबर
रीया, तुझ्या जागी तु बरोबर होतिस.अश्या लोकांना ज्योशमध्ये येऊन भांडून बोलून काही उपयोग नाही.
एखाद्या वेळेस प्रेमाने समजावले तर काही परिणाम होईल.पण आरे ला कारे म्ह्टले तर जास्त पेटणार खरे तर यांना समुपदेशाची गरज असते पण हे करणार कोण?
नळी फुंकली सोनारे, इकडुन
नळी फुंकली सोनारे, इकडुन तिकडे गेले वारे
मध्यंतरी टीव्हीवर एक जाहिरात
मध्यंतरी टीव्हीवर एक जाहिरात येत असे.
शेजारपाजारच्या घरात तुम्हाला कौटुंबिक हिंसेची काही लक्षणे आढळली तर माणूस जाऊन बेल दाबायचा आणि म्हणायचा की मी आता पोलिसांना सांगेन! हिंसा करणार्याचा चेहरा उतरायचा.
सगळेच गुंडच असतील असे नव्हे. सगळीकडेच हस्तक्षेप करणारा सलमान किंवा अमिताभ असायला हवा असेल असे नव्हे.
काही ठिकाणी घरात वाघ असणारे 'बेल वाजवून कोणी हस्तक्षेप करत आहे' ह्यानेही दचकतील.
आता आता तर मला असे वाटायला लागले आहे की ह्या धाग्यातून जे सुचवण्यात आले आहे ते सुचवले जावे हेही मान्य होत नसावे.
बरेच काही शिकवत आहे ही चर्चा
(संपादन - बरेच काही शिकवत आहे ही चर्चा, बायकांनाही बहुधा)
मामी जे करत आहेत ते समुपदेशच
मामी जे करत आहेत ते समुपदेशच आहे पुरषांना स्वता:हा मध्ये डोकावण्याची संधी.ते उघड कबुली देऊ अथवा नाही पण आत्मनिरीक्षण जरुर करत असावेत.
हो ना आणि ही चर्चा वाचुन
हो ना आणि ही चर्चा वाचुन शहाणे झालेले सगळे पुरुष आता एकदम शहेनशाह बनणार!
तुम्ही पण बनलात का?शहेनशाह.
तुम्ही पण बनलात का?शहेनशाह.
>>>एक मुलगा एका मुलीला बेदम
>>>एक मुलगा एका मुलीला बेदम मारहाण करत होता. लाथा - बुक्क्यांनी तुडवत होता. बांबू काढून रपारप मारत होता. ती मुलगी तिथुन निघुनही जात नव्हती<<<
>>>यानंतर जवळपास तास दिड तास त्या मुलीला खुप मारल्या नंतर तो मुलगा आणि मग ती मुलगी निघून गेले (मंदिरात लोकांचं येणं जाणं चालूच होतं)<<<
रीया,
सहसा इतक्या काळात बांबू आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्यावर कोणतीही व्यक्ती किमान बेशुद्ध झाली असती.
मला इतकेच म्हणायचे आहे की :
१. ती मुलगी पळून का गेली नाही?
२. त्या मुलीने इतरांकडे मदत का मागीतली नाही?
३. ती मुलगी इतका मार सहन कसा करू शकली?
४. तास-दिड तास बांबूने रपारप आणि लाथा-बुक्क्यांनी मार सहन केल्यावर ती स्वतःहून निघून कशी जाऊ शकली?
अरुंधती, परत एकदा मुद्देसुद
अरुंधती, परत एकदा मुद्देसुद पोस्ट !
अरूंधती, बरोबर लिहीलेस.
अरूंधती, बरोबर लिहीलेस. रीयासारखेच अनेक अनुभव मलाही आलेत. जोपर्यंत आपण स्वत: सेफ नाही तोवर हीरोगिरी करायला जाणं जीवावर बेतणारंच ठरेल. म्हणूनच माझं म्हणणं होतं की परक्या तिसर्याच माणसाकडून अपेक्षा करणं अ-वास्तव ठरेल. त्याच्या काय मर्यादा आहेत हे आपल्याला कुठे ठाऊक असतं? उद्या त्याच्या मागावर जाऊन त्या हलकट माणसाने त्याच्या कुटूंबीयांना त्रास दिला तर ही हीरोगिरी त्याला केवढ्याला पडेल? पूर्वीची एक म्हण आठवली, ज्याचा हात तुटेल त्याने गळ्यात बांधावा. तरीही चित्र इतकं निराशाजनक नाहीये. अशा चर्चांतून निदान अनेक पुरूष स्वत: असे हलकट प्रकार करणार नाहीत असे झाले तरी पुष्कळ हातभार लागेल. आणि जमावातून विरोधात सहभागी झाले तरी.
स्त्री ने स्वता:हाचा बचाव
स्त्री ने स्वता:हाचा बचाव स्वता:हा करण्याचा प्र्यत्न करावा.
एका हाताच्या बोटांची नखे वाढवावित बोचकारण्यासाठी
चप्पल टोकदार टाचेची घालावी बसमध्ये पाय तुडवन्यासाठी.
बस मध्ये उभे राहावे लागले तर हाताचे कोपरे मागे घ्यावेत खेटायला आला तर मागुन कोपरे लागले पाहिजे.
आई बहिनी ची आठवन करुन द्यावी.
गेले २-३ दिवस हा धागा वाचतेय.
गेले २-३ दिवस हा धागा वाचतेय. हुश्श!
शीर्षकच मला पटले नाही. एक पुरुष म्हणून सामाजिक जबाबदारी ही, स्त्री म्हणूनच्या सामाजिक जबाबदारीपेक्षा वेगळी कशी? समाज हा स्त्री- पुरुष मिळून बनलेला आहे. प्रत्येक व्यक्ति ही घराबाहेर पडली की समाजाचा घटकच आहे. सामाजिक बांधिलकी ही लिंग सापेक्ष नसते. असो.
रियानी सांगितलेलं उदाहरण मला प्रातिनिधिक वाटते. मीही अशीच रीअॅक्ट झाले असते. पब्लिक प्लेस मधे मारहाण, टिंगल टवाळ्या, छेडछाड करणार्या लोकांकडे शस्त्र (पिस्तुल, चाकू इ. ) असण्याची शक्यता असते. तेव्हा मदतीला जाणे धोकादायक असते. एखाद्या व्यक्तिला मदत करताना/वाचवताना माझ्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाला वार्यावर सोडण्याचा धोका पत्करायचा की नाही याचा विचार करायलाच हवा.
सगळी चर्चा येऊन येनकेन
सगळी चर्चा येऊन येनकेन प्रकारे "कुनी अशा वेळी मदत करावी की नाही" इथवरच येऊन थांबलेली दिसत आहे. छेडखानी, बलात्कार, मारामारी याही व्यतिरीक्त इतरही काही वेळा आपल्यावर सामाजिक बांधीलकी असू शकते याचा विचार करायला हवाय.
एक पुरुष म्हणून सामाजिक जबाबदारी ही, स्त्री म्हणूनच्या सामाजिक जबाबदारीपेक्षा वेगळी कशी? समाज हा स्त्री- पुरुष मिळून बनलेला आहे. प्रत्येक व्यक्ति ही घराबाहेर पडली की समाजाचा घटकच आहे. >> त्या प्रत्येक घटकाची जबाबदारी, हक्क, संघर्ष आणि लढाया या भिन्न आहेत. स्त्री-पुरूष असो, वा शहरी ग्रामीण असो वा उच्च-मागासवर्गीय असो. समाज ही काय एकजिनसी वस्तू नाही, म्हणूनच पुरूषाची सामाजिक जबाबदारे एही स्त्रीपेक्षा भिन्न आहे.
विषय काय, लिहिताहेत काय?
विषय काय, लिहिताहेत काय? कुणिही काहिही पुड्या सोडुन जात आहे. बनावट, अतिरंजित किस्से टाकु नका. मुळ प्रश्न आहे की पुरुष काय बदल घडवु शकतात. सुरुवात अर्थातच स्वतःपासुन होत असते
एक अनुभव शेअर करायला
एक अनुभव शेअर करायला आवडेल.>>> मलाही.
२महिन्यांपूर्वी मी कुर्ला स्टेशनच्या ब्रिजवरून उतरत असताना एक व्यवस्थित बाई एका पुरुषाला(लांबून ती व्यक्ती बारीक केसांमुळे पुरुष वाटली) थाड थाड मारत असताना मी पाहिली.
तोंडाने आरडाओरड चालू होती.मी प्लॅटफॉर्मवर आले तेव्हा पाहिले की ,पुरुष वाटलेली व्यक्ती एक बाईच होती.एवढी हाणामारी चालत असताना ,मधे कोणीही पडत नव्हते.रेल्वे पोलीस आला पण तोही काही करताना लांबून दिसला नाही.
मला वाटले ,बाईचा हात कसा धरायचा या विचाराने बाकीचे लोक मधे पडले नसतील.माझी स्वतःची तिकडे एकटीने जायची टाप नव्हती.म्हणून पंजाबी ड्रेसमधील ,एका पोरसवद्या मुलीला विचारले की चल पाहू या बिचारी बरीच मार खातेय.तीही तयार झाली .आम्ही गेलो आणि ती मुलगी कधी गर्दीत घुसली कळण्याचाआधी मुलीने पटकन त्या व्यक्तीचे मागून हात असे पकडले की तिला हलता येईना.त्या पकडण्याच्यावेळी ,हावभावाने आपली पर्स घ्यायला तिने सांगितले.मी आपली तिची पर्स आणि आणखी बॅग घेतली.त्या मुलीने आणि रेल्वे पोलीसाने त्या व्यक्तीला नेले.ती मुलगी परत येईपर्यंत अर्धा तास प्लॅटफॉर्मवर तिच्या बॅगा संभाळत होते.
(ती व्यक्ती एक वेडी होती हे नंतर कळले.ती बरेचजणांना मारत होती.) पण त्या दोघांनाही ती आवरत नव्हती .त्यावेळी मदत करायला इतर पुरुषच होते.
इथे ट्रेन आल्याआल्या सर्व लेडीज ट्रेनमधे चढून गेल्याही. आधीही कुणीच आल्या नव्हत्या.
ती पोरसवदा मुलगी एक पोलीस होती हे पण नंतर कळले.त्यावेळी वाटले की ही आधी का मधे पडली नाही.तिला विचारणार तर ती लगेच दुसर्या स्टेशनला उतरलीही.कदाचित ड्यूटी संपली असेल किंवा बॅग्जचे काय करायचे असेही वाटले असावे.
पण त्यावेळी प्लॅटफॉर्मवरच्या बायकांच्या उदासीनतेचा राग जरूर आला.लकीली ती मुलगी पोलीसातली होती.त्यांना ते ट्रेनिंग दिले गेले असावे.
भांडणात आपण नाही पडू शकत पण हात तर धरू शकतो किंवा तसा प्रयत्न तर करू शकतो.
रियाच्या अनुभवात तिचे बरोबरच आहे. मीही कदाचित तसाच विचार केला असता.
एवढा वेळ चांगल्या चालेल्या
एवढा वेळ चांगल्या चालेल्या चर्चेचा सूर थोडा खटकू लागलाय.
स्त्री-पुरुष आयडी, वा पुरुष-पुरुष आयडी यांच्यात वाद-मतभेद झाले तर समजू शकतो.
पण स्त्री-स्त्री आयडींमध्ये जर मतभिन्नता असेल तर त्यांनी सामंजस्याने चर्चा करावी अशी अपेक्षा, न की विरोधाचा सूर लावत वाद.
असो, आता सध्या चालू असलेल्या मुद्द्यावर..,
जमावाला चेहरा नसतो. जर जमाव एकत्र चाल करून गेला तर गुंड प्रवृत्तीची व्यक्ती असेल तरी शरण येते, तसेच कोणा एकावर राग ठेवून बदला घेईन याची शक्यता कमी असते.
पण प्रॉब्लेम हा असतो की एकमेकांना न ओळखणारा हा जमाव सहजपणे एकत्र येऊन चाल कसा करणार. बरेचदा प्रत्येक जण वाट बघत असतो की दोनचार जण पुढे आले तर मी सुद्धा घुसेन, आणि यातच वाट बघत राहतो. यावर माझ्यामते एक सोपा उपाय म्हणजे अश्यावेळी ‘ओये ओये, ओये ओये..’ असा मोठ्याने आरडाओरडा करायचा. लगेच दोनचार जण आणखी करतात आणि आवाज वाढत जातो. बळ वाढत जाते.
काही शहरांत ही, म्हणजे अपप्रकारांच्या विरोधात जमाव तयार होणे ही गोष्ट सहज घडते, तर काही शहरांत चुकूनही घडत नाही. कारण त्या त्या शहरातील लोकांची एक तयार झालेली मानसिकता. म्हणून सकारात्मक मानसिकता तयार होण्यासाठी आता इथे काही पब्लिक धुलाईचे सकारात्मक किस्से शेअर होऊद्यात.
बाळ ऋन्मेष आणि पब्लिक धुलाईचा
बाळ ऋन्मेष
आणि पब्लिक धुलाईचा अधिकार तुला कोणी दिला म्हणे? चार लोक मारत आहे तर मी पण हात धुवून घेतो अश्या भेकड विचारसरणींच्या, संधी मिळाली तर ईतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सामाजिक जबाबदारी पार पाडणार्या व्यक्तींची खचितच अपेक्षा नसेल त्यांना जे ईथे कळकळीने लिहित आहेत.
ह्याच जमावातील गर्दीचा फायदा घेवून जर पुन्हा पिडित व्यक्तीचाच गैरफायदा घेतला गेला तर त्यांना कोण अडवणार? पुन्हा धुलाई मध्ये संशयित दगावला तर जमाव त्याची जबाबदारी घेणार का? म्हणजे एकाने दुसर्याला मारले तर अन्याय आणि जमावाने एखाद्याला मारले तर तो न्याय का? आणि ह्याला धार्मिक रंग चढला तर मग काय? दंगली आणि जाळपोळ का?
मूल्य शिक्षण आणि एकट्या दुकट्याचे सक्षमीकरण नव्हे (ते पण खरं हवेच आहे) तर सामाजिक कायदा आणि सुव्यवस्थेचे बळकटीकरण हेच दोन ऊपाय आहेत. केवळ गुन्हा घडल्यावरच नाही तर अनसेफ वाटते म्हणून सरकारी कार्यालयांवर मोर्चे, पब्लिक अवेअरनेस, कार्यशाळा, हेल्प लाईन, सपोर्ट ग्रूप, कामाच्या ठिकाणी मॅनेजमेंटवर सोयी सुविधांसाठी द्बाव ई. प्रोअॅक्टिव गोष्टी करायला हव्यात. आणि हो! ही पुरुषांची आणि ही स्त्रियांची सामाजिक जबाबदारी असे न करता संपूर्ण समाज त्यातील एका घटकाला होणार्या त्रासाच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतो आहे असे चित्रं व्हावे. लेडीज स्पेशल डबा, बसमध्ये रिझर्व सीट्स सारख्या गोष्टी सुद्धा कुणाच्या तरी प्रयत्नातुनच झाल्या आहेत ना, आज तेवढ्याच गोष्टी पुरेश्या नाहित म्हणून ईतर ऊपायांसाठी नव्याने एकत्रित प्र्यतन करावे लागणार.
Pages